Maharashtra Breaking Live Marathi news Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live Update : रायगडच्या पाताळगंगा नदीत बुडून एकाचा मृत्यू

Maharashtra Breaking Live Marathi Headlines Updates 26th February 2025 : आज बुधवार, दिनांक २६ फेब्रुवारी २०२५. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडीचा वेगवान आढावा, महाशिवरात्री, राज्यातील शिवमंदिरात भक्कांची गर्दी, राजकीय घडामोडी, राज्यात उष्णेतेच्या लाटेचा इशरा, मुंबई-नाशिक-पुण्यासह राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

Raigad : रायगडच्या पाताळगंगा नदीत बुडून एकाचा मृत्यू

रायगड जिल्ह्यातील गुळसुंदे आपटा येथे शंकर मंदिराजवळ पाताळगंगा नदीत बुडून एकाचा मृत्यू झाला. शंकर सुरेश फसाले असे त्याचं नाव असून तो मोहपाडा शिंदेवाडी येथील रहिवासी आहे. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेच्या सदस्यांनी त्याचा पाण्यात शोध घेऊन मृतदेह बाहेर काढला.

Nashik Crime : नाशिक मुंबई महामार्गावर पेट्रोल पंपावर पहाटे दरोडा

- नाशिक मुंबई महामार्गावर श्रीहरी पेट्रोल पंपावर पहाटे दरोडा

- तलवारी कोयते घेऊन आलेल्या सशस्त्र गुंडांनी केली लूट

- पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून दीड लाख रुपयांची लूट

- मारहाणीमध्ये संतोष मोहिते आणि शांताराम रावळे दोन जण जखमी

- सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, नाशिक ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू

स्वारगेट एसटी डेपो घटना प्रकरणी काही जणांची चौकशी होण्याची शक्यता

स्वारगेट एसटी डेपो व्यवस्थापन मधील काही जणांची चौकशी होण्याची शक्यता

पोलिसांकडून व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता

व्यवस्थापन कार्यालयात पहाटे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी देखील होण्याची शक्यता

स्वारगेट डेपोमध्ये कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांचीसुद्धा पोलीस चौकशी करण्याची शक्यता

एसटी बसचे दार लॉक होतं का नव्हतं? स्वारगेट बस डेपोमध्ये बस आल्यानंतर चालकाने काय केलं याची देखील पोलिसांकडून चौकशी होणार

महादेव मुंडे खून प्रकरणात SIT स्थापन करून तपास करावा - सुरेश धस

परळीतील महादेव मुंडे यांचा १५ महिन्यांपूर्वी खून झाला

कुटुंबीयांनी अनेक वेळा मागणी केल्यानंतर सुद्धा पोलिसांनी याचा तपास केला नाही.

राजकीय दबाव पोलिसांवर होता याचा तपास करण्यासाठी स्वतंत्र पथक स्थापन करून चौकशी करावी

भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे मागणी केली आहे

प्रशांत कोरटकर यांचं तोंड काळ करू, संभाजी ब्रिगेडचा इशारा

इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकीचा फोन प्रकरणात आता संभाजी ब्रिगेडने उडी घेतलीय.

प्रशांत कोरटकर यांनी ही धमकी दिल्याने त्यांच्याविरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक झालंय

प्रशांत कोरटकर यांना जिथे भेटेल तिथे त्यांचे तोंड काळं करुन गाढवावरुन धिंड काढण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने आज पनवेल येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिलाय

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील पिडीत तरुणीला डिस्चार्ज

⁠ससून रुग्णालयातून पिडीत तरुणीला देण्यात आला आहे डिस्चार्ज

२४ तास ॲाब्सर्वेशनखाली ठेवण्यात आल्यानंतर थोड्यावेळापूर्वी देण्यात आला डिस्चार्ज

Pune : वसंत मोरे यांनी केली स्वारगेट एसटी डेपोची तोडफोड

Raigad : महाडमध्ये वीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवाला आज पासून प्रारंभ

महाडचे ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराज यांचा छबिना उत्सव आजपासून प्रारंभ होत आहे. महाशिवरात्री पासुन पुढे चार दिवस हा उत्सव साजरा होणार आहे. सकाळी ग्रामदेवी जाखमातेची पालखी मिरवणुक वीरेश्वर मंदिराकडे निघाली असून या मिरवणुकीत महाडमधील विवीध मंदिर देवस्थान आणि मंडळ सासण काठी आणि अखाडे घेऊन सहभागी झाले. खालू, ताशा आणि नगाऱ्या तालावर नाचवल्या जाणाऱ्या या उंच उंच सासण काठ्या पहाण्यासाठी त्याच प्रमाणे ग्रामदेवी जाखमातेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी महाडमध्ये मोठी गर्दी केली आहे. रात्री उशिरा ग्रामदेवी जाखमातेची पालखी वीरेश्वर मंदिरात पोहोचली की रात्री उशिरा महापुजा होणार आहे.

महाशिवरात्रीनिमित्त परळीतील वैद्यनाथ मंदिरावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून विशेष नजर

महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी लक्षात घेता परळीतील वैद्यनाथ मंदिर आणि परिसरावर 140 सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून विशेष लक्ष आहे. बैद्यनाथ मंदिरातील गाभारा आणि परिसर पूर्ण सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आहे. पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनेवरून सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलीय.

स्वारगेट डेपोच्या 'त्या' बस समोर रिपब्लिकन सेनेचा आंदोलन सुरू

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडुन 10 कोटींचे अंमली पदार्थ नष्ट

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून नशा मुक्त नवी मुंबई हे अभियान मोठ्या प्रमाणात राबविले जात असून या अभियानाअंतर्गत अमली पदार्थाचे सेवन आणि विक्री करणाऱ्या नागरिकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेय. याच नशा मुक्त नवी मुंबई अभियान कार्यक्रमाचाच एक भाग म्हणुन आज नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील एकुण 40 गुन्हयातील जप्त करण्यात आलेले 10 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ तळोजा येथील शासन मान्य मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीत नष्ट करण्यात आलेय. यावेळी वन मंत्री गणेश नाईक यांनी नशा मुक्त अभियानाची प्रशंसा करत पोलिसांच्या कार्याचे कौतुक केलेय.

स्वारगेट बस स्टॅन्ड बलात्कार प्रकरणानंतर शिवसेना आक्रमक

तुळजापूर येथील पुजाऱ्याच्या शिष्टमंडळाने घेतली काशी पिठाचे धर्मगुरू आणि छत्रपती संभाजी राजे यांची भेट

श्री तुळजाभवानीच्या मुख्य गाभारा आणि मंदिराची पुनर्बांधणी करण्यावरून तुळजापूर येथे भोपे पुजारी आणि पुरातत्त्व विभागामध्ये मतभेद

तुळजाभवानीचे मुख्य मंदीर पाडुन नव्याने बांधण्याला भोपे पुजारी मंडळाचा आहे विरोध

तुळजाभवानी मंदीराचे स्ट्रक्चरल ऑडिट हे पुण्यातील एका संस्थेमार्फत करण्यात आले असुन हे ऑडिट केंद्राच्या पुरातत्त्व विभागाकडून करण्याची आहे मागणी

श्री तुळजाभवानीचा गाभारा आणि मुख्य शिखर पाडण्यासंदर्भात काशीपीठाचे धर्मशास्त्र पंडीत पद्मश्री गणेश्वर शास्ञी द्रविड यांचे शिष्टमंडळानी घेतले मार्गदर्शन

तुळजाभवानी मंदीराचा हा ऐतिहासिक व पौराणिक ठेवा आम्ही जतन करण्याबाबत ठाम असुन हा ठेवा नष्ट होवु देणार नाही भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांची भुमिका

पिडीत तरुणी सध्या पुण्यातल्या ससुन रुग्णालयात ॲडमिट

- पिडीत तरुणीची ससुन रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे

- ⁠वैद्यकीय चाचणीचा रिपोर्ट संध्याकाळ पंर्यत येणार

- ⁠पिडीत तरुणी सध्या ससुन रुग्णालयात ॲडमिट

- ⁠ससुनमध्ये पिडीत तरुणीवर उपचार सुरु आहेत

- ⁠संध्याकाळी पिडीत तरुणीला डिस्चार्ज मिळण्याची शक्याता

- ⁠वैद्यकीय अहवाल अद्याप पोलिसांना प्राप्त नाही

पुणे पोलिसांचे पथक आरोपी दत्तात्रय गाडेच्या घरी दाखल

पुणे पोलिसांकडून आरोपी गाडे याच्या भावाला घेण्यात आले ताब्यात

पुणे पोलिसांचे पथक आरोपी दत्तात्रय गाडेच्या घरी दाखल

मात्र गाडे घरी नसून तो फरार आहे

पुणे पोलिसांनी खाडे याच्या शिरूर येथील घरावर मारला छापा

खाडे याच्यावर पुण्यासह शिरूर मध्ये सुद्धा चोरी, हाणामारीचे गुन्हे दाखल

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची पथकं सुद्धा घेत आहेत शोध

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आईला बेदम मारहाण, लोणावळ्यात गुन्हा दाखल

उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याने स्वतःच्या आईला बेदम मारहाण केलीये.

आईच्या पाठीवर, हातावर, मानेवर व्रण ही उमटलेत. मारहाण करणाऱ्या पोराचं मारुती देशमुख असं नाव असून नुकतीच त्यांची मावळ राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलीये.

याप्रकरणी आईने लोणावळा ग्रामीण पोलिसांत मुलगा मारुती, त्यांची पत्नी आणि मुलगा यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात केलाय...

अमरावतीत सरपंचाला मारहाण, खासगी रूग्णालयात उपचार सुरू

अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील उपराई येथील सरपंचाला मारहाण झाल्याचा प्रकार घडलाय. सरपंच नीरज नागे यांना मारहाण करण्यात आली आहे. ग्रामपंचायतच्या घरकुल यादीमध्ये लाभार्थ्यांचं नाव न आल्यामुळे मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. सायंकाळी मित्रासोबत घराबाहेर जात असताना काही लोकांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यांची प्रकृती चिंताजनक असून खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत

खासदार सुळेंनी घेतली श्री क्षेत्र बनेश्वर मंदिरातील महादेवाचं दर्शन

महाशिवरात्रीनिमित्त खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतलं भोरमधील प्रसिद्ध श्री क्षेत्र बनेश्वर मंदिरातील महादेवाचं दर्शन. त्यांनी दर्शन घेत विधिवत पुजा देखील केली. यादरम्यान सुळे यांनी दर्शनासाठी आलेल्या भाविकांशी सवांदही साधला.

हमीभावाने तूर खरेदी ऑनलाईन नोंदणीसाठी 30 दिवसांची मुदतवाढ

हमी भावाने तूर खरेदी करण्यासाठी राज्य सरकारतर्फे ऑनलाइन नोंदणी करण्याची मुदत 30 दिवसांनी वाढवन्यात आल्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे,

हंगाम 2024-25 मधील हमीभावाने तूर खरेदीसाठी 24 जानेवारी 2025 पासून पुढे 30 दिवसांपर्यंत शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणीबाबत कळविण्यात आले होते, ही मुदत आणखी 30 दिवस वाढविण्यात येत असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे.

महाशिवरात्री निमित्त उमरगा शहरात महादेव मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी

महाशिवरात्री निमित्त उमरगा शहरातील हेमाडपंती महादेव मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी केली आले.मंदिरामध्ये हजारो भाविक दर्शनासाठी आल्याचे पाहायला मिळत असुन हे मंदिर पूर्वाभिमुख असून या मंदिराची बांधणी पंचरथ पद्धतीची आहे. त्रिदलपद्धतीच्या या मंदिराचे अधिष्ठान उंच जोत्यावर आहे. ब्रह्मा, विष्णु, महेश या तिघांनाही या मंदिरात स्थान आहे.

शहादा मार्गावर मोटरसायकल आणि कारचा अपघात

शहादा प्रकाशा मार्गावर शहादा शहरा जवळील गुलमोहर हॉटेल समोर मोटरसायकल आणि स्कार्पिओ ची समोरासमोर धडक...

अपघातात मोटरसायकल वरील एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी...

महामार्गावरील अपघाताच्या घटनांमध्ये वाढ...

रस्ता सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी

खासदार बजरंग सोनवणे देशमुख कुटुंबियांची भेट घेणार

खासदार बजरंग सोनवणे थोड्याच वेळात देशमुख कुटुंबाची भेट घेण्यासाठी मसाजोग येथे दाखल होणार..

न्यायासाठी देशमुख कुटुंबाचे व गावकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे..

देशमुख कुटुंबाची भेट घेतल्यानंतर खासदार बजरंग सोनवणे काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष..

माचनूर येथे सिध्देश्वर दर्शनासाठी भाविकांची गर्दी

मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील प्रसिद्ध सिद्धेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे.

भीमा नदी काठी असलेल्या सिध्देश्वराच्या दर्शनासाठी महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात भाविक येतात. महाशिवरात्री निमित्ताने येथे पाच दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात. महाशिवरात्रीच्या दिवशी दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी झाली आहे.

सरपंच संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी सुरू असलेल्या अन्न त्याग आंदोलनाला सरपंच उपसरपंच संघटनेचा पाठिंबा

सरपंच संघटनेचे अध्यक्ष यांनी दिल पाठिंबाचे पत्र

गावकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य न झाल्यास दोन दिवसानंतर राज्यातील सर्व ग्रामपंचायत बंद ठेवण्याचा संघटनेचा पत्राद्वारे इशारा.

राज्यातील गावोगावी जाऊन संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी सरपंच संघटना करणार जनजागृती.

सरपंच संघटनेच्या अध्यक्ष परमेश्वर तळेकर यांची माहिती

इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणाच्या तपासासाठी कोल्हापूरातून पोलिस पथक नागपूरला रवाना

इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणाचा तपास करण्यासाठी कोल्हापुरातून पोलीस पथक नागपूरला रवाना

काल रात्री उशिरा एक अधिकारी आणि चार कर्मचाऱ्यांचा एक विशेष पथक नागपूरला झाले रवाना

थोड्याच वेळात हे पथक नागपूर मध्ये पोहोचणार

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल केलेल्या आक्षेपार्य विधाना संदर्भात प्रशांत कोरटकर याची पोलीस करणार चौकशी

बारामतीत रंगणार पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार सामना?

राज्याच्या सहकार क्षेत्रातील साखर कारखाना म्हणून अग्रगण्य समजला जाणारा पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जाणारा सहकार क्षेत्रातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लवकरच लागणार असून ही निवडणूक पूर्ण ताकतीनिशी लढवण्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी दिलेयेत.... राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तशी तयारी देखील सुरू केली असल्याचे चित्र दिसून येत आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार योग्य ते निर्णय घेतला जाईल असे युगेंद्र पवारांनी यांनी म्हटले असले तरी निवडणूक पवार विरुद्ध पवार होणार असे चित्र दिसत आहे...

पुण्यातील मिशन टायगर अडकलं अटी शर्तींच्या गर्तेत

15 ते 20 नगरसेवक आणि शहराध्यक्ष पद द्या, एका माजी आमदाराची शिंदेंसमोर अट

इतकंच नाही तर म्हाडाचे अध्यक्षपद किंवा विधानपरिषद यापैकी एकावर संधी द्या

शहराध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्यावर सोपवा मग पक्ष कसा वाढतो ते दाखवतो

मिशन टायगरला पुण्यात फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचं ओळखून या माजी आमदाराने शिंदेंच्या शिवसेनेकडे शहराध्यक्ष पदाची अट ठेवल्याची माहिती

शहरात पक्ष वाढवायचा असेल तर भाजपसोबत छुपी लढाई करावी लागेल आणि ती मीच करू शकतो, अस हा माजी आमदार शिंदे सेनेच्या मुंबईतील काही वरिष्ठ नेत्यांना बोलल्याची माहिती

बदलापुरातल्या गांधी चौकातील हनुमान मंदिरात ड्रेसकोड लागू

बदलापुरातल्या गांधी चौकातील प्रसिद्ध हनुमान मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आलाय.यापुढे मॅक्सी, हाफ पँट, मिनी स्कर्ट्स, मीडी स्कर्ट्स,फाटलेल्या जीन्स घालून येणाऱ्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. तसा निर्णय मंदिर प्रशासनानं घेतलाय. तसंच मंदिर परिसरात पाळीव पाणी आणण्यास मनाई करण्यात आलीय. ड्रेस कोड बाबतचा फलकही मंदिराबाहेर लावण्यात आलाय.

बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून, तर अ‍ॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांची धनंजय देशमुख यांच्यासोबत चर्चा

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या सुरुवातीच्या काळातील तपासा बाबतच्या मागण्यावर मसाजोग ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलन करत आहेत.. या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस असून या आंदोलनास प्रारंभ होताच केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील हे आंदोलन स्थळे पोहोचले असून ते धनंजय देशमुख यांच्याशी चर्चा करत आहेत.. देशमुख कुटुंब तसेच ग्रामस्थांच्या मागण्याबाबत आज काही ठोस निर्णय होऊ शकतो का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..

बदलापुरात महाविकास आघाडीकडून मुख्याधिकाऱ्यांना बुलडोझर भेट

बदलापूरमध्ये महाविकास आघाडीने पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांना प्रतिकात्मक बुलडोझर भेट दिला आहे. पालिकेकडून शहरातील अनधिकृत टपऱ्या, फेरीवाले यांच्यावर सुरू असलेल्या धडक कारवाईला पाठिंबा म्हणून हा बुलडोझर भेट देण्यात आलाय.

मेळघाटात पुन्हा 22 दिवसाच्या बाळाच्या पोटावर दिले तब्बल 65 चटके

पोटफुगीचा आजार झाल्याने घरगुती उपाय म्हणून दिले पोटाला चटके...

मेळघाटच्या सिमुरी गावातील घटना 22 दिवसाच्या चिमुकल्या बाळावर अमरावतीच्या रुग्णालयात उपचार सुरू...

22 दिवसाच्या बाळाची प्रकृती चिंताजनक..

यापूर्वी अनेकदा मेळघाटात चिमुकल्या मुलांच्या पोटाला चटके दिल्याच्या घटना..

नागपूर शहरात 27 फेब्रुवारीला अनेक भागात पाणी पुरवठा बंद

- उन्हाळाच्या पार्श्वभूमीवर देखभाल दुरूस्तीसाठी ओसीडब्ल्यू आणि महानगर पालिकेकडून 27 फेब्रुवारीवरील शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा असणारा बंद

- 27 फेब्रुवारी सकाळी 10 ते संध्याकाळी 10 पर्यंत असणार पाणीपुरवठा बंद..

- पेज 1 मधून होत असलेल्या शहरातील 13 जलकुंभावर उद्या पाणीपुरवठा खंडित असणार आहे

- सीताबर्डी कमांड एरिया, वंजारीनगर जुने आणि नवीन, रेशीमबाग कमांड एरिया, मेडिकल फिडर कमांड एरिया, सेंट्रल रेल्वे लाईन, लष्करीबाग कमांड एरिया, गोरेवाडा, सादर याभागात 24 तास पाणी पुरवठा नसणार.

प्रभू वैद्यनाथ मंदिर परिसरात भाविकांची अलोट गर्दी..

महाशिवरात्रीच्या शुभ पर्वावर बारा ज्योतिर्लिंगापैकी प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनासाठी परळी मध्ये भाविकांची अलोट गर्दी झाली आहे.. मध्यरात्रीपासून भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.. भाविकांच्या लांबच लांब रांगा दर्शनासाठी लागत आहेत..

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालकांना ठोठावलेला दंड न भरल्यास घर, जमिनीवर बोजा चढवण्याचे आदेश

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या चाळीस टिपर मालकांना दीडशे कोटी रुपये दंडाची नोटीस जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवली होती.. त्यानंतर आता या टिपर चालकांनी हा दंड न भरल्यास त्यांच्या जमीन तसेच घरावर बोजा चढवण्याच्या प्रक्रियेला वेग आलाय.. बीडच्या तहसीलदारांनी यातील काही टिप्पर चालकांच्या जमिनीवर बोजा चढवण्याचे आदेश दिल्याने आता या टिप्पर चालकांमध्ये खळबळ उडाली.. बीड जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीच्या विरोधात महसूल प्रशासन कठोर भूमिका घेत असून आता ज्या 40 टिप्परच्या माध्यमातून 3300 फेऱ्या करत वाळू वाहतूक केल्याचे निदर्शनास आले होते.. त्यांना ठोठावलेल्या दंडाची रक्कम न भरल्यास त्यांच्या सातबारावर बोजा चढवला जाणार आहे..

भगवान महादेव समोर नंदीबैल नसलेल्या भारतातून एकमेव मंदिर नाशिक मध्ये

नाशिक नाशिकच्या कपालेश्वर मंदिर भारतातील एकमेव असे मंदिर आहे ज्या ठिकाणी शंकर भगवान नंदी नाही कारण या ठिकाणी शंकर भगवान यांनी नंदीला आपले गुरु मानले आहे त्यामुळे या मंदिरात शिवभक्तांची मोठी गर्दी दर्शन घेण्यासाठी असते महाशिवरात्रीनिमित्त नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासूनच रांगा बघायला मिळत आहे आज दिवसभरात दीड ते दोन लाख भाविक दर्शनाला येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे आणि यासाठी मंदिर प्रशासन कडून जयत तयारी करण्यात आली आहे संपूर्ण मंदिर ला विद्युत रोषणाई तसेच फुलांची सजावट करण्यात आली आहे पंधरा मिनिटात भाविकांचे दर्शन व्हावे तसेच कुठलीही अन उचित घटना घडू नये यासाठी संपूर्ण मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आणि खाजगी सुरक्षा रक्षक सह पोलिसांचा मोठा फोज फाटा या ठिकाणी तैनात करण्यात आले .

Nashik : सर्व नियमांचं पालन करूनच त्र्यंबकेश्वर मंदिरात प्राजक्ता माळी यांच्या नृत्याचा कार्यक्रम

- गेल्या अनेक वर्षांपासून त्र्यंबकेश्वर मंदिरात नृत्य, धार्मिक, संस्कृतिक कार्यक्रम होतायत

- नटरंग अकादमीने विनंती केल्यानं यंदा त्यांच्या शिवार्पणमस्तू या कार्यक्रमाच आयोजन

- त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांची माहिती

- आज रात्री ८ वाजता पुण्याच्या नटरंग अकॅडमीतर्फे शिवार्पणमस्तू हा नृत्याचा कार्यक्रम करण्यात येणार आहे सादर

- यामध्ये इतर कलाकारांसोबतच प्राजक्ता माळी देखील सादर करणार नृत्य

- प्राजक्ता माळी यांच्या खासगी आयुष्याशी देवस्थानला काहीही देणं घेणं नाही

१६ व्या शतकातील भव्य शिवलिंग भाविकांच्या प्रतीक्षेत

महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव मंदिर आणि शिवलिंगाची पूजा मोठ्या भक्तीभावाने केली जाते. या दिवशी भाविक मंदिरांमध्ये लांबचलांब रांगेत उभे राहून पूजेची वाट पाहत असतात, मात्र चंद्रपूर शहरातील भिवापूर परिसरात १६ व्या शतकातील भव्य प्राचीन शिवलिंग आजही भाविकांच्या प्रतीक्षेत आहे. आजही या शिवलिंगाची पूजा केली जात नाही. हे शिवलिंग चारशे वर्षांपूर्वी गोंडराजाने बांधले होते. चंद्रपूरच्या विशाल किल्ला, मंदिर आणि लोकोपयोगी कामांपासून प्रेरणा घेऊन सेठ रायप्पा वैश्य यांनी इतर पुतळ्यांसह इथे महादेवाच्या मंदिराचे बांधकाम सुरू केले होते. मंदिर बांधण्यापूर्वीच रायप्पा वैश्य मरण पावले आणि मंदिर अपूर्ण राहिले. 400 वर्षांपासून हे भव्य शिवलिंग मैदानात मोकळ्या आकाशाखाली जीर्णोद्धाराची वाट पाहत आहे. महाशिवरात्रीलाही लोक त्याची पूजा करत नाहीत, सुमारे 11 फूट उंच असलेल्या या शिवलिंगाचे वेगळे वैशिष्ट्य आहे. मात्र देवालय अपूर्ण असल्याने भाविक या शिवलिंगाची पूजा करीत नाही.

धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अतिवृष्टीचे 137 कोटी रुपये जमा

धाराशिव जिल्ह्यात 2024 च्या एप्रिल महिण्यात झालेला आवकाळी पाऊस आणि सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामध्ये बाधित 1 लाख 6 हजार 500 शेतकऱ्यांच्या खात्यावर 137 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. तर बाकी बाधित असलेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन लोकप्रतिनिधी यांनी केले आहे.

- महाशिवरात्रीनिमित्त अंचलेश्वर मंदिरात शिवभक्तांची उसळली गर्दी

शिवाच्या आराधनेत रममाण होणा-या भक्तांसाठी चंद्रपूरचे अंचलेश्वर मंदिर हे आराध्य आहे. आज महाशिवरात्रीनिमित्त या मंदिरात शिवभक्तांची पुजेसाठी मोठी गर्दी उसळली आहे. पंधराव्या शतकातील हे प्राचीन मंदिर भाविकांच्या गर्दीनं फुलून गेले आहे. चंद्रपूरातील अंचलेश्वर मंदिर हे भगवान शिवाचे मंदिर असून या मंदिराच्या गाभा-यात एक नैसर्गिक जलकुंड आहे. ऐतिहासिक मान्यतेनुसार, जलकुंडातील पाणी हे पवित्र मानले जाते. तिथेच बाजूला शिवलिंग स्थापित आहे. राणी हिराईने सोळाव्या शतकात या जलकुंडाचे महत्त्व अनुभवल्यानंतर या मंदिराचा कायापालट केला. तेव्हापासूनच या मंदिराला भक्तांच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त झाले. महाशिवरात्री असो वा श्रावण महिना इथे भक्तांची मोठी गर्दी उसळते. ऐतिहासिक नोंदीनुसार हे जलकुंड आजही मंदिराच्या गाभा-यात विद्यमान आहे. त्यात पाणीही आहे. पण आता हे पाणी दूषित होऊ लागले आहे. भाविक या जलकुंडात निर्माल्य टाकत असल्याने ते तिथेच सडून जाते. दगडातील झ-यामधून इथे पाणी साचते. अतिशय पवित्र मानले गेलेले हे जल आता निर्माल्या विसर्जनामुळे दूषित झाले. गोंड शासकांपासून सुरू झालेली ही पूजेची परंपरा आजही कायम आहे. चंद्रपूर शहरातील प्राचीन वास्तूंपैकी अंचलेश्वर मंदिर हे एक.

धाराशिवच्या ढोकी गावात बर्ड फ्लूची एन्ट्री,पोलीस ठाणे परिसरातील कावळ्यांना झाली बर्ड फ्लूची लागण

धाराशिवच्या ढोकी गावात बर्ड फ्लूची एन्ट्री झाली आहे.गावातील पोलीस ठाण्याच्या परिसरात गेल्या काही दिवसापूर्वी कावळ्यांचा मृत्यू झाला होता.याचा अहवाल समोर आला असून बर्ड फ्लूमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा उघड झाले आहे.यानंतर पशुसंवर्धन विभाग, ग्रामपंचायत अलर्ट मोडवर आले असून कावळ्यांचा मृत्यू झालेल्या परिसरात विविध उपायोजना राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.पोलीस ठाण्याचा परिसर,सुभाष देशमुख यांचे घर प्रतिबंधित करण्यात आले आहे.तर ढोकी शहराच्या 10 किमी त्रिजेचा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आलाय.या परिसरातील कुक्कुटपालन केंद्रावरील पक्षांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच परिसरातील मटन,मास विक्री देखील बंद राहणार आहेत.

वेरूळच्या श्री घृष्णेश्वर मंदिर परिसरामध्ये भक्तांची गैरसोय

पोलीस शासन आणि विश्वस्ताच्या नियोजनामुळे शिवभक्तांची मोठी अडचण

रांगेत मारहाण आणि गोंधळ

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनाही दर्शना साठी बराच वेळ ताटकळत राहावं लागलं.

मंदिर परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त नसल्यामुळे समस्या वाढली.

विश्वस्तांचे पोलिसांकडे तर पोलिसांचे विश्वस्ताकडे बोट

समन्वयाचा अभाव असल्यामुळे सकाळपासूनच शिवभक्तांना अडचणीचा सामना करावा लागतो

प्रयागराज येथून आणले 1500 लिटर जल... महाशिवरात्रीनिमित्त वाशिममध्ये भाविकांनी घेतला कुंभस्नानचा आनंद

प्रयागराज येथे आज महाशिवरात्री निमित्त शेवटच कुंभस्नान होणार आहे. आणि जे भक्त अजूनही प्रयागराज येथे गंगास्नानासाठी जाऊ शकले नाही, किंवा जाता आले नाही. त्या भाविकांसाठी वाशिमच्या मंगरूळपीर येथील चारभुजानाथ मंदिरात प्रयागराज येथून टँकरने 1500 लिटर जल आणून एक जलकुंभ तयार करत इथ कुंभ स्नानाची संधी उपलब्ध करून दिलीये... यावेळी मंगरूळ येथील भाविक भक्तांनी या कुंडात डुबकी मारून कुंभ स्नानाचा आनंद घेतला..

Pune Crime: पुण्यात गाड्यांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी काढली धिंड

चंदन नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहनांची आरोपींनी केली होती तोडफोड

वाहन तोडफोड करणाऱ्या एकूण 8 आरोपींना पुणे पोलिसांनी केली अटक

ज्या ठिकाणी फोडल्या गाड्या त्याच ठिकाणी आरोपींची पोलिसांकडून परेड

चंदननगर भागात गाडी तोडफोड करणारे एकूण 13 आरोपी त्यापैकी 8 आरोपींना पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

तर यात 2 अल्पवयीन आरोपींचा देखील समावेश

Latest Marathi News Live :  आरटीई अंतर्गत विद्यार्थ्‍यांची यादी रद्द करा; अलिबागचे अमर वार्डे यांची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी

शिक्षण विभागाकडून नुकतीच शिक्षण हक्‍क कायदा प्रवेश प्रक्रीयेसाठी अर्ज प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र रायगड जिल्‍ह्यात या पात्र लाभार्थ्यांच्या यादीत सधन कुटूंबातील विद्यार्थ्यांचाही समावेश दिसून येत आहे. त्यामुळे वंचित आणि दुर्बल घटकातील विद्यार्थी आरटीई लाभापासून दूर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची यादी रद्द करावी अशी लेखी मागणी अलिबाग येथील दत्‍ताजीराव खानविलकर एज्‍युकेशन ट्रस्‍टचे अध्यक्ष अमर वार्डे यांनी केली आहे. वार्डे यांच्‍या शाळेसाठी 28 विद्यार्थ्‍यांची यादी शिक्षण विभागाने पाठवली आहे. यातील 23 विद्यार्थी शाळेपासून एक किलोमीटर अंतराच्या परिसरातील नाहीत तर एका विद्यार्थ्याचा पत्ता चक्क छत्त्तीसगड येथील दाखवण्यात आला आहे. असा दावा वार्डे यांनी केलाय असून सरकार मराठी भाषे ऐवजी इंग्रजीला प्रोत्साहन देत असल्याचा आरोपही अमर वार्डे यांनी केला आहे.

Sangli :सांगली महापालिकेने थेट देवाला पाठवली घरपट्टी कराची नोटीस, महापालिकेचा अजब कारभार चव्हाट्यावर..

सांगली महापालिकेच्या घरपट्टीचा अजब प्रकार समोर आला आहे.शहरातील एका म्हसोबा मंदिरला महापालिकेकडून घरपट्टीची नोटीस पाठवण्यात आली आहे.म्हसोबा मंदिरच्या नावे 1 हजार 62 रुपयांची घरपट्टी भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.शहरातल्या खणभाग येथील म्हसोबा गल्ली मधले हे म्हसोबा मंदिर आहे.सदरचे म्हसोबा मंदिर हे कोणत्याही ट्रस्ट अथवा मंडळाच्या अखत्यारीत नाही. त्यामुळे महापालिकेने मसोबा मंदिराच्या नावाने दिलेले घरपट्टी बिल कोण भरणार ? आणि महापालिका या म्हसोबा मंदिराच्या घरपट्टीच्या वसुलीबाबत काय भूमिका घेणार ? असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे.त्यामुळे महापालिकेच्या कारभारामुळे आता म्हसोबा देवाला कर भरावा लागणार का ? असा सवाल केला आहे.

Sangli News : सांगलीच्या मारुती चौकातील श्री केशवनाथ मंदिराच्या आवारात महाकुंभ तिर्थ दर्शन सोहळा संपन्न

अनुलोम संस्थेकडून अनुगामी लोकराज्य महाअभियानानंतर्गत आज सांगलीच्या मारुती चौकातील श्री केशवनाथ मंदिराच्या आवारात महाकुंभ तिर्थ दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

पैलवान पृथ्वीराज भैय्या पवार यांच्या उपस्थितीत तसेच स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत या तीर्थ कलशाचे पूजन करण्यात आले. ज्या भाविक भक्तांना महा कुंभमेळ्यामध्ये जाता आले नाही अशा भाविक भक्तांना कुंभमेळ्यातील तीर्थाचं दर्शन व्हावं या उद्देशाने अनुलोम संस्थेच्या वतीने या धार्मिक उपक्रमाचे आयोजन केले होते. या महा कुंभ तीर्थपूजनचा सांगलीतील भाविकांनी लाभ घेत दर्शन घेतले. यापुढेही सांगली शहरातील विविध भागांमध्ये या महा कुंभ तीर्थ कलश नागरिकांच्या आणि भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन अनुलोम संस्थेकडून करण्यात आले आहे.

Yavatmal : बाराव्या शतकातील जागृत ओंकारेश्वर मंदिर

चिऱ्यावर उभे असलेले मंदिर इतिहासाची साक्ष देते.भगवान शंकराची भव्य दिव्य पिंड जागृत असल्याची अनेकांची श्रध्दा असून मुख्य गाभाऱ्यातील पिंड तब्बल साडेचार फूट उंच आहे.बाराव्या शतकाचा इतिहास दर्शविणाऱ्या या मंदिरात डाव्या आणि उजव्या बाजुला असलेल्या भुयारसदृश खोल्यांचा साधू-संत ध्यान धारणा करण्यासाठी उपयोग करित असल्याचा कयास आहे.

Raigad : : महाशिवरात्री निमित्ताने रायगडमध्ये शंकराच्या मंदिरांमध्ये भक्तांची मोठी गर्दी

आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने रायगडमध्ये शंकराच्या मंदिरात मोठी गर्दी झालेली पहायला मिळत आहे. पहाटे पासूनच अभिषेक विधीवत पूजन सुरु करण्यात आला आहे. महाड शहरातील शिवकालीन वीरेश्वर मंदिरात आज पासून छबिना उत्सव म्हणजेच जत्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे.

Rohit Patil  : क्रिकेटचंही मैदान आमदार रोहित पाटलांनी गाजवले

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित आर आर पाटील यांनी क्रिकेटचे मैदान चांगलंच गाजवलं.सांगलीच्या तासगाव मध्ये आयोजित आमदार चषक क्रिकेट स्पर्धेत रोहित पाटील यांनी धडाकेबाज फलंदाजी केली.षटकार आणि चौकार लगावत चांगली फलंदाजी केली.12 चेंडुत 16 धावा घेत रोहित पाटील हे नाबाद राहिले.

आर आर पाटील स्पोर्टसकडून तासगाव मध्ये आमदार चषक क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून या दरम्यान पार पडलेल्या एका सामन्यात रोहित पाटील यांनी स्थानिक संघाकडून मैदानात उतरत क्रिकेटचं मैदान देखील गाजवले.

Dhule Mahashivratri : महाशिवरात्रीनिमित्त धुळ्यातील झुलत्या पुलावरील 22 फुटी महादेवाच्या दर्शनासाठी भावीकांची लगबग

महाशिवरात्रीनिमित्त सर्वच महादेव मंदिरांमध्ये सकाळपासून भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी बघावयास मिळत आहे, धुळ्यात देखील शहरातील झुलतापूल या ठिकाणी असलेल्या 22 फुटी पूर्णकृती महादेवाच्या दर्शनासाठी धुळेकरांनी सकाळपासूनच गर्दी केल्याचे बघावस मिळत आहे.

धुळे शहरात आकर्षकनाचं आणि भाविकांचं केंद्रबिंदू असलेल्या 22 फुटी महादेवाच्या दर्शनासाठी जिल्हा बाहेरून देखील मोठ्या प्रमाणात भाविक नेहमीच या ठिकाणी येत असतात, आज महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी केल्याचे बघावयास मिळत आहे.

Chhatrapati Sambhajinagar - आदर्श विद्यालयाच्या केंद्रप्रमुखासह १३ जणांवर फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बारावी परीक्षेतील कॉपी प्रकरणी आदर्श विद्यालयाच्या केंद्रप्रमुखासह १३ जणांवर फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. आदर्श विद्यालयांमध्ये बारावी परीक्षेत सुरू असलेली सामूहिक कॉपी आणि त्या परीक्षा केंद्रावर खाजगी कोचिंग क्लासेसचे शिक्षक हे परीक्षक म्हणून काम पाहत असल्याची बातमी सर्वप्रथम साम टीव्हीने दाखवली होती. फुलंब्री तालुक्यातील पिंपळगाव वळण येथील सामूहिक कॉपी प्रकरणात चर्चेत आलेल्या आदर्श विद्यालयाच्या केंद्रप्रमुखासह १३ जणांविरुद्ध शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी २५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळगाव वळण येथील आदर्श विद्यालयाच्या बारावीच्या परीक्षा केंद्रावर २२ फेब्रुवारी रोजी गणित विषयाच्या पेपरला सामूहिक कॉपी सुरू असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी केलेल्या पाहणीत समोर आले होते. याप्रकरणी २८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर परीक्षा केंद्रावर ११ पर्यवेक्षक खाजगी कोचिंग क्लासचे असल्याची खळबळजनक बाब समोर आली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तपासणी केली त्यात अनेक त्रुटी आढळल्या आहेत. त्यावरून कारवाई करण्यात आली.

Nashik : महाशिवरात्रीनिमित्त पहाटेपासूनच त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी

- पहाटे चार वाजेपासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं

- भाविकांच्या सोयीसाठी आज रात्रभर मंदिर दर्शनासाठी खुले राहणार

- उद्या रात्री नऊ वाजेपर्यंत सलग 41 तास त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार

- भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर आज त्र्यंबकेश्वर मंदिरातील व्हीआयपी दर्शन आणि गर्भगृह दर्शन पूर्णपणे बंद

- महाशिवरात्रि निमित्त त्र्यंबकेश्वर मंदिराला आकर्षक विद्युत रोष नाही आणि फुलांची आकर्षक सजावट

- महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वर मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईची सजावट

- संपूर्ण मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई

- पहाटे ४ वाजता विधिवत पूजेनंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं

- पहाटेपासूनच त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

- भाविकांच्या सोयीसाठी आज रात्रभर मंदिर दर्शनासाठी खुलं राहणार

- महाशिवरात्री निमित्त मंदिर परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमांच देखील आयोजन

Chhatrapati Sambhajinagar - सिद्धेश्वर मंदिर महाशिवरात्री

बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वराच्या मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने आज पहाटेपासूनच शिवभक्तांनी मोठी गर्दी केली आहे. भक्तांच्या हाकेला धावून येणारे आणि भक्तांची मनोकामना पूर्ण करणारे ज्योतिर्लिंग म्हणून घृष्णेश्वरांची ओळख आहे. चार धाम सप्तपुरी, ११ ज्योतिर्लिंग यांची यात्रा केल्यानंतर बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वरांचे दर्शन करून यात्रा पूर्ण करतात. आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने हा योग मोठा असल्यामुळे देशभरातल्या वेगवेगळ्या भागातून मोठ्या संख्येने शिवभक्त वेरूळमध्ये रात्रीच दाखल झालेले आहेत.

Nagpur News : कल्यानेश्वर मंदिरात सकाळपासून गर्दी  

महाशिवरात्रीच्या निमित्याने नागपूरच्या 400 वर्ष जुने प्राचीन कल्यानेश्वर मंदिरात सकाळपासून गर्दी पाहायला मिळत आहे.

महाशिवरात्री निमित्ताने आजपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसत आहे...

महाशिवरात्री निमित्य विधिवत शीव पिंडीवर पूजा अर्चना करून भगवान शिवचे रुद्राभिषेक केला जात आहे.

या मंदिराचा 1968 ला जीर्णोद्धार झाला, भोसलेकालीन मंदिर आहे...

वर्षभर गर्दी असतेच, पण महाशिवरात्रीच्या तसेच श्रावण मासात मोठ्या संख्यने भाविक येत असतात...

आज मंदिरात सुद्धा रोषणाई पूजा, अर्चा करण्यासाठी सकाळपासून गर्दी दिसून येत आहे...

भोले बाबांच्या मूर्तीला फुलांनी सुंदर सजावट केली असून भाविकांच लक्ष वेधून घेत आहे.

Pune water News : पुण्यातील खराडी, चंदननगर व वडगाव शेरीमध्ये शुक्रवारी पाणी पुरवठा बंद

चंदननगर येथील पाण्याच्या टाकीच्या मुख्य जलवाहिनीचे तातडीचे काम करण्यात येणार

खराडी, चंदननगर व वडगाव शेरी तसेच लष्कर जलकेंद्रावर अवलंबुन असलेल्या परिसरात पाणी पुरवठा बंद असणार आहे.

पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडुन देण्यात आली माहिती.

शनिवारी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.

पुण्यातील या भागात शुक्रवारी पाणी येणार नाही.

खराडी, चंदननगर, वडगाव शेरीमधील आनंद पार्क, सुनीता नगर, गणेश नगर, स्वामी समर्थ, नामदेव नगर, मते नगर, पुण्य नगरी, महावीर नगर, मुन्नवार सोसायटी, माळवाडी परिसर तसेच लष्कर जलकेंद्रावर अवलंबुन असलेल्या परिसर

Beed Parali : वैद्यनाथाच्या दर्शनासाठी मध्य रात्रीपासूनच भाविकांची गर्दी

महाशिवरात्र पर्वकाळात देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री वैद्यनाथाच्या दर्शनासाठी परळीत भाविकांची मांदिआळी पाहायला मिळत आहे.वैद्यनाथ मंदिराला महाशिवरात्री निमित्त आकर्षक अशी फुलाची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.मध्यरात्री 12 पासून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले असून सायंकाळी 6 वा बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या हस्ते शासकीय महापूजा केली जाणार आहे.

महाशिवरात्रीनिमित्त प्रभू वैद्यनाथाची अलंकारिक महापूजा करण्यात येते.यावेळी प्रभूंना विविध दागिने घातले जातात. अलंकारिक पूजेचे मनमोहक रूपाने भक्तांचे नेत्र दिपून जात आहे.वैद्यनाथाच्या स्पर्श दर्शनाचे अनन्यसाधारण महत्व आहे मात्र शिवरात्रीच्या निमित्ताने याच अलंकारिक पूजेचे दर्शन घेण्यासाठी शिवभक्तांनी गर्दी केलेली आहे.

MahaShivratri महाशिवरात्री निमित्ताने घोरावेश्वर मंदिराच्या पायथ्याशी सप्ताहाचे आयोजन.. रोज हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ....

जुन्या मुंबई पुणे महामार्ग लगत असलेल्या घोरावेश्वर मंदिराच्या पायथ्याशी महाशिवरात्री निमित्ताने सप्ताहाचे आयोजन केले आहे. सात दिवस चाललेल्या या सप्ताहामध्ये राज्यातील नामवंत कीर्तनकारांनी आपली सेवा सादर केले. आजची कीर्तन सेवा ह.भ.प.माऊली महाराज कदम यांनी सादर केले. दरम्यान सात दिवस चाललेल्या या सप्ताह निमित्ताने रोज हजारो भाविकांना महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. उद्या कॉलेजच्या कीरनाने या सप्ताहाची समाप्ती होणार आहे...

MahaShivratri महाशिवरात्री निमित्त अंबरनाथ च्या प्राचीन शिव मंदिरात दर्शनासाठी लाखो भाविक 

महाराष्टार्तील  शिल्पकला आणि वास्तुकलेच उत्कृष्ट आणि उतुंग नमुना म्हणजे ठाणे जिल्ह्यातील  अंबरनाथ मधील प्राचीन शिवमंदिर तब्बल ९५० वर्सापुर्वीचे हे मंदिर आजही आपला साज टिकवून उभं असून .

आज शिवरात्री या मंदिरात दर्शनासाठी लाखो भाविकानी मध्यरात्रीपासून दर्शनासाठी आपली हजेरी लावली, पाच ते सहा लाख भाविक येथे दर्शनासाठी येतात, उल्हासनगर आणि अंबरनाथ च्या मध्यावर येथे मोठी यात्रा सुरु झाली आहे,रात्री बारा वाजता मंदिराचे पुजारी पाटील कुटुंबीयांनी पूजा केल्यानंतर हे मंदिर भाविकांसाठी खुले केले गेले.

Bhimashankar- महाशिवरात्री निमित्ताने भिमाशंकरला महादेव नगरी सजली

ज्योतिर्लिंगाचे विकास होत असताना भिमाशंकरच्या विकास आराखड्यात दिरंगाई होत असल्याचे खंत भिमाशंकरचे मुख्य पुजारी मधुकर गवांदे यांनी व्यक्त करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदीनी भिमाशंकरला दर्शनाला आल्यावर भिमाशंकर आणि परिसराचा विकास होईल अशी अनोखी अट ठेवत पंतप्रधान नरेंद्र मोदीला आमंत्रण दिलय

- महाशिवरात्री पुजा संपन्न झाली . महाशिवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा. भिमाशंकर विकास आराखड्याची कामे आमच्या हातुन पुर्ण व्हावी हिच भिमाशंकर चरणी मागणी केली. भिमाशंकर हा वनविभाग,अभारण्य,आणि इको सेन्सिटिव्ह झोन असल्याने भिमाशंकरला तीन कायदे लागु असल्याने सुखसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अडचणी आहेत.
दीलीप वळसे पाटील
भिमाशंकरचे दर्शनाचे भाग्य लाभले. राज्यात प्रगती व्हावी सर्वाच्या जीवनात सुख समृद्धी निर्माण व्हावी. राजकारणात कटुता आणि द्वेश निर्माण झाली ती कमी व्हावी.
सचिन आहिर

Mahashivratri  मराठवाड्यातील आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ मध्ये शिवभक्तांचा उत्साह, ओम नमः शिवायचा गजर करत भक्त रांगेत उभे

महाशिवरात्रीनिमित्त देशभरातील शिवमंदिर शिवभक्तांच्या गर्दीने फुलून गेली आहेत, मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात असलेल्या आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ मंदिरात मध्यरात्रीपासूनच शिवभक्तांनी प्रभू शिव शंकराच्या दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत, औंढा नागनाथ संस्थान कडून शासकीय महापूजा संपन्न झाल्या भाविकांच्या दर्शनासाठी हे मंदिर खुलं करण्यात आलं होतं दरम्यान हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्यासह लोकप्रतिनिधींच्या हस्ते प्रभू शिवशंकराला दुग्ध अभिषेक घालण्यात आला तर मंदिर समितीकडून मंदिराच्या मुख्य भागावर आकर्षक विद्युत रोषणाई करत फुलांची सजावट करण्यात आली आहे

Thane : कोपिनेश्र्वर मंदिर भाविकांची गर्दी

आज महाशिवरात्री निमित्त ठाण्यातील कोपिनेश्र्वर मंदिर या ठिकाणी पहाटे पासूनच भाविकांनी येण्यास सुरुवात केली आहे.यंदा देखील दीड लाखाहून अधिक भाविक दर्शन घेणार आहेत.यंदा देखील चार गेट तयार करण्यात आले आहेत

Jalgaon : महाशिवरात्री महाेत्सवानिमित्ताने अाेंकारेश्वर मंदिरात आज विविध कार्यक्रम

महाशिवरात्रीनिमित्ताने आज पहाटे ४ वाजे पासून भाविकांना मंदिर दर्शनार्थ खुले करण्यात आले. मंदिरात २४ तासांच्या ७ विशेष पर्वात शिवअभिषेक करण्यात येईल. महाशिवरात्रीनिमित्ताने आज ओंकारेश्वर मंदिरात भाविकांसाठी दिवसभर खुले राहणार आहे. महाशिवरात्री महाेत्सवानिमित्ताने आज शहरातील अाेंकारेश्वर मंदिरात करण्यात आलेली विद्युत राेषणाई जळगावकरांचे लक्षवेधून घेत हाेते. हाशिवरात्रीच्या जळगाव शहरातील शिवमंदिरांची सजावट करण्यात आली असून मंदिरांवर रंगरंगोटी, विद्युत रोषणाई, गर्दीला विभागण्यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले आहे. मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी मंदिरात झाली आहे.

Yavatmal : दाभडीच्या ओंकारेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भक्तांची गर्दी

महाराष्ट्राच्या भूमीत प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडविणारे अनेक गड किल्ले, मंदिरे वैभवशाली इतिहासाची साक्ष देतात. प्राचीन कलाविष्कार उत्तम नमुना असलेल्या यवतमाळच्या दाभडी येथील ओंकारेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी पहाटेपासून प्रचंड गर्दी केली

Pune Mahashivratri : महाशिवरात्रीनिमित्त पुण्यातील काही रस्त्यांवर वाहतुकीत बदल

वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी पुण्यातील पुण्येश्वर रस्ता ते अगरवाल रस्ता वाहतुकीसाठी बंद

सकाळी सहा वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात

शहर वाहतूक शाखेकडून देण्यात आली माहिती

हे आहेत वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग

कुंभारवेस चौकातून फडके हौद चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी कुंभारवेस चौक -गाडगीळ पुतळा चौक- जिजामाता चौक - गणेश रस्त्याने इच्छित स्थळी जावे

सूर्या हॉस्पिटलकडून पवळे चौकातून अगरवाल रस्त्याने जाणाऱ्या वाहनांनी छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याने जिजामाता चौकातून डावीकडून गणेश रस्त्याने पुढे जावे

फडके हौद चौकातून कुंभारवेस चौकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी जिजामाता चौक- फुटका बुरूज - बाजीराव रस्ता- गाडगीळ पुतळा मार्गे इच्छित स्थळी जावे

कमला नेहरू रुग्णालयाकडून अगरवाल रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांना दारूवाला पूल -देवजीबाबा चौक -फडके हौद चौकमार्गे पुढे इच्छित स्थळी जाता येईल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pregnancy Mental Health: गर्भधारणेदरम्यान मानसिक तणाव टाळण्यासाठी 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Salman Khan : सलमान खाननं 'बिग बॉस 19'साठी किती घेतलं मानधन? आकडा वाचून पायाखालची जमीन सरकेल

Manikrao Kokate: कृषीमंत्री कोकाटेंवर कारवाईची टांगती तलवार? राजीनाम्याचं काऊंटडाऊन सुरू? CM दिल्ली दौऱ्यावर, नेमकं काय घडलं?

Diabetes without blood test: शरीरात हे ६ बदल दिसले तर समजा मधुमेह झालाय; ब्लड टेस्ट न करताही डायबेटीजचा धोका येईल लक्षात

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT