Maharashtra Live News Updates Saam tv
महाराष्ट्र

Marathi News Live Updates : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची उद्या पुण्यात पत्रकार परिषद, राजकीय घडामोडींवर भाष्य करण्याची शक्यता

Maharashtra News Live Updates : आज रविवार, २८ जुलै २०२४ आजच्या ठळक बातम्या, महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी आणि पावसाचे अपडेट एका क्लिकवर वाचा एका क्लिकवर...

Satish Daud

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची उद्या पुण्यात पत्रकार परिषद, राजकीय घडामोडींवर भाष्य करण्याची शक्यता

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत. संध्याकाळी चार वाजता पत्रकार परिषद होणार आहे. आज राज ठाकरेंनी पूरग्रस्त भागाची पाहणी करत नागरिकाशी सवांद साधला होता. पुण्यातील पूर स्थितीवर उद्या राज ठाकरे भूमिका मांडणार आहेत. तसेच राजकीय घडामोडींवर ही राज ठाकरे भाष्य करण्याची शक्यता आहे.

Khadakwasla Dam: पुणेकरांसाठी मोठी बातमी! खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवणार

पुणेकरांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवणार आहे. खडकवासला धरणातून 11704 क्यूसेक्स इतका पाण्याचा विसर्ग मुठा नदीमध्ये केला जाणार आहे. रात्री १० वाजता 7000 वरून पाण्याचा विसर्ग 11704 इतका करण्यात येणार आहे.

Igatpuri Accident : इगतपुरीत पर्यटनासाठी आलेल्या दोन वाहनांचा अपघात

इगतपुरी येथे भावली या ठिकाणी पर्यटनासाठी आलेल्या दोन वाहनांचा अपघात झाला. समोरून येणाऱ्या वाहनाला वाचवायच्या प्रयत्नात अपघात झाल्याची माहिती समोर आलीय. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दोन्ही वाहने रस्त्यालगत असणाऱ्या छोट्या पुलावरून खाली कोसळले. यात चार जण जखमी झालेत. तर इगतपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.

Raj Thackeray : पुण्यात विजेचा धक्का लागून मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांचं राज ठाकरे यांनी केलं सांत्वन

पुण्यातील अंडा भुर्जी स्टॉल धारकांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. यातील एका तरुणाच्या घरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सांत्वनपर भेट दिली. तीन दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे विजेचा शॉक लागून तरुणांचा मृत्यूल झाला होता.

Pune Crocodile News : दौंड येथे भिमा नदीपात्रात मगरींचा वावर

दौंड येथे भिमा नदीपात्रात मगरीचा वावर आहे. पावसामुळे भिमानदी दुथडी भरून वाहत आहे. पुराच्या पाण्यात मगर वाहून आली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ⁠भिमा नदीपात्रात मगरीचा वावर दुर्मिळ, मात्र, मगर दिसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Raj Thackeray : राज ठाकरेंना भेटण्यासाठी पुण्यातील एकतानगरमधील नागरिकांची मोठी गर्दी

पुण्यातील निंबजनगर मधील पाहणी केल्यानंतर राज ठाकरे एकता नगरमध्ये दाखल झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे एकतानगरमधील नागरिकांच्या घरात पाणी शिरलं होतं. या भागाची पाहणी करण्यासाठी राज ठाकरे दाखल झाले आहेत. दरम्यान एकतानगरमधील नागरिकांची राज ठाकरेंना भेटण्यासाठी मोठी गर्दी केली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर, नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असून सिंहगड भागात पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त नागरिकांची भेट घेणार आहेत. राज ठाकरे पुण्यातील सिंहगड रोड भागातील निंबजनगरमध्ये दाखल झाले आहेत. निंबजनगरमध्ये पाणी घरात शिरलं होतं.

Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे उद्या बीड जिल्हा दौऱ्यावर

उद्या भाजप नेत्या पंकजा मुंडे या बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. विधान परिषद सदस्यपदाची शपथ घेताच पंकजा मुंडे या बीड जिल्ह्यात प्रथमच येत आहेत. या पार्श्वभूमीवर भगवान भक्तीगड सावरगाव घाट येथे पंकजा मुंडेंच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आलीय. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने जंगी स्वागत होणार आहे, या निमित्ताने भगवान भक्ती गडावर स्वागताचे जंगी स्वागताचे बॅनर देखील लावण्यात आले आहेत..दरम्यान पंकजा मुंडेंच्या येण्याने भगवान भक्ती गड येथे दिवाळी साजरी करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिलीय.

Nagpur Rain :  नागपूर जिल्ह्यातील नांद नदीला पूर, ५ गावाचा संपर्क तुटला

मागील तीन दिवसांपासून नागपूर जिल्ह्यतील ग्रामीण भागातील पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहे. भिवापूर नांद मार्गावरील या पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने लोनारा, धामणगाव, वणी, आलेसूर, खोलदोडा गावाचा संपर्क तुटला. गावातील 300 वर्ष जुने शिव मंदिर पुराचा पाण्यामुळे अर्ध बुडाले. आजूबाजूचा गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

तथ्य नसल्यानं मेरीटच्या आधारावर अनिल देशमुख यांना जामीन; सलील 

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या टिकेनंतर सत्ताधारी टीका करत आहे. त्या टीकेला अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी एक्स हँडलवर ट्विट करून प्रतीउत्तर दिलं. अनिल देशमुख यांचा जमीन मेडिकल बेसवर नाहीबतर तथ्य नसल्यानं मेरीटच्या आधारावर असल्याचं सलील देशमुख यांनी ट्विट करून म्हंटल.

Navi Mumbai News :  पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्याविरोधात पनवेलमध्ये गुन्हा दाखल

पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्याविरोधात पनवेलमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पनवेल येथील एका ऑर्केस्ट्रामध्ये २ जणांना मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. डान्स करताना वाद झाल्यानंतर भाजप पदाधिकारी यांनी धक्का मारून खाली पाडले आणि मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

Paris Olympics 2024 :  १० मीटर एअर रायफलमध्ये रमिता जिंदालची फायनलमध्ये धडक

MNS News: रत्नागिरीच्या पाचही विधानसभा मनसे लढवणार - अविनाश अभ्यंकर

रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही विधानसभेच्या जागा मनसे लढवणार आहे. या दौऱ्यानंतर राज साहेब ठाकरे यांना अहवाल दिला जाईल. त्यानंतर राज ठाकरे देखील कोकणचा दौरा करतील अशी माहिती मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी दिली. दरम्यान कोकणातील रस्त्यांची दुरावस्था आहे. पण यापुढे त्यांना मनसे स्टाईलनेच उत्तर दिले जाईल अशी तीव्र प्रतिक्रिया देखील अभ्यंकर यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषदेमध्ये दिली. तर लाडकी बहीण सारख्या योजना विधानसभेपूर्वी यशस्वी होणार आहेत का? असा सवाल देखील अविनाश अभ्यंकर यांनी यावेळी विचारला.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांची अहमदनगरमध्ये शांतता रॅली

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली 12 ऑगस्ट रोजी अहमदनगर शहरात होणार आहे. त्या अनुषंगाने नियोजन बैठक अहमदनगर शहरात पार पडली...जिल्हाभरातून मोठ्या संख्येने मराठा बांधव हे या नियोजन बैठकीत सहभागी झाले. 12 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या शांतता रॅलीत जवळपास 10 लाख मराठा बांधव सहभागी होतील असा दावा यावेळी मराठा कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय.

Raigad News: रायगड जिल्ह्यातील महायुतीमधील संघर्ष टोकाला

रायगड जिल्ह्यातील महायुतीमधील संघर्ष टोकाला गेलाय. शिवसेना आणि राष्ट्रवादीत बिनसलं आहे. आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरेंसह राष्ट्रवादीला खडेबोल सुनावले. गद्दारी कराल तर आम्ही श्रीवर्धनमध्ये शिवसेनेचा उमेदवार उभा करू असे त्यांनी सांगितले.

Pune Police Bharti: पुणे ग्रामीण पोलीस मैदानी चाचणीचे नवीन वेळापत्रक जाहीर

पुणे ग्रामीण पोलीस मैदानी चाचणीचे नवीन वेळापत्रक जाहीर

आता २९ जुलै ते ५ ऑगस्टपर्यंत होणार चाचणी

पुणे परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे चाचणी पुढे ढकलण्यात आली होती. पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलात ४४८ रिक्त पोलीस शिपाई पदांसाठी चाचणी घेण्यात येणार होती. मैदानी चाचणीसाठी सकाळी ५ वाजता हजर रहावे असे आवाहन पुणे ग्रामीण पोलिसांनी केलं आहे.

Tamhini Ghat News: ताम्हिणी घाटात दिवसाला तब्बल ३०० ते ५०० मिलिमीटर इतका पाऊस

पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर गेल्या ४ ते ५ दिवसांपासून जोरदार बरसतोय. ताम्हिणी घाट जो पर्यटकांसाठी फेवरेट ठिकाण असतं त्याठिकाणी तर दिवसाला जवळपास ३०० ते ५०० मिलिमीटर पावसाची नोंद केली जातेय. यंदा ताम्हिणी घाटातील काही परिसरात दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे काहीशी पर्यटकांची नाराजी आहे. पवना धरणात जून महिन्यापासून १८२४ मिलिमीटर पावसाची नोंद झालीय तर मुळशी मध्ये २०७१ मिलिमीटर इतका पाऊस झालाय.

Nanded News: नांदेड शहरातील मुख्य रस्त्यावर कोसळले झाड, १ गंभीर जखमी

नांदेड जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे नांदेड शहरातील श्रीनगर या मुख्य रस्त्यावरील एक झाड अचानक रस्त्यावर कोसळले. याच रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीवर हे झाड कोसळले आहे. दुचाकीवर दुचाकी स्वरासह एक महिला आणि लहान मुलगा होता..झाड कोसळल्याने काही वेळ या झाडाखाली तिघे जण दबल्या गेले.स्थानिकांनी या तिघांना बाहेर काढले. यातील एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

Pune News:  खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग होणार

दुपारी ३ वाजता खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग होणार आहे. खडकवासला धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने वाढ होत असून धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात ५१३६ क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात याव्यात, खडकवासला पाटबंधारे विभगाच्या सूचना

Sharad Pawar:  पुढील महिन्यात शरद पवारांचा राज्यव्यापी दौरा, विधानसभेचे रणशिंग फुंकणार

पुढील महिन्यापासून शरद पवार फुंकणार विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग

पुढील महिन्यापासून शरद पवार करणार राज्यव्यापी दौरा

राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात किल्ले शिवनेरीपासून होण्याची शक्यता

राज्यव्यापी दौऱ्यात अनेक ठिकाणी होणार शरद पवार यांच्या जाहीर सभा

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होणार दौऱ्याची सुरुवात

Maharashtra Politics News: विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राज्यातील जनतेला राज्य सरकारचा आनंदाचा शिधा

विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राज्यातील जनतेला राज्य सरकारचा आनंदाचा शिधा

गणेशोत्सवात राज्यातील १ कोटी ७० लाख कुटुंबांना वाटला जाणार आनंदाचा शिधा.

७ सप्टेंबरला गणेशोत्सवाची सुरूवात असून ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळं सर्व जनतेपर्यंत गणेशोत्सवात आनंदाचा शिधा पोहचविण्यासाठी राज्य सरकारकडून हालचाली.

१०० रूपयांत प्रत्येकी एक किलो रवा, साखर, चनाडाळ आणि खाद्यतेल लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी टेंडर प्रक्रियेला वेग.

टेंडर प्रक्रियेतील अटी आणि शर्थी शिथील केल्याने यावेळी ९ कंपन्यांचा टेंडर प्रक्रियेत सहभाग, यापूर्वी केवळ दोन ते तीन कंपन्याच होत असत सहभागी.

आनंदाचा शिधा हा निकृष्ट दर्जाचा आणि खूप उशिरा वितरीत होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. तसंच विरोधकांकडून आरोप झाले होते. परंतु निवडणुकीच्या तोंडावर यावेळी असे प्रकार घडू नयेत याची काळजी सरकार घेत आहे.

Wardha News: पतीचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकली; वृध्द पत्नीनेही सोडला प्राण

पतीच्या निधनानंतर काही तासातच पत्नीनेही प्राण सोडल्याची हृदयविदारक घटना हिंगोलीच्या बासंबा गावामध्ये घडली आहे, नामदेव रामनाथ पवार पतीचे तर समिंद्राबाई नामदेव पवार असे मयत पती-पत्नीची नावे आहेत दरम्यान गावकऱ्यांनी दोघांचेही अंत्यसंस्कार एकाच वेळी करत दोघांनाही श्रद्धांजली अर्पण केली आहे.

BJP Meeting Delhi: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच मानाचे स्थान कायम

देशातील भाजपशासीत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच मानाचे स्थान कायम. उपमुख्यमंत्री असतानाही देवेंद्र फडणवीस हे मोदी अमित शाह यांच्यासह पहिल्या रांगेत बसले. पार्टीचा प्रोटोकॅाल सोडून फडणवीसांना पहिल्या रांगेतल स्थान कायम ठेवल्यानं फोटोची जोरदार चर्चा होत आहे.

Nandurbar News:  मंत्री विजयकुमार गावित यांच्या कन्याविरुद्ध नंदुरबार जिल्हा परिषदेत अविश्वास ठराव

राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांच्या कन्या डॉ सुप्रिया गावित या नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा असून त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आलेला आहे. मंत्री विजयकुमार गावित यांच्या कन्या डॉक्टर सुप्रिया गावित यांच्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून काँग्रेस आणि सत्तेत असलेले शिंदे गट हे भ्रष्टाचाराचे आरोप करत आले आहे यातच काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या अविश्वास ठराव दाखल करण्यात आलेला आहे यावर स्पष्टीकरण देत मंत्री विजयकुमार गावित म्हणाले की अविश्वास ठराव हा पास होणार नसून आमच्याकडे पुरेसा संख्या बळ असून यात विरोधकांचे स्वप्न उध्वस्त होणार असल्याची टीका मंत्री विजयकुमार गावित यांनी केलेले आहे..

Nandurbar News: केंद्र सरकारच्या संसदीय संकुल विकास परीयोजनेत नंदुरबार जिल्ह्यातील 10 गावांची निवड

केंद्र सरकारने संसदीय संकुल विकास परीयोजना राबवण्यात येत असून, या योजनेत नंदुरबार जिल्ह्यातील दहा गावांची निवड करण्यात आली असून, जनजाती कौशल्य विकास परियोजनामार्फत गावांच्या विकास केला जाणार आहे. तर या दहा गावातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आला असून आधुनिक शेती करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील दहा गावांची निवड करण्यात आलेली आहे त्यामुळे या दहा गावातील शेतकऱ्यांना आधी प्रशिक्षण देऊन आधुनिक शेती कडे वळवण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्न आहे. या योजनेमुळे गावांच्या मोठ्या प्रमाणावर विकास होणार आहे. या प्रशिक्षणाचे उद्घाटन माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी केला, तर शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे वळण्याच्या आवाहन हिना गावित यांनी केलं.

Nashik News: राष्ट्रवादीच्या बैठकीला नरहरी झिरवळ अनुपस्थित

नाशिकमध्ये होत असलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीस नरहरी झिरवळ अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे नाशिकच्या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने नाशिक पक्ष कार्यालयात दाखल झाले आहेत. या कार्यक्रमाला नरहरी झिरवळ मात्र अनुपस्थित आहेत.

 Buldhana News: रस्त्यासाठी युवकाचे चिखलात लोटागंण आंदोलन

मेहकर तालुक्यातील घाटबोरी गावातील मुख्य रस्ता पूर्त चिखलमय झाल्याने रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे, शाळेतील विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्याबाबत ग्रामपंचायतिला पावसाल्यापूर्वी निवेदने देण्यात आली होती मात्र रस्ता तयार करण्यात् आला नसल्याने गावातील युवकांनी चिखलमय रस्त्यावरून लोटांगण आंदोलन करीत जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे... तसेच या रस्त्यासाठी ग्रामस्थांनी या अगोदर आमरण उपोषण सुद्धा केले होते त्यावेळे रस्ता पावसाळ्या पूर्वी करण्यात येईल असे लेखी आश्वासन देण्यात आले होते मात्र रस्ता अद्याप झाला नाही त्यामुळे हे आंदोलन करीत ग्रामपंचायत कारभाराचा निषेध व्यक्त केला आहे

Nalasopara News: तब्बल २५ महिलांशी लग्न करणारा 'लखोबा लोखंडे' अखेर जाळ्यात

अनेक जणींना फसवून लग्न करणारा आणि पुन्हा तो मी नव्हेच, असे टोपी फिरवत म्हणणारा आचार्य अत्रे यांचा 'लखोबा लोखंडे' अजरामर आहे! तो सध्या मराठी रंगभूमीवर वावरत नसला तरी पालघरच्या नालासोपारात तो अवतरला. या नव्या 'लखोबा'ने एक-दोन नव्हे, तर तब्बल २५ वेळा लग्न केले आणि या सर्व पत्नींना अक्षरशः लाखो रुपयांना गंडवले. यातील एक लग्नाची बेडी मात्र गजाआड होण्यास कारणीभूत ठरली. फिरोज नियाज शेख (वय ४३) नावाचा हा लुटारू 'लखोबा' हाती लागला आहे.

BJP Meeting Kolhapur:  कोल्हापुरात भाजपची पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक सुरू

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी ॲक्शन मोडवर. भारतीय जनता पार्टीची कोल्हापुरात पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक सुरू आहे. भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत दादा पाटील, राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, समरजीत सिंह घाटगे, गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेक नेते बैठकीला उपस्थित आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा या 3 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे.

Pune Breaking News: कोरेगाव पार्कमधील पॉप्युलर हाइट्स इमारत कोसळण्याची भिती

कोरेगाव पार्क धील पॉप्युलर हाइट्स बहुमजली इमारत कोसळण्याची भिती. पाॕप्युलर हाइट्स हाउसिंग सोसायटीची सुरक्षा भिंत पावसाच्या पाण्याने पडली. कोरेगाव पार्कमधील पॉप्युलर हाईट 2 इमारत आज पडायला आली आहे. पॉप्युलर हाईट ही खूप मोठी सोसायटी आहे. नदी काठी आहे, नदीच्या काठची सुरक्षा भिंत पुरात पूर्ण ढासळून गेली आहे आणि आज एक इमारत ही ढासळण्याच्या बेतात आहे. ती कधी ही पडू शकते. नदीपात्र सुशोभीकरण प्रकल्प करताना काहीही विचार न करता नदी पात्राचे वाटोळे केल्याचा स्थानिक आरोप करत आहेत.

Chhatrapati Sambhajinagar:  ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे किती? माहिती द्या; औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

राज्यातील ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदांबाबत शपथपत्राद्वारे माहिती सादर करा असे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि वाय.जी.खोब्रागडे यांनी वैद्यकीय विभागाच्या आयुक्तांना दिलेय. माजी खासदार इम्तियाजली यांनी दाखल केलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील रिक्त पदांबाबतच्या जनहित याचिकेवरील सुनावणी दरम्यान हे आदेश देण्यात आले. दरम्यान जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयात सर्व संवर्गाची 973 पदे मंजूर असून त्यापैकी केवळ 525 पदे भरली असून 448 पदे ही रिक्त आहे. यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांचा ताण घाटी रुग्णालयावर पडत असल्याचं खासदार इम्तियाज जलील यांनी निदर्शनास आणून दिलं होतं.

Pune News: मोठी बातमी! अजित दादा  गटाचे आमदार शरद पवारांच्या व्यासपीठावर

पुण्यातील शरद पवारांच्या कार्यक्रमात आज अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे ही उपस्थित आहेत. सातारा जिल्हा मित्र मंडळाच्या वतीने गोल्डन जुबली कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम हडपसर मतदार संघातील वानवडी येथे होत आहे. या कार्यक्रमात अजित पवार गटाचे आमदार उपस्थित आहेत.

शरद पवारांच्या कार्यक्रमात पहिल्यांदाच चेतन तुपे पवरासोबत व्यासपिठावर

सातारा जिल्हा मित्र मंडळाच्या वतीने गोल्डन जुलै कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले...

हा कार्यक्रम हडपसर मतदार संघातील वानवडी येथे होत आहे....

Navi Mumbai News: अक्षता म्हात्रे हत्या प्रकरण: आरोपींच्या शिक्षेसाठी ग्रामस्थांचा भव्य लाँग मार्च

नवी मुंबईत आज कोपरखैरणे ते वाशी दरम्यान ग्रामस्थांचा भव्य लाँग मार्च निघणार आहे. अक्षता म्हात्रेचा खटला फास्ट कोर्टात चालवा आणि आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी ग्रामस्थांचा लाँग मार्च निघणार आहे. नवी मुंबईतील 29 गावातील ग्रामस्थ लाँग मार्चमध्ये सहभागी होणार असून कोपरखैरणे ते वाशी मुख्य रस्ता बंद करण्यात आला आहे.

Maharashtra Politics: विधान परिषद आमदार शपथविधी: पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत यांनी घेतली शपथ

विधान परिषदेत निवडणुकीमध्ये जिंकून आलेल्या 11 विधानपरिषद सदस्यांना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आज शपथ देणार आहेत. विधान भवन येथे विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात शपथ ग्रहण सोहळा पार पडत आहे.

कोण कोणते आमदार शपथ घेणार

1- पंकजा मुंडे - भाजप

2- योगेश टिळेकर - भाजप

3- अमित गोरखे - भाजप

4- परिणय फुके - भाजप

5- सदाभाऊ खोत - भाजप

6- भावना गवळी - शिंदे शिवसेना

7- कृपाल तुमाने - शिंदे शिवसेना

8- शिवाजी गर्जे - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

9- राजेश विटेकर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

10- प्रज्ञा सातव - काँग्रेस

11- मिलिंद नार्वेकर - उद्धव ठाकरे पक्ष

Pandharpur News: 'भावी आमदार अभिजीत पाटील',पंढरपुरात बॅनर झळकले!

पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटलांचे पंढरपुरात भाविक आमदार असे बॅनर झळकले. लोकसभा निवडणूकीपासून अभिजीत पाटील भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत. पंढरपुरातून अभिजीत पाटील यांची विधानसभेची तयारी सुरू केली आहे.

Wardha News:  रेल्वेच्या पुलाखाली साचले पाणी, गावातील वाहतूक बंद

वर्धा जिल्ह्याच्या देवळी तालुक्यातील दहेगाव गावंडे या गावाला जाण्यासाठी बनविण्यात आलेल्या रेल्वे पुलाखालील रस्त्यावर पाणी साचल्याने गावातील वाहतूक बंद झाली आहे. पावसाच्या सरी येताच या पुलाखाली तीन ते चार फूट पाणी साचतो यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.मार्ग बंद झाल्याने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे सोबतच ज्या नागरिकांना रुग्णालयात जायचे आहे त्यांना सुद्धा अडचणीचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांनाही याचा त्रास होत आहे.

Pune News : खडकवासला धरणातून पुन्हा होणार पाण्याचा विसर्ग

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. खडकवासला धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. दुपारी 3 वाजता 5 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. त्यामुळे नदीकाठावर कुणीही जाऊ नये, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

Ratnagiri News : रत्नागिरीत गर्भपाताच्या गोळ्या ठेवणाऱ्या डॉक्टरवर कारवाई

गर्भपात केंद्राची मान्यता नसतानाही गर्भपाताच्या गोळ्या व साहित्य ठेवून त्या रुग्णांना देणाऱ्या रत्नागिरीतील डॉक्टरावर कारवाई करण्यात आली आहे. साई हॉस्पिटलचे प्रमुख डॉ.अनंत नारायण शिगवण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक भास्कर जगताप यांनी तक्रार दिली आहे. बेकायदा गर्भपात केंद्र चालविल्याप्रकरणी डॉ.शिगवण यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Sangli News : कृष्णा नदीकाठच्या गावांना दिलासा; पाणीपातळी झपाट्याने कमी

सांगलीमध्ये कृष्णा नदीची पाण्याची पातळी आता संथ गतीने कमी होत आहे. कृष्णेची पातळी रात्री 40 फूट 6 इंच होती. ती आता सकाळी पातळी 40 फूट झाली आहे. रात्रीपासून 6 इंच ने पाणी पातळी कमी झाली आहे. मात्र इशारा पातळी ही 40 फूट आहे. यामुळे कृष्णा काठाला दिलासा मिळाला आहे. मात्र सांगलीच्या सखल भागात अजूनही पाणी साचून आहे. अनेक घरं पाण्याखाली आहेत. तेथील कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले आहे.

Wardha News : वर्धा येथे विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आष्टी तालुक्याच्या भिष्णूर गावात घडली.राजेश भीमराव नांदणे (४२) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.मृतक राजेशकडे दोन एकर शेती आहे. त्यांच्या निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Bhandara Rain News : भंडाऱ्यात मध्यरात्रीपासून पावसाची हजेरी

मध्यरात्रीपासून पावसाने सुरुवात केली असून.कुठे मध्यम तर कुठे हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. 5 दिवसापूर्वी आलेल्या मुसळधार पावसाने लाखांदूर आणि पवनी तालुक्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून अनेक शेतकऱ्यांचे यात नुकसान झाले. काल सकाळी आलेल्या पावसाने दिवसभर विश्रांती घेतली मात्र पुन्हा मध्यरात्रीपासून कुठे हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे.

Ratnagiri News : रत्नागिरीत ऑलिंपिक शुभेच्छा रन, नागरिकांनी भारतीय खेळाडूंना दिल्या शुभेच्छा

यंदाच्या पॅरिस ऑलिंपिकमध्ये 117 भारतीय खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी रत्नागिरी शहरातील नागरिक एकत्र आले आणि त्यांनी ऑलिंपिक शुभेच्छा रनचं आयोजन भाटये या समुद्रकिनारी केले. यावेळी लहान थोरांपासून प्रत्येक वयोगटातील रत्नागिरीकर मोठ्या उत्साहाने यामध्ये सहभागी झालेला दिसून आला. सर्व नागरिकांनी मिळून अडीचशे किलोमीटर हुन जास्त अंतर धावत सर्वांनी पॅरिस ऑलम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

Gadchiroli News : भामरागडमधील बाजारपेठ 24 तासांपासून पाण्याखालीच

गडचिरोली जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून शनिवारी पर्लकोटा नदीला आलेल्या पुराचे पाणी भामरागड शहरातील बाजारपेठेत शिरले होते. 24 तास उलटूनही पूर ओसरला नसल्याने आजही बाजारपेठ पूर्णता पाण्याखाली आहे.

एक दिवसाच्या विश्रांतीनंतर शनिवारी गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने पुन्हा हजेरी लावली. त्यामुळे शनिवारी जिल्ह्यातील सहा मार्ग बंद पडले. सध्या वैनगंगा नदी इशारा पातळीच्या खाली असली तरी जिल्ह्यातील छोट्या नाल्यांना पूर आल्यामुळे अनेक मार्ग बंद आहे.

त्यातच काल 64 जणांना बचाव पथकाने रेस्क्यू करत पुरातून बाहेर काढले. भामरागड- आल्लापल्ली या राष्ट्रीय महामार्गावर अनेक नाल्यांवर पुलाचे बांधकाम सुरू असून रपटे वाहून गेल्याने हा मार्ग बऱ्याच दिवसांपासून बंद आहे.

Kolhapur News : कोल्हापुरातील रस्त्यांवर पुराच्या पाण्यासोबत आला मोठ्या प्रमाणात कचरा

कोल्हापुरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सर्वच रस्त्यांवर पुराचे पाणी साचलंय. पुराच्या पाण्यासोबत आला मोठ्या प्रमाणात कचरा वाहून आलाय. प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक पिशव्या, थर्माकॉलसह इतर कचरा साचल्याने दुर्गंधीचे साम्राज्य पसरलं आहे.

Rain Updates : विदर्भात पहाटेपासूनच मुसळधार पाऊस, शेतीपिकांना मोठा फटका

विदर्भात रविवारी पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. नागपूर, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. हवामान खात्याने आज नागपूरसह संपूर्ण विदर्भाला पावसाला यलो अलर्ट दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामतीमधून अजित पवार आघाडीवर

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

SCROLL FOR NEXT