IPL 2023 Schedule : क्रिकेटप्रेमी आयपीएलचे सामने कधी सुरु होणार याची वाट पाहत आहे. क्रिकेट रसिकांची प्रतीक्षा आता संपली आहे. कारण आयपीएलचं वेळापत्रक आता जारी झालं आहे. येत्या 31 मार्चपासून आयपीएलचा नवा सीजन सुरु होणार आहे.
आयपीएलचा पहिला सामना 31 मार्चला होणार आहे. पहिला सामना गुजरात टायटन्स म्हणजेच हार्दिक पांड्याचा संघ आणि एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसके यांच्यात होणार आहे. हा सामना अहमदाबादमध्ये होणार आहे. तर 21 मे रोजी अंतिम सामना होणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना 22 मार्च रोजी होणार आहे. म्हणजेच टीम इंडियाचे खेळाडू आणि आयपीएल खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना सुमारे आठ दिवसांचा ब्रेक मिळेल.
IPL 2023 ग्रुप
ग्रुप A: मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स.
ग्रुप B : चेन्नई सुपर किंग्ज, पंजाब किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, गुजरात टायटन्स.
52 दिवसांत 10 संघांमध्ये 70 लीग सामने खेळवले जातील. त्यानंतर चार प्लेऑफ सामने खेळवले जातील. अशा प्रकारे या स्पर्धेत एकूण 74 सामने होणार आहेत. 18 डबल हेडर म्हणजे एका दिवसात दोन सामने असतील. सर्व सामने देशभरातील एकूण 12 मैदानांवर खेळवले जातील. गेल्या वेळी गुजरात टायटन्सने अंतिम फेरीत राजस्थान रॉयल्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते.
सामने कुठे पाहता येतील?
आयपीएलच्या प्रसारणाचे हक्क यावेळी डिजिटल आणि टीव्ही असे स्वतंत्रपणे देण्यात आले आहेत. मोबाईलवर म्हणजेच जिओ सिनेमाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर IPL चे थेट प्रक्षेपण पाहू शकाल. त्याचे अधिकार Viacom18 ला देण्यात आले आहेत. टीव्हीवर सामन्याचा आनंद घ्यायचा असेल, स्टार स्पोर्ट्सवर ते पाहू शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.