राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र आले तरी महायुतीला काही फरक पडणार नाही, मुंबई महापालिका निवडणुकीत महायुती सत्तेत येईल, असा विश्वास आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी महाडमध्ये व्यक्त केला आहे.
कोंढवा गणेश काळे हत्या प्रकरण
सोशल मीडियावर गणेश काळे च्या हत्येच समर्थन
कोंढव्यामधील तरुणांनी सोशल मीडियावर बंदुकांसह काही काडतुसांसोबत बनवला व्हिडिओ
तसेच हत्येच समर्थन करणारा व्हिडिओ देखील केला पोस्ट
बबलू सय्यद असं पोस्ट केलेल्या तरुणाचे नाव
बबलू सय्यद देखील हत्तेमध्ये सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला जातोय
अभिनेता किरण माने यांनी ॲड. असीम सरोदे यांनी माफी मागण्यास नकार दिल्याचे सार्वजनिकरित्या कौतुक केले.
तीन महिन्यांसाठी झालेल्या सनद रद्द कारवाईला माने यांनी “किरकोळ” असे संबोधले.
असीम यांचा निर्णय हा धैर्याचे आणि स्वाभिमानाचे प्रतिक असल्याचे माने यांनी म्हटले.
माने यांनी सध्याच्या परिस्थितीवर टीका करत अराजक, दडपशाही आणि हुकूमशाही वाढत असल्याचा आरोप केला.
मुंबई महापालिकेसह राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकित रिपब्लिकन पक्ष महायुतीसोबत निवडणुका लढणार आहे.ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेत रिपब्लिकन पक्षाला समाधानकारक जागा सोडण्यात येणार नाहीत त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाने स्वबळावर आपले उमेदवार निवडूण आणून रिपब्लिकन पक्षाची राज्याच्या राजकारणावर आपली चांगली छाप निर्माण करावी असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
रूपाली चाकणकर या बेजबाबदारपणे वागत आहेत.
अजित पवार कशासाठी हे सगळं सहन करत आहे हे आश्चर्य आहे.
महिला व बालकल्याण विभाग असो, महिला आयोग असो सगळीकडे विचित्रपणा सुरू आहे.. या विभागाकडे कुणाचाच लक्ष नाही
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे.
आरोपी अंशुमन राम केवल यादव, वय १९ वर्षे, रा.शिरुरमधून ताब्यात घेवुन युनिट ६ कार्यालय वाघोली येथे घेवुन येवुन त्याचेकडे ट्रान्सफॉर्मर/रोहीत्र मधील तांब्याच्या तारा चोरी केल्याचे कबूल केले.
आरोपीने वाघोली लोणीकंद भागात त्याचे साथीदारांसह रोहीत्रामधील तांब्याच्या तारा चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्यांकडे आधिक चौकशी करुन एकुण २ लाख रुपयाच्या रोहीत्रामधील तांब्याच्या तारा जप्त केल्या आहेत
आरोपीला ताब्यात घेऊनवाघोली पो.स्टे. कडील ०२ गुन्हे, लोणीकाळभोर पो.स्टे. कडील ०१ गुन्हा व लोणीकंद पो.स्टे. कडील ०१ गुन्हा उघडकीस आणला आहे.असे चार गुन्हे उघड केले आहेत.
अधिक तपास गुन्हे शाखा करत आहे.
प्रकाश सुर्वे यांना आईचे महत्व माहिती नसेल बाकीच्या गोष्टीचे त्यांना चांगले महत्त्व माहिती आहे. मागे त्यांचा ब्रीज वरचा विडीओ चांगला वायरल झाला होता 39 देशामध्ये त्याचं हे कर्तृत्व पहिल्या गेल होत.अशा माणसाकडून आईचा काय सन्मान राखला जाईल.स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आई सगळ्यात महत्वाची आहे मराठी ही आपली आई आहे आणि आई जगली पाहिजे त्यात आईचे असे पुत्र असतील तर त्यांच्या पक्षाचे आणि त्यांचे कल्याणच आहे असे टोला शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी लगावला आहे.
हवामान खात्याने वर्तविल्या यलो अलर्ट नुसार शहरासह अनेक भागात पाऊसाला सुरवात...
मध्यम स्वरूपाचा पाऊस मात्र सततचा पाऊस राहिल्यास हरभरा, गहू, आणि कांदा पिकांच्या पेरणीवर परिणाम होण्याची शक्यता...
मेट्रो वन मार्गावरील साकीनाका मेट्रो स्थानकात तांत्रिक बिघाड
मागील अर्धा तासापासून मेट्रो एकाच स्थानकात खोळंबली
कामावरून घरी जाणाऱ्या चाकरमान्यांची तारांबळ
मेट्रो पालकाचे प्रवेशद्वार केले बंद
अंधेरी वेस्टन एक्सप्रेस हायवे जे बी नगर मरोळ नाका साकीनाका मेट्रो स्थानकात मोठी गर्दी
आरोपी अंशुमन राम केवल यादव, वय १९ वर्षे, रा.शिरुरमधून ताब्यात घेवुन युनिट ६ कार्यालय वाघोली येथे घेवुन येवुन त्याचेकडे ट्रान्सफॉर्मर/रोहीत्र मधील तांब्याच्या तारा चोरी केल्याचे कबूल केले.
आरोपीने वाघोली लोणीकंद भागात त्याचे साथीदारांसह रोहीत्रामधील तांब्याच्या तारा चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्यांकडे आधिक चौकशी करुन एकुण २ लाख रुपयाच्या रोहीत्रामधील तांब्याच्या तारा जप्त केल्या आहेत
आरोपीला ताब्यात घेऊनवाघोली पो.स्टे. कडील ०२ गुन्हे, लोणीकाळभोर पो.स्टे. कडील ०१ गुन्हा व लोणीकंद पो.स्टे. कडील ०१ गुन्हा उघडकीस आणला आहे.असे चार गुन्हे उघड केले आहेत.
अधिक तपास गुन्हे शाखा करत आहे.
जैन मुनी निलेशचंद्र यांचं उपोषण मागे
१५ दिवसानंतर घेतली माघार
नार्वेकर आणि लोढा यांच्या आश्वासनानंतर माघार
मुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, असं सांगितलं
ऊस दरासाठी घेण्यात आलेल्या बैठकीला कारखान्याचे चेअरमन उपस्थित नसल्याने शेतकरी संघटना प्रतिनिधीचां संताप
राजू शेट्टींनी देखील व्यक्त केली नाराजी
कारखान्याच्या चेअरमनला बैठकीला बोलवायला आता पालखी पाठवायची का
राजू शेट्टीं चां जिल्हाधिकारी यांना सवाल
साक्री तालुक्यातील आमळी येथील श्री तिर्थक्षेत्र कन्हैयालाल महाराज यात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे, आमदार मंजुळा गावीत यांच्या हस्ते श्री कन्हैयालाल महाराज यांची विधिवत पूजा करून आरती करण्यात आली, श्री कन्हैयालाल महाराजांना ऊस, साखरेचे पेढे चढविण्यात आले.
पारंपारिक आख्यायिका असलेल्या कन्हैयालाल महाराज मंदिरात दरवर्षी जिल्ह्याच्या त्याचबरोबर बाहेरील राज्यातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात, कन्हैयालाल महाराजांची मूर्ती स्वयंभू असल्याची आख्यायिका असून, कन्हैयालाल महाराजांच्या नाभीतून पाणी ठिपकत असते आणि हा चमत्कार पाहण्यासाठी दरवर्षी या यात्रा उत्सवामध्ये मोठ्या संख्येने भाविक कन्हैयालाला महाराज यांच्या दर्शनासाठी आपली उपस्थिती दर्शवत असतात, या वर्षी देखील या यात्रा उत्सवामध्ये मोठ्या संख्येने भाविक यात्रा उत्सवामध्ये सहभागी होत असल्याचे दिसून येत आहे.
ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाची बैठक
थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होणार
बैठकीला कारखानदार प्रतिनिधी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह जिल्ह्यातील काही इतर शेतकरी संघटना आणि जिल्हाधिकारी यांच्यात बैठक
जिल्ह्यातल्या तीन कारखान्याच्या विरोधात स्वाभिमानीचा आक्रमक पवित्रा
कोल्हापुरातील दालमिया, बिद्री आणि कुंभी साखर कारखान्यांनी एक रक्कमी एफआरपी मध्ये मोडतोड केल्याचे म्हणत जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा दिलाय इशारा
बैठकीनंतर ऊस दर लेखी देत नाहीत तोपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनाच घेराव घालणार असा स्वाभिमानीने दिलाय इशारा
बैठकीत शेतकरी आक्रमक होण्याची शक्यता
नवी मुंबई शहरामध्ये अनाधिकृत बांधकामावर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू करण्यात येत आहे अशाच प्रकारे घनसोली येथील तळवली गाव येथे सिडको नवी मुंबई महानगरपालिका आणि महावितरण कारवाई करण्यात आली आहे
50 ते 60 कुटुंब रस्त्यावर आलेले आहेत
ही इमारत अनाधिकृत असल्यामुळे कारवाई करण्यात येत आहेत
बिल्डर आणि फसवणूक केल्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसून येत आहेत
भाजपचे खिसे भरण्यासाठी पुणेकरांच्या खिशातून लूट
पुणे महानगरपालिकेने नव्याने मान्य केलेल्या ६ एसटीपी प्लांटचे तब्बल १८६० कोटी रुपयांचे टेंडर भारतीय जनता पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याच्या कंपनीला देण्यात आले आहे.
हे काम भाजपच्या या पदाधिकाऱ्यालाच मिळावे या पद्धतीने निविदा प्रक्रियेत अनेक बदल करण्यात आले,
नव्याने अनेक अटी मान्य करण्यात आल्या. यातून सामान्य पुणेकरांच्या कररुपी पैशांची तब्बल ५०० कोटी रुपयांची लूट होणार आहे.
या भ्रष्टाचाराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आंदोलन करत आहेत.
नांदेडमध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी.
नांदेडच्या कंधार तालुक्यातील कौठा परिसरात मुसळधार पाऊस.
सातत्याने पाऊस बरसत असल्याने वेचणीला आलेल्या कापसाचे प्रचंड नुकसान.
काढून ठेवलेले सोयाबीनचे ढीग शेतात.
सततच्या पावसामुळे शेतकरी हतबल
नांदेडच्या किनवट तालुक्यातील सारखणी येथे एसटी प्रवर्गाच्या मागणीसाठी बंजारा बांधवांनी आमरण उपोषण सुरू केल आहे.मागील सात दिवसापासून ऍड. प्रदीप राठोड आणि राहुल चव्हाण यांनी हे उपोषण सुरू केल आहे. काल बंजारा समाजाचे नेते मंत्री संजय राठोड हे त्यांच्या सासुरवाडी असलेल्या किनवट तालुक्यातील परसराम तांडा येथे आले होते. परंतु मंत्री संजय राठोड यांनी उपोषण स्थळा समोरून जाऊन देखील उपोषण स्थळी असेल्या उपोषणकर्त्यांची भेट घेतली नाही. मंत्री संजय राठोड यांनी उपोषणकर्त्याची भेट टाळल्याने बंजारा समाज आक्रमक झाला आहे. समाजासाठी वेळ नसलेल्या मंत्री संजय राठोड यांचा सारखणी येथे तीव्र निषेध करण्यात आला.किनवटच्या सारखणी येथे बंजारा बांधवांनी मंत्री संजय राठोड यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध व्यक्त केला आहे.
राज्यात मतदान यादी वरून राजकारण तापले आहे निवडणूक आयोगाच्या निवडणूक यादीवरून आरोप प्रत्यारोप सध्या सुरू झालेले आहेत अशाच प्रकारे नवी मुंबई शहराचे तत्कालीन नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांचा सुद्धा नवी मुंबई शहरामध्ये तसेच ठाणे शहरामध्ये दुबार मतदान नोंदवलेला आहे
- सिन्नरच्या सोमठाणे गटात काका आणि पुतणी आमने सामने येणार ?
- माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे यांनी सोमठाणे गटातून निवडणूक लढवण्याची व्यक्त केली इच्छा
- भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि गिरीश महाजन यांच्यासमोर उमेदवारीची केली मागणी
- सोमठाण्यात भाजपचे कमळ फुलेल असा व्यक्त केला विश्वास
- सोमठाणे गटातून माणिकराव कोकाटे यांच्या कन्या सिमंतिनी कोकाटे आहेत इच्छुक
महादेव मुंडे हत्या प्रकरणात न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंची आज खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. तपासाची माहिती जाणून घेण्यासाठी आणि कुटुंबाची काळजी व्यक्त करण्यासाठी सुप्रिया सुळे ज्ञानेश्वरी मुंडेंना भेटल्या, मात्र या भेटीदरम्यान ज्ञानेश्वरी मुंडेंना अश्रू अनावर झाले. महादेव मुंडे खून प्रकरण एसआयटी स्थापन करण्यात आली होती. या एसआयटीमार्फत तपास कुठपर्यंत आला आहे. यांची माहिती जाणून घेतली.
फटाके फोडत, पेढे वाटत आणि घोषणाबाजी करत महिला संघटनेकडून आनंद व्यक्त
भारतीय महिलांनी पहिल्यांदाच विश्वचषक जिंकल्याने देशभरात एक दिवसाची सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी
महिला खेळाडूंना राज्य व केंद्र सरकारकडून योग्य सन्मान व बक्षीस जाहीर करावे, अशीही मागणी
1983 साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर देण्यात आलेल्या सुट्टीची आठवण करून दिली
पत्रकाराच्या मुलगा यश ढाकाच्या निर्घृण हत्येला आता एक महिना पूर्ण झाला. मात्र अद्यापही मुख्य आरोपी शिराळे याला अद्याप बीड पोलिसांनी अटक केलेले नाही. राजकीय आश्रयामुळे आरोपीला का वाचवले जातेय? याच प्रश्नांसह संतापलेल्या यश ढाका च्या कुटुंबीयांनी आणि बीडकरांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढला. आरोपींना तात्काळ अटक करा आणि या प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत व्हावा, अशी ठाम मागणी मोर्चेकऱ्यांनी आणि यश ढाका यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आली.
मागाठाणे मतदारसंघात शिवसेना (शिंदे गट) तर्फे आयोजित धार्मिक कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीय नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमात आमदार प्रकाश सुर्वे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आता राजकीय वातावरण तापले आहे. कार्यक्रमादरम्यान सुर्वे यांनी मराठी समाजाच्या भावना दुखावतील असे वक्तव्य केल्याचा आरोप होत आहे.
या विधानाचा मनसेकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे. मनसेचे नेते नयन कदम यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना मतांसाठी मराठी समाजाच्या भावना बाजूला सारून वागण्याचा आरोप करत सुर्वे यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे मागाठाणे क्षेत्रात राजकीय चर्चा पुन्हा एकदा चांगल्याच पेटल्या आहेत.
जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्यासह माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे संताजी चालुक्य यांनी घेतली तानाजी सावंत यांची भेट
भाजप नेत्यांकडून पुण्यात जात सावंत यांची भेट, भेटीचा कारण गुलदस्त्यात
धाराशिव मध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि भाजपा आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या सुप्त संघर्ष सुरू असताना घेतलेल्या भेटीला महत्त्व
भाजप नेत्यांनी पुण्यात जाऊन सावंतांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण
खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का.
कृषी उत्पन्न बाजार समितीतील स्थानिक नेत्यांच्या राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या सभापती वर आणला अविश्वास.
18 पैकी 13 सदस्यांनी थोड्याच वेळापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे केला अविश्वास प्रस्ताव दाखल करून गेले अज्ञातवासात
काँग्रेस नेत्याने आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला भाजपची ही साथ.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी खामगावात राजकीय वातावरणात मोठी खळबळ.
- सोलापुरात भाजप कार्यकर्ते पुन्हा आक्रमक
- भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचे समर्थक आक्रमक
- तडीपार गुंडांना पक्षात प्रवेश दिल्याने भाजप कार्यकर्ते आक्रमक
- भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्यासोबत कार्यकर्त्यांची शाब्दिक बाचाबाची
- आम्ही ज्यांच्यासोबत लढलो, ज्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले त्यांनाच पक्षात घेतले
- तर ज्यावेळी आमचे तिकीट कापून आम्ही ज्यांच्यासोबत आयुष्यभर लढलो त्यांनाच तिकीट दिले आणि ते महापौर झाले त्यावेळी कार्यकर्ते कुठे गेले होते असा शहराध्यक्ष तडवळकरांचा सवाल
- भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या समर्थकांनंतर आमदार विजयकुमार देशमुखांचे कार्यकर्ते आक्रमक
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये तृतीयपंथी घटकांना राजकीय प्रतिनिधित्व मिळावे, अशी ठाम मागणी मैत्री संघटना आणि तृतीयपंथी समुदाय यांनी केली आहे.
तळोदा तालुक्यात नाल्यात बुडून दोन सख्या बहिणींचा मृत्यू....
अवैध वाळूसाठीच्या खड्ड्यामुळे गेला दोन तरुणींचा जीव.....
तळोदा तालुक्यातील रोझवा गावाची घटना...
शेतात उडीद काढण्यासाठी गेलेल्या बहिणी परतल्याच नाही...
दुपारी जेवणापूर्वी दोघी बहिणी शेता जवळील परिसरात नाल्यांमध्ये हातपाय धुण्यासाठी गेल्या मात्र परतल्याच नाही...
वाळू माफियांनी रेतीसाठी खोदलेल्या खड्ड्याने घेतला दोघा बहिणींचा जीव ...
ललिता आणि कोबी असं मृत दोघा बहिणींचे नावे....
रत्नागिरी - सतत कोसळणाऱ्या पावसामुळे भात शेतीचं मोठं नुकसान
गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसाची धुवाधार बॅटिंग
कापलेले भात भिजून गेले काही तर तर काही ठिकाणी भात पीक पूर्णपणे आडवे
कृषी विभागाकडून सध्या पंचनामे सुरु
जिल्ह्यात जवळपास 4 हजार हून अधिक शेतक-यांच 772 हेक्टरवरील क्षेत्राचं भात पिकाचा नुकसान
65 लाखाहून अधिकच नुकसान
अजुनही 10 हेक्टरवरील भातकापणी शिल्लक
शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आमदार आमश्या पाडवी शेतकऱ्यांचा बांधावर...
अक्कलकुवा आणि अक्राणी तालुक्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची आमदारांनी केली पाहणी.....
गेल्या सात दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे अक्कलकुवा आणि अक्राणी तालुक्यात शेती पिकाच प्रचंड नुकसान.....
सोयाबीन ,उडीद, ज्वारी यासह मका पिकाच मोठा नुकसान....
नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करत तात्काळ पंचनामे करण्याचे आमदार आमश्या पाडवी यांनी दिलेले आदेश...
पुणे-बेंगळुरू महामार्गावर भीषण अपघात
खड्ड्यामुळे दुचाकीस्वार घसरला, महिला जखमी
पुणे-बेंगळुरू महामार्गावर खड्ड्यामुळे दुचाकी घसरून चालक आणि मागे बसलेली महिला खाली पडल्याने भीषण अपघात घडला
या अपघातात दोघेही जखमी झाले असून, मागून येणाऱ्या वाहनाच्या डॅशकॅममध्ये संपूर्ण घटना कैद झाली
हा सगळा प्रकार १ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता घडला
भांडुप ची कन्या १५ वर्षी सेरेना मस्कर हिने भारताचे नेतृत्व करत युथ एशियाई कबड्डी स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल हासिल केले नंतर तिचे भांडुप मध्ये जोरदार स्वागत करण्यात आले तिचे आता सर्व स्तरावर स्वागत केले जात आहे त्यात महत्त्वाचे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांच्या कुटुंबासोबत चर्चा केली आणि पुढील वाटचालीसाठी सेरेना मस्कर हिला शुभेच्छा दिल्या.
शेतकऱ्यांची मागणी आहे कर्जमाफी केली पाहिजे
केंद्राचे पाहणी पथक येणार आहे
दोन तीन दिवसात हे पथक पाहणी करमत कशी मराठवाड्याची
अमित शहा म्हणाले प्रस्ताव पाठवा.....मला नाही वाटत राज्य सरकारने प्रस्ताव पाठवला असेल
कर्जमाफी पुढच्या वर्षी करणार असं सांगितलं आहे...
कर्ज माफी केली तर बँकांचा फायदा होईल असं मुख्यमंत्री अतर्क्य वाक्य म्हणाले
आता कर्जमाफी केली तर बँकांना फायदा होईल अन् पुढच्या वर्षी जून महिन्यात केल्यावर बँकांना कसा फायदा होणार नाही....हे त्यांनाच माहिती.... कारण त्यांना वाटतं की ते चांगले अर्थतज्ज्ञ आहेत
केंद्राचे पाहणी पथक येणार आहे
दोन तीन दिवसात हे पथक पाहणी करमत कशी मराठवाड्याची
अमित शहा म्हणाले प्रस्ताव पाठवा.....मला नाही वाटत राज्य सरकारने प्रस्ताव पाठवला असेल
कर्जमाफी पुढच्या वर्षी करणार असं सांगितलं आहे...
कर्ज माफी केली तर बँकांचा फायदा होईल असं मुख्यमंत्री अतर्क्य वाक्य म्हणाले
आता कर्जमाफी केली तर बँकांना फायदा होईल अन् पुढच्या वर्षी जून महिन्यात केल्यावर बँकांना कसा फायदा होणार नाही....हे त्यांनाच माहिती.... कारण त्यांना वाटतं की ते चांगले अर्थतज्ज्ञ आहेत - उद्धव ठाकरे
छत्रपती संभाजीनगरमधील 800 पेक्षा जास्त निवासी डॉक्टर आजपासून संपावर आहेत. या संपाचा रुग्ण सेवेवर परिणाम होणार आहे. अत्यावश्यक सेवा देणार अशी भूमिका या डॉक्टरांनी घेतली आहे. त्यामुळे OPD सेवेवर परिणाम जाणवणार आहे.
सरकारने शेतकऱ्यांची थट्टा लावली आहे, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
शेतकऱ्यांनी कर्जाचे हप्ते भरावे की नाही?
कर्जमुक्ती झालीच पाहिजे, शेतकऱ्यांची मागणी.
महात्मा फुले कृषी कर्जमाफीनुसार तुम्हीही कर्जमाफी करा.
सगळी आकडेवारी उपलब्ध, अभ्यास करत बसू नका.
हेक्टरी ५० हजार रूपयांची मदत ही शेतकऱ्यांची मागणी. -उद्धव ठाकरे.
अमरावती शहरात साफसफाईचा बोजवारा उडाल्याने आणि उच्च न्यायालयाने आदेश देऊनही ठेकेदारांवर कारवाई होत नसल्याचा आरोप करत अमरावती महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेश द्वारा समोर अमरावती काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन...
यावेळी भारतीय जनता पक्ष आणि महायुती सरकार विरोधात तसेच अमरावती मनपातील कचरा माफिया यांच्या विरोधात भव्य जवाब दो आंदोलन...
भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक जिंकल्यानंतर सांगलीत जल्लोष साजरा करण्यात आला. भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून प्रथमच विश्वचषक जिंकला. या संघाची उपकर्णधार स्मृती मानधना ही मूळची सांगलीची आहे. तिच्या अप्रतिम कामगिरीमुळे सांगलीकरांनी आनंद व्यक्त केला. शहरातील मारुती चौक येथे जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी ढोलताशांचा गजर आणि फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा केला. यावेळी नागरिकांना जिलेबीचे वाटप करण्यात आले. हा विजय सांगलीकरांसाठी अभिमानास्पद क्षण कारण स्मृती मानधनाचे क्रिकेटचे प्रशिक्षण सांगलीतच झाले त्यामुळे सांगलीकरांनी मोठा जल्लोष साजरा केला.
महाविकास आघाडी आणि मनसेकडून सत्याचा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात त्यांनी सत्ताधारी आणि मतदारयादींविरोधात गंभीर आरोप केले. याच आरोपांना भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिलं आहे.
'दिल्ली ते गल्लीपर्यंत पप्पूला बेनकाब करणार'.
'जे सत्य आहे ते मांडणार'. - आशिष शेलार.
शेलारांकडून राज ठाकरेंचा दावा खोडण्याचा प्रयत्न.
राज ठाकरेंनी व्होट जिहाद करू नये - शेलार.
निवडणुका याद्या स्वच्छ झाल्या पाहिजे, आमची देखील तीच भूमिका - आशिष शेलार.
पुण्यातील गुडलक चौकात आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षाच्या रूपाली ठोंबरे, ठाकरे गटाच्या रेखा कोंडे आणि संगीता तिवारी यांनी चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी जोरदार आंदोलन केलं.. फलटण मध्ये झालेल्या डॉक्टर महिलेच्या आत्महत्यानंतर रूपाली चाकणकर यांनी वादग्रस्त शब्द वापरले असा आरोप करत रूपाली चाकणकर यांच्या विरोधात या महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली.. यानंतर रूपाली चाकणकर यांना या पदावर राहायचा अधिकार नाही म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत रूपाली चाकणकर यांच्या विरोधात वेगवेगळे पोस्टर दाखवत आणि घोषणाबाजी करत या महिलांनी आंदोलन केलं... यावेळी रूपाली चाकणकर यांच्या फोटोला जोडे मारत त्यांचा मेकअप केलेला फोटो असलेल्या पोस्टर जमिनीवर टाकत या महिलांनी निषेध केला.
तुळशीचा विवाह हे धर्म,निसर्ग आणि भक्ती याचा संगम मानला जातो.यानंतर खऱ्या अर्थाने लग्नसराईचा हंगाम सुरू होतो.अशात यवतमाळच्या आर्णी येथील शास्त्री नगरातील दुर्गा मंदीरात तुळशी विवाह मोठ्या थाटात संपन्न झाला.यावेळी वराती म्हणून भजनी मंडळाच्या महीला पुरुषगण ऊपस्थीतीत होते तर मंगलआष्टकांनी तुळशी विवाह सोहळा संपन्न झाला तूळशी विवाह संपन्न झाल्यावर डफडी वाजवत फटक्याची आतिषबाजी सुध्दा करण्यात आली यावेळी तुळशीला नवरी प्रमाणे नऊवारी साडीने सौ,रेखा आत्माराम जारंडे ह्यानी लक्षवेधी सजविले होते.
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात आंदोलन करण्यात येत आहे. रूपाली ठोंबरे, संगीता तिवारी यांच्याकडून चाकणकर यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे. फलटणच्या डॉ आत्महत्या प्रकरणात केलेल्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे.
पाचशे रुपयांच्या बनावट नोटाप्रकरणी नाशिकच्या मालेगाव तालुका पोलिसांनी शहरातून तोसिफ मोहम्मद अक्रम या तिसऱ्या संशयितास ताब्यात घेतले आहे..अटकेतील दोघा संशयितांनी त्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सहा लाख रुपयांच्या बनावट नोटा दिल्या होत्या,या नोटा चलनात आणल्याचा पोलिसांना संशय आहे..दरम्यान यातील मुख्य संशयित मोहंमद जुबेर मोहंमद अश्रफ अन्सारी याच्या मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील घरावर मालेगाव पोलिसांच्या मदतीने तेथील स्थानिक पोलिसांनी रविवारी ( दि.२ ) छापा टाकल्याची माहिती समोर येत आहे..छाप्यात पोलिसांच्या हाती काय लागले याची अधिकृत माहिती मिळू शकली नाही. मात्र, मालेगाव पोलिसांनी कारवाई केल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे..
गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या चांदवड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असून त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हा मात्र हवालदिल झालेला आहे. कांदा पिकावर करपा व मावा रोग पडल्याने नवीन लागवड केलेला कांदा देखील सडू लागला आहे त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अशी मागणी चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
मधील सहा दिवसांमध्ये भंडारा जिल्ह्यात सर्वदूर परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली. याचा सर्वाधिक फटका भातपीक शेतीला बसला आहे. भातपीक शेतीसह भंडाऱ्यात बागायत शेती करणाऱ्या फळबागायतदार आणि फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही याचा चांगलाचं फटका बसला. या परतीच्या पावसामुळं झाडाला लागलेले पेरू आणि फुल काळवंटली असून ते खराब झाल्यानं बाजारात विक्री होणार नसल्यानं याचा आर्थिक फटका बागायतदार शेतकऱ्यांना बसला आहे.
वाशिम शहरातून जाणाऱ्या अकोला हैदराबाद या महामार्गावर रात्रीच्या दरम्यान रस्ता पार करतांना कासवाच्या अंगावरून वाहन गेल्याने कासव जखमी झाले होते. वाशिम शहरचे पोलिस कर्मचारी पेट्रोलिंग करताना नागरिकांनी तो कासव पोलिसांच्या हवाली केला. पोलिसांनी रात्रीच या कासवावर उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय केंद्र गाठले मात्र, रात्री रुग्णालय बंद असल्याने रात्रभर या कासवाची काळजी घेत सकाळी कासवाला उपचारासाठी दाखल करत, उपचार झाल्यावर या कासवाला नैसर्गिक अधिवासात सोडणार असल्याचा मानस पोलिसांनी व्यक्त केला.
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मुर्तीजापूर रोडवर भरधाव कारने समोरील दुचाकीस जबर धडक देऊन झालेल्या भिषण अपघातात दोन मजूरांचा जागीच मृत्यू झाला आहे. घर बांधकाम मजूर गौतम अणा मोहोड, कैलास एकनाथ पेठकर असे मुतकाचे नावे आहेत. घटनेच्या वेळी दर्यापूर येथून राजकाम आटोपून दोघे ही गावी जात होते. दरम्यान दर्यापूर-मुर्तीजापूर रोडवरील समोरून येणाऱ्या भरधाव कार समोरासमोर जोरदार धडक दिली. या भिषण अपघातात दुचाकी चालक गौतम मोहोड व सहकारी कैलास पेठकर यांना डोक्याला व ईतर ठिकाणी जबर मार लागल्याने दोघांचाही जागीच मृत्यूं झाला. माहीती मीळताच दर्यापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलीसांनी दोन्ही मुतदेह शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालयात ठेवले आहे.
प्रभागनिहाय मतदार याद्यांतील अनियमितता च्या तक्रारींनंतर पुणे महापालिका प्रशासनाने या याद्यांची फेरपडताळणी करण्याचा निर्णय
झालेल्या गोंधळाची गंभीर दखल घेत निवडणूक विभागाने नुकतेच आदेश जारी केले असून, सहाय्यक आयुक्तांकडे या कामाची जबाबदारी
राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पुणे महापालिकेने प्रभागानुसार मतदार याद्यांचे विभाजन सुरू केले होते
मात्र, या प्रक्रियेदरम्यान काही इच्छुकांनी अनधिकृत हस्तक्षेप करून त्यांना प्रतिकूल असणाऱ्या मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात हलवण्याचे, तसेच अनुकूल मतदारांचे नावे स्वतःच्या प्रभागात आणण्याचे प्रकार समोर आले
बुलढाणा जिल्ह्यात दोन दिवसापासून पाऊस कोसळत आहे तर रात्रीच्या सुमारास अतिवृष्टी झाली.. त्याचा फटका जिल्हतातील शेतकऱ्यांना बसलाय.. नदीकाठच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, लिहा बुद्रुक या गावातील शेतकरी हतबल झाला आहे.. गावा शेजारी असलेल्या नदीला पूर आला आणी त्या पुरामुळे शेताला तलावाचे स्वरूप आले आहे.. शेतातील मका पिक वाहून गेले आहे आणी शेतात दोन ते तीन फुट पाणी साचल्याने होत्याच नव्हतं झालाय त्यामुळे शेतकऱ्याचे मोठ आर्थिक नुकसान झाल आहे.
रत्नागिरी नजिकच्या खेडशीतील डफळचोळवाडी परिसरात बिबट्याची दहशत कायम असून, मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या पुन्हा एकदा खुलेआम वाडीत फिरताना ग्रामस्थांनी पाहिला. बिबट्याची ही दृष्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तसेच ग्रामस्थांच्या मोबाईलमध्ये चित्रीत झाली आहेत.. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून, केवळ दोन दिवसांपूर्वी याच बिबट्याने एका ग्रामस्थाच्या दारातून कुत्रा उचलून नेल्याची घटना घडली होती. डफळचोळवाडी परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून बिबट्याचा सातत्याने वावर आहे. मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या थेट वस्तीत येत असल्याने ग्रामस्थांची झोप उडाली आहे. सहा महिने बिबट्याचा वावर असताना आणि ग्रामस्थ वारंवार तक्रारी करत असतानाही वनविभागाने या समस्येकडे पूर्णपणे डोळेझाक केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या बिबट्याला त्वरित पकडून सुरक्षित स्थळी सोडावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
भंडाऱ्याच्या लोभी गावात मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या तयारीच्या अनुषंगानं शिंदे सेनेचे स्थानिक नेते ठाकचंद मुंगुसमारे आणि काही शेतकरी मध्यप्रदेशातून आलेल्या महाराजांसोबत आष्टी गावातील एका धान गोडाऊनमध्ये बसून चर्चा करीत होते. यावेळी तुमसर पंचायत समितीचे माजी उपसभापती शिशुपाल गौपाले हे तिथं पोहचलेत आणि त्यांनी उपस्थितांशी वाद घालून एकावर बंदूक ताणली. ही घटना भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील आष्टी गावात मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी अजय गहाणे यांच्या तक्रारीवरून गोबरवाही पोलिसांनी शिशुपाल गौपाले याचे विरोधात गुन्हा दाखल करत धमकावण्यासाठी वापरलेली बंदूक आणि बलेनो कार पोलिसांनी ताब्यात घेत शिशुपाल गौपाले याला अटक केली आहे. या घटनेनं भंडारा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
पुढील अनेक पिढ्यांसाठी तुम्ही प्रेरणास्रोत आहात! तुमच्या निर्भीड क्रिकेटने आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत असलेल्या विश्वासाने तुम्ही प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असं काम केलं आहे. तुम्ही सर्व कौतुकास पात्र आहात आणि या क्षणाचा पुरेपूर आनंद घ्या! उत्कृष्ट कामगिरी, हरमन आणि संपूर्ण टीमला!विराट कोहली
दिवाळीची गर्दी कॅश करण्यात एसटीचा यवतमाळ विभाग यशस्वी झाला असून केवळ नऊ दिवसात चार कोटी 99 लाख 32 हजार 527 रुपयाची कमाई यवतमाळ एसटी विभागाने केली. एसटी बसेस खचाखच भरून जात असतानाही नागरिकांनी लालपरीलाच पसंती दिली.23 ते 31 ऑक्टोंबर या काळात यवतमाळ विभागातील सर्व नऊही आगारांनी महामंडळाला अधिक प्रवासी मिळावी याकरिता प्रयत्न केले त्याची फलश्रुती चांगली कमाई होण्यात झाली.
नवी मुंबईत झालेल्या वर्ल्ड कपच्या रोमांचक सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकाचा धुव्वा उडवला आणि विजयाचा झेंडा फडकावला. या ऐतिहासिक विजयाची आनंदलहरी नागपूरात ही पोहोचल्या आणि पावसाचे वातावरण असताना ही नागपूरच्या धरमपेठ परिसरातील लक्ष्मीभुवन चौकात तरुणाई ने जल्लोषात फटाके फोडले, तिरंगा लहरवला आणि "भारत माता की जय" तसेच "वंदे मातरम"च्या घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला.....
जांबूत, पिंपरखेड परिसरातील नागरिकांच्या जिविताचे रक्षण करण्यासाठी या भागातील नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घालून ठार मारण्याची मागणी
डॉ अमोल कोल्हे यांचे मुख्य वनसंरक्षक आशिष ठाकरे यांना पत्र
पिंपरखेड येथे रोहन विलास बोंबे या १० वर्षांच्या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी वनविभागाचे वाहन आणि कार्यालय पेटविले
या घटनेची तत्काळ गंभीर दखल घेऊन खासदार डॉ. कोल्हे यांनी पुणे प्रादेशिक विभागाचे मुख्य वनसंरक्षक आशिष ठाकरे यांना पत्र पाठवून नरभक्षक बिबट्यांना ठार मारण्यासाठी एलिमिनेशन ऑर्डर काढण्यासाठी चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन, राज्य सरकार तसेच संबंधित यंत्रणेची परवानगी घेण्यासाठी त्वरीत पावले उचलावीत अशी मागणी केली
निवडणुकांमुळे नागपुरात होणारं हिवाळी अधिवेशन १० दिवस पुढे जाण्याची शक्यता
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे ८ डिसेंबरपासून होणारं अधिवेशन तारीख पुढे ढकलण्याची शक्यता
- अनौपचारिक चर्चेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
- निवडणूकांमुळे मनुष्यबळाचा कमतरता जाणवू शकते, म्हणून अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता
- ठेकेदारांच्या कामबंद आंदोलनामुळे हिवाळी अधिवेशनाची तयारीही झाली ठप्प.....
उपराजधानी नागपुरात महिला अत्याचाऱ्याच्या दररोज 4 घटनांची नोंद होत असल्याची, माहिती अधिकारातून आली माहिती समोर
धक्कादायक म्हणजे स्त्री अत्याचाराशी निगडीत दाखल गुन्ह्याची संख्या 2022 च्या तुलनेत सातत्याने वाढत चालली आहे..
2022 मध्ये शहराच्या हद्दीत महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या 1259 घटनांची नोंद करण्यात आली आहे..
2023 मध्ये ही संख्या 1556 झाली, तर 2024 मध्ये दुपटीहून अधिक जणांवर गुन्हे दाखल झाले..
चालू वर्षात जानेवारीपासून आतापर्यंत महिला अत्याचाराच्या 1132 घटनांची नोंद झाली आहे..
मागील दहा महिन्यात पोलिसांकडून वारंवार कारवाई करूनही गुन्हेगारी प्रवृत्तीत सुधारणा होत नसलेल्या शहरातील 34 पोलिस ठाण्यातून आलेल्या प्रस्तावाची दखल घेत 74 गुंडांना तडीपार केल्याची माहिती...
माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना माहिती अधिकारातून प्राप्त झालीय.
धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील लोहगाव-नळदुर्ग मार्गावरील रस्त्याचे काम गेली चार वर्षांपासून रखडल्याने रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये फुले टाकून पूजन करून गांधीगिरी आंदोलन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलय.याबाबत संबंधित बांधकाम विभागाकडे नागरिकांकडून वारंवार लेखी तक्रार करूनही संबंधित बांधकाम विभाग व प्रशासनासह लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. चार वर्षांपूर्वी रस्त्यास मंजुरी मिळाली असून आजवर रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्याच्या प्रचंड दुरावस्थेमुळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे दिवसेंदिवस अपघातात वाढ झाली आहे.तरी याकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करावे अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.