Accident News
Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News: मोठी बातमी! पेण खोपोली मार्गावर भीषण अपघात; ३ प्रवासी ठार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन कदम

Raigad: सर्वत्र शिवजयंतीचा उत्साह सुरू असतानाच रायगडमधून एका भीषण अपघाताची घटना घडली आहे. रायगडमधील पेण खोपोली मार्गावर वाक्रुळ गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. ज्यामध्ये तीन प्रवासी जागीच ठार झाले असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मदतकार्याला सुरूवात झाली आहे. (Latest Marathi Update)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, रायगडमधील पेण खोपोली मार्गावर वाक्रुळ गावाजवळ इको कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या भीषण अपघातानंतर महामार्गावर गाड्यांची मोठी गर्दी झाली आहे. प्रवाशांच्या मदतीने अपघातग्रस्तांना मदत करण्याचे काम सुरु आहे. या भीषण धडकेत लाल रंगाच्या इक्को गाडीचा चक्काचूर झाला आहे. (Accident News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court: ...तर मानधन सोडा, घशाला आराम द्या; रोहतगींच्या त्या विनंतीवर CJI चंद्रचूड यांचं उत्तर

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! शतकी खेळीनं मुंबईच्या लल्लाटी विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

SCROLL FOR NEXT