Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update : निलेश घायवळ विरोधात "ब्लू कॉर्नर" नोटीस

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज शनिवार, दिनांक १२ ऑक्टोबर २०२५, राज्यातून पावसाची माघार, उकाडा वाढण्याची शक्यता, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी; देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्या, जालन्यात धुळे सोलापूर महामार्गावर दुनगाव फाटा येथे शेतकऱ्यांचा रास्ता रोको...

जालन्यात धुळे - सोलापूर महामार्गावरील दुनगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेय.अतिवृष्टीने बाधित झालेल्या पिकांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्यावि, तसेच ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी या मागणीसाठी अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आलाये,यावेळी या महामार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या आहेत..

युवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला_घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद -

श्रीरामपूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या परिसरात एका युवकावर दोन जणांनी कोयत्यांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.. या हल्ल्यात शाहरुख सय्यद नावाचा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.. हल्ल्याची ही घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.. हा प्राणघातक हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला? हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.. मात्र श्रीरामपूर शहरात वाढत्या गुन्हेगारीने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे..

मित्रांसोबत पोहायला गेलेला तरुण नदीत बुडाला देहुरोड येथील दुर्दैवी घटना....

देहुरोड थॉमस कॉलनी येथील तीन तरुण मुले काल दुपारी एक वाजताच्या सुमारास गंहुजे येथील पवना नदी ठिकाणी पोहण्या साठी गेले होते. त्यांच्या सोबत याच भागात राहणारा वीस वर्षाय रोहन रॉय हा देखील होता. मात्र पाण्यात पोहत असताना नदी पात्रातील खोलीचा अंदाजां न आल्याने पोहता पोहता अचानक रोहन दिसेनासा झाला त्याला शोधण्या साठी त्याच्या इतर मित्रांनी प्रयत्न केले. परंतु तो मिळून आला नाही या घटनेची माहिती शिरगाव परदंवडी पोलिस ठाणे तसेच वन्यजिव संरक्षण संस्था यांना देण्यात आली. शोध पथकाने घटना स्थळावर दाखल होत तीन तास प्रयत्न करून रोहन चा मृतदेह पाण्या बाहेर काढला शिरगाव पोलिसांच्या मदतीने मृतदेह पिंपरी येथील YCM रुग्नाल्यात पाठविण्यात आला. असं परंदवाडी पोलीस अधिक तपास करीत आहे...

Maharashtra Live News Update : निलेश घायवळ विरोधात "ब्लू कॉर्नर" नोटीस

इंटरपोल ने जारी केली घायवळ विरोधात ब्लू कॉर्नर" नोटीस

पुणे पोलिसांकडून इंटरपोल शी पत्र व्यवहारानंतर नोटीस जारी

फौजदारी गुन्ह्यांत सहभागी असलेल्या व्यक्तींची तपासासाठी अतिरिक्त माहिती, ओळख, ठावठिकाणा मिळावा यासाठी ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली जाते

घायवळ चा शोध घेण्यासाठी आता पुणे पोलिसांना इंटरपोल ची मदत

दि इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ॲार्गनायझेशन म्हणजेच ‘इंटरपोल’ या नावाने ही यंत्रणा ओळखली जाते

आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध देशांमधील पोलीस आणि गुन्हेगारांच्या माहितीची अंतर्गत सहकार्य या तत्त्वावर यंत्रणेचे काम चालते

पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात घरफोडी

घरफोडी करत व्यापाऱ्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात सोन आणि रोकड लंपास झाल्याची माहिती

संपूर्ण घटनेचा CCTV आला समोर

घराच लॉक तोडत चोरट्यांनी मारला डल्ला

मार्केट यार्ड पोलीस स्टेशन मध्ये २ आरोपींविरोधात गुन्हा दाखल

शुक्रवारी पहाटे ३ वाजल्याची घटना

रेल्वेची ‘पीआरएस’ उद्या सहा तास बंद

मुंबईतील रेल्वे प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) उद्या तांत्रिक कामांसाठी बंद राहणार आहे. रविवारी रात्री ११.४५ ते सोमवारी पहाटे ५.४५ पर्यंत पीआरएस सेवा, कोचिंग रिफंड सेवा, आयव्हीआरएस, चालू आरक्षण, चार्ट डिस्प्ले, टच स्क्रीन आणि रिफंड काउंटर उपलब्ध नसतील. प्रवाशांना परतावा विद्यमान नियमांनुसार दिला जाईल. यासाठी टीडीआर जारी केला जाईल.

काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय जेवण जात नाही.-अशोक चव्हाण

माझं नाव घेतल्याशिवाय काही जणांना जेवण जात नाही, जिल्ह्यातील शुल्लक राजकारण सोडून द्या, विरोधक बोंबलून बोंबलून किती बोंबलतील त्यांना बोंबलू उद्या,माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.नांदेडच्या हदगाव तालुक्यातील वाळकी येथे भाजप पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी खासदार अशोक चव्हाण यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. दरम्यान यावेळी खासदार अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यातील राजकारणावर स्पष्टपणे भाष्य केले असून, ते म्हणाले, "इथले जे क्षुल्लक राजकारण चालते, त्याला सोडून द्या. जिल्ह्यात 'खऱ्याला खोटं आणि खोट्याला खरं' ठरवण्याचा कार्यक्रम सुरू आहे.जिथे चांगले चालले त्याला वाईट म्हणायचे आणि वाईट गोष्टींना चांगले म्हणायचे अशी स्थिती आहे.​नकारात्मक कामांमध्ये आपल्याला कोणताही रस नसल्याचे सांगत, "सकारात्मक गोष्टीला आपण प्रतिसाद दिला पाहिजे," अशी भूमिका चव्हाण यांनी मांडली. "माझा जिल्हा महाराष्ट्रातील टॉप टेन मध्ये राहिला पाहिजे ही माझी भावना आहे." ​यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला."काही लोकांना माझे नाव घेतल्याशिवाय जेवण जात नाही, ही त्यांची अडचण आहे." मात्र, आपण त्याची कधीही फिकीर करत नाही. "ज्याला काय बोलायच ते बोलू द्या, बोबलून बोबलून किती बोलतील," अशा शब्दांत त्यांनी विरोधकांच्या टीकेला दुर्लक्षित केले.

पुण्यात "टॅायरुम पब" मध्ये शासनाचे नियम डावलून रात्री दीड नंतर दारू विक्री, मनसेचा आरोप

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने बंद केला पब

बॉम्बे प्रोहिबीशन अॅक्ट मधील कलम ११.३ नुसार व शासन धोरणानुसार रात्री १:३० वाजल्यानंतर कुठल्याही लायसेन्स धारक आस्थापनांमध्ये मद्य विक्री करण्यास मनाई आल्याचा मनसे चा दावा

रात्री दीड नंतर " टॅायरुम " या पब मध्ये पहाटे ३ पर्यंत उघडपणे मद्य विक्री होत असल्याचा आरोप मनसे ने केला आहे

गेमींग ॲपच्या माध्यमातून आठ कोटी 63 लाखांची फसवणूक

गेमींग अॅपच्या माध्यमातून आठ कोटी 63 लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या करळगाव येथे उघडकीस आलाय या प्रकरणात यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी आंतरराज्यीय टोळीतील सहा आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल केले असून घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी याबाबतचा तपास एलसीबीकडे सोपविला आहे.

शिवसेनेचे शहाजी पाटील यांच्या विरोधात काम केल्याची पालकमंत्री जयकुमार गोरे यांची जाहीर कबुली

विधानसभा निवडणुकीत युतीचा धर्म न पाळता शिवसेनेचे सांगोल्याचे उमेदवार शहाजी पाटील यांच्या विरोधात काम करून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाबासाहेब देशमुख यांना निवडून आणल्याची जाहीर कबुली पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

सांगोल्यात शेकापच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी पालकमंत्री नव्हतो तरी तुम्हाला निवडून आणण्यासाठी मदत केली,अशी टिप्पणी शेकापचे आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांना उद्देशून केली होती. त्यावर शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी ही पलटवार केला आहे. भाजपने माझा पराभव केला नाही. परंतु

पालकमंत्री जयकुमार गोरे हे भावनेच्या भरात बोलून गेले असतील असा टोलाही त्यांनी लगावला. आगामी 2029 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा सांगोल्यात आमदार निवडून येईल असा दावा ही पाटील‌ यांनी केला आहे.

जालन्यात आज पोलीस पाटील भरती परीक्षा, एकूण 724 जागांसाठी 24 परीक्षा केंद्रावर पार पडणार परीक्षा

जालना जिल्ह्यातील 724 रिक्त पोलीस पाटील पदांसाठी आज पोलीस पाटील भरती परीक्षा पार पडणार आहे.24 परीक्षा केंद्रावर हि परीक्षा पार पडणार असून 8 हजार 161 परीक्षार्थीं पोलीस पाटील भरती परीक्षा देणार आहेत.परीक्षेतील गैरप्रकाराला आळा बसण्यासाठी प्रत्येक परीक्षार्थींची व्हिडिओग्राफी केली जाणार आहे.पोलिस पाटील भरती परीक्षा शहर आणि परिसरातील 24 परीक्षा केंद्रांवर पार पडणार असून परीक्षेसाठी पात्र उमेदवाराची मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी केली जाणार आहे. तर प्रत्येक परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवली जाणार आहे..

यवतमाळ जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानातून साखर गायब

यवतमाळ जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानातून दिली जाणारी साखर गत सहा महिन्यांपासून गायब झाली असून किमान दिवाळीला तरी साखर मिळेल अशी ग्राहकांना अपेक्षा होती. प्रत्यक्षात ग्राहकांच्या अपेक्षा वर पाणी फेरण्याचे काम शासनाच्या धोरणाने झाले आहे.यामुळे दिवाळीला साखर मिळण्याची अपेक्षा पूर्णता मावळली आहे.

शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज एकत्र बैठकीला उपस्थित राहणार

पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये दुपारी महत्त्वाची बैठक

बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार एकत्र असणार

बैठकीमध्ये साखर कारखान्या संदर्भात महत्त्वाची चर्चा होणार

यवतमाळ पोलिसांकडून 279 गुन्हेगारांची झाडाझडती

गुन्हेगारीला अंकुश बसावा या उद्देशाने यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या संकल्पनेतून विशेष मोहीम हाती घेत विविध गुन्हे शिरावर असलेल्या 279 गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली,यामध्ये यवतमाळ, पुसद, दारव्हा,वणी,पांढरकवडा,उमरखेड उपविभागातील 43 हिस्ट्रिशिटर गुन्हेगारांचा समावेश असून गुन्हे न करण्याची प्रतिज्ञा गुन्हेगारांना देण्यात आली.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आष्टी गावात शेतकऱ्याने सुरू केले आमरण उपोषण

नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टी मुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ 50 हजार रुपये हेक्टरी आर्थिक मदत द्यावी, सरसकट कर्जमाफी करावी यास इतर मागण्यांसाठी नांदेडच्या हदगाव तालुक्यातील आष्टी या गावात शेतकऱ्याने आमरण उपोषण सुरू केल आहे. मागील दोन दिवसापासून आष्टी येथील दिगंबर शिंदे हे शेतकरी उपोषणास बसले आहेत.त्यांच्या उपोषणाची दखल अद्याप कोणीही घेतली नाहीये. शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात,मागण्या मान्य नाही केल्यास माझी या ठिकाणाहून अंत्ययात्रा निघेल असा इशारा शेतकरी दिगंबर शिंदे यांनी दिला आहे.

Maharashtra Live News Update : नगरमध्ये शिवशक्ती- भीमशक्तीचा आज जनआक्रोश मोर्चा

आक्षेपार्ह पत्रके भिरकावल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी शिवशक्ती- भीमशक्तीचा जनआक्रोश मोर्चा उद्या, रविवारी शहरात काढण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप, ॲड. वाल्मीक निकाळजे व इतर हिंदुत्ववादी या मोर्चात सहभागी होणार आहेत.

तालिबानशी तीव्र चकमकीत 12 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू 

अफगाणिस्तानने आपल्या सीमेवर पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले आहे. अफगाणी आणि पाकिस्तानी सैन्यामध्ये सीमेवर जोरदार गोळीबार सुरू आहे. समोरासमोरच्या लढाईत पाकिस्तानी सैन्याचे मोठे नुकसान झाले आहे.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत आता ३५ टक्के जागा खुली ठेवणे विकासकांवर बंधनकारक

 झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील(एसआरए) प्रकल्पात एकूण जागेच्या ३५ टक्के जागा खुली ठेवणे विकासकांवर बंधनकारक करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही योजनेला मंजूरी देऊ नये तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदेंचा काँग्रेसला जबरी धक्का, सलग ३ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश, राजकीय वर्तुळात खळबळ

Chhaya Kadam: माधुरी दीक्षितला मागे टाकत छाया कदमने जिंकला 'हा' मानाचा पुरस्कार; म्हणाली, मी एका छोट्या गावातून...

ICMR Indian diet study: भारतीयांच्या थाळीतच लपलंय आजारांचं मूळ; ICMR च्या अभ्यासात धक्कादायक तथ्य

Local Body Election : मिनी विधानसभेसाठी भाजपची नवी रणनीती, ठाकरे-पवारांना देणार धक्क्यावर धक्के, राज्याच्या राजकारणात भूकंप होणार

Foods to clean heart vessels: 'या' पद्धतींनी लगेच वितळेल धमन्यांमध्ये जमा झालेली चरबी; हृदयाच्या रक्तवाहिन्या होतील एकदम स्वच्छ

SCROLL FOR NEXT