Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: सांगली जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडत जाहीर

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज मंगळवार, दिनांक १४ ऑक्टोबर २०२५, विरोधक आज आयोगाला भेट देणार, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी; देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

Chhatrapati Sambhaji Nagar: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील दुबार नावे वगळण्याची काँग्रेसची मागणी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील दुबार नावे वगळण्याची मागणी काँग्रेसने केलीय. याबाबत गंगापूरचे तहसीलदार नवनाथ वगवाड यांना निवेदन देण्यात आले. निवडणूक आयोगाने प्रारूप मतदार यादी जाहीर केली, त्या याद्यांमध्ये अनेक बुथवर एकाच मतदाराची नावे आढळून येत असल्याचे निदर्शनास आले आहे.

निवडणूक आयोग आणि गंगापूरचे तहसील प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शुद्ध मतदार यादी तयार करण्याची मागणी काँग्रेस पक्षकडून होत आहे.

Solapur: सोलापूर काँग्रेस पक्षाकडून वोट चोर गद्दी छोड स्वाक्षरी मोहीम सुरू

- सोलापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर काँग्रेस पक्षाकडून स्वाक्षरी मोहीम करण्यात आला आंदोलन

- काँग्रेस पक्ष निरीक्षक मोहन जोशी, काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थित करण्यात आला आंदोलन.

- काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळेस वोट चोर गद्दी छोड म्हणत स्वाक्षरी करण्यात आली..

- काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली..

Amravati:परंपरा ग्रुपच्या वतीने मुख्यमंत्री निधीत 21 लाखाची मदत; अमरावतीत मुख्यमंत्र्यांना दिला चेक.

मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी मुळे सर्वसामान्य माणसाचे जनजीवन विस्कळीत झालेल आहे अनेकांची घर घरातील अन्नधान्य व गृह उपयोगी साहित्य कपडे सर्व पावसाच्या पुराच्या पाण्यात वाहून गेले. मुख्यमंत्री निधीत मदत म्हणून अमरावती येथील परंपरा गरबा ग्रुपच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २१ लाखाचा चेक प्रदान करण्यात आला. यावेळी माजी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा देखील उपस्थित होते गरबा चालवणाऱ्या एखाद्या ग्रुपने मुख्यमंत्री निधी मदत करणारा हा राज्यातील पहिलाच गरबा ग्रुप आहे.

Solapur: सोलापूर महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर..

26 प्रभाग निश्चित, एकूण 102 नगरसेवकांची निवड होणार...

24 प्रभागांमधून 4 नगरसेवक,इतर 2 प्रभागांमधून 3 नगरसेवक निवडले जाणार...

प्रारूप रचनेवर आलेल्या 38 हरकती आणि सूचना

सुनावणीनंतर 8 हरकती मान्य, 10 प्रभागांमध्ये फेरफार...

प्रभाग क्रमांक 6, 10, 11, 12, 14, 15, 16, 19, 20 आणि 21 मध्ये किरकोळ बदल...

काही बूथ इकडून तिकडे हलवले अथवा वाढवले

शहरातील तीन भाजप आमदारांच्या मतदारसंघात फेरफार...

विविध पक्षांचे पदाधिकारी आणि इच्छुक अंतिम रचना पाहण्यासाठी उपस्थित...

अंतिम आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडे होणार सादर...

आयोगाची मंजुरी मिळाल्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता...

Dhananjay Munde: माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर मराठा क्रांती मोर्चाचा हल्लाबोल

माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मराठा विरोधी भूमिकेवर मराठा क्रांती मोर्चा चे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी जोरदार टीका केली आहे. धनंजय मुंडे यांनी मराठा समाजाच्या व नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. मराठा समाजाला मिळालेल आरक्षण हे त्याची पोटसूळ आहे. अलीकडेच धनंजय मुंडे यांनी वंजारा समाजाच्या मेळाव्यात मराठा समाजाला एका टक्क्याचे हे आरक्षण मिळो देणार नाही असे विधान केले होते. त्यावर आता मराठा क्रांती मोर्चाने आक्षेप घेत हल्लाबोल केला आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी माजी खासदार संजयकाका पाटलांचे चक्काजाम आंदोलन सुरू

शेतकरी कर्जमुक्ती व सरसकट पंचनामे सह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली तासगाव आणि कवठेमहांकाळ या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे.जेसीबी,ट्रॅक्टर, बैलगाडी,शेळ्या मेंढ्यांसह तासगावच्या चौकात चक्काजाम सुरू झाले आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत चक्काजाम आंदोलन सुरू करण्यात आले आहे.शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे त्याचबरोबर जिल्ह्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून भरपाई मिळावी याचा विविध मागण्यांसाठी संजयकाका पाटलांकडुन आंदोलन करण्यात येत आहे.

सांगली जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडती जाहीर

सांगली जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडती पार पडल्या आहेत.61 जागांसाठी झालेल्या आरक्षण सोडत मध्ये असून 38 जागा खुल्या गटासाठी राखीव झाल्या आहेत.त्यामध्ये 19 जागा महिलांसाठी राखीव झाल्यात,तर 7 जागा अनुसूचित जाती गटासाठी आरक्षित झाले असून यामध्ये चार महिलांसाठी जागा राखीव झाली आहेत. तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 16 जागा राखीव झाल्या असून यापैकी 8 जागा महिलांसाठी आरक्षित झाले आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील अनेक दिग्गजांचा पत्ता कट झालाय तर अनेक नव्या उमेदवारांना संधी देखील मिळणार आहे.त्याचबरोबर जिल्हा परिषदे अध्यक्ष यंदा ओबीसी महिला गटासाठी राखीव झालाय,त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या गटांमध्ये 31 महिलांना संधी मिळणार असल्याने सांगली जिल्हा परिषदेमध्ये यंदा महिला राज पाहायला मिळणार आहे.

NAGPUR - महाराष्ट्रातील बारा हजार महसूल सेवकांचे आंदोलन तात्पुरते स्थगित

राज्यातील 12 हजार महसूल सेवकांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले. महसूल मंत्री बावनकुळे यांची शिष्टाई यशस्वी, 16 ऑक्टोबर रोजी मुंबईत बैठक, समाधान होईल असा तोडगा काढण्याचे आश्वासन

वंचितला मोठा धक्का, बबलू जगतापचा भाजपात प्रवेश

अकोल्यात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीला मोठा झटका. पक्षाचे महापालिकेत 2012 आणि 2017 असे सलग दोनदा नगरसेवक असलेल्या बबलू जगताप यांचा भाजपात प्रवेश. काल अमरावती येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या विभागीय मेळाव्यात हा प्रवेश. जगताप हे 10 वर्ष जठारपेठ-लहान उमरी भागातून विजयी होतायेत. त्यांच्या पक्ष प्रवेशाने या भागात भाजपला मोठा फायदा होण्याची शक्यता.

52 पैकी 14 सर्कल ओबीसी तर अनेक ठिकाणी राखीव गेल्याने उत्सुक एक एक पाऊल मागे

गेल्या अनेक वर्षांपासून लांबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता लवकरच होणार आहेत, कारण प्रशासनानं आरक्षण सोडत जाहीर केली आहे मात्र या निवडणुकीची तयारी करणाऱ्या अनेक भावी जिल्हा परिषद सदस्यांना आरक्षण सोडतीमुळे चक्क एक पाऊल मागे येण्याची वेळ आली आहे, हिंगोली जिल्ह्यात 52 जिल्हा परिषदेचे गट आहेत त्यापैकी 14 गटात ओबीसी उमेदवारांसाठी जागा राखीव झाले आहेत तर गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेक उमेदवारांच्या जागेवर एससी एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे, आरक्षित जागेमुळे आता जिल्हा परिषदेसाठी नव्हे तर पंचायत समितीसाठी उभे राहू असे म्हणत भावी जिल्हा परिषद सदस्यांनी भावी पंचायत सदस्य म्हणून तयारी सुरू केली आहे.

Maharashtra Live News Update:

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाडसावंगीमध्ये शेतीला विज मिळत नसल्याने संताप व्यक्त करीत शेतकऱ्यांनी उपकेंद्रात आंदोलन सुरू केलंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक गावात वीजपुरवठा सुरळीत होत नसल्यानं शेतकरी, गावकरी त्रस्त झाले आहेत. रबी पिकाची पेरणी सुरू झाल्यानंतर १२-१२ तास वीजपुरवठा बंद असल्याने शेतीला पाणी देणे शक्य होत नाही, त्यामुळं शेतकरी संतप्त झाले आहेत. लाडसावंगी येथील उपकेंद्रातुन २२ गावाला विज पुरवठा होतो. शेतीला विज मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी रात्री बारा वाजेपासून उपकेंद्रात वीज बंद करून आंदोलन सुरू केले आहे. लाडसावंगी उपकेंद्रात एकूण चार फिटर आहे. मात्र अंजनडोह फिटरवर विज पुरवठा सुरळीत चालत नाही.

महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी दीपावली सानुग्राह अनुदान जाहीर!

महाराष्ट्र सागरी मंडळाच्या संचालक मंडळाची ८५ वी बैठक आज दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा महाराष्ट्र सागरी मंडळाचे अध्यक्ष श्री.नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीत महाराष्ट्र सागरी मंडळाच्या आस्थापनेवरील तसेच बाह्ययंत्रणेद्वारे नियुक्त (कंत्राटी) कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा यावेळी मंत्री नितेश राणे यांनी केली.

तलाठ्यांना आठवड्यातील चार दिवस कार्यालयात थांबणे बंधनकारक

ग्रामीण भागातील महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

यापुढे राज्यातील सर्व तलाठ्यांना आठवड्यातील चार दिवस कार्यालयात आणि एक दिवस मंडल अधिकारी यांच्या कार्यालयात उपस्थित राहून काम करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

अहिल्यानगर महानगर पालिकेची अंतिम प्रभाग रचना अद्याप जाहीर नाही...

13 ऑटोबर होती प्रभाग रचना जाहीर होण्याची अंतिम तारीख...

प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर हरकती आणि सूचना जिल्हा अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्यानंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर होण्याकडे लागले होते आजी माजी भावी नगरसेवकांचे लक्ष...

निवडणूक आयोगाने मुदत संपूनही अंतिम प्रभाग रचना जाहीर न केल्याने चर्चेचा विषय...

महापालिकेचे आयुक्त, उप आयुक्त,आणि इतर अधिकारी मुंबईत मात्र प्रभाग रचना जाहीर का करण्यात आली या बाबत प्रश्नचिन्ह

अमरावतीत उपोषणाच्या आंदोलनातील महिलेचा मृत्यू.

अनुकंपा नोकरी देण्यात यावी, त्यांच्या आईचे घर पूर्वीप्रमाणे त्यांनाच देण्यात यावे, मनपाचे विधी अधिकारी श्रीकांत चव्हान, क्षेत्रीय अधिकारी नरेंद्र देवरणकर यांना सेवामुक्त करण्यात यावे यासाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ शांताबाई उकर्डा आणि त्यांची मुलगी विजया उकर्डा यांचे उपोषण चालू होते, मात्र 75 वर्षीय शांताबाई उकर्डा या महिलेचा  उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खळबळ उडाली

जालन्यात कहीं खुशी, कहीं गम जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीमध्ये अनेकांचा हिरमोड..

जालना जिल्हा परिषदेच्या 57 गटांसह पंचायत समितीच्या 114 गणाची आरक्षण सोडत जाहीर झालीय. आरक्षण सोडतीमध्ये अनेक भावी उमेदवारांचा हिरमोड झाला आहे.जालना जिल्हा परिषदेवर महिलाराज येणार असून एकूण 29 जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. जालना जिल्हा परिषदेसाठी ओबीसी 15, एससी 8, एसटी 1 तर सर्वसाधारणसाठी 33 जागा निश्चित करण्यात आल्या आहे. तर जालना जिल्ह्यातील पंचायत समितीच्या 114 गणांची आरक्षण सोडत देखील जाहीर करण्यात आली आहे.

दिवाळीत निघणारी सिडकोची लॉटरी पुन्हा लांबणीवर

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सिडकोच्या घराच्या किमती करण्यासंदर्भामध्ये बैठक आयोजित करणार होते..मुख्यमंत्री नवी मुंबईमध्ये आल्यानंतर पंधरा दिवसात सिडकोच्या घरांच्या किमती करण्यासंदर्भामध्ये बैठक लावू असे आश्वासन माथाडी कामगारांना देण्यात आलं होतं. मात्र सिडकोच्या घराच्या किमती करण्यासंदर्भामध्ये सिडको आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून अद्याप कोणताही निर्णय न घेतल्यामुळे सिडकोची लॉटरी आता लांबणीवर पडली आहे..

धाराशिव जिल्ह्यातील 204 प्रकल्प ओव्हरफ्लो,93 टक्के उपयुक्त साठा

धाराशिव जिल्ह्यात यंदा रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला चार महिने झालेला पावसामुळे खरीप हंगामाचे अतोनात नुकसान झाले तर दुसरीकडे प्रकल्प मात्र तुडुंब भरले आहेत. मागील 27 वर्षात पहिल्यांदाच जिल्ह्यातील 204 प्रकल्प डबडबून गेले आहेत.प्रकल्पात 93% उपयुक्त पाणीसाठा असल्याने रब्बीचा पेराही यंदा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.शिवाय जिल्ह्यातील 350 गावांना उन्हाळ्यात टंचाई देखील भासणार नाही.मे महिन्यात बहुतांश महसूल मंडळात अतिवृष्टी झाली त्यामुळे नदी -ओढे उन्हाळ्यातच प्रवाहित झाले होते.त्यानंतर जून व जुलै महिन्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला मात्र ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात धुवाधार पाऊस पडत राहिला परिणामी नदी,ओढे पात्र सोडून वाहत होते.प्रकल्प क्षेत्रात मोठा पाऊस झाल्याने प्रकल्पात पाणी वाढले.

महायुतीत राष्‍ट्रवादी कॉंग्रेस नको म्‍हणणाऱ्या शिवसेनेची सामंजस्‍याची भूमिका

रायगड जिल्‍ह्यातील स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या निवडणूकीत राष्‍ट्रवादी कॉंग्रेसला सोबत घेणार नाही, असं ठासून सांगणाऱ्या शिवसेनेने रायगड जिल्ह्यात आपला सूर बदलला आहे. जिल्‍हा परीषद आणि पंचायत समिती निवडणूका महायुतीमधूनच लढायच्‍या अशी सामंजस्‍याची भूमिका त्‍यांनी घेतली आहे. मात्र त्‍याचवेळी जागावाटपाचा फॉर्म्‍युलाही त्‍यांनी समोर आणला आहे. आरक्षण जाहीर झाल्‍यानंतर पक्षाचे मंत्री, आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्‍या बैठकीत यावर चर्चा झाली. जिल्‍ह्यात शिवसेना भाजपचे प्रत्‍येकी तीन तर राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचा केवळ एक आमदार आहे. जिल्‍हा परीषदेच्‍या 59 जागांचे वाटप पक्षाच्‍या आमदाराच्‍या संख्‍येनुसार करायचे. असा शिवसेनेचा प्रस्‍ताव आहे. हा प्रस्‍ताव त्‍यांनी महायुती समोर मांडण्‍याचा निर्णय घेतलाय. आता शिवसेनेचा हा प्रस्‍ताव घटक पक्ष असलेला राष्‍ट्रवादी कॉंग्रेस मान्‍य करेल का, हा खरा प्रश्‍न आहे.

राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, १४ टक्के बोनस

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने ११४ व्या वर्धापन दिनानिमित्त यंदा कर्मचाऱ्यांना १४ टक्के बोनस केला जाहीर

गेल्या दोन दशकांतील हा सर्वोच्च बोनस ठरला असून, यंदाची दिवाळी अधिक गोड करण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

राज्य बॅंकेच्या मुख्य कार्यालयात आयोजित वर्धापन दिन सोहळ्यात प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी हा निर्णय जाहीर केला

बँकेचा स्वनिधी आठ हजार चारशे कोटी रुपयांच्या वर गेल्याने आशिया खंडातील सर्वात सक्षम राज्य बँक म्हणून बँकेने नावलौकीक प्राप्त केला आहे

भरत गोगावले, आदिती तटकरे आणि महेंद्र दळवी एकाच व्यासपीठावर

मागील चार वर्षांपासून रखडलेला रायगड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा अखेर पार पडला. 60 हून अधिक प्राथमिक शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मंत्री भरत गोगावले, मंत्री आदिती तटकरे तसेच आमदार महेंद्र दळवी यानिमित्ताने एकाच व्यासपीठावर पहायला मिळाले.

YAVATMAL : यवतमाळ जिल्हा परिषदेच्या 31 गटांत महिलाराज

मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या यवतमाळ जिल्हा परिषदेच्या 62 गटांच्या आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवनात काढण्यात आली यात काही प्रस्थापितांना धक्का बसला असून काहींना मात्र लॉटरी लागली आहे.सदर आरक्षण हे प्रारूप असल्याने 14 ते 17 ऑक्टोबर पर्यंत विभागीय आयुक्ताकडे आक्षेप दाखल करता येणार आहे. अनुसूचित जाती सात, अनुसूचित जमाती 14 नामाप्र 16 आणि सर्वसाधारण साठी 25 जागा सोडवण्यात आल्या आहेत.

Maharashtra Live News Update: सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार

आज मंगळवारी दुपारी 12.30 वाजता सर्वपक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेणार आहे. लोकशाही बळकट व्हावी आणि निवडणूक यंत्रणेवरील विश्वास अधिक दृढ व्हावा यासाठी शिष्टमंडळ आयोगासोबत चर्चा करणार आहे.

कुठल्याही योजना बंद करण्याचा आमचा विचार नाही, सर्व योजना आम्ही चालवणार आहोत.  नैसर्गिक आपत्तीच्या संकटामुळे एक मोठा भार राज्यावर पडला आहे, मात्र तरीही आम्ही कुठलीही योजना थांबवलेली नाही.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र

nashik malegaon-एटीएस कारवाई,संशयित व्यक्ती ताब्यात

नाशिकच्या मालेगाव मध्ये एटीएस व तेलंगणा पोलिसांनी संयुक्त पणे कारवाई करत तोशिफ शेख या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे तोशिफ हा सोशल मीडियाच्या माध्यमातून परदेशातील काही संघटना व संशयित व्यक्तींच्या संपर्कात असल्याचा गंभीर संशय असून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून,सुरक्षा यंत्रणेकडून याप्रकरणी गोपनीयतेने तपास करण्यात येत असून त्याच्या मोबाईल मधील डेटा,सोशल मीडिया अकाउंट तपासला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे,या प्रकरणात पोलिसांकडून पूर्ण माहिती नसली तरी या घटनेमुळे मालेगाव शहरात खळबळ उडाली आहे.

निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणी मोठी अपडेट

घायवळ च्या पासपोर्ट प्रकरणी अहिल्यानगर पोलिसांची होणार चौकशी

पासपोर्ट व्हेरिफिकेशन रिपोर्ट वर "not available" असा शेरा दिल्याप्रकरणी होणार चौकशी

घायवळ ने दिलेल्या खोट्या प्रतिज्ञापत्र आणि कागदपत्रांची शहानिशा का केली नाही असा प्रश्न अहिल्यानगर पोलिसांना विचारला जाण्याची शक्यता

अहिल्यानगर पोलिस दलातील कर्मचारी आणि अधिकारी यांची चौकशी होणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brain Tumor: सारखं डोकं दुखतंय? असू शकतं ब्रेन ट्युमरचं लक्षण, वेळीच व्हा सावध

Maharashtra Roads : मोठा निर्णय! रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे पडलात किंवा मृत्यू झाला तर मिळणार भरपाई, जाणून घ्या

Wardha Police : शेतकऱ्यांच्या मदतीला सरसावले पोलिसदादा; वर्ध्यातील १८०० पोलीस देणार एका दिवसाचे वेतन

'कपडे फाडले, नको तिथे स्पर्श करत सामूहिक बलात्काराचा प्रयत्न', युनिव्हर्सिटीतील विद्यार्थिनीचे लचके तोडले

Gold Price: सोन्याला पुन्हा चकाकी, १० तोळा सोनं ३२,८०० रुपयांनी वाढले; वाचा आजचे दर

SCROLL FOR NEXT