Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update : एसटी आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज मंगळवार, दिनांक २१ ऑक्टोबर २०२५, महाराष्ट्रात दिपोउत्सोव, आज लक्ष्मीपूजन; राज्यातील राजकीय घडामोडी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

ST Reservation : एसटी आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक

एसटी आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक झाले आहेत. जालन्यात सुरू असलेल्या उपोषणस्थळीच बंजारा समाजाची दिवाळी केली.

Washim News : वाशिम मध्ये पावसाची दमदार हजेरी

वाशिम मध्ये दिवाळीची धामधूम तर शेत शिवारात सोयाबीन काढणीच्या हंगाम सुरू असताना वाशिम मध्ये पावसाने मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. वातावरणात बदल होत पावसाने दमदार हजेरी लावल्याने दिवाळी निमित्त रस्त्यावर लावलेल्या दुकानदारांसह शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Yavatmal News : यवतमाळमध्ये परतीच्या पावसाने झोडपलं

यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात परतीच्या पावसाने झोडपलं,हवामान विभागाने पावसाचा दिला होता,इशारा

यवतमाळ जिल्ह्यातील अनेक भागात परतीच्या पावसाने झोडपलं,सध्या जिल्ह्यात सोयाबीन काढणी सुरू आहे अशात परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे

ऐन दिवाळीच्या दिवशी परतीच्या पावासची हजेरी, परतीच्या पावसाचं सोयाबीनचा कापसाला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे..

Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी

ऐन दिवाळी दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. सकाळपासून कोल्हापूर शहरासह उपनगरांमध्ये उन्हाचा तडाखा वाढला होता. त्यातच दुपारी साडेतीन वाजल्यानंतर कोल्हापूर शहरातल्या विविध भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. सकाळपासून उष्णतेने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना या पावसामुळे थोडासा दिलासा मिळाला.

Virar Fire : विरारमध्ये अग्नीतांडव! फर्निचर दुकानं जळून खाक

विरार मध्ये एका फर्निचर दुकानाला भीषण आग

विरार पूर्व RJ नाक्यावरील फर्निचर दुकानाला आज दुपारी २:४५ सुमारास ही आग लागली असून आगीच कारण अद्याप अस्पष्ट आहे

वसई विरार महापालिकेचं अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत

सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नसून चार दुकान मात्र जळून खाक झालं आहे.

Solapur News : माजी आमदाराच्या भाजप प्रवेशावरून जिल्ह्यात राजकीय वादंग

दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांचा मोठा खुलासा “पक्षाने आम्हाला कोणतीच कल्पना दिली नाही”

इतरांना पक्षात घेणे म्हणजे निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय

“या निर्णयामुळे पक्षाला मोठी हानी होऊ शकते”

आगामी निवडणुकीत वर्चस्व राखण्यासाठी माजी आमदारांचा प्रवेश

भाजप कार्यालयासमोर दक्षिण सोलापूरच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन

“कार्यकर्ते आक्रमक होणे स्वाभाविक” आंदोलनाला आमदारांचा पाठिंबा

Latur News : लातूरमध्ये हॉटेल व्यवसायकावर धारदार शस्त्राने हल्ला

लातूर शहरातल्या गोलाई परिसरात असलेल्या फेमस हॉटेल या व्यवसायिकावर कोयत्याने हल्ला करण्यात आलाय. हल्ल्यात चार ते पाच जणांनी लाथा बुक्क्या आणि कोयत्यांनी जबर मारहाण केली. या हल्ल्यात दोघेजण जखमी झाले आहेत. तर हल्ला नेमकं कुठला कारणामुळे झाला याचा तपास पोलीस करत आहेत दरम्यान या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Yavtmal News : यवतमाळमध्ये ठाकरे गटाचं शिदोरी आंदोलन

यंदाच्या हंगामात कधी नव्हे एवढा नुकसान शेतकऱ्यांचा झाला.त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधाऱ्यात गेली. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी करण्यात यावी प्रत्येक शेतकऱ्याला एक तरी 50 हजार रुपये अनुदान देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी यवतमाळात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने काळी दिवाळी साजरी करून शिदोरी आंदोलन करण्यात आले.यावेळी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रविण शिंदे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

Mumbai News : मुलीच्या छेडछाडनंतर डाचकुल पाडा परिसरात दोन गटांमध्ये झटापट

काशीमिरा परिसरातील डाचकुल पाडा येथे रात्री दोन गटांमध्ये किरकोळ वाद झाल्यानंतर सकाळी काही जणांकडून मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे.

काशिमीरा पोलीस घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार काही व्यक्ती हातात दांडके, लोखंडी सळया आणि दगड घेऊन आले होते व त्यांनी रिक्षांच्या काचा फोडल्या. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अकोल्यातल्या गांधी रोडवर रविकांत तुपकर यांच्या शेतकरी संघटनेने 'काळी दिवाळी'  

अकोल्यातल्या गांधी रोडवर रविकांत तुपकर यांच्या शेतकरी संघटनेने आज 'काळी दिवाळी' साजरी केली. अतिवृष्टी मदत आणि शेतमालाला अपेक्षित हमीभाव द्यावा, या मागणीसाठी या शेतकरी संघटनेला हे अनोख आंदोलन केलंय.. हातात शेतमाल घेत मिळेल त्या भावात, शेतमाल विक्री करून सरकार निषेध केलाय.. शेतकऱ्यांची लूट, सरकार हमीभाव देणार पण खरेदी नाही करणार.. तर व्यापारी खरेदी करणार पण हमीभाव देणार नाही.. दुसरीकडे शेतकरी शेतमाल पिकवणार पण भाव नाही ठरू शकणार.. असे फलक अंगावर धारण करत रविकांत तुपकर यांच्या शेतकरी संघटनेने आंदोलन केला आहे.. या आंदोलन दरम्यान सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला..

भाजपचे माजी उपमहापौर राजेश काळे यांचा आजच्या आंदोलनावर आरोप

आजचे आंदोलन हे स्पॉन्सर होते, त्याचा मी जाहीर निषेध करतो.

- आज जी भाषणे झाली त्याविरोधात मी पक्षाला पत्र देणार आहे की आंदोलन करणाऱ्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करावी

- काल काही महिला पदाधिकाऱ्यांना फोनवरून दम देऊन आंदोलनात काळी साडी घालून येण्याचे सांगितले

- दिलीप माने हे सहकारातील मोठे नेते असून त्यांचा पक्षप्रवेश लवकर झाला पाहिजे.

- काँग्रेस मुक्त भारत ही भाजपची ही पक्षाची भूमिका आहे

दिवाळीनिमित्त किल्ले प्रतापगडची भव्य प्रतिकृती

दिवाळीत बच्चे कंपनी गोडधोड फराळ, फटाके यामध्ये मग्न असते मात्र दिवाळीच्या सुट्टीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम आणि इतिहास बच्चे कंपनीला कळावा यासाठी कोल्हापुरात विविध मंडळाच्या वतीने दिवाळीमध्ये शिवाजी महाराजांच्या भव्य अशा किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारण्यात येतात. कोल्हापुरातील साठमारी फ्रेंड्स सर्कलने यंदा किल्ले प्रतापगडाची भव्य प्रतिकृती साकारली आहे. दिवाळीनिमित्त उभारण्यात आलेल्या प्रतापगडची प्रतिकृती पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी गर्दी केली आहे.

अहिल्यानगर शहरासह परिसरात जोरदार पावसाचे हजेरी

मतदार याद्यांमध्ये घोळ, मात्र अधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाची बनवाबनवी सुरू_काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची टीका

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी थोरात सहकारी साखर कारखाना स्थळावर कुटुंबियांसमवेत विधिवत लक्ष्मीपूजन केले.. दिपावलीच्या शुभेच्छा देताना सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे, मात्र ते कर्जमाफीचे आश्वासन विसरले असल्याची प्रतिक्रिया थोरात यांनी दिलीये.. तर मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असून, निवडणूक आयोग अधिकाऱ्यांच्या माध्यमातून बनवाबनवीचा कार्यक्रम करत असल्याची टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

बच्चू कडू हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटले त्यांना बच्चू कडू यांनी म्हटलं की माझं राजकीय पुनर्वसन करा मला विधान परिषद द्या
रवि राणा

nashik-manmad-मनमाड बाजार समिती कर्मचाऱ्यांचे काळी दिवाळी निषेध आंदोलन

मनमाड बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी बाजार समितीच्या ऑफिस जवळ विविध मागण्यांसाठी काळी दिवाळी निषेध आंदोलन केलय, कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन,सानुग्रह अनुदान,बोनस अशा विविध मागण्यांसाठी या कर्मचाऱ्यांनी बाजार समितीच्या ऑफिसला काळा आकाश कंदील लटकवत आंदोलन सुरू केले असून ऐन लक्ष्मी पूजनाच्या दिवशी या कर्मचाऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे.

पुण्यात फटाक्यामुळे तीन ठिकाणी आगीच्या घटना

फटाक्यामुळे फुरसुंगी रस्त्यावर एका इमारतीत दहाव्या मजल्यावर गॅलरीमध्ये रॉकेट पडल्याने पडदा पेटून सदनिकेत आग.

तर खराडी,गेरा सोसायटी येथे फटाका पडून मोठ्या प्रमाणात कचरा पेटला तर हडपसर रेल्वेमार्ग नजीक गवताला आग.

अग्निशमन दलाकडून तीन ही आगीवर नियंत्रण

पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षभरात संपूर्ण देशात शहीद झालेल्या पोलीस हुतात्म्यांना नायगाव पोलीस मुख्यालय येथील पोलीस स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत व प्रतिनिधी, वरिष्ठ पोलीस अधिकारी व निमंत्रित यांनी देखील पोलीस स्मृतिस्तंभाजवळ जाऊन हुतात्म्यांना अभिवादन केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संदेश वाचनातून गेल्या वर्षभरात देशात हौतात्म्य प्राप्त झालेल्या ३४ पोलीस अधिकारी व १५७ पोलीस अंमलदार अशा एकूण १९१ वीर शहीदांना त्यांच्या अतुलनीय बलिदानाबद्दल श्रद्धांजली वाहिली.

सोलापुरात भाजपा कार्यकर्त्यांचे थेट पक्षालाच आव्हान

- जिल्ह्यातील आजी-माजी आमदारांच्या प्रवेशावरून भाजपाची धुसफुस समोर

- स्थानिक निवडणुका तोंडावर असताना भाजपा कार्यकर्त्यांनी भाजपा विरोधातच भूमिका घेतल्याने अनेक चर्चाना उधाण

- माजी आमदारांचा भाजपा प्रवेश पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून निश्चित झालेला असताना स्थानिक पातळीवर मात्र नाराजीनाट्य

- याबाबत धरणे आंदोलनाला बसलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी..

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अर्ध नग्न आंदोलन

छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या घरासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अर्ध नग्न आंदोलन करण्यात आले. अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी द्या, संपूर्ण कर्जमाफी करा अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यासमोर आंदोलन आंदोलन करीत असल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त येणार होता. तातडीने अर्ध नग्न आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी आंदोलन शेतकऱ्यांनी आणि स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार सरकार विरोधात घोषणाबाजी केली.

बुलढाणा जिल्ह्यातील पिंप्री गावात डायरियाची लागण.

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यामधल्या दुर्गम अशा पिंप्री आडगाव या गावात दिवाळीच्या दिवशी अतिसाराची लागण मोठ्या प्रमाणात झालेली आहे... या गावांमध्ये नळ योजना कार्यान्वित नसून ग्रामस्थांना एका विहिरीवरून पाणी भरावे लागते.. विहिरीला जे झरे फुटलेले आहेत ते दूषित पाण्याचे असल्यामुळे या ग्रामस्थांना अतिसाराची लागण झाली असं ग्रामस्थ सांगतात.... अतिसाराची लागण झाल्यानंतर खरंतर आरोग्य यंत्रणा या ठिकाणी पोहोचायला हवी होती मात्र ग्रामस्थांनी आरोप केलाय की यंत्रणा या ठिकाणी पोहोचलीच नाही.... त्यांना खाजगी रुग्णालयात जावे लागते.

nashik-manmad-झेंडू फुलांची आवक वाढली,दर मात्र घसरले

आज लक्ष्मी पूजनासाठी मनमाड शहरात अनेक शेतकरी झेंडू फुले घेऊन विक्रीसाठी आले आहे,फुलांची मोठी आवक असल्याने अनेक शेतकरी मिळेल तेथे जागोजागी दुकाने लावत शेतकरी फुले विक्री करताना दिसत असून,फुलांच्या दारात मात्र घसरण झाली आहे,20 रुपये किलोने फुलांची विक्री होत आहे,तर दसऱ्याला झेंडूच्या फुलांना 60 रुपये किलो चा दर मिळालेला असताना दिवाळीच्या सणा ला मात्र दरात घसरण झाली,असून दुपारनंतर यात आणखी घसरण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

नवी मुंबईमध्ये आगीत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. वाशीमध्ये चार तर कामोठ्यात दोन जणांचा मृत्यू झालाय.

राजकीय कार्यकर्त्याकडून १३ लाखांचा गंडा

नाशिक -

- राजकीय कार्यकर्त्याकडून १३ लाखांचा गंडा, फटाके दुकानाला परवाना देण्याच्या नावे फसवणूक

- पोलिसांनी झणझणीत 'फराळ दिल्यानंतर दोघे नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणत वाहनात बसले.

वाशीत भयानक आग

नवी मुंबई -

वाशीतील सेक्टर १४ एम जी कॅाम्लेक्स मधील रहेजा रेसिडन्सी सोसायटी मध्ये मध्यरात्री लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू

१० , ११, १२ व्या मजल्यावर लागली होती आग

दहाव्या मजल्यावर घरात एका आजीचा मृत्यू तर १२ व्या मजल्यावर घरात आई , वडील आणि ६ वर्षाच्या मुलीचा मृत्यू

आग मोठ्या प्रमाणात असल्याने घटली दुद्रेवी घटना

आगीवर वाशी अग्निशमन विभागाने नियंत्रण मिळवले आहे

उच्चभ्रू सोसायटीच्या सदनिकेला लागली भिषण आग, रावेत परिसरातील घटना

पिंपरी चिंचवड शहरातील रावेत परिसरातील स्वास्तिक ड्रीम सोसायटी मधील एका बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावरील एका फ्लॅटला भीषण आग लागली होती. फ्लॅटला ज्यावेळी आग लागली त्यावेळी फ्लॅट मध्ये भाड्याने राहणारा कुटुंब हा बाहेरगावी गेला होता. त्यामुळे जीवित हानी टळली आहे.

मात्र फ्लॅटचा दरवाजा हा बंद असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागाला शर्तीचे प्रयत्न करावे लागले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने फ्लॅटचा दरवाजा तोडून तसेच पाण्याचा मारा करून फ्लॅटमध्ये लागलेली आग आटोक्यात आणली आहे. आकाशात उडणाऱ्या फटाक्यामुळे किंवा शॉर्टसर्किटमुळे सोसायटीच्या सदनिकेला आग लागली असावी असा अग्निशमन दलाचा प्राथमिक अंदाज.

तुळजाभवानी मंदिरात दिवाळी सुट्ट्या निमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे.दिवाळी सुट्ट्या असल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक सहकुटुंब तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येत आहेत.भाविकांची होणारी गर्दी पाहता दिवाळी आणि आगामी नाताळाच्या अनुषंगाने मंदिर संस्थानने पहाटे एक वाजता मंदिर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

EV बाईक च्या शोरूम ला भीषण आग जवळपास 50 ते 60 दुचाकी वाहन जळून खाक

पिंपरी चिंचवड शहरातील वाकड येथील EV बाईकच्या एका शोरूम ला आज पहाटे भीषण आग लागली आहे. या आगीत जवळपास 50 ते 60 दुचाकी वाहन पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. सकाळी पाच वाजता दरम्यान EV बाईकच्या शोरूम ला आग लागल्याची वर्दी अग्निशमन दलाला मिळाली त्यानंतर अग्निशमन दल लगेच घटनांसाठी दाखल होऊन आग आटोक्यात आणली आहे. शॉर्टसर्किटमुळे शोरूम ला आग लागली असावी असा अग्निशमन दलाचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.

रत्नागिरीत मध्यरात्री पावसाची हजेरी

पावसाने मध्यरात्री रत्नागिरी जिल्ह्यात हजेरी लावली.. गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे बळीराजा शेतीच्या कामात व्यस्त झाला होता. मात्र कालपासून ढगाळ वातावरण होतं. उष्णतेतही वाढ झाली होती. त्यामुळे पावसाची शक्यता होती. अखेर रात्री पावसाने हजेरी लावली. रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर, चिपळूण आदी तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

मावळमध्ये राजकीय बदलाचे संकेत. तळेगाव येथील कार्यक्रमातून नवीन राजकीय समीकरणाची चाहूल

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण आयोजित केलेल्या कार्यक्रमात मावळ तालुक्याच्या राजकारणात नव्या समीकरणाची चाहूल लागली आहे. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या आमदार सुनील शेळके यांनी युतीसाठी एक हात पुढे करण्याचा संदेश दिला आहे. तर माजी आमदार बाळा भेगडे यांनी तात्काळ प्रतिसाद देत तुम्ही एक हात पुढे केला तर मी दोन हात पुढे करेन असे वक्तव्य करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवली. या परस्पर संवादामुळे मावळ तालुक्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे राजकारण तापण्याचे चिन्ह दिसत आहे. यांनी पुढे बोलताना म्हणाले की आपण तालुक्यात बिनविरोध निवडणुका घेऊ मतभेद विसरून विकासासाठी एकत्र काम करू. राजकीय जाणकारांच्या मते या दोन्ही नेत्यांमधील अशा वक्तव्यामुळे महायुती किंवा सहकार्याच्या नव्या शक्यता निर्माण होत आहेत. मावळ तालुक्यात गेल्या काही वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आणि शिंदे गट या तिन्ही गटांमध्ये स्पर्धा तीव्र राहिली असतात ना आता या संवादामुळे नाव राजकीय प्रारंभ होऊ शकतो अशी चर्चा मावळात होत आहे

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झाल्याशिवाय पायात चप्पल घालणार नाही,धाराशिवचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्षांचा पण

धाराशिवमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे मोठं नुकसान झालं,शेतीसह पिक वाहून गेली शेतकरी कर्जबाजारी झाला तरीही सरकारने शेतकरी कर्जमाफी केली नाही म्हणून धाराशिवचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाल्याशिवाय आपण पायात चप्पल घालणार नसल्याचा पण केला आहे.शेतकऱ्याची हजारो एकर शेती खरडून गेले जमीन नीट कशी करायची हा शेतकऱ्यापुढे प्रश्न आहे,मात्र सरकार तुटपुंजी मदत देत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष असून हीच कर्जमाफीची योग्य वेळ आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर कर्जमाफी करावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष दुधगावकर यांनी व्यक्त केलीय.

जळगाव चिमुकले राम मंदिर उजळले ११५१ दिव्यांनी

जळगाव रुशील मल्टिपर्पज फाउंडेशन संचालित उडान दिव्यांग पुनर्वसन केंद्रातर्फे शहरातील चिमुकले राम मंदिरात सहाला उत्साहपूर्ण वातावरणात दीपप्रज्वलन सोहळा पार पडला.या सोहळ्यात केंद्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी स्वतःहून निर्मित केलेल्या ११५१ दिव्यांचे प्रज्वलन करून संपूर्ण विश्वात शांती, एकात्मता, बंधुत्व, सुख व समृद्धी नांदो, तसेच द्वेष व मत्सराचा अंधार नाहीसा होवो, असा मंगल संदेश दिला. जिल्हाधिकारी रोहन घुगे व जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. उडान फाउंडेशनच्या संचालिका हर्षाली चौधरी व सहकारी यावेळी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सोहळ्याची सुरुवात झाली. या प्रसंगी उपस्थित पाहुण्यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाचे कौतुक करत त्यांच्या प्रयत्नांना प्रेरणादायी असे संबोधले.दिव्यांच्या उजेडात 'उडान' केंद्र परिसर प्रकाशमय झाला होता. या दिव्य उजेडात मानवतेचा संदेश देणारा 'उडान'चा दीपप्रज्वलन सोहळा सर्वांच्या मनाला उजळून गेला.

धर्मादाय आयुक्त अमोघ कलोटी यांची हकालपट्टी करा, रवींद्र धंगेकर यांची मागणी

पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ आणि धर्मादाय आयुक्त अमोघ कलोटी यांनी या सगळ्या गोष्टी केल्या आहेत. टेंडर प्रक्रिया बोगस आहे. यात मोहोळ, पालिका अधिकारी, रजिस्टर हे सगळे एकत्र मिळाले आहेत. या व्यवहारात असलेल्या बँकेचा मॅनेजर हे सुद्धा मोहोळ यांचे मित्र आहेत. कुठल्याही गोष्टी योगायोगाने झाल्या नाहीत हे सगळं या लोकांनी घडवून आणलं आहे. जैन समाजाची जागा हडपण्याचे काम सुरू आहे असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी आज केला आहे.

लक्ष्मीपूजनानिमित्त झेंडूच्या फुलाला प्रचंड मागणी, बाजारात फुलांची मोठी आवक 

सणासुदीच्या काळात झेंडूच्या फुलाची मोठ्या प्रमाणात मागणी असते, दसऱ्यानंतर दिवाळीमध्ये झेंडूच्या फुलाला चांगली मागणी असते. तर आज लक्ष्मीपूजनानिमित्त बाजारात मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलाची आवक झाली आहे. आजच्या दिवशी झेंडूच्या फुलाला महत्त्व असतं , तर अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना झेंडूची शेती आधार देते आहे. बाजारात सध्या 80 ते 90रुपये किलो प्रमाणे फुलांची विक्री होते आहे.

कोल्हापूर : एसटी नसल्याने नाणीजला जाणारे प्रवासी संतापले

तीन तासांहून अधिककाळ वाट पाहून देखील एसटी उपलब्ध झाली नसल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज येथे जाणारे प्रवासी आज संतापले. त्यांनी कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकामधील (सीबीएस स्टँड) रस्त्यावरच ठिय्या मारला. या स्थानकाच्या प्रवेशद्वारामध्ये रास्ता रोको करण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केला. रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला.

रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज येथे जाण्यासाठी सायंकाळी सहा वाजल्यापासून काही प्रवासी सीबीएस स्टँड येथे एसटीची प्रतीक्षा करत होते. तासाभरात त्यांची संख्या वाढली. मात्र, सायंकाळी सात, रात्री आठ आणि नऊ वाजता येणाऱ्या अनुक्रमे लातूर, अंबेजोगाई आणि विजापूर-रत्नागिरी या तिन्ही एसटी कोल्हापुरात वेळेत आल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांची गर्दी वाढली. एक-दीड तास उलटला, तरी एसटी आली नाही. त्यांनी नियंत्रण कक्षात विचारणा केली असता, त्यांना एसटी येईल असे सांगण्यात आले. मात्र, त्यानंतर वाट बघून देखील एसटी येत नसल्याचे पाहून या प्रवाशांच्या संयमाचा बांध फुटला. त्यांचा संताप वाढला. त्यातील काही प्रवाशांनी रस्त्यावरच ठिय्या मारला. काहींनी स्टँडच्या प्रवेशद्वारासमोर रास्ता रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वाहतुकीची कोंडी आणि काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्याची माहिती मिळताच शाहुपुरी पोलिस त्याठिकाणी आले. त्यांनी मध्यस्थी करत प्रवाशांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्या दरम्यान कोल्हापूर आगाराच्या व्यवस्थापनाने जादा एसटी उपलब्ध करून दिल्यानंतर प्रवासी शांत झाले आणि त्यांची गर्दी देखील कमी झाली.

घोडबंदरमध्ये हिरानंदानी इस्टेटमध्ये भीषण आग

ठाण्यातील घोडबंदर रोड वरील हिरानंदानी इस्टेट या ठिकाणी बेसिलियम टॉवर या इमारतीच्या 31 व्या मजल्यावरील गॅलरी मध्ये ठेवण्यात आलेला लाकडी सोफा आणि इतर साहित्य जळून खाक झाले आहे. सदरची आग आटोक्यात आणण्यात आली आहे.तर वागळे इस्टेट येथे ऐका गॅरेजला आग लगली होती. तर शिळफाटा या ठिकाणी ऐका मंडप डेकोरेशन चा दुकानाला आग लागली होती. यां घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये

Maharashtra Live News Update : उल्हासनगरमध्ये ऑफिस खुर्ची बनवणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री भीषण आग

उल्हासनगर कॅम्प क्रमांक चार येथील मराठा सेक्शन परिसरातील जुन्या मटन मार्केटजवळ असलेल्या ऑफिस खुर्च्या बनवणाऱ्या कारखान्याला रात्री दीडच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. भर वस्तीत आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली व नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली.घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या सहा गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशामक दलाने चारही बाजूंनी पाण्याचा मारा करत तब्बल एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी स्थानिकांच्या मते फटाक्यामुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस आणि महापालिका अधिकारी तपास करत आहेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shilpa Shetty Photos: लाल साडी अन् सडपातळ कंबर, शिल्पाच्या सौंदर्याने केले घायाळ

Rain : राज्यात अनेक ठिकाणी परतीच्या पावसाने झोडपलं; नांदेड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

Heart Attack: सकाळची ही सवय वाढवते हार्ट अटॅकचा धोका; रक्तवाहिन्या का होतात ब्लॉक?

Rajeev Deshmukh : ऐन दिवाळीत राजकीय वर्तुळात शोककळा; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिलेदाराचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

KDMC : दिवाळीच्या दिवशी कंत्राटी कामगारांचं ठिय्या आंदोलन; बोनस न मिळाल्याने संताप व्यक्त

SCROLL FOR NEXT