हिंगोलीच्या सेनगाव शहरात ठाकरे शिवसैनिक आक्रमक
खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पुतळ्याच केलं दहन
खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी..
नागेश पाटील अष्टीकर यांच्या प्रतीकात्मक फोटोला जोडे मारत केल आंदोलन..
हिंगोलीत ठाकरे शिवसेना आक्रमक .
नांदेड -
नांदेड विधान परिषदेसाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतदान करण्याचे काँग्रेसचे माघार घेतलेले उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर यांचे आवाहन.
आवाहन करणारी केली फेसबुक पोस्ट.
एनवेळी काँग्रेसचे उमेदवार रामदास पाटील यांचा उमेदवारी अर्ज मागे घेऊन खा. नागेश पाटील आष्टीकर यांचा मुलगा कृष्णा पाटील यांना करण्यात आले पुरस्कृत.
संख्याबळ असताना काँग्रेसला डावलल्याने रामदास पाटील यांनी आधीही व्यक्त केली होती नाराजी.
ऑपरेशन टायगर मध्ये खासदार आष्टीकर यांचे नाव आल्याने केली पोस्ट.
नांदेड महापालिकेत काँग्रेस आणि वंचित ची आघाडी असल्याने वंचित चे उमेदवार प्रशान्त इंगोले यांना मतदान करण्याचे केले आवाहन.
भिवंडी -
भिवंडीत अवैध परराज्यातील मद्याची वाहतूक करणाऱ्यास अटक
ट्रकसह 1 कोटी 90 लाखांचा मुद्देमाल जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई.
रत्नागिरी -
रामदास कदम यांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल, भास्कर जाधव आणि संजय राऊतांवरही निशाणा
शिवसेना नेते रामदास कदम यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल.
ही वेळ का आली, उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावे, अशी मागणी.
आता उद्धवजी, वहिनी आणि आदित्य ठाकरे तिघेच पक्षात राहणार, असा टोला.
आमदार, मंत्री आणि आता खासदारही पक्ष सोडत असल्याचा दावा.
सर्वांना चालते व्हा म्हणण्याने मराठी माणसाचे नुकसान होत आहे, अशी टीका.
लहान तोंडी मोठा घास घेतोय, म्हणत उद्धव ठाकरेंवर बोचरी टिप्पणी.
ठाकरे गटातील सहा खासदारांच्या संभाव्य निर्णयावर भाष्य; तांत्रिक अडचण येणार नाही असा दावा.
पुणे -
पुणे महापालिकेत काँग्रेसचे आंदोलन
महापालिकेच्या सर्व साधारण सभेत काँग्रेस चे पुण्यातील पाणी कपातीच्या विरोधात आंदोलन
पाणी कपात ही अयोग्य असल्याचा काँग्रेसचा आरोप
पुण्यात टँकर माफिया यांच्याकडून लूट सुरू असल्याचा सुद्धा आरोप
पुणे -
पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत 'आप'चा राडा
महापालिकेच्या शाळा खाजगी संस्थेला देण्याच्या विऱोधात आप चे आंदोलन
महापालिका सर्वसाधारण सभेवेळी प्रेक्षक गॅलरी मधून आप कार्यकर्त्यांचे आंदोलन
पालिकाच्या खाजागी शाळा धोरणा विरोधात आपचे आंदोलन
महापालिकेनं आकांक्षा फाउंडेशन ला इंग्लिश स्कूल चालवण्यास मंजुरी देऊन वर्षाला 12 कोटी मंजूर केलेत
या धोरणाच्या विरोधात आंदोलन
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव शहरात मुसळधार पावसाने मोठा कहर केला आहे. सायंकाळी झालेल्या जोरदार पावसादरम्यान भागचंद नगर धावणेवाडी मार्गावरील एक मोठे निंबाचे झाड विद्युत खांबावर कोसळल्याने खांब तुटून पडला. या घटनेमुळे परिसरातील वाहतूक काही काळ ठप्प झाली तर शहरातील अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला. घटनेनंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले असून वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.
दिल्लीतील राजकीय घडामोडींनंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापले आहे. खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या भूमिकेवरून ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाल्याची माहिती समोर आली आहे. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी शिर्डीतील त्यांच्या निवासस्थानासह कार्यालय परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिस्थितीवर पोलीस प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.
यवतमाळ – वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्या वाशिम शहरातील कार्यालय बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उबाठाचे खासदार संजय देशमुख हे शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेनंतर त्यांच्या कार्यालय बाहेर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे..
खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची साथ सोडल्याने संगमनेर तालुक्यातील ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रतिकात्मक पुतळा आणि फोटोला साडी घालून, वाकचौरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी खासदार वाकचौरे यांच्या पुतळ्याचे दहन करत निषेध करण्यात आले.
वाढीव वीज बिले आणि स्मार्ट मीटरच्या विरोधात वायगाव व निपाणी येथील ग्रामस्थांनी वायगाव वीज उपकेंद्रावर धडक देत तीव्र आंदोलन केले. यावेळी नागरिकांनी वाढीव वीज बिलांची होळी करून निषेध व्यक्त केला. स्मार्ट मीटरमुळे अवास्तव बिले येत असल्याचा आरोप करत ‘मीटर बदलून द्या व वीज बिले कमी करा, अन्यथा आम्ही वीज बिले भरणार नाही’, असा ठाम पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. महावितरण कंपनीच्या कथित मनमानी कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून जुने मीटर पुन्हा बसविण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
ओमराजे निंबाळकर घेतील तो निर्णय सर्व नगरसेवकांना मान्य
धाराशिव नगरपालिकेतील ठाकरे गटाच्या पाच नगरसेवकांच्या बैठकीत निर्णय
ओमराजे निंबाळकर सत्तेसोबत गेल्यास फायदा होईल, नगरसेवकांनी व्यक्त केला विश्वास
संजय देशमुख शिंदेसेनेत जाणार असल्याच्या चर्चांमुळे घराबाहेर पोलीस तैनात
देशमुखांच्या संभाव्य पक्षांतराची जोरदार चर्चा;निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवली
शिवसेना ठाकरे गटात खळबळ; खासदार संजय देशमुखांच्या घरासमोर पोलिसांचा पहारा
शिंदेसेनेत जाण्याच्या चर्चांदरम्यान संजय देशमुखांच्या घराबाहेर कडेकोट बंदोबस्त.
भाविकांसाठी जिल्हा प्रशासनाचा निर्णय
उद्यापासून भीमाशंकर मंदिर सकाळी ७ ते ११ पर्यंत मोफत दर्शन असणार
भीमाशंकरला आता तत्काळ दर्शनही घेता येणार
१५ जून पासून भीमाशंकर दर्शन सुरू झाले आहे.
गेले काही महिने मंदिर कामासाठी बंद होते.
पुणे साईनगर शिर्डी एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाणार
आजपासून पुणे ते शिर्डी थेट रेल्वे सेवा सुरू
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव पुणे रेल्वे स्थानकावर उपस्थित
मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ सुद्धा उपस्थित
बुलढाण्यात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून आंदोलन अधिक आक्रमक झाले आहे. कोरा करा कोरा करा, सातबारा कोरा करा या घोषनेने परिसर दणाणून गेला होता... जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका शेतकरी पुत्राने अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्याला ताब्यात घेतल्याने मोठी दुर्घटना टळली
माध्यमांना टाळून ओमराजे निंबाळकर दुसऱ्या दाराने पुणे विमानतळाच्या बाहेर
तब्बल 3 तास ओमराजे निंबाळकर पुणे विमानतळाच्या व्हि आय पी लाउंज मध्ये बसून होते
दिल्लीतून आल्यावर गेल्या तीन तासांपासून ओमराजे निंबाळकर पुणे विमानतळावर थांबून होते.
उद्या होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी मतपत्रिका, मतदान पेटी आणि इतर साहित्य घेऊन पोलिंग पार्टी मतदान केंद्राकडे रवाना
3 पोलीस कर्मचारी, 1 बंदूकधारी पोलिसांच्या सुरक्षेत मतदान साहित्य घेऊन मतदान कर्मचारी रवाना
सोलापूर विधानपरिषद निवडणुकीसाठी 615 मतदार उद्या आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत
मतादानासाठी सोलापूर जिल्ह्यातील 6 ठिकाणी मतदान केंद्र असणार आहेत
डोंबिवलीतील एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये लिफ्टच्या वीजबिलाच्या वादातून तणाव निर्माण होऊन एका रहिवाशाला शेजाऱ्यांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून परिसरात खळबळ उडाली आहे.
शिवसेनेतील दुसऱ्या फुटीमागे पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचणारं चुकीचं फिडिंग आणि तळागाळातील कार्यकर्त्यांची उपेक्षा कारणीभूत ठरल्याचा दावा अजित पवार गटाचे आमदार माऊली कटके यांनी केला.तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्तेत असूनही अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे लोकप्रतिनिधींना आंदोलनाची वेळ येत असल्याची खदखदही त्यांनी व्यक्त केली.
ओमराजे यांना उध्दव साहेबांनी भरभरून दिल तरीही, आई सारख्या शिवसेनेला सोडून जात असाल तर वेदनादायी आहे
एखादा आमदार व दोनदा खासदार केल,तुम्ही जर शिंदे गटात गेला तर तुमच्या तोंडाला काळ फासू
शिवसेना ठाकरे गट कधीही सहन करणार नाही,धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे
धाराशिवमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक
मलकापूर शहरात भीषण पाणीटंचाईमुळे नागरिकांचा संयम संपला असून हजारो महिला-पुरुषांनी नगरपालिकेवर धडक मोर्चा काढला. 15 दिवसांनी अवघा एक तास पाणी मिळत असल्याने संतप्त महिलांनी मुख्याधिकाऱ्यांच्या हातात रिकाम्या घागरी देत "पाणी द्या, पाणी द्या"च्या गगनभेदी घोषणा दिल्या.
ठाकरे गटाच्या खासदारनंतर राष्ट्रवादी तुतारीगटाच्या खासदारमध्ये देखील गडबड सुरु
काही खासदार हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत
महाविकास आघाडीमधल्या खासदारामध्ये चलबिचल
गद्दारीचा शिक्का अंगावर मारून घेऊ नका
गद्दारी कराल तर पुन्हा निवडून येणार नाहीत
ओमराजे निंबाळकर यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाच्या चर्चेमुळे फेसबुक पोस्टवर कमेंट चा पाऊस
ऑपरेशन टायगर मध्ये उमराजे निंबाळकर शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार असल्याने सोशल मीडिया वरून जोरदार टीका
राजमाता जिजाऊच्या पुण्यतिथी निमित्त ओमराजे यांनी केलेल्या फेसबुक पोस्टवर गद्दारीच्या कमेंट चा पाऊस,ओमराजे जोरदार ट्रोल
5 दिव्यांग वारकऱ्यांचा पायी पालखी सोहळा निघाला पंढरपूरला
40 दिवसांत...400 किलोमीटर करणार पायी प्रवास
याच वारकऱ्यांशी बातचीत...
भंडारा- गोंदिया विधानपरिषद मतदारसंघात कॅाग्रेसला ‘ॲापरेशन लोटस’ची भिती
विधानपरिषद निवडणूक मतदानाच्या एक दिवसांपूर्वी कॅाग्रेस नगरसेवक नागपूरात ‘गुप्त ठिकाणी’
नाना पटोले यांना ‘ॲापरेशन लोटस’ची भिती असल्याने कॅाग्रेस नगरसेवकांना नागपूरात ‘सिक्रेट प्लेसमध्ये’ मुक्कामी ठेवलं
अकोला जिल्ह्यातील दहीहंडा पोलीस स्टेशन हद्दीतील काटी गावात अघोरी प्रथेचा संशयित प्रकार समोर आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. तीन दिवसांपूर्वी निधन झालेल्या विनायक चराटे यांच्या अंत्यसंस्कारानंतर राख सावटण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांना स्मशानभूमी परिसरात काही संशयास्पद साहित्य आढळून आले.
खासदार सोडून गेल्याने काही फरक पडणार नाही
सहा वेळेस आमदार खासदार राहिलेले लोक पक्ष सोडून जात आहेत हे कशामुळे
आमदार फोडण्याचा ही प्रयत्न केला जात आहे हे माझ्या लक्षात आले आहे आमदार राहुल पाटील यांचे वक्तव्य
महाराष्ट्रात सुरु असलेल्या ऑपरेशन टायगरवर पत्रकार परिषदेत अरविंद सावंत यांनी मांडलं मत
आमदार खासदार म्हणजे पक्ष नाही, कार्यकर्ता म्हणजे पक्ष - अरविंद सावंत
संविधानाशी छेडछाड सुरु आहे - अरविंद सावंत
महाराष्ट्रात सुरु असलेल्या ऑपरेशन टायगरवर पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी मांडलं मत
महाराष्ट्रातील खासदारांना ५० कोटींना विकत घेतलं जात आहे, महत्त्वाच्या व्यक्तीने दिली माहिती - संजय राऊत
एका खासदाराने ३ वेळा साई बाबांची शप्पथ घेतली - संजय राऊत
ज्यांना जायचं आहे त्यांनी आधी राजीनामा द्यावा - संजय राऊत
उद्या आमची संसदीय पक्षाची बैठक - संजय राऊत
मशाल चिन्हावर हे सर्व खासदार लढून आलेत - संजय राऊत
आधी पैसे घेतले नंतर चार्टर्ड विमानाने गेले - संजय राऊत
वडिलांच्या हत्येचा निकाल बाजूने हवा असेल तर आमच्या सोबत या असा ओमराजेंवर दबाव - संजय राऊत
ऑपरेशन टायगर सोप्प नाही - संजय राऊत
आमच्यापर्यंत या घडामोडींचे कोणतीही माहिती - संजय राऊत
महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेतलं जात आहे.- संजय राऊत
रत्नागिरी - जे घडणार आहे ते घडणारच आहे - भास्कर जाधव
हेही दिवस निघून जातील पण त्यासाठी आपल्याला कार्यक्रम हाती घ्यावा लागेल
काही निर्णय घ्यावे लागतील, काही भूमिका ठरवाव्या लागतील
उद्धव साहेब डरो मत, चिंता करू नका-- भास्कर जाधव
अफवांची राळ गेले वर्ष दीड वर्ष सुरू आहे
अंबरनाथ पश्चिमेतील उलन चाळ परिसरात आशीर्वाद हॉस्पिटलसमोर उभ्या असलेल्या दुचाकींना आज पहाटे आग लागल्याची घटना घडली. या आगीत तब्बल पाच दुचाकी जळून भस्मसात झाल्या.
शासकीय अनुदानावरील 3 लाख 54 हजार रूपये किंमतीचा खतसाठा गायब
रायगडच्या रोह्यात खताचा काळाबाजार उघड
कृषी सेवा केंद्र मालकावर गुन्हा दाखल
- नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर नगरपरिषद कार्यालयाला लागली आग
- आज पहाटे आग लागल्याची माहिती
- आगीत काही महत्त्वाचे कागदपत्रे आणि इमारतींचा भाग जळाला
- अग्निशमन दलाच्या चार गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले
- आग कशामुळे लागली? याचा शोध सुरु
अमरावती शहरातील शंकर नगर रोडवरील "लिकरीया बिअर अँड वाईन शॉप"वर छापा टाकत पोलिसांनी मालक विनोद केशवप्रसाद मालवीया यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दुकानात ग्राहकांना बसून मद्यपान करण्यासाठी जागा आणि साहित्य पुरविले जात असल्याची गोपनीय माहिती राजापेठ पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार करण्यात आलेल्या कारवाईत विदेशी बिअर आणि वाईनचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शिक्रापुर परिसरात पीएमपीएमएल बस आणि टेम्पो यांच्यात झालेल्या अपघाताने एकच खळबळ उडाली. बसच्या जोरदार धडकेनंतर टेम्पो रस्त्यावर पलटी झाला. अपघाताचा संपूर्ण थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या घटनेचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनाची थट्टा करणार्या भाजप विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजप विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावेळी निषेध बॅनरला पायाने तुडवून आंदोलन केले.
ऑपरेशन टायगर ची पुण्यात चर्चा
शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी लावले शहरात बॅनर
जस्ट वेट अँड वॉच असा बॅनर वर उल्लेख
ऑपरेशन टायगर तयारी झाली आहे
बॅनर वर उल्लेख
आरटीई प्रवेशासाठी 50 हजारा लाज घेतल्या प्रकरणात पब्लिक स्कूल विरोधात मनसेचा आंदोलन
उंड्री येथील युरो स्कूल समोर मनसे कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक नोटा उधळून आंदोलन केला आहे
आरटी प्रवेश म्हणून सुद्धा 50 हजार रुपये शाळेने डोनेशन घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे
मनसेकडून शाळा प्रशासनाला निवेदन देऊन प्रतिकात्मक नोटा उधळून आंदोलन करण्यात आला आहे
मस्साजोगाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात होणार सुनावणी.
आरोपी विष्णू चाटे याला करण्यात आलेली अटक ही बेकायदेशीर आहे असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात केला होता.
तर सरकारी वकील उज्वल निकम यांनी या युक्तीवादाला जोरदार प्रत्युत्तर दिले होते.
सेच आज साक्षीदार न्यायालयात हजर करायचे या संदर्भातील माहिती आज सरकारी पक्षाकडून न्यायालयाला देण्यात येणार आहे.
आजची महत्वाची सुनावणी होणार
- विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय.
- पावसाळ्यापूर्वी सर्व शाळांचे व्यापक ‘सेफ्टी ऑडिट’ केले जाणार.
- धोकादायक इमारती, वर्गखोल्या व स्वच्छतागृहांचा वापर तातडीने बंद करण्याचे निर्देश.
- विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित पर्यायी व्यवस्था करण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समित्या व ग्रामपंचायतींवर.
- २७ कलमी मान्सूनपूर्व सुरक्षा कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार.
पंढरपूर शहरातील काही दुकांनाना मध्यरात्री अचानक लागली.
या आगीमध्ये चार चपलांची तर चार किराणा अशी आठ दुकाने आगीत जळून खाक झाली.
यामध्ये मोठी आर्थिक हानी झाली आहे.
दरम्यान अग्निशमन दलाच्या वतीने आगीवर नियंत्रण मिळवले.
तळेगाव दाभाडे येथील तुळजाभवानी मंदिरात दोन वेळा चोरी गेलेला चांदीचा मुकुट आणि तळेगाव एमआयडीसी परिसरातील मंदिरांमध्ये चोऱ्या करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे.
राज्यातील अनेक भागातील पुढील काही दिवस उष्ण आणि दमट हवामानाचा प्रभाव कायम राहणार असून विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे दुसरीकडे कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात हलक्या पावसाची शक्यताही वर्तवली आहे.
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने झाल्टा फाट्याजवळ सापळा रचून एम.डी. म्हणजे मेफेड्रोन पावडरची तस्करी करणाऱ्या दोन आंतरराज्यीय पेडलर्सना रंगेहात अटक केली आहे. आरोपींकडून तब्बल ६२.२७ ग्रॅम घातक ड्रग्ज जप्त करण्यात आले असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याची किंमत २ लाख ४९ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बीड बायपास रोडवर पांढऱ्या रंगाच्या कारची नाकेबंदी करून ही धडक कारवाई करण्यात आली. या छाप्यात ड्रग्जसह कार, मोबाईल आणि डिजिटल वजनकाटा असा एकूण ७ लाख ३९ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
त्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाऊस लांबल्याने भाजीपाल्याची आवक तब्बल ४० टक्क्यांनी घटल्याने बाजारात दर वाढले आहेत. विशेषतः पालेभाज्या, टोमॅटो, भेंडी, गवार, सिमला मिरची यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले. कांदा आणि बटाट्याच्या किमतीतही वाढ झाल्याने दैनंदिन स्वयंपाक अधिक महाग झाला आहे.
•टोमॅटो - ₹80
* गवार ₹80
* भेंडी- ₹80
* सिमला मिरची- ₹80
* वांगे -₹60
* फ्लॉवर -₹80
* पत्ताकोबी - ₹50
* शेवगा शेंगा -₹90
* कांदा -₹20
•बटाटा - ₹30
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.