मुख्यमंत्र्यांना भगिनींच्या रक्षणाची जाण होण्यासाठी राखी जरुर पाठवा - चित्रा वाघ

चित्र वाघ यांनी ठाकरे सरकारवर टीका
मुख्यमंत्र्यांना भगिनींच्या रक्षणाची जाण होण्यासाठी राखी जरुर पाठवा -चित्रा वाघ
मुख्यमंत्र्यांना भगिनींच्या रक्षणाची जाण होण्यासाठी राखी जरुर पाठवा -चित्रा वाघSaam Tv
Published On

मुंबई: शिवसेना आमदार संजय राठोड Sanjay Rathod यांच्यावर आणखी एका महिलेने अतिशय गंभीर आरोप केल्याचा मुद्दा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ Chitra Wagh यांनी उपस्थित केला आहे. चित्रा वाघ यांनी या मुद्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. विरोधी पक्षांनी संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण Pooja Chavan आत्महत्या Suicde प्रकरणात अत्यंत गंभीर आरोप केले होते. त्यामुळे राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

हे देखील पहा -

"मूळात ज्याच्यामुळे एका मुलीला आत्महत्या करावी लागली. जीव गमावावा लागला आणि इतके ढळढळीत पुरावे असताना देखील कोणाच्या सांगण्यावरुन हा मकोाट आहे, कुणाच्या सांगण्यावरुन बेडया ठोकल्या गलेल्या नाहीत, की आपण आणखी महिलांवर अत्याचार होण्याची वाट पाहत आहात अशा तिखट शब्दात चित्र वाघ यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

मुख्यमंत्र्यांना भगिनींच्या रक्षणाची जाण होण्यासाठी राखी जरुर पाठवा -चित्रा वाघ
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून परभणी जिल्ह्याला 8 व्हेंटीलेटर

अशा पद्धतीची तालिबानी प्रवृत्ती राज्यातील महिलांनी कधीच अनुभवली नाही. ज्याची अनुभूती ठाकरे सरकारच्या काळात महिला अनुभवत आहेत असा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. न्याय मिळवण्यासाठी एखाद्या महिलेला आत्महत्या करावी लागेल का? असा प्रश्न चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. आज मी महाराष्ट्रातील माझ्या सगळ्या भगिनींना आवाहन करते की रक्षाबंधनच्या दिवशी एक ‘रक्षा-बंधना’ चा धागा माननीय मुख्यमंत्र्यांना जरूर पाठवावा जेणेकरून मुख्यमंत्री म्हणून त्यांना महाराष्ट्रातील त्यांच्या भगिनींची व त्यांच्या रक्षणाची जाण होईल असे देखील त्या पुढे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com