Pune : नवले पुलावरील भीषण अपघातानंतर आरटीओची मोठी कारवाई; १५ दिवसांत २४ लाखांचा दंड वसूल

Navle Bridge Accident : नवले पुलावरील भीषण अपघातानंतर पुणे आरटीओने खेड शिवापूर–नवलेपूल दरम्यान विशेष मोहीम राबवली. १५ दिवसांत ८२४ वाहनचालकांवर कारवाई करून २४ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
Pune : नवले पुलावरील भीषण अपघातानंतर आरटीओची मोठी कारवाई; १५ दिवसांत २४ लाखांचा दंड वसूल
Pune News Saam Tv
Published On
Summary
  • नवले पुल अपघातानंतर आरटीओची मोठी मोहीम

  • १५ दिवसांत ८२४ वाहनचालकांना दंड.

  • वेगमर्यादा उल्लंघन, हेल्मेट, सीट बेल्ट, विमा नसणे यावर लक्ष केंद्रीत

  • आतापर्यंत २४ लाखांचा दंड वसूल

सचिन जाधव, पुणे

काही दिवसांपूर्वी नवले पुलावर भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत निष्पाप ८ जणांचा मृत्यू झाला. या भयावहा दुर्घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. नवलेपूल परिसरात झालेल्या भीषण अपघातानंतर वाहतूक सुरक्षेची स्थिती सुधारण्यासाठी पुणे आरटीओ कडून खेड शिवापुर टोल नाका ते नवले पुलदरम्यान विशेष मोहीम राबवून कारवाई केली जाते.

गेल्या १५ दिवसांत या पथकाकडून ८२४ वाहन चालकांवर विविध नियम भंगाबाबत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत २४ लाखाचा दंड वसूल केला आहे.आरटीओकडून विनाहेल्मेट,सीट बेल्ट,विमा,वाहनातील तांत्रिक बिघाड, वेग मर्यादेचे उल्लंघन आणि मोबाईल वापर यासारख्या गंभीर प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून तपासणी केली जात आहे

Pune : नवले पुलावरील भीषण अपघातानंतर आरटीओची मोठी कारवाई; १५ दिवसांत २४ लाखांचा दंड वसूल
Local Train News : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' स्थानकातील कामामुळे लोकल वेळापत्रकात मोठा बदल, जाणून घ्या

नवले पुल परिसरात भीषण अपघात होऊन आठ जणांचा मृत्यू झाला होता. यात वाहनाचा वेग जास्त असल्याचे दिसले होते. तसेच अनेक वाहन चालकाकडून नियमांचे पालन केले जात नव्हते. त्यामुळे आरटीओकडून दोन बदकामार्फत वाहनांची तपासणी करून कारवाई करण्यात येते.

Pune : नवले पुलावरील भीषण अपघातानंतर आरटीओची मोठी कारवाई; १५ दिवसांत २४ लाखांचा दंड वसूल
Today Weather : राज्यात पुढील काही दिवस थंडी कायम! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, जाणून घ्या IMDचा इशारा

या कारवाईत चुकीच्या ठिकाणी पार्किंग करणे ११३, वाहनांचा विमा संपलेले ९५, वाहनांची योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण न केलेले ८९,हेल्मेटचा वापर न करणारे ८५,वाहन चालवताना मोबाईलवर बोलणारे ४७, ब्रिक लाईट झालेली ४७,सीट बेल्टचा वापर न करणारे २६,अशा ८०० हून अधिक वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. नियमाचे पालन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.यापुढे देखील ही कारवाई सुरू राहणार असल्याचे आरटीओकडून सांगण्यात येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com