accident news 
महाराष्ट्र

सोनपेठ- नरवाडी रस्त्यावर अपघात; दोन ठार, चार गंभीर जखमी

सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत अशी प्राथमिक माहिती पाेलिसांनी दिली.

राजेश काटकर

परभणी accident news : परभणी (parbhani) जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील सोनपेठ येथून नरवाडीकडे ऊस गाळपास घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली पाठीमागून येणाऱ्या ऑटोवर पलटी झाली. या अपघातात (accident) दाेन जण ठार तर चार जण जखमी झाले आहेत.

या अपघाता मृत्यू झालेल्यांमध्ये सविता बंडू मोरे आणि यशवंत सलगर अशी नावे आहेत. हे दाेघे ऑटोतून प्रवास करीत हाेते. या अपघातात बंडू रामकिशन मोरे, गणेश लक्ष्मण गोरे, मनीषा रामेश्वर काटे व राजूबाई माळी हे गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठविले आहे. काहींना बीड जिल्ह्यातील परळी आंबाजोगाई येथे पाठवण्यात आले आहे. सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत अशी प्राथमिक माहिती पाेलिसांनी दिली.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Drunk Driving : दारूच्या नशेत मध्यरात्री ऑडी वाऱ्याच्या वेगाने पळवली, फुटपाथवरील ५ जणांचा चिरडले

Ladki Bahin Yojana: विकास निधी येण्यास विलंब..., शिंदेंच्या नेत्यानंतर दादांच्या शिलेदाराचाही लाडकीवर सवाल

Dadar Tourism : मनसोक्त शॉपिंग अन् चौपाटीची भेळ, वीकेंडला करा दादरची सफर

आधी मसाला स्प्रे, मग शरीरावर चाकूनं वार, अभिनेत्रीच्या चारित्र्यावर संशय घेऊन नवऱ्यानं केला हल्ला

Shravan 2025: श्रावण महिन्यात दिल्लीतील 'या' रहस्यमय शिवमंदिरांना भेट द्यायला विसरू नका

SCROLL FOR NEXT