(अमोल काळे, रत्नागिरी)
माझे कुंटुंब माझ्या पाठीशी असल्याने माझा विजय झाल्याचं ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी राजन साळवी यांची तब्बल दोन तास चौकशी केली. एसीबीच्या कार्यालयातून बाहेर आल्यानंतर उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. यावेळी साळवी यांनी कार्यकर्त्यांशी आणि माध्यमांशी संवाद साधला. (Latest News)
आमच्या मागे लागलेल्या शुक्ल कष्टाचे उत्तर आम्ही देणार आहोत. श्रीराम जसे वनवासातून परतले, त्याचप्रमाणे आम्ही देखील सुखरूप भविष्यामध्ये परतू. माझ्या ज्येष्ठ बंधूंमागे शुक्ल कष्ट लावण्याचा हेतू असू शकतो. परंतु माझं कुटुंब माझ्या पाठीशी आहे, त्यामुळे हाच माझा विजय झाल्याचं राजन साळवी म्हणाले. माझ्या कुटुंबाला त्रास देण्याचे काम सुरू आहे, माझी जनता या संदर्भातील उत्तर देईल, असं राजन साळवी म्हणाले. दरम्यान बेकायदा संपत्ती गोळा केल्याचा आरोपाखाली साळवी यांची चौकशी मागील दीडवर्षापासून केली जात आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
एसीबीने साळवी यांना याप्रकरणी चौकशीसाठी बोलवलं होतं. त्यावेळी राजन साळवी सर्व कागदपत्र घेऊन एसीबी कार्यालयात दाखल झाले होते. दरम्यान उत्पन्नापेक्षा ११८% संपत्ती जास्त असल्याचा आरोप साळवी यांच्यावर करण्यात आलाय. पोलीस एफआयआरमध्ये राजन साळवी, त्यांची पत्नी आणि मुलावर आरोप करण्यात आलेत. राजन साळवी यांची मूळ संपत्ती 2 कोटी 92 लाख अंदाजे असून त्यांनी ३ कोटी ५३ लाखांची अपसंपदा जमा केल्याचा एसीबीचा आरोप आहे. ऑक्टोबर २००९ ते २ डिसेंबर २०२२ पर्यंत या १४ वर्षात साळवी यांनी ही बेकायदा संपत्ती जमा केल्याचा आरोप आहे. गेल्या दीड वर्षांपासून राजन साळवी यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांची याप्रकरणी चौकशी सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.