Samruddhi Mahamarg Saam tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Accident News: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! दोघांवर काळाचा घाला; एअरबॅग उघडली पण...

भरघाव गाडीचा टायर फुटल्याने हा भीषण अपघाता झाला आहे. ज्यामध्ये दोघांना जीव गमवावा लागला..

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन बनसोडे, शिर्डी

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका काही थांबत नसल्याचे चित्र दिसत आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण झाल्यापासून या महामार्गावर भिषण अपघाताच्या घटना समोर येत आहेत.

आता पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली असून या दुर्देवी अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. समृद्धी महामार्गावर कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात हा अपघात घडला आहे. (Samrudhi Mahamarg)

याबाबत अधिक माहिती अशी की, आज दुपारच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात मारुती सुझुकी कंपनीची ब्रेजा कार क्र.एम एच ४९ बीबी ६६२० चा डाव्या बाजूचा टायर फुटून ती कार दुभाजकावर आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की कारच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

या भीषण अपघातात राजेश रहाटे वय वर्षे ५२ आणि अलका वझुलकर वय वर्षे ४२ यांचा मृत्यू झाला आहे. तर लीना रहाटे, वय वर्षे १८ आणि अवंतिका वझुलकर, वय वर्षे १६ या दोघी जखमी झाल्या असून त्यांच्यावर कोपरगाव येथील एस.जे.एस. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, अपघात झालेले चारही जण वैद्यकीय कारणासाठी नागपूरहून नाशिकच्या दिशेने चालले होते. मात्र शिर्डी इंटरचेंज अवघ्या काही अंतरावर असतानाच कोपरगाव शिवारात गाडीचा टायर फुटल्याने हा भिषण अपघात झाला. ज्यामध्ये दोन जणांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Accident News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kumbha Rashi : आरोग्यात काळजी, नोकरी-व्यवसायात प्रगती, कसा असेल कुंभ राशीचा आजचा दिवस

Gautam Gaikwad Missing: सिंहगडावरील गौतमचा अपघात की घातपात? सीसीटीव्हीतील हुडीवाल्यामुळं गूढ वाढलं

Maval Farmer: 'जीव गेला तरी चालेल एक इंचही जमीन देणार नाही'; रिंग रोडला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

Uttar Pradesh Crime: ५ दिवसाआधी पत्नीच्या मृत्यू, सहाव्या दिवशी दीड वर्षाच्या मुलासोबत BSF जवानाची गंगेत उडी

कोकणी माणसाला चाकरमानी म्हणायचं की कोकणवासीय?, कोकणी लोकांच्या भावना जाणून घ्या

SCROLL FOR NEXT