Accident News Saam TV
महाराष्ट्र

Accident News : अवकाळी पावसाने घेतला मजूराचा बळी; विहिरीत काम करताना कोसळली दरड

Accident News : शेतातील विहिरीत काम करणाऱ्या एका मजुराच्या डोक्यात दगड पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झालाय.

साम टिव्ही ब्युरो

Chhatrapati Sambhaji Nagar : राज्यात सध्या सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी गारांचा पाऊस देखील पडत आहेत. अशात सिल्लोड येथून एक दु:खद बातमी समोर येत आहे. येथील एका मजूराचा पावसामुळे दरड कोसळल्याने मृत्यू झालाय. या घटनेमुळे परिसरात शोकाकूल वातावरण पसरलं आहे. (Accident News)

मिळालेल्या माहितीनुसार, सिल्लोड तालुक्यातील अनाड येथे गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. अशात शेतातील विहिरीत काम करणाऱ्या एका मजुराच्या डोक्यात दगड पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झालाय. शिवाजी दामोधर हातोळे असे मृत मजूराचे नाव आहे.

विहिरीत काम करत असलेला आणखी एक मजूर या घटनेत जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मजूर विहिरीत काम करत असताना मुसळधार पावसाला सुरूवात झाली होती. पावसामुळे विहिरीतील वरचा एक दगड खाली कोसळला. घटनेची माहिती मिळताच अजिंठा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने मृत आणि जखमी मजूराला विहिरीतून बाहेर काढले. जखमी मजूराला अजिंठा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शुक्रवारी देखील अवकाळी पावसामुळे मोठी दुर्घटना घडली. गंगाखेड तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने दोघांचा मृत्यू झाला. तर ३ जण गंभीर जखमी झालेत. बाळासाहेब फड(50) परशुराम नागरगोजे (34) अशी या मृत व्यक्तींची नावे आहेत. शेतात शेती काम करत असताना ही घटना घडली आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथे वीज पडल्याने एका पंधरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. शेळगाव येथील गिरजप्पा दुधाजी मुलगीर यांच्या शेतात काम करत असताना ओंकार भागवत शिंदे (वय 15)या मुलावर अचानक वीज कोसळली. त्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: इगतपुरी ते कसारा दरम्यानच्या समृद्धी महामार्गावर दरड कोसळली

School Holiday: शाळा-कॉलेज उद्याही बंद राहणार, कुठे-कुठे घेण्यात आला सुट्टीचा निर्णय? वाचा सविस्तर

Chanakya Niti : नवरा बायकोत 'ही' गोष्ट नसेल तर तुटेल नातं

Mumbai Tourism : पावसाळ्यात जोडीदारासोबत जा रोमँटिक लाँग ड्राईव्हवर, मुंबईतील ५ बेस्ट लोकेशन

Shocking News : आईने दोन पेग घेतले त्यानंतर..., हत्या करून निळ्या ड्रममध्ये मृतदेह लपवला, चिमुकल्यानं सांगितलं वडिलांसोबत काय घडलं?

SCROLL FOR NEXT