Barshi Takli Police station
Barshi Takli Police station Saam Tv
महाराष्ट्र

धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून गर्भपात; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

अॅड. जयेश गावंडे

अकोला- जिल्ह्यातल्या बार्शीटाकळी पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यानंतर तिला गर्भधारणा झाल्याने तिचा गर्भपात केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बार्शीटाकळी पोलिसांनी आरोपी निखिल खेडकर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बार्शीटाकळी येथील एका अल्पवयीन मुलीचे व आरोपी निखिल खेडकर याने प्रेमप्रकरणाचा फायदा घेत अल्पवयीन मुलीसोबत अनेकदा बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. गर्भ राहू नये, म्हणून तो तिला गर्भनिरोधक गोळी सुद्धा घ्यायला लावायचा, याच दरम्यान आरोपीने तिला गर्भ राहिला का तपासून बघण्यास सांगितले. तेव्हा ती गर्भवती असल्याचे समजले. पीडिता या प्रकाराने हादरून गेली.

हे देखील पाहा -

दरम्यान आरोपीने कायद्याने बंदी असलेल्या गर्भपाताची किट आणली व तिला घ्यायला सांगितले. त्या किट मधील एक गोळी घेतल्यानंतर पीडितेची तब्येत बिघडली. म्हणून तिने त्या किट मधील उर्वरित औषधी घेतली नाही. परिणामी, गर्भाची वाढ झाली. दीड महिन्याचा गर्भ पोटात वाढला. तिने ही बाब तिच्या आईला सांगितली. दरम्यान,आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून गर्भपातासाठी तयार केले.

अकोल्यातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये तिचा गर्भपात केला. परंतु, त्यानंतरही तो सतत पीडितेचे शारीरिक शोषण करत राहिला. पीडितेने त्याला वारंवार लग्नासाठी म्हटले असता तो टाळाटाळ करायचा, असे तक्रारीत सांगितले. पीडितेच्या तक्रारीवरून बार्शीटाकळी पोलिसांनी निखिल जगदीश खेडकर विरुद्ध गुन्हा दाखल केला.

गर्भपात करणारा तो डॉक्टर कोण?

या प्रकरणी अल्पवयीन मुलीचा गर्भ राहिल्याने गर्भपातासाठी तिला अकोल्यातील एका नामांकित डॉक्टर कडे आरोपी घेऊन आला होता. कायद्याने बंदी असताना देखील अवैधरित्या गर्भपात करण्यात आला. त्यामुळे गर्भपात करणाऱ्या या डॉक्टरची पोलीस चौकशी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या डॉक्टरचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान पैशासाठी काही डॉक्टर अशाप्रकारे गर्भपात करतात या प्रकरणावरून समोर आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shirur LokSabha Election: शिरूरमध्ये अजितदादांची फिल्डिंग की पवारांचं होल्डिंग?; दोन्ही पवारांचा शिरूरकडे मोर्चा

Nagpur Crime: पत्नीने दिला थंड भात, नवऱ्याला आला संताप अन् लावला गळाला फास; पण..

MPSC Exam : लोकसेवा आयोगाकडून सुधारित वेळापत्रक; राज्यसेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर कधी येणार निर्णय? सर्वोच्च न्यायालयाने सांगितली तारीख

Maharashtra Politics 2024 : लोकसभेनंतर 'काँग्रेसी' एकत्र येणार?; प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?

SCROLL FOR NEXT