Abdul Sattar Saam Tv
महाराष्ट्र

Abdul Sattar: ...तर अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही - अब्दुल सत्तार

अब्दुल सत्तार यांनी कृषी मंत्री पदाचा पदभार स्वीकारताच मराठवाड्यातील विभागीय कृषी अधिकारी यांची तातडीने बैठक बोलवली.

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

जालना - अब्दूल सत्तार (Abdul Sattar) यांनी कृषी मंत्री पदाचा पदभार स्वीकारताच मराठवाड्यातील विभागीय कृषी अधिकारी यांची तातडीने बैठक बोलवली. या बैठकीसाठी विभागातील सर्व जिल्हाधिकारी, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी,विभागीय कृषी सह संचालक, कृषी आयुक्त, पुणे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना उपस्थित राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच ज्यांना जालना येथे उपस्थित राहता येणार नाही, त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहण्याच्या सुध्दा सूचना देण्यात आल्या आहेत.

हे देखील पाहा -

यावेळी सत्तर यांनी शेतकऱ्यांच्या ईपीक पाहणी बाबद तांत्रिक अडचणी निर्माण होत असेल तर ऑफलाईन पीक पाहणी करण्याचे निर्देश कृषी विभागाला दिले. शेतकऱ्यांच्या पीक कर्ज वाटपाबाबद राष्ट्रीय बँकांच्या उदासीन धोरणावर नाराजी व्यक्त करत उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या बँकांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

मराठवाड्यात शेतकऱ्याच्या आत्महत्यांच्या वाढते प्रमाण लक्षत घेता आता बँकांनी शेतकऱ्यांची फाईल येताच तात्काळ कारवाई करावी कुठलाही शेतकरी पीक विमा,पीक कर्ज,आणि नुकसान भरपाई पासुन वंचित राहू नये. असे न झाल्यास कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी सक्त ताकीद कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी जालन्यात पार पडलेल्या विभागीय कृषी अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT