Zilla Parishad Corruption Saam Tv
महाराष्ट्र

ACB Action: जिल्हा परिषदेच्या २ बड्या अधिकाऱ्यांना अटक, लाच घेताना रंगेहाथ पकडलं

Zilla Parishad Corruption: जिल्हा परिषदेच्या २ अधिकाऱ्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. त्यांनी १ लाख ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

Priya More

विशाल शिंदे, परभणी

परभणी जिल्हा परिषदेत लाचखोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीचे थकीत वेतन मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडे तब्बल १ लाख ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत एका कला शिक्षकाला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले. विशेष म्हणजे, ही रक्कम वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी स्वीकारल्याचे समोर आल्यानंतर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे अतिरिक्त पदभार असलेले संदीप घोन्सीकर यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमुळे जिल्हा परिषद प्रशासनात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदाराच्या पत्नीने ३० ऑक्टोबर २०२४ रोजी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यांचे एप्रिल २०२१ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीतील १२ लाख ४६ हजार ४९८ रुपये थकीत वेतन मंजूर झाले होते. मात्र, ही रक्कम अदा करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयातील लिपिक शेख असलम यांनी थकीत वेतनाच्या १५ टक्के म्हणजेच १ लाख ८० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. तक्रारीची २० नोव्हेंबर रोजी पडताळणी करण्यात आली. यावेळी मोबाईल संभाषणातून शेख असलम यांनी १ लाख ८० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर २६ नोव्हेंबर रोजी परभणी बसस्थानक परिसरातील मिलन ऑप्टिकल्ससमोर एसीबीने सापळा रचला. यावेळी दुपारी १२ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास शेख असलम यांनी तक्रारदाराकडून १ लाख ८० हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्याचवेळी एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. लाच स्वीकारल्यानंतर शेख असलम यांना एसीबी कार्यालयात आणण्यात आले. यावेळी पंचांसमक्ष चौकशी केली असता, ही रक्कम वरिष्ठ अधिकारी डॉ. संदीप घोन्सीकर यांच्यासाठी स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले.

त्यानंतर शेख असलम यांनी पंचांसमक्ष घोन्सीकर यांना मोबाईलवर फोन करून १ लाख ८० हजार रुपये स्वीकारल्याची माहिती दिली आणि ही रक्कम कुठे आणून द्यायची, अशी विचारणा केली. त्यावर घोन्सीकर यांनी पैसे घरी घेऊन येण्यास सांगितल्याचे एसीबीच्या अहवालात नमूद आहे. या प्रकरणी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप घोन्सीकर आणि कला शिक्षक शेख असलम शेख रज्जाक या दोघांनाही एसीबीने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Duplicate Ration Card : रेशन कार्ड हरवलं किंवा फाटलं? काळजी नको! घरबसल्या मोबाईलवरून काढा दुसरं कार्ड

Easy Hairstyles : रोजच्या पोनीटेलचा कंटाळा आलाय? ऑफिससाठी ट्राय करा ५ मिनिटांत होणाऱ्या ५ हेअरस्टाईल

सांगली हादरली! आधी एकजण खाली उतरला, त्याला वाचवण्यासाठी दुसरा गेला, अन् पाहता पाहता तिघांचाही मृत्यू; नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: धुळ्यात शेतकऱ्याचे कापूस विक्रीचे पैसे लुटल्याप्रकरणी दोघांना अटक

Bigg Boss 20: गुल्लूने कनिका मानसाठी सोडली कॅप्टन्सी; मित्राचा निर्णय पाहून वॉशरूममध्ये रडू लागली अभिनेत्री

SCROLL FOR NEXT