Abhijit Dipke saam tv
महाराष्ट्र

Abhijit Dipke: CJPच्या आंदोलनाला परदेशातून फंडिंग मिळाल्याचा आरोप; अभिजीत दिपकेंनी दिलं थेट उत्तर

जंतर-मंतर आंदोलनानंतर परदेशी फंडिंग, विरोधी पक्षांचा पाठिंबा आणि आम आदमी पक्षाशी संबंध असल्याच्या आरोपांवर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी साम टीव्हीशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधत सविस्तर भूमिका मांडली.

Surabhi Jayashree Jagdish

जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर कॉकरोज जनता पार्टी आणि त्याचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्याभोवती राजकीय वर्तुळात अनेक आरोपांची चर्चा सुरू झाली होती. आंदोलनाला परदेशातून फंडिंग मिळत असल्याचा आरोप, विरोधी पक्ष या आंदोलनामागे असल्याची टीका, तसंच आम आदमी पक्षासाठी 'स्लीपर सेल' म्हणून काम करत असल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला. या सर्व आरोपांवर अभिजीत दिपके यांनी साम टीव्हीशी एक्स्लुझिव्ह संवाद साधताना पहिल्यांदाच सविस्तर भूमिका मांडली.

सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे यांच्यासोबत 'ब्लॅक अँड व्हाईट' या शोमध्ये सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी साम टीव्हीशी एक्स्लुझिव्ह संवाद साधला. यावेळी त्यांच्यावर होत असलेल्या विविध आरोपांना त्यांनी सविस्तर उत्तर दिलं. परदेशातून फंडिंग मिळत असल्याचा आरोप फेटाळताना त्यांनी तपास यंत्रणांनी चौकशी करावी, असं खुलं आव्हानही दिलं.

परदेशातून फंडिंग होत असल्याच्या आरोपावर अभिजीत दिपके म्हणाले, "आरोप काय लावताय? ईडी, बीसीआय किंवा संबंधित कोणतीही यंत्रणा माझ्याकडे पाठवा आणि चौकशी करा. जर खरंच मला परदेशातून फंडिंग मिळत असेल आणि तिथून मला कंट्रोल केलं जात असेल, तर ते देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचं सर्वात मोठं अपयश आहे. चाणक्य असताना बाहेरची ताकद भारतात येऊन असं काही कसं करू शकते?"

विरोधी पक्ष आंदोलनाला पाठिंबा देत असल्यामुळे या आंदोलनाला सरकारविरोधी धार मिळाल्याच्या आरोपावरही त्यांनी उत्तर दिलं. "हे आंदोलन सरकारविरोधीच होतं, कारण पेपरफुटी सरकारच्या काळात झाली, सरकारमुळे २० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. २० तारखेला लहान मुलांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. १२-१२ वर्षांच्या मुलांना मारहाण झाली, त्यांच्या डोक्यात लाठ्या मारल्या गेल्या. मुलींना पुरुष पोलिसांनी मारहाण केली, त्यांचे कपडे फाडले. हे सगळं सरकारच्या आदेशावर झालं.

ते म्हणाले, आमचं आंदोलन सरकारविरोधात होतं, पण सरकारमध्ये कोण आहे याच्याशी आमचं वैयक्तिक भांडण नाही. उद्या दुसरं सरकार आलं आणि त्यांनीही असंच केलं, तर त्यांच्याविरोधातही आम्ही आंदोलन करू," असं दिपके यांनी स्पष्ट केलं.

आपण आम आदमी पक्षासाठी 'स्लीपर सेल' म्हणून काम केल्याच्या आरोपावर बोलताना अभिजीत दिपके म्हणाले, "जर तसं असतं, तर सर्वात आधी मी माझे जुने ट्विट्स डिलीट केले असते. मी एकही ट्विट डिलीट केलेलं नाही. माध्यमांना सुरुवातीला अभिजीत दिपके कोण आहेत, हेही माहिती नव्हतं. मी स्वतःहून सांगितलं की, दोन-तीन वर्षे मी आम आदमी पक्षासाठी काम केलं होतं. मी ते कधीच लपवलं नाही. मला काही लपवायचं नव्हतं. जनतेसोबत प्रामाणिक राहणं मला महत्त्वाचं वाटलं," असं त्यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

9 IPS अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री बदल्या; पोलिस दलात खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

Pune Politics: ज्येष्ठ नेत्यांवर टीका, भाजपच्या जिव्हारी, पुणे महापालिकेतील निधी रोखल्याचा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारी

Shivsena Dispute : ...तर ठाकरे-शिंदे एकत्र येऊ शकतात; शिंदेसेनेच्या बड्या नेत्याचं भाकित, EXCLUSIVE

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची पुणे महापालिकेत बैठक

घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा ‘नाशिकची स्पेशल मिसळ थाळी’; चव अशी की पोट भरून खातील! 

SCROLL FOR NEXT