Akkalkuwa Aamdar amshya padvi rally Akkalkuwa Aamdar amshya padvi rally
महाराष्ट्र

शिंदेंच्या आमदाराच्या विजयी मिरवणुकीत तरुणांचा राडा, दिसेल त्याला मारले, Video Viral

Fights in Akkalkuva MLA Amshya Padvi Rally: आमशा पाडवी यांच्या विजयी मिरवणुकीत जोरदार राडा झाला. दोन गटात तुंबळ हाणामारी झाली.

Namdeo Kumbhar

Akkalkuwa Aamdar amshya padvi rally : शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आमश्या पाडवी यांच्या विजयी मिरवणुकीत जोरदार राडा झाल्याचे समोर आलेय. रॅलीमध्ये तरुणांनी सिने स्टाईलने हाणामारी केली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. दोन गटातील हाणामारीने रॅलीला गालबोट लागलेय.

बँडच्या तालावर नाचणारे तरुणांचे दोन गट आपसात भिडले. तरुणांच्या गटात जो समोर येतो त्याला मारहाण करत असल्याचे व्हिडीओत दिसतेय. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयाचा आनदोत्सव व्यक्त करण्यासाठी 10 बँड पथकाचे नियोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून मोठ्या संख्येने तरुण रॅलीत सहभागी झाले होते. या बँडच्या तालावर नाचत असतांना दोन गटातील तरुणांमध्ये तुफान हाणामारी झाली.याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे आमश्या पाडवी हे निवडून आले. विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आमश्या पाडवी यांनी अक्कलकुवा शहरातून विजयी मिरवणूक काढली. विशेष म्हणजे टॉपचे 10 बँड पथक या रॅलीला मागवण्यात आले होते. शिवसेना शिंदे गटाच्या वतीने मोठा जल्लोष करण्यात आला. दहा प्रकारचे मोठे बँड मागवल्याने तरुणांची मोठी गर्दी अक्कलकुवा शहरात झाली होती.

विजय मिरवणुकीत हजारोंच्या संख्येने तरुण सहभागी झाले होते, यातच बँड तालावर नाचत असताना तरुणांचा दोन गट किरकोळ वादातून आपसात भिडले. या वादाचे रूपांतर तुफान हाणामारी झाले. दोन्ही गटातील तरुण एकमेकांवर धावून गेले आणि सिनेस्टाईल पद्धतीने एकमेकांना मारहाण करण्यात आली. दीडशे ते दोनशे तरुण आपसात भिडले असून मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आली. या तरुणांच्या वादामुळे काही वेळ विजय मिरवणुकीत तणाव निर्माण झाला होता, मात्र पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याने. बराच वेळ तरुणांमध्ये मारहाण झाल्याचं पाहायला मिळालं. तरुणाचा हाणामारीमुळे आमदार आमश्या पाडवी यांच्या विजय मिरवणुकीत गालबोट लागली. मारहाणीचा केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या: सदाभाऊ खोत यांची मागणी

Shubman Gill: शुभमन गिलने इतिहास रचला, विराट कोहली आणि सर डॉन ब्रॅडमॅनचा रेकॉर्ड मोडला

Shocking : लव्ह मॅरेजनंतर ४ महिन्यांनी जवानाच्या पत्नीने आयुष्य संपवलं; इन्स्टाग्रामवर पोस्ट केला शेवटचा व्हिडिओ

Shocking : भांडणानंतर रागाच्या भरात बायको घर सोडून गेली, नंतर नवऱ्यानं आई आणि मुलांसह जे केलं ते पाहून सारेच हादरले

Eating Too Fast: घाईघाईत जेवल्याने काय होतं?

SCROLL FOR NEXT