Today's Marathi News Live By Saam TV  Saam TV
महाराष्ट्र

Marathi News Live Updates: पुणे शहरात बालेवाडी ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कार्यक्रम होणार

Maharashtra Breaking News Live Updates : आज शुक्रवार दिनांक १६ ऑगस्ट २०२४ आजच्या ठळक बातम्या, लाडकी बहीण योजना, देशातील राजकीय घडामोडी, राज्यातील ताज्या अपडेट्स, देश-विदेशातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Vishal Gangurde

Pune :  बालेवाडी ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कार्यक्रम होणार

पुणे शहरात बालेवाडी या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हा कार्यक्रम होणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होऊ शकते या पार्श्वभूमीवर पुणे वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. कात्रज चौकाच्या पुढे नवले पूल मार्ग मुंबई बेंगलोर महामार्ग जड वाहनांसाठी उद्या बंद असणार आहे.

Nagpur : नागपूरमध्ये भाजप महिला मोर्चाच्यावतीने कलकत्ता येथील घटनेच्या निषेधार्थ कॅण्डल मार्च

भाजप महिला मोर्चाच्या वतीने कलकत्ता येथील घटनेच्या निषेधार्थ कॅण्डल मार्च काढण्यात आला. सीए रोडवरील महात्मा गांधीजींच्या पुतळा परिसरपर्यंत हा कॅनडल मार्च काढण्यात आला. कोलकत्ता घटनेच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या कँडलमार्चमध्ये अमृता फडणवीस या सहभागी झाल्यात. महाल परिसरातील बडकस चौक येथून येथे कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले होते .

 KDMC:  केडीएमसी मधील 27 गावात क्लस्टर योजना राबवणार; मुख्यमंत्री शिंदेंचे यंत्रणांना आदेश

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील 27 गावांतील धोकादायक तसेच अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण करून त्यांच्यासाठी क्लस्टर योजना राबवावी.त्यासाठी आराखडा तयार करावा. यामुळे गावांचा विकास होण्यास गती मिळेल, अशा सूचना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांना केल्या आहेत. तसेच वाढत्या लोकसंख्येला पुरेल इतके पाणी पुरवण्यासाठी अमृत योजनेचे स्वरूप अधिक विस्तारित करण्यासाठी अतिरिक्त २०० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी द्यावी अशी मागणी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली. त्यावरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक भूमिका घेतली.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २० कोटी रुपयांचं कोकेन जप्त

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २० कोटी रुपयांचं कोकेन जप्त

महसूल गुप्तवार्ता संचालनालयाची (DRI) कारवाई

द्राव्य स्वरूपात सुरू होती कोकेनची तस्करी

शॅम्पू आणि लिक्वीड साबणाच्या बाटलीतून सुरू होती तस्करी

नैरोबी वरून आलेल्या महिलेला अटक

१९८३ ग्रॅम द्राव्य स्वरूपातील कोकेन जप्त

Dhule Bandh:  बांगलादेशात होत असलेल्या हिंसाचाराच्याविरोधात धुळ्यात उद्या बंदची हाक

गलादेश येथे होत असलेल्या हिंसाचाराच्या विरोधामध्ये धुळे जिल्हा बंद ची हाक देण्यात आली आहे. सकल हिंदू समाज संघटनेच्या वतीने उद्या 17 ऑगस्टरोजी धुळे बंदची हाक देण्यात आली असून या आशयाचे बॅनर्स संपूर्ण जिल्हाभरात विविध ठिकाणी चौकाचौकांमध्ये लावण्यात आले आहेत.

Pune : ससून हॉस्पिटलपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत उद्या डॉक्टरांचा मोर्चा

कोलकत्ता या ठिकाणी डॉक्टरावर झालेल्या अन्यायाविरोधात झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज पुण्यातील इंडियन मेडिकल असोसिएशन ने बैठक घेतली. या बैठकीत पुणे शहरातील सर्व डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे शहरातील सर्व हॉस्पिटल उद्या बंद असतील. सर्व डॉक्टर उद्या ससून रुग्णालय परिसरामध्ये एकत्र येऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन देतील. अत्यावश्यक सेवा फक्त सुरू राहील. सर्व हॉस्पिटल सर्व डॉक्टर ओपीडी ऑपरेशन सुरू ठेवणार नाहीत. असा निर्णय यामध्ये घेण्यात आला.

धुळ्यात मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचा लाभार्थी महिलांचे फुल गुच्छ देऊन स्वागत

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या धुळे शहरातील लाभार्थी महिलांना भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने फुल गुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. या महिलांमध्ये मोठ्या संख्येने अल्पसंख्यांक महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आलाय. ज्या महिलांनी अद्यापही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल केलेले नाहीत अशा महिलांनी 31 ऑगस्टपर्यंत योजनेचे अर्ज दाखल करावे, असे आवाहन देखील भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.

नीलम गोऱ्हे यांच्या पत्रकार परिषदेत मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची  घोषणाबाजी

नीलम गोऱ्हे यांच्या पत्रकार परिषदेत मराठा समाजाची घोषणाबाजी. पत्रकार भवन येथे नीलम गोऱ्हे यांचे पत्रकार परिषद सुरू होत असताना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी. मराठा आरक्षणा संबंधित भूमिका स्पष्ट करण्याची मागणी आंदोलकांनी केली.

Ahmednagar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महंत गंगागिरी महाराजांच्या अखंड हरिनाम सप्ताहाला हजेरी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महंत गंगागिरी महाराजांच्या अखंड हरिनाम सप्ताहाला हजेरी लावली. सिन्नर तालुक्यातील शहा पांचाळे इथ सुरुय महंत गंगागिरी महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह आहे. गांगागिरी महाराजांचे शिष्य रामगिरी महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत अखंड हरिनाम सप्ताह आहे.

संभाजीनगर महामार्गांवर करण्यात आलेला रास्ता रोको मागे

दोन तास सुरु असलेला रास्त रोको पोलिसांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.

मुस्लिम समाजाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आला होते.

दोन तासाच्या आंदोलनामुळे नगर - संभाजीनगर महामार्गांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

NCP Protest : रवी राणाविरोधात पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

आमदार रवि राणा यांनी केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पुण्यातील बालगंधर्व चौकामध्ये आंदोलन करण्यात आल.विधानसभा महिला अध्यक्षा, कार्याध्यक्षा, प्रभाग अध्यक्षा तसेच आठही विधानसभा मतदारसंघातील विधानसभा कार्यकारणी सदस्या व शहर कार्यकारिणी सदस्या या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. जोरदार घोषणाबाजी यावेळी रवी राणाविरोधात करण्यात आली

मुस्लिम समाजाने रोखला अहमदनगर-संभाजीनगर महामार्ग

रामगिरी महाराजांनी मुस्लिम धर्मियांचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे निषेधार्थ चक्काजाम आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत रामगिरी महाराजांना अटक होत नाही तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नसल्याची भूमिका मुस्लिम समाजाने घेतलीय. मुस्लिम समुदायाचा हजारोंच्या संख्येने तरुण वर्ग रस्त्यावर उतरला.

Election Commission: निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू; महाराष्ट्र, जम्मू-काश्मीरमधील निवडणुकांच्या तारखांची घोषणा

हरियाणात एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. यासाठी १ ऑक्टोबरला मतदान होणार असून जम्मू-काश्मीरसोबतच ४ ऑक्टोबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची अधिसूचना २८ ऑगस्ट रोजी जारी केली जाणार आहे.

 निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू, विधानसभा निवडणुकीच्या तारखा थोड्याच वेळात होणार जाहीर

जम्मू-काश्मीरमध्ये सीमांकनानंतर जागांची संख्या 114 झाली आहे. यापैकी 24 जागा पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये आहेत, तर 90 जागांपैकी 47 जागा काश्मीर विभागात येतात आणि 43 जागा जम्मू विभागात येतात. जम्मू-काश्मीरमध्ये शेवटची विधानसभा निवडणूक २०१४ मध्ये झाली होती.

जम्मू काश्मीरच्या लोकांनी बुलेटऐवजी बॅलेट निवडलं : निवडणूक आयुक्त राजीव कुमार

लोकसभा निवडणूक 2024 ही या वेळची सर्वात मोठी निवडणूक प्रक्रिया होती. देशभरात निवडणुकीचं पर्व आनंदात साजर झालं. आपल्या लोकसभा निवडणुकीने जगभरात मेसेज गेला. जम्मू काश्मीर आणि हरियाणा दोन्ही राज्यात आयोगाने दौरा केला. तिथे अनेक लोकांशी आम्ही चर्चा केली. सगळ्या राजकीय पक्षांसोबत चर्चा केली, त्यांनी लवकरात लवकर निवडणुका घेण्याची विनंती केली. जम्मू काश्मीरमधे लोकसभा निवडणुकीवेळी लोकांनी मोठ्या रांगा लावून मतदान केलं. जम्मू काश्मीरच्या लोकांनी बुलेट ऐवजी बॅलेट निवडलं, असे निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले.

Teacher Agitation: रत्नागिरीत डीएड, बीएड, पदवीधर बेरोजगार शिक्षण सेवकांचे आंदोलन

कंत्राटी तत्वावर जिल्हा परिषद शाळांवर काम कर‌णा-या शिक्षक सेवकांना शासनाने कार्यमुक्त केले. जिल्ह्यातील शाळा सुरळीत चालाव्या यासाठी या शिक्षकांनी मेहनत घेतली मात्र याकडे शासनाने दुर्लक्ष केलेय.या शिक्षक सेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरु केलय.स्थानिक डीएड, बीएड, पदवीधर बेरोजगारांना शिक्षण सेवक म्हणून सेवेमध्ये सामावून घ्यावे. तसेच भविष्य काळामध्ये होणाऱ्या नोकर भरतीमध्ये संधी मिळावी. किमान तत्काळ अंशकालीन कर्मचाऱ्यांचा दर्जा आम्हाला मिळावा. रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये स्थानिक डीएड, बीएड, पदवीधर बेरोजगार भूमिपुत्रांना शिक्षण सेवक म्हणून सेवा बजावण्याची पुनश्च संधी मिळावी.यासाठी या शिक्षकांनी गेल्या दोन दिवसांपासून आंदोलन सुरू केलेय.

Nanded Politics: पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा पहिला उमेदवार घोषित

महायुतीतील घटक पक्ष असलेल्या पीपल्स रिपब्लिकन पार्टी प्रा.जोगेंद्र कवाडे गट यांच्या पक्षाचा विधानसभेचा पहिला उमेदवार घोषित करण्यात आला आहे.पीआरपीचे महासचिव बापूराव गाजभरे यांच्या नावाची आज घोषणा करण्यात आली.नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली हा मतदारसंघ अनुसूचित जाती साठी राखीव आहे.यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे पक्षाचे प्रदेश महासचिव बापूराव गजभारे यांच्या नावाची घोषणा पी.पी.आर.पी चे अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी नांदेड येथे पत्रकार परिषदेत केली.

Maharashtra Assembly Election: बच्चू कडू विधानसभेला बॅट घेऊन मैदानात; निवडणूक आयोगाने दिले चिन्ह

बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला भारतीय निवडणूक आयोगातर्फे मिळाले "बॅट" अधिकृत निवडणूक चिन्ह! प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी भारतीय निवडणूक आयोगाकडे अधिकृत निवडणूक चिन्हासाठी केला होता अर्ज

70th national film awards 2024: 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; वाचा संपूर्ण यादी!

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - गुलमोहर

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - वाळवी

सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी -Mumars of the Jungle

दिग्दर्शक आणि प्रोड्युसर - साहिल वैद्य

Pune News: देशात तब्बल 22 आय ए एस, आय पी एस अधिकारी बोगस?

देशातील एकूण 22 आय ए एस, आय पी एस आधिकारी बोगस असल्याचा दावा "UPSC फाईल्स" या डॉक्युमेंट मधून समोर आलाय. या 22 जणांपैकी चार जण महाराष्ट्रातील असून विशेष म्हणजे एक जण शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यातील आहे. ई डब्ल्यू एस फोटो प्रमाणपत्र घेऊन तसेच दिव्यांग सर्टिफिकेट घेऊन आयोगाची फसवणूक केल्याचा दावा या डॉक्युमेंट मधून करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी या संदर्भात ट्विट करत यू पी एस सी कडे पत्र लिहीत तक्रार केली आहे. या संपूर्ण प्रकरणी विजय कुंभार यांनी या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केलीय.

Assembly Election 2024: विधानसभेसाठी वंचित आघाडीचे चिन्ह  'गॅस सिलेंडर'

आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांनी जोरात सुरू केली आहे. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी हा पक्ष सुद्धा मागे नाही. अशातच दिनांक 14 ऑगस्ट रोजी भारतीय निवडणुक आयोग सचिवालयाकडून एक पत्र जारी करण्यात आले. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात 'गॅस सिलेंडर' चिन्ह दिल्याचे घोषित केले आहे.

Washim News: लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महिलांनी पुन्हा एकदा गर्दी केली आहे. सुरुवातीला फॉर्म भरण्यासाठी महिलांच्या रांग बघायला मिळाल्या होत्या आता परत एकदा याच महिलांनी खात्यात जमा झालेले पैसे काढण्यासाठी रांग लावली आहे. वाशिम शहरातील पोस्ट ऑफिससमोर मोठ्या प्रमाणात महिलांनी पैसे काढण्यासाठी गर्दी केली

Pune News: पुण्यातील संचेती पुलावर तरुण चढला

पुण्यातील संचेती पुलावर तरुण चढल्याने मोठा गोंधळ उडाला आहे तरुणाचे नाव आणि कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस त्याला खाली उतरवण्याची विनंती करत आहेत. हातात भगवा झेंडा घेऊन तरुण संचेती पुलावर चढला.

Jalgaon News: हिंदू समाजाच्या वतीने जळगाव जिल्हा बंदची हाक

जळगाव बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने आज जळगाव जिल्हा बंद पाळण्यात येत आहे. या बंदला जिल्ह्यातील विविध संघटनांनी आपला पाठिंबा दिला आहे. आज सकाळी हिंदू बांधवांकडून मोर्चा काढण्यात आला मोर्चाच्या मार्गावर असलेले दुचाकी शोरूम उघडे होते बंदच आव्हान करून दुकान बंद न ठेवल्याने मोर्चा करांनी संताप व्यक्त केला या मोर्चातील काही कार्यकर्त्यांनी शोरूम वर दगड फेकून काच फोडली व निषेध केला

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात संघटनात्मक बदल होण्याची शक्यता

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता आहे. अजित पवार नवीन चेहऱ्यांना पक्षात सक्रिय करून घेणार आहेत. काल रात्री पुण्यात झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

Jalna News : रावसाहेब दानवे-अर्जुन खोतकरांमध्ये पुन्हा धुसफूस? चर्चांना उधाण

कसभा निवडणुकीच्या निकालानंतर जालना जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती मधल्या नेत्यांमध्ये आता धुसफूस सुरू झाली आहे. माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यात लोकसभा निवडणुकीपासून हळूहळू दुरावा वाढत चालल्याची सध्या चर्चा सुरू आहे.

आता विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही नेत्यांमधील धुसफूस समोर येत आहे. यावर बोलताना अर्जुन खोतकर यांनीही निवडणुकीमध्ये जी परिस्थिती निर्माण होईल त्यानुसार आम्हीही पुढे जाऊ अशी भूमिका मांडलीय. जर त्यांनी जिल्ह्यात स्वतंत्र लढले तर आम्हीही तयार आहोत. मात्र हा निर्णय माझ्या हातात नाही, हे वरच्या पातळीवरचा आहे असे खोतकर म्हणाले.

Nagpur News : नागपुरात आज सकाळपासून ढगाळ वातावरणासह पावसाच्या सरी

नागपुरात आज सकाळपासून ढगाळ वातावरणासह पावसाच्या सरी कोसळत आहे. शहरातील काही भागात जोरदार पाऊस होत आहे. हवामान विभागाने आज शहराला यलोअलर्ट दिला आहे.

Narayan Rane News : खासदार नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाच समन्स

भाजपचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाने समन्स बजावलं आहे. सिंधुदुर्ग मतदारसंघातील लोकसभा निवडणूक रद्द करण्याच्या याचिकेबाबत हे समन्स बजावलं आहे. याबाबत माजी खासदार विनायक राउत यांनी दाखल केली आहे.

Buldhana News : बुलढाण्यातील शेगाव तालुक्यात राष्ट्रध्वजाचा अवमान

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील जानोरी या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याची घटना उघडकीस आली आहे. जानोरी येथील जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडावंदन सकाळी पार पडले.

मात्र सायंकाळी शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी झेंड्याला वंदन करून झेंडा खाली उतरवणे अपेक्षित होतं मात्र मुख्याध्यापक व शिक्षक मुख्यालय राहत नसल्याने त्यांनी फोनवरूनच गावातील शाळे शेजारी राहणाऱ्या मजूर मुलांना फोन करून झेंडा उतरवण्यात सांगितलं.

त्याप्रमाणे गावातील या मजूर मुलांनी कुठलीही सलामी व राष्ट्रगीत न मानता झेंडा खाली उतरवला व कसाबसा गुंडाळून त्यांच्या घरी घेऊन गेले याबाबत प्रशासनाला विचारलं असता याबाबत कुठलीही माहिती नसल्याचं सांगण्यात आलं मात्र याबाबत सोशल मीडियावर झेंड्याचा अवमान झाल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. याबाबत अद्याप कुठलीही तक्रार झालेली नाही.

Mumbai News: वर्सोवा विधानसभेत उद्धव ठाकरे यांना डिवचणारे बॅनर

वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मांडल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नऊ खासदारांनी सभागृहाचा त्याग करून बाहेर पडणे पसंत केले. मात्र यामुळे काही मुस्लिम समाज नाराज झाला असून त्यांनी आता याच मुद्द्याला भांडवल करून माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना डिवचणारे बॅनर लावले आहेत वर्सोवा विधानसभा क्षेत्रात जोगेश्वरी एस वी रोड वरील पप्पू कंपाउंड आणि वर्सोवा कब्रस्तान शेजारी वर्सोवा कब्रस्तान शेजारी धोकेबाज असे शीर्षक असणारे बॅनर लावले आहेत

Bhandara News : भंडाऱ्यात भाजपला मोठा धक्का, बडा नेता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. विदर्भातील भाजपचे माजी खासदार शिशुपाल पटले आज शुक्रवारी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत मुंबईत हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे.

Pune Accident News : पुण्यातील वाघोली परिसरात भीषण अपघात

पुण्यातील वाघोली परिसरात असणाऱ्या राजेश्वरी नगरी बकोरी येथे टँकरचा अपघात झालाय. सोसायटीमध्ये राजरोसपणे टँकर चालक वेगाने टँकर चालवत असल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं आहे.

Hingoli Rain update :  हिंगोलीत पुन्हा पावसाचा हाहाकार

हिंगोलीत पुन्हा पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. हिंगोलीतील इसापूर ओढ्याला पूर आल्याने सकाळी सात पर्यंत ग्रामस्थांचा शहराशी संपर्क तुटला आहे. तर रुग्णांना ही पुरामुळे गावातच अडकून पडावे लागले.

Cabinet meeting : केंद्रीय मंत्रिमंडळाची आज सायंकाळी बैठक होणार

केंद्रीय मंत्रिमंडळाची आज सायंकाळी बैठक

सायंकाळी 5.30 वाजता बैठक होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार

Earthquake Taiwan : तैवान भूकंपाने हादरलं, रिश्टर स्केलवर 6.3 तीव्रता

तैवानमध्ये शुक्रवारी जोरदार भूकंप झाल्याची घटना घडली आहे. या भूकंपाची तीव्रता ६.३ रिश्टर स्केल मोजली गेली आहे. हवामान खात्याने तैवानच्या हुलिएन शहरापासून दूर ३४ किलोमीटर दूर ६.३ तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपात कोणत्याही प्रकारचे नुकसानचं वृत्त अद्याप आलेलं नाही.

jammu Kashmir News : जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणूक आज जाहीर होण्याची शक्यता

जम्मू-काश्मीर, हरियाणा विधानसभा निवडणूक आज जाहीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आज निवडणूक आयोग दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत ही निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.

Mumbai News : मुंबईतील पवईत खड्ड्यात आढळलं मगरीचं पिल्लू

मुंबईतील पवईच्या कैलास नगर येथील सायकल ट्रॅकजवळ गुरुवारी रात्री एका खड्यात मगरीचे पिल्लू आढळले आहे. स्थानिक आणि वनविभागाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर मगरीच्या पिल्लाला रेस्कू करण्यात यश आले आहे. तूर्तास मगरीच्या पिल्लाला सुखरूपरित्या जवळच असणाऱ्या विहार लेक परिसरात सोडण्यात आलं आहे.

Washim News : वाशिम जिल्ह्यात बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर परिणाम; रुग्णालयांत रुग्णांची गर्दी

वाशिम जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून बदलत्या वातावरणमुळे रुग्ण संख्येत वाढ

डोळ्यांचा संसर्ग,सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ

शहरातील खासगी रुग्णालयासह वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातही रुग्णांची संख्येत वाढ

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT