Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: पुण्यात उमेदवारी अर्जाची छाननी पूर्ण, १७४ अर्ज बाद, तर २ हजार ७०३ अर्ज वैद्य

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज शुक्रवार, दिनांक २ जानेवारी २०२६, महायुती आणि मविआमध्ये जागावाटप, राज्यात थंडी ओसरली, मुंबईत आजही पाऊस, आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Priya More

माजलगाव तालुक्यातील 90 शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारीच्या कॉपर वायरची चोरी.

माजलगाव तालुक्यातील गोदाकाठावरून 90 शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारीच्या कॉपर वायरची चोरी.

- 90 शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे कॉपर वायर केले लंपास.

- या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Amravati:  हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांचं आज भाजप पदाधिकाऱ्या विरोधात निषेध आंदोलन

अमरावती -

हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांचं आज भाजप पदाधिकाऱ्या विरोधात निषेध आंदोलन

दुपारी 12 वाजता अमरावतीच्या राजकमल चौकात महाकाली मंदिराचे पिठाधीश शक्ति महाराज यांच्या नेतृत्वात आंदोलन होणार...

दोन दिवसांपूर्वी भाजप अधिकाऱ्या सोबत महानगरपालिकेच्या तिकीट वाटपा संदर्भात वाद झाला होता त्या दरम्यान शिवीगाळ आणि अपमानास्पद वागणूक दिल्याचा हिंदुत्ववादी संघटनेचा आरोप....

अमरावतीच्या स्थानिक भाजप पदाधिकारी विरोधात हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते निषेध सभा घेऊन निषेध आंदोलन करणार आहे...

Pune: पुण्यात उमेदवारी अर्जाची छाननी पूर्ण,  १७४ अर्ज बाद, तर २ हजार ७०३अर्ज वैद्य

पुणे -

पुण्यात उमेदवारी अर्जाची छाननी पूर्ण

पुण्यात १७४ अर्ज बाद,तर २ हजार ७०३अर्ज वैद्य

महापालिकेच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी पूर्ण

१५ क्षेत्रीय कार्यालयामध्ये मिळून १७४ अर्ज पास झाले तर २ हजार ७०३ अर्ज वैद्य ठरले

Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपमध्ये तब्बल 80 जणांची बंडखोरी

छत्रपती संभाजीनगर -

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपा पक्षात तब्बल 80 जणांची बंडखोरी

80 जणांना थांबवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू

बंडोबा थंडोबा होणार का?

संभाजीनगर मध्ये सर्वाधिक भाजपामध्ये बंडखोरी

आमदार संजय केणेकर आणि शिरीष बोराळकर यांच्याकडून भेटीगाठी घेत बंडोबांना थांबवण्याचे प्रयत्न सुरू

बंडोबांना थांबवण्यासाठी भाजप लागले कामाला; घरी जाऊन भेटी घेऊन मनवण्याचा भाजपचा प्रयत्न

Nashik: नाशिकमध्ये बंडखोरांना थंड करण्याचं भाजपसह सर्वच पक्षांसमोर आव्हान

नाशिक -

- अर्ज माघारीचा आजचा शेवटचा दिवस

- बंडखोरांना थंड करण्याचं भाजपसह सर्वच पक्षांसमोर आव्हान

- भाजपकडून काही प्रभागांमध्ये २ उमेदवारांना AB फॉर्म देण्यात आल्यानं भाजपच्या उमेदवारी यादीतील उमेदवार ठरलेत बाद

- भाजपमधील उमेदवारीचा गोंधळ, बंडखोरी आणि नाराजांना शांत करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन रात्री नाशिकमध्ये दाखल

- दीपक बडगुजर यांच्या AB फॉर्ममुळे गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मुकेश शहाणे यांचा अर्ज झालाय बाद

- मुकेश शहाणे यांची अपक्ष निवडणूक लढवण्याची भूमिका, तर दीपक बडगुजर आज अर्ज मागे घेणार का? याकडे लक्ष

Nashik: नाशिकमध्ये महाविकास आघाडीत फूट?, नाशिकमध्ये महाविकास आघाडीत फूट?

नाशिक -

- नाशिकमध्ये महाविकास आघाडीत फूट?

- जागावाटपात युतीधर्म पाळण्यात आला नसल्याचे समोर

-अनेक प्रभागांमध्ये दोन-तिन पक्षांनी दिले उमेदवार

- ठाकरेंची शिवसेना, शरद पवार राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये काल पार पडली महत्वाची बैठक

Nagpur:  नागपुरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, संजय सरायकर यांचा भाजपमध्ये प्रवेश

नागपूर -

- काँग्रेस नेते संजय सरायकर यांचा भाजपमध्ये प्रवेश

- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या उपस्थितीत संजय सरकार यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला

- संजय सरायकर यांनी 2007 आणि 2017 मध्ये काँग्रेस कडून महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती

- पण दोन्ही वेळा त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते, 2007 मध्ये फक्त 13 मतांनी त्यांचा पराभव झाला होता

Pune: पुण्यात चायनिज मांज्यामुळे महिला जखमी

पुणे -

पुण्यात चायनिज मांज्यामुळे महिला जखमी

बोपखेल खडकी पुलावर घडली घटना

दुचाकीवरून जात होती महिला

महिलेच्या मानेला मांजा लागल्यामुळे महिला जखमी

स्थानिकांनी तात्काळ मदत करत मांजा तोडून केला बाजूला

Pune: नाराजांची मनधरणी होणार? इच्छुक त्यांच्या निर्णयावर ठाम राहणार?

पुणे -

नाराजांची मनधरणी होणार? इच्छुक त्यांच्या निर्णयावर ठाम राहणार?

अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस

महापालिकेसाठी महायुती आघाडीचे चित्र होणार स्पष्ट

पहिल्या दिवशी निवडणुकीतून 67 जणांनी घेतली माघार

बंड थंड करण्यासाठी पक्षांकडून प्रयत्न सुरू

अनेक पक्षाने युती आघाडी न झाल्याने जास्तीचे एबी फॉर्म दिले असल्याने वरिष्ठ नेत्यांच्याही बैठका सुरू

दुपारी ३ पर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत

Pandharpur: लव्हजिहाद विरोधात अरण ते पुणे पदयात्रा

पंढरपूर -

लव्हजिहाद विरोधात अरण ते पुणे पदयात्रा

अखंड हिंदू राष्ट्र निर्माण व्हावे यासाठी व लव्हजिहाद विरोधात सोलापूर जिल्ह्यातील अरण ते पुणे अशी हिंदू जनजागरण पदयात्रा काढली जाणार आहे.

अरण येथील महाकाली मठात हिंदू जनजागरण समितीची बैठक झाली.

या बैठकीत पदयात्रा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अखंड हिंदू राष्ट्र निर्माण व्हावे व महाराष्ट्रातील लव्हजिहाद नष्ट व्हावा यासाठी दहा दिवस पदयात्रा काढून जनजागृती केली जाणार आहे.

या पदयात्रेत सुमारे एक हजार साधू सहभागी होणार आहेत.

Pune: महापालिका निवडणुकीपूर्वी पुणे पोलिसांची धडक कारवाई

पुणे -

महापालिका निवडणुकीपूर्वी पुणे पोलिसांची धडक कारवाई

नऊ सराईत गुन्हेगारांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

निवडणूक शांततेत, निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी पोलिसांनी उचलली कडक पावले

परिमंडळ-एक अंतर्गत येणाऱ्या खडक, डेक्कन आणि फरासखाना पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील नऊ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

त्यांची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mosambi Juice : मोसंबीचा फ्रेश आणि हेल्दी ज्यूस नक्कीच प्या, आहे आरोग्यासाठी फायदेशीर

Ikkis Collection : धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट पाहायला थिएटर हाऊसफुल; 'इक्कीस'नं पहिल्या दिवशी केली बक्कळ कमाई, वाचा कलेक्शन

Cigarette Price Hike: मोठी बातमी! सिगारेट, पान मसालाच्या किंमती वाढणार; एका Cigaretteसाठी किती पैसे मोजावे लागणार?

Hans Rajyog 2026: 12 वर्षांनंतर या राशींच्या नशीबाला मिळणार कलाटणी; नवी नोकरी मिळून पगारवाढही मिळणार

Accident: स्पर्धेसाठी जाताना काळाचा घाला, खेळाडूंच्या बसची व्हॅनला धडक; १५ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT