Agriculture Minister Abdul Sattar Saam TV
महाराष्ट्र

Abdul Sattar News: कृषीमंत्री अब्दुल सत्तारांकडून अंधारात नुकसानग्रस्त भागाचा दौरा; शेतकऱ्यांनी व्यक्त केला संताप

Maharashtra Unseasonal Rain: अंधारात नुकसानग्रस्त भागाचा दौरा केल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Nashik News: राज्यभरात अवकाळी पावसाने गेल्या काही दिवसांपासून चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या अवेळी आलेल्या पावसामुळे बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी पावसामुळे आणि गारपिठीमुळे हातातोंडाशी आलेले पीक मातीमोल झाल्याने बळीराजा चांगलाच अडचणीत सापडला आहे. राज्यसरकारकडूनही मदत मिळत नसल्याने शेतकरी वर्ग नाराज आहे.

अशातच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नुकसानग्रस्त पाहणी दौऱ्यावर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. कारण राज्याचे कृषीमंत्री चक्क अंधारात नुकसानग्रस्त भागाची पाहाणी करत आहेत. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, सलग दोन आठवडे राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून भरपाईची मागणी केली जात आहे. मात्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पंचनामेही रखडले होते. मंगळवारी पंचनाम्यांना सुरुवात झाली. दुपारी कृषीमंत्री येणार असल्यानं शेतकऱ्यांची गर्दी झाली.

सर्वांचे डोळे कृषीमंत्र्यांकडे लागले होते. मात्र, दुपारी येणारे कृषीमंत्री निफाड तालुक्यात येता-येता अंधार पडला. त्यानंतर लगबगीनं कृषीमंत्र्यांनी कुंभारी गावात एका द्राक्ष बागेची पाहाणी केली

अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी पाच मिनिटांत द्राक्ष बागेत जाऊन पाहणी केली, फोटो सेशन केलं, मिडियाशी बोलले आणि चहा पिऊन निघून गेले असंच काहीसे चित्र शेतकाऱ्यांच्या मध्ये निर्माण झाले आहे. त्यात शेतकऱ्यांनी अब्दुल सत्तार यांना प्रश्न विचारून त्यांची चांगलीच कोंडी केली होती.

अब्दुल सत्तार धुळे जिल्ह्यात जाण्यासाठी निघाले असताना नाशिकच्या निफाड चांदवड तालुक्यातील द्राक्ष,कांदा पिकांच्या नुकसानीची पाहणी करतील, असं नियोजन करण्यात आलं होतं. मात्र हा दौरा म्हणजे, केवळ एक औपचारिकताच असल्याची भावना सध्या शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT