Bribe, chhatrapati sambhaji nagar, dharashiv, bribe Saam Tv
महाराष्ट्र

Sangli News : लाचखाेर प्रभारी अग्नीशमन अधिकाऱ्याच्या घरात एसीबीला सापडलं घबाड; महत्त्वाची कागदपत्रे जप्त

विश्रामबाग पोलिस ठाण्यात लाचखाेर अधिका-यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय पाटील

Sangli Crime News : ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी सव्वा लाखांची लाच घेताना सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या प्रभारी अग्नीशमन अधिकाऱ्यास रंगेहात पकडण्यात आले. सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. (Maharashtra News)

तक्रारदाराने यांनी अग्नीशमन विभागाकडे ना हरकत दाखल्याची मागणी केली होती. हा दाखला देण्याच्या बदल्यात पवार यांनी त्याच्याकडे सव्वा लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली होती.

त्यानंतर याबाबत तक्रारदाराने सांगलीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार दिली होती. त्या तक्रारीची पडताळणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली असता त्यांची खात्री पटली.

त्यानंतर एसीबीने संशयितावर पाळत ठेवली. तक्रारदाराकडून सव्वा लाख रूपयांची लाच स्विकारताना त्यास रंगेहात पकडले. एसीबीने दिलेल्या माहितीनूसार विजय आनंदराव पवार (वय ५०) असे लाच घेणाऱ्या अग्नीशमन अधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान प्रभारी अग्नीशमन अधिकाऱ्याच्या घरात तब्बल सात लाख एक हजार सहाशे रूपयांची रोकड सापडली आहे. ती जप्त करण्यात आली आहे. काही कागदपत्रेही जप्त करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप पाटील यांनी दिली. त्या अधिकाऱ्याच्या घरात इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याने खळबळ उडाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Car Offers: दिवाळी बंपर ऑफर; 'या' टॉप सेडान कारवर तब्बल २.२५ लाखांची सूट

Dog Attack : पाळीव जर्मन शेफर्ड श्वानाचा मुलावर हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

Abhyang Snan Time: दिवाळी पहाटच्या दिवशी 'अभ्यंगस्नान' कधी करावे? वाचा शुभ मूहूर्त

Maharashtra Live News Update : पाळीव जर्मन शेफर्ड श्वानाने केलेल्या हल्ल्यात चिमुकला मुलगा गंभीर जखमी

Diwali 2025 : आली दिवाळी! फटाके फोडताना 'ही' घ्या काळजी, नाहीतर...

SCROLL FOR NEXT