Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update : मावळात दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज शुक्रवार, दिनांक २१ नोव्हेंबर २०२५, आजच्या ताज्या बातम्या, महाराष्ट्र हवामान अपडेट्स, राज्यात थंडीची लाट, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका अपडेट्स, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

पवना धरण परिसरातील आठ बंगले जमीनदोस्त, जलसंपदा विभागाची मोठी कारवाई...

पवना धरण परिसरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम जलसंपदा विभागामार्फत सुरू असून परिसरातील आठ बंगले जमीनदोस्त करण्यात आले आहेत. धरण क्षेत्रातील सुरक्षा आणि जलस्तोत्राचे संरक्षण लक्षात घेऊन ही मोहीम करण्यात आली आहे. धरण क्षेत्रातील अतिक्रमणामुळे जलसाठा पाण्याची शुद्धता आणि आपत्ती व्यवस्थापन यावर धोका निर्माण होत असल्याने जलसंपदा विभागाने कठोर पावले उचलली आहे. धरण परिसरातील अतिक्रमण हटविण्याचे या मोहिमेमुळे स्थानिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तर जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार पुढील काही दिवसातही ही मोहीम सुरूच राहणार असून उर्वरित अतिक्रमण लवकरच हटवली जाणार आहे..... दरम्यान या अतिक्रमण कारवाई विरोधाला पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता..

अमरावती जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत 29 हजार 106 महिला संकटात

तांत्रिक तपासणीत अपात्र ठरल्याने महिलांचे दीड हजार रुपये बंद.

बालविकास विभागाने अपात्र ठरलेल्या महिलांची नावे जाहीर केली.

आर्थिक स्तर, आरोग्य, पोषण यांसह विविध कारणांनी पात्रता नाकारली

बँक खात्यातील व्यवहार व जोडलेली कागदपत्रे तफावत दाखवताहेत

जिल्ह्यात तब्बल ९ हजार महिलांच्या कागदपत्रांची तपासनी सुरूच.

31 डिसेंबरपूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचे प्रशासनाचे निर्देश.

कोल्हापूर महापालिका क्षेत्रात ३२ हजार दुबार मतदार

कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या २० प्रभागांच्या प्रारुप मतदार यादीत ३२ हजार २५० मतदारांची नावे दुबार असल्याची बाब समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगानेच मतदार यादीत दुबार असलेल्या नावांपुढे 'स्टार' चिन्ह टाकून याद्या दिल्या आहेत. महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयाकडील सहायक आयुक्त व उपशहर अभियंता प्रारुप मतदार याद्यांवर प्राप्त होणाऱ्या हरकतींवर सुनावणी घेणार आहेत, तशी दुबार मतदारांच्या नावांची खात्री करून घेतील. एकाच नावाचे दोन, कुठे तीन तर कुठे चार नावे आहेत. हे मतदार वेगवेगळे आहेत की एकच आहे याची शहनिशा केल्यानंतर त्यांची यादी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येणार आहे.

निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना तसेच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रारुप मतदार याद्या प्रति पान दोन रुपये प्रमाणे उपलब्ध करुन दिल्या जातील. त्यावर मतदारांची छायाचित्रे असतील, तर वेबसाईटवर जी यादी प्रसिद्ध केली गेली आहे ती मतदारांच्या छायाचित्रासह आहे. त्यामुळे दुबार मतदाराच्या नावावर उमेदवार किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना हरकती घेण्याची मुभा दिली आहे. त्यांना मतदान करायला द्यायचे की नाही याबाबतचे मार्गदर्शन मिळाल्यानंतर कार्यवाही केली जाईल, असे सांगण्यात आले

बाळासाहेब थोरातांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा पंजा गायब

विधानसभा निवडणुकीनंतर संगमनेरमधील राजकीय गणिते बदलली असून पालिका निवडणुकीत काँग्रेसचे पंजा चिन्ह गायब झाले आहे.. संगमनेर हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला मानला जायचा मात्र संगमनेरमध्येच पंजा चिन्ह गायब झालंय.. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात आणि आमदार सत्यजीत तांबे यांच्या पुढाकाराने स्थानिक आघाडी बनवून पालिका निवडणूक लढवली जात आहे.. भाजप महायुतीला शह देण्यासाठी एकाच चिन्हावर निवडणूक लढवली जावी असा उद्देश असल्याची सारवासारव बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.. तर तुम्ही स्वतःला काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून मिरवता मात्र पालिका निवडणुकीत पंजा चिन्ह गायब होणे हा थोरातांचा पराभव आहे.. बाळासाहेब थोरात यांच्या राजकीय अंताला सुरुवात झाली असल्याचा टोला विधानसभेत थोरातांचा पराभव करणारे शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांनी लगावला आहे...

सलील देशमुख तडकाफडकी मुंबईला

सलील देशमुख यांची मध्यंतरी प्रकृती खराब असताना रुग्णालयात अजितदादा पवार यांनी स्वतःहून त्यांची भेट घेतली होती. त्यामुळे आता प्रकृतीचे कारण देत मुंबईला गेलेले सलील देशमुख हे अजित दादा पवार यांना भेटणार तर नाही ना अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

चिमुरडीवर अत्याचार प्रकरणी आज मालेगाव बंद

- मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज मालेगाव बंदची हाक देण्यात आली आहे. तसंच दुपारी 11 वाजता आक्रोश मोर्चा काढत करणार निषेध व्यक्त केला जाणार आहे. मालेगावच्या रामसेतू पुल ते अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत हा आक्रोश मोर्चा असेल. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मालेगाव मध्ये अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात असेल...

जालना शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर,

जालना शहर महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे त्यानुसार जालना शहरामध्ये 2 लाख 45 हजार 913 मतदार असल्याच समोर आल आहे. तर जालना शहरातील प्रभाग क्रमांक पाच मध्ये सर्वाधिक कमी मतदार असून प्रभाग क्रमांक दहा मध्ये सर्वाधिक मतदार असल्याच देखील समोर आल आहे.दरम्यान 27 नोव्हेंबरपर्यंत हरकती नोंदविता येणार असून हकरतींवर सुनावणी झाल्यानंतर पाच डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.

धाराशिवमध्ये निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का

धाराशिवमध्ये ऐन नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला खिंडार पडले आहे.माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला सोबतच जिल्हा समन्वयक दिनेश बंडगर यांच्या सह उबाठा शिक्षकसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ही भाजपमध्ये प्रवेश केला.उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का बसला असून हे प्रवेश म्हणजे घर वापसी असल्याचं राणाजगजीतसिंह पाटील यांनी म्हटलंय.

मतदानापूर्वीच रायगडात सहा उमेदवार बिनविरोध

नगर पालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वीच रायगडच्या तीन नगरपालिकांमध्ये नगर सेवक पदाचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. अलिबागमध्ये शेकापचे प्रशांत नाईक बिनविरोध निवडून आले आहेत तर पेणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वसुधा पाटील यांच्या विरोधात अर्जच न आल्याने त्या विजयी झाल्या आहेत. पेणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची युती झाली असून त्यांनी एकमेकांविरोधातील उमेदवार मागे घेतले. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक गुरव आणि सुशीला ठाकूर हे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. तर प्रभाग क्रमांक 12 मधून भाजपाचे अभिराज कडू बिनविरोध विजयी झालेत. शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराने माघार घेतल्यामुळे रोह्यात राष्ट्रवादत काँग्रेसचे राजेंद्र जैन बिनविरोध निवडून आलेत.

गेल्या आठ वर्षात नागपूर शहरात वाढले 3 लाख 89 हजार नवे मतदार

- गेल्या आठ वर्षात नागपूर शहरात वाढले 3 लाख 89 हजार नवे मतदार, महापालिकेची प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी जाहीर

- मनपा निवडणुकीसाठी गुरुवारी प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली

- त्यानुसार नागपूर शहरातील मतदारांची संख्या 24 लाख 82 हजार 475 एवढी झाली आहे

- 2017 मध्ये नागपूर शहरात 20 लाख 93 हजार 392 मतदार होते

- पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे

- या वाढलेल्या मतदारांचा कल कोणाच्या बाजूने राहणार यावर मनपा निवडणुकीचा कौल राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे

KHED | राजगुरुनगर नगरपरिषद निवडणुकीत शिंदे गटाची पहिली बाजी

अतुल देशमुखांनी नुकताच शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने शिवसेना पुर्ण ताकदीने राजगुरुनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरली असुन भाजप,राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार, शिवसेना उबाठा,आणि शिंदे गटाची शिवसेना असे चारही पक्षांची चौरंगी लढत होत असतानाही अतुल देशमुख यांनी मोठा डावपेच टाकत विचारावर चालणारी लोक कमी आहेत पण जी विचारावर चालतात ती घडतात असं म्हणत राजगुरुनगर नगरपरिषदेची पहिली जागा बिनविरोध करण्यात यश मिळाले यावेळी आनंदोत्सवातही भावना क्षण अनुभवायला मिळाला 

MAVAL | मावळात दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मावळात अनेक ट्विस्ट बघायला मिळत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट दोन्ही  पक्ष एकत्रित येऊन निवडणुकीला सामोरे जात आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाने अजित पवार गटाला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आम्हाला शरद पवार गटाने पाठिंबा दिल्यामुळे आमची ताकद मोठ्या प्रमाणात लोणावळा आणि वडगाव मध्ये वाढणार आहे असे मत आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केले. 

SANGOLA | सांगोल्यात आजोबा आणि नातू एकाच वेळी रिंगणात,

मारुती आबा बनकर हे भाजपचे सर्वात ज्येष्ठ उमेदवार असून त्यांनी यापूर्वी दोन वेळेला सांगोल्याचे नगराध्यक्ष पद भूषवले आहे. मारुती आबा बनकर यांनी नगराध्यक्षपदाची उमेदवारी दाखल करताना त्यांचा नातू ज्योतिरादित्य बनकर यांनी प्रभाग क्रमांक पाच मधून नगरसेवक पदासाठी उमेदवारी दाखल केली आहे. विशेष म्हणजे मारुती आबा बनकर हे सर्वात जास्त वयाचे उमेदवार असून त्यांचा नातू ज्योतिरादित्य हा सर्वात कमी वयाचा उमेदवार आहे. आता सांगोला नगरपालिका निवडणुकीत 73 वर्षांचे आजोबा मारुती आबा बनकर नगराध्यक्षपदासाठी तर त्यांचा 21 वर्षाचा नातू ज्योतिरादित्य हा नगरसेवक पदासाठी रिंगणात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Metro 11: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! वडाळ्यावरुन थेट गेट वे ऑफ इंडियाला जा, नव्या मेट्रो मार्गाला मंजुरी

Bollywood Controversy: इंडस्ट्री माफियांचा खरा चेहरा केला उघड; अभिनेत्रीने प्रसिद्ध दिग्दर्शकासोबतची कॉल रेकॉर्डींग केली लीक

Buldhana : शालेय विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ! पोषण आहार रद्दी पेपरवर वाटला, प्रशासन तरीही गप्प?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी! ७.५ लाख महिलांचे अर्ज बाद; कारण काय? वाचा सविस्तर

Navi Mumbai Traffic: नवी मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! १ वर्षासाठी वाहतूक मार्गात मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?

SCROLL FOR NEXT