Buldhana News Saam Tv
महाराष्ट्र

Accident : मजुरांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोला एसटीची धडक, २ महिलांचा जागीच मृत्यू; ५ गंभीर

Buldhana Accident News : बुलढाण्यात एसटी बसने पिकअपला दिलेल्या भीषण धडकेत दोन महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी आहेत. मजुरीसाठी आलेल्या परराज्यातील महिलांवर काळाने घाला घातला. पोलीस तपास सुरू.

Alisha Khedekar

  • बुलढाण्यात एसटी बस–पिकअप भीषण धडकेत दोन महिला मजुरांचा जागीच मृत्यू.

  • पाच महिला गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू

  • पिकअपमध्ये चढत असताना अपघात

  • मृत महिला परराज्यातील आहेत

बुलढाण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मजुरीच्या शोधात आलेल्या परराज्यातील दोन महिला मजुरांवर काळाने घाला घातला आहे. मालवाहू वाहनाला भरधाव बसने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, देऊळगाव राजा येथील कापूस जिनिंगमध्ये परराज्यासह अमरावती जिल्ह्यातून आलेल्या अनेक महिला मजुरांचे वास्तव्य आहे.. रोजीरोटीच्या शोधात आलेल्या या महिला कापूस वेचण्यासाठी पिंपळगाव येथे जाण्यासाठी मालवाहू पिकअप मध्ये चढत होत्या. याच दरम्यान जाफराबाद- जालना मार्गावरून जाणाऱ्या एसटी बस ने पिकअपला मागून जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात दोन मजूर महिलांचा जागीच मृत्यू झाला असून ५ महिला गंभीर जखमी आहेत. या दुर्घटनेत मृत झालेल्या महिलांचे नाव मायाबाई सुरज काजले (वय 32), मुक्काम रामखेरा, ता. खगनार, जि. बुरहानपूर, रिचाय काल्या कासदेकर (वय 72), मुक्काम नांदुरी, ता. धारणी, जि. अमरावती असे आहे.

जखमी महिलांना प्राथमिक उपचारांनंतर जालना येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्या सर्वांच्या प्रकृतीची स्थिती गंभीर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. दरम्यान या दुर्घटनेबाबत पोलीस अधिक तपास करत असून मृत मजूर महिलांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरेंच्या मनसेचे २ उमेदवार गायब? राजकीय वर्तुळात खळबळ

कल्याणमध्ये मोठी राजकीय घडामोड; दोन दिग्गज नेत्यांची एकत्र बैठक, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

ऐन निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; बड्या नेत्याचा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'

Ladki Bahin eKYC: थर्टी फर्स्टची डेडलाईन तरी ई-केवायसी सुविधा सुरूच; लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक घोळ?

Friday Horoscope : नव्या वर्षाचा पहिला शुक्रवारी ठरेल लकी; जुळणार प्रेमाच्या रेशीम गाठी, ५ राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार

SCROLL FOR NEXT