pandharpur, aap, raigad, shivrajyabhishek din saam tv
महाराष्ट्र

AAP Swarajya Yatra : खोके सरकार लोकशाहीला घातक : प्रीती मेनन

भाजपाने नवीन संसद भवन बांधले पण त्यांनी त्या संसदेत लोकशाहीचा गळा घोटला असा आरोप मेनन यांनी केला.

भारत नागणे

Pandharpur News : राज्यातील जनता खोके सरकारला वैतागली आहे. हे पन्नास खोके एकदम ओके सरकार लोकशाहीला घातक आहे अशी टीका आम आदमी पक्षाच्या मुंबई प्रदेशाध्यक्षा प्रीती मेनन यांनी केली आहे. पंढरपुरातून आम आदमी पार्टीच्या पंढरपूर ते रायगड स्वराज्य यात्रेचा शुभारंभ नुकताच झाला. यावेळी त्या बोलत होत्या. (Maharashtra News)

राज्यातील जनतेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संकल्पनेतील स्वराज्य मिळावे या हेतूने स्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. 6 जून छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक दिनी ही यात्रा रायगडला पोहोचणार आहे.

आम आदमी पार्टी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था विधानसभा आणि लोकसभा स्वबळावर लढणार. राज्यातील सरकारवर बंधने आणणारे राज्यसभेतील विधेयकाला विरोध करणे प्रत्येक विरोधी पक्षाचे काम आहे. यासाठीच केजरीवाल यांनी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीबद्दल वाईट न वाटता प्रत्येकाला या विधेयकाबद्दल वाईट वाटावे असा टोला त्यांनी आपल्याच पक्षातील अंजली दमानिया यांना लगावला.

कुठल्याही पक्षाची आठवण येते याची पार्श्वभूमी काहीही असू द्या मात्र लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकाने एकत्र आले पाहिजे. 2014 च्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या विरोधात पोत्याने पुरावे असल्याचे म्हटले होते. मात्र असा कुठलाही पुरावा ते दाखवू शकले नाहीत उलट त्यांनी अजित पवारांबरोबर पहाटेच शपथविधी केला आणि सत्तेसाठी ते एकत्र आले.

राज्यपाल बीजेपीचे प्रवक्ते झाले आहेत. भाजपाने नवीन संसद भवन बांधले पण त्यांनी त्या संसदेत लोकशाहीचा गळा घोटला असा आरोप मेनन यांनी केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

SCROLL FOR NEXT