लाचखोर महिला शिक्षणाधिकारी डॉ.वैशाली झनकर यांना एसीबीकडून अटक Saam Tv
महाराष्ट्र

लाचखोर महिला शिक्षणाधिकारी डॉ.वैशाली झनकर यांना एसीबीकडून अटक

आजच त्यांनी वकिलामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिक - वैशाली झनकर Viashali Zankar यांना एसीबीकडून ACB अटक करण्यात आली आहे. शिक्षण संस्था चालकांकडून मंजुरीच्या कामासाठी चालकामार्फत 8 लाख रुपयांची लाच Bribe घातल्या प्रकरणी नाशिकच्या Nashik शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांना एसीबीने अटक केली आहे. आजच त्यांनी वकिलामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

दरम्यान, 8 लाख रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडल्या गेलेल्या नाशिकच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे. शासनाने देखील शिक्षण आयुक्तांना वैशाली झनकर यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता शिक्षण आयुक्त काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या २ दिवसांपासून वैशाली यांचा शोध यांचा शोध सुरु होता.आरोपी शिक्षणाधिकारी वैशाली झनकर या फरार होत्या परंतु आता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ठाणे अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या टीमला वैशाली झनकर यांना ताब्यात घेण्यात यश आले आहे. अटकपूर्व जामिनासाठी डॉ. वैशाली यांनी कोर्टात धाव घेतली होती. आज डॉ.वैशाली झनकर यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Dasara Melava Live Update: संगमनेरमधील मुस्लिम मावळा दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थावर दाखल

Bhaskar Jadhav: टीका करणारे डल्लेखोर, तकलादू आणि भाडेकरू, भास्कर जाधवांचा जोरदार हल्लाबोल|VIDEO

Swollen Face: सकाळी उठल्यानंतर चेहरा सुजलेला का दिसतो?

Instagram Ads : तुम्ही काय बोलता हे सर्व इंस्टाग्राम गुपचूप ऐकतं का? अ‍ॅडम मोसेरीने सगळं खरं खरं सांगितलं

Shocking: दसरा सणाला गालबोट! दुर्गा देवीच्या विसर्जनादरम्यान अनर्थ घडला, ६ जण नदीत बुडाले

SCROLL FOR NEXT