maharashtra police  saam tv
महाराष्ट्र

Bribe: ५०० रुपयांची लाच घेताना सदर बझार पाेलीस ठाण्यातील कर्मचारी सापडला

पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी यांनी गुन्ह्याबाबतची माहिती साम टीव्हीला दिली.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : पाेलीस ठाण्यातून प्रमाणपत्र देण्यासाठी पाचशे रुपयांची लाच (bribe) स्वीकारताना साेलापूरातील (solapur) सदर बझार पाेलीस ठाण्यातील (sadar bazar police station) एका पोलीस नाईकास एसीबीने (acb) रंगेहात पकडले आहे. नाना शिंदे असे त्याचे नाव असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने दिली. (solapur latest marathi news)

याबाबत एसीबीकडून मिळालेली अधिक माहिती अशी : तक्रारदार यांच्या विरुद्ध सीआरपीसी १०७ प्रमाणे करण्यात आलेल्या कारवाईत तक्रारदार यांना सदर बझार पोलीस ठाणे सोलापुर शहर येथे दाेन ते दहा मे या कालावधीत दैनंदिन हजेरी लावली होती.

त्यामुळे तक्रारदाराने हजेरी लावल्याचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी पाेलीस ठाण्यात मागणी केली. त्यानंतर पाेलीस नाईक नाना शिंदे याने तक्रारदारास पाचशे रुपयांची मागणी केली. या लाचेची संपुर्ण रक्कम रुपये पाचशे घेताना एसीबीने नाना शिंदे यास रंगेहाथ पकडले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: छगन भुजबळ तातडीने मुंबईला रवाना

Health: शरीरासाठी आवश्यक पदार्थ कोणकोणते? जाणून घ्या एका क्लिकवर

Abhijeet Kelkar: 'धुरळा उडाला, सूर्य पुन्हा एकदा तळपला...' देवेंद्र फडणवीस यांच्या विजयानंतर मराठी अभिनेत्याची जबरदस्त पोस्ट, म्हणाला...

Amravati Assembly Election 2024: बच्चू कडूंना पराभवाचा धक्का, अमरावतीच्या प्रत्येक मतदारसंघाचा निकाल एका क्लिकवर

Maharashtra Election Result: पुणेकरांची पसंती कोणाला? पुण्यातील २१ आमदार पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT