AAP Protest
AAP Protest Saam TV
महाराष्ट्र

AAP Protest : अरविंद केजरीवालांच्या अटकेनंतर आप कार्यकर्ते आक्रमक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा इशारा

Ruchika Jadhav

PM Residence :

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कार्यकर्त्यांनी दिल्लीमध्ये दाखल होत मोदींच्या निवास्थानी घेराव घालण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आज दिल्लीतील पटेल चौक मेट्रो स्टेशनबाहेर कार्यकर्त्यांनी जमण्यास सुरूवात केली आहे.

या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी कलम 144 लागू करण्यात आल्याची घोषणा केलीये. आंदोलनासाठी कोणालाही परवानगी नाही, हा परिसर लवकरात लवकर खाली कार, असं पोलिसांनी कार्यकर्त्यांना म्हटलं आहे.

आम आदमी पक्षाच्या निदर्शनाच्या घोषणेनंतर दिल्ली पोलीस अॅक्टीव मोडमध्ये आहेत. पोलिसांनी राजधानीच्या मध्यवर्ती भागात येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांवर काही निर्बंध घालून विशेष व्यवस्था केली आहे.

यामध्ये मध्य दिल्लीतील वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. तुळगाक रोड, सफदरजंग रोड आणि कमाल अतातुर्क मार्गावर वाहने पार्क करण्यास परवानगी नसल्याचं वाहतूक पोलिसांनी म्हटलं आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली आहे. ईडीने कारवाई करत न्यायालयाने त्यांना २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. यानंतर केजरीवाल यांनी दिल्लीचा कारभार तुरुंगातूनच चालवणार अशी घोषणा केली. तसेच रविवारी पहिला आदेश जारी करत आपल्या मंत्र्यांना काही सूचना दिल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tata Altroz Racer येतेय, स्टायलिश लूक आणि अॅडव्हान्स फीचर्स; जाणून घ्या किती असेल किंमत

Saturday Horoscope: आज या राशींवर होणार शनिदेवाची कृपा, प्रत्येक संकटातून मिळेल मुक्ती

MS Dhoni Fan Viral Video: ' माही आशीर्वाद असू दे..' एमएस धोनीच्या चरणस्पर्शासाठी चाहता थेट मैदानात; पाहा video

Ravindra Waikar: जेलमध्ये जाण्याच्या भीतीनं पक्षांतर केलं, रवींद्र वायकरांचा मोठा गौप्यस्फोट

Amravati News : ८४ वर्षांचे आजोबा तिसऱ्यांदा अडकले लग्नबंधनात; आजीबाईचाही आनंद गगनात मावेना

SCROLL FOR NEXT