Maharashtra Breaking Live Marathi news Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live Update : अरे बापरे! वर्ध्यात गोमासाची बिर्याणी, पोलिसांनी केला भंडाफोड

Maharashtra Breaking Live Marathi Headlines Updates 21th February 2025 : आज शुक्रवार, दिनांक २१ फेब्रुवारी २०२५. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडीचा वेगवान आढावा, आजपासून दहावीच्या परीक्षा, अमित शाह पुणे दौऱ्यावर, एकनाथ शिंदे विदर्भाच्या दौऱ्यावर, राजकीय घडामोडी, राज्यात ऊन्हाच्या झळा, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

अरे बापरे! वर्ध्यात गोमासाची बिर्याणी, पोलिसांनी केला भंडाफोड

- गांधी जिल्ह्यात सुरु होता गोरखधंदा

- पोलिसांनी केला भंडाफोड

- हॉटेल 'अल बरकत' वर कारवाई

- शहर पोलिसात गुन्हा दाखल

- दोघांवर गुन्हा दाखल

नंदुरबार जिल्ह्यात बनावट नोटांचा सुळसुळाट

जिल्ह्यातील ग्रामीण भागात बनावट नोटा चलनात.

धडगाव, मोलगी यासह अक्कलकुवा तालुक्यातील अनेक परिसरात बाजारात बनावट नोटा चलनात.

अवैध धंद्यांच्या माध्यमातून बनावट नोटा चलनात आणल्या जातात.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर

आज आणि उद्या असा दोन दिवसीय अमित शहा यांचा पुणे दौरा.

आज कोरेगाव पार्क येथील वेस्टिन हॉटेलमध्ये शहांचा मुक्काम.

उद्या सकाळी ११ वाजता अमित शहांच्या उपस्थितीत पश्चिम गृह विभागाची बैठक.

तसेच हडपसर येथील विठ्ठल तुपे सभागृहात दुपारी ३ वाजता जनता सहकारी बँकेच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या समारोपाला शहा उपस्थित राहणार.

चेंबूरमध्ये भीषण अपघात

उभ्या असलेल्या चार चाकी गाडी वर क्रेन कोसळली

घटना स्थळावर अग्निशमन आणि पोलिस दाखल

कोणतीही जीवित हनी नाही

चार चाकी गाडी चे मोठ्या प्रमाणात नुकसान

जालना पेपर फुटी प्रकरणी संशयित तिघांना पोलिसांनी चौकीसाठी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती

बदनापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे....

साम टीव्हीने जालन्यातील बदनापूर येथे मराठीचा पेपर फुटल्याची बातमी दिली होती आणि त्यानंतर प्रशासन आता ॲक्शन मोडवर आल असून बदनापूर पेपर फुटी प्रकरणी संशियीत तिघांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे...

पुण्यातल्या 'त्या' घरातून साडेतीनशे मांजरी बाहेर, सोसायटीतल्या रहिवाशांना मानले साम टीव्हीचे आभार

मागील काही दिवसामध्ये हडपसर भागात असणाऱ्या मार्व्हल बाउंटी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये एक अजब प्रकार सुरु होता याच्या संदर्भात साम टीव्ही ने ही बातमी दाखवली आणि पालिका प्रशासनाने 48 तासांची नोटीस देत रिंकू भारद्वाज यांच्या वर कारवाई करत त्या फ्लॅट मधून 350 मांजरी या घरा बाहेर काढल्या आहेत.

त्याची पाहणी करण्यासाठी पालिका प्रशासकीय अधिकारी, SPCA सह पोलीस देखील या ठिकाणी पाहणीसाठी आले होते. यावेळी रिंकू भारद्वाज यांच्या घरात एकही मांजर दिसले नसल्याचं सोसायटीतील नागरिक व सर्व अधिकाऱ्यांनी सांगितला. यावेळी सोसायटी लोकांनी साम टीव्ही चे आभार मानले

शेकडो बांधकाम कंत्राटदारांचे अमरावतीच्या सार्वजनिक बांधकाम विभागात कामबंद आंदोलन

अमरावती विभागातील शेकडो बांधकाम कंत्राटदारांचे अमरावतीच्या सार्वजनिक बांधकाम विभागात कामबंद आंदोलन

अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातील कंत्राटदारांचे 2700 कोटी रुपये महाराष्ट्र सरकारकडे थकल्याने आंदोलन

आंदोलनाच्या स्थळी कंत्राटदारांकडून भजन कीर्तन गायत आंदोलन

सरकारने कंत्राटदारांचे पैसे न दिल्यास कामे बंद ठेवण्याचा कंत्राटदारांचा इशारा

कल्याण रेल्वे स्कायवॉकवर चोरट्यानी भाजी विक्रेत्याला दगडाने मारहाण करत लुबाडले

कल्याण पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या स्कायवॉकवर दोन चोरट्यांनी दगडाने हल्ला करत एका इसमाचा मोबाईल आणि रोकड लुबाडल्याची घटना समोर आली आहे.सुरेश सिंह असे या जखमी झालेल्या इसमाचे नाव असून तो भाजीविक्रेता आहे .या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध आहेत.

इचलकरंजी परिसरात कुख्यात गुंडांची जर्मन टोळी

जाधव उर्फ जर्मन नावाने प्रसिद्ध असणारे तीन भाऊ इचलकरंजीमध्ये दहशत माजवत आहेत.

खून, मारामारी, जबरी चोऱ्या, खंडणी, दरोडे अशा पद्धतीचे अनेक गुन्हे जर्मन टोळीच्या गुंडांवर दाखल आहेत.

तरुण मुलांना एकत्रित करून, व्यसनाच्या नादी लावून जर्मन गॅंग मध्ये सहभागी करून घेणे हा जर्मन टोळीचा मुख्य उद्देश आहे.

व्यापारी, सर्वसामान्य नागरिकांवर जोर जबरदस्ती करून खंडणी गोळा करणे, दहशत माजवणे हा मुख्य या जर्मन टोळीतील गुंडांचा उद्योग आहे.

पुण्यातील मारणे टोळीतील तिघांना पोलिसांकडून अटक, एका आरोपीचा शोध सुरू

मारणे टोळीतील तिघांना पोलिसांकडून अटक एका आरोपीचा शोध सुरू

कुख्यात गुंड गजा मारणे चा भाचा फरार पोलिसांकडून शोध सुरू

कोथरूड मधील एका व्यक्तीला गाडीचा धक्का लागला म्हणून मारहाण केली आहे

शिवजयती दिवशी कोथरूडमध्ये गर्दीच्या ठिकाणी देवेंद्र जोक यांना दुचाकी वरून जात असताना चार लोकांनी मारहाण केली होती. जोगिनी कोथरूड पोलिसात तक्रार दाखल केली होती त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.

चार आरोपी पैकी तिघांना कोथरूड पोलिसांनी अटक केली एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

कोथरूड पोलिसांनी मारहाणीची सर्व माहिती घेत गुन्हा दाखल केलाय..गुन्हा करण्यास विलंब केला नाही.असं पोलीस उपायुक्त त्यांनी सांगितले.

बुलढाणा - आमदार श्वेता महाले धमकीचे पत्रप्रकरणी शेकडो भाजपा कार्यकर्ते आक्रमक

आमदार श्वेता महाले यांना धमकीचे पत्र प्रकरण ..

शेकडो भाजपा कार्यकर्ते घुसले पोलिस स्टेशन मध्ये ..

आरोपीला तत्काळ पकडून कारवाईची केली मागणी ..

शेकडो भाजपचे कार्यकर्त्याचा जमाव पोलिस स्टेशन वर गेला चालून ..

नागपूरचे ठाकरे गटातील माजी जिल्हाप्रमुख आज शिंदे गटात करणार प्रवेश

उद्धव ठाकरे गटाला राम राम करत शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राजू भरणे आज शिंदे गटात प्रवेश करणार आहे.

काटोल विधानसभा मतदारसंघातून पदाधिकाऱ्यांसह पक्ष प्रवेशासाठी नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहे.

आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विदर्भाचा दौऱ्यावर असताना दे धक्का तंत्राचा उपयोग करत अनेक जण पक्षप्रवेश करणार आहे.

नागपूरात धावत्या कारवर उडानपुलाचा काही भाग कोसळला

- उडानपुलाचा जवळपास ५० ते ६० किलो वजनाचा पार्ट कारवर कोसळला

- नागपुरातूल प्रजापती नगर चौक एचबी टाऊन परिसरातील घटना

- कारचालक विशेष श्रीवास्तव किरकोळ जखमी

- पण कारचं मोठं नुकसान, लोकांमध्ये भितीचं वातावरण

- उडानपुलाच्या भागाला क्रॅक आल्याने आणखी अपघात होण्याची भिती...

राज ठाकरे पुन्हा अ‍ॅक्शन मोडवर, मुंबई महापालिकेच्या आयुक्तांची घेतली भेट

जमिनी खालून जाणाऱ्या केबलच्या मुद्यावर चर्चा

मुंबई महापालिकेवर आथिक ताण

आयुक्त राज्य सरकारला पत्र लिहितील

पालिका पैसे का सोडत आहे

नवी मुंबई, जालना येथे दहावी बोर्डाचा मराठीचा पहिलाच पेपर फुटल्याने राज्यातील सर्व विभागीय मंडळ अलर्ट.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मुंबई विभागीय मंडळ देखील अलर्ट वर.

सर्व शाळांना सूचना, शाळे जवळील xerox सेंटर वर लक्ष ठेवण्याचे आदेश

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे पहिल्याच दिवशी दहावीचा पेपर फुटला

पेपर चे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

शिक्षण आणि महसूल विभागाकडून जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय महागाव आणि कोठारी येथील शाळेत चौकशी सुरू

पिंपरी चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प सादर. चिंचवड, पिंपरीच्या तुलनेत भोसरीला झुकतं माप

पिंपरी चिंचवड महापालिकेचं आयुक्त शिखर सिंह यांनी आज 6 हजार 256 कोटीचं अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात स्वतःच्या विधानसभेला झुकतं माप मिळावं यासाठी भाजपच्या चार ही आमदारांनी आयुक्त शेखर सिंह यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता.

दहावीचा मराठीचा पेपर फुटला, उत्तरप्रतिकांच्या प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या

पहिल्याच दिवशी दहावीच्या मराठी पेपर फुटीला ग्रहण लागलेलं आहे. जालन्यात दहावीचा मराठीचा पेपर फुटला आहे. जालना जिल्ह्यातील बदानापूर येथे दहावीचा मराठीचा पेपर फुटला आहे. शहरातील झेरॉक्स सेंटरमधून उत्तरपत्रिकांच्या प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या जात आहेत. त्यामुळे आता खळबळ उडाली आहे.

तुम्हाला ऑपरेशन करायचं असेल तर ऑपरेशन टायगर न करता विकासाचं ऑपरेशन करा - आमदार कैलास पाटील

धाराशिवचे पालकमंत्री तथा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ऑपरेशन टायगर वक्तव्याला ठाकरे गटाचे धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी उत्तर दिलय.धाराशिव येथे पत्रकारांच्या कार्यक्रमाला पालकमंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते.त्यावेळी धाराशिव जिल्हा हा मागासलेला आहे तुम्हाला ऑपरेशन करायचे असेल तर ऑपरेशन टायगर करण्यापेक्षा धाराशिव जिल्ह्याच्या विकासाचे ऑपरेशन करा असे प्रत्युत्तर आमदार कैलास पाटील यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना दिलय.

ड्रग्ज प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करा ;पुजारी मंडळाचे तहसील कार्यालयात उपोषण

तुळजाभवानीची तुळजापूर नगरी ड्रग्सच्या विळख्यात सापडली असल्याची माहिती समोर आल्यानंतर साम टिव्ही ने यावर सर्वप्रथम आवाज उठवला होता त्यानंतर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांना खडेबोल सुनावत ७२ तासाच्या आत या प्रकरणाचा अहवाल देण्याच्या सुचना दिल्या आहेत.दरम्यान या प्रकरणी पुजारी मंडळाने ही बाब पालकमंत्री सरनाईक यांच्यासमोर मांडल्याने एका पोलीस अधिकाऱ्याने पालकमंत्र्यासमोरच पुजाऱ्याला धमकावल्याचा आरोप पुजाऱ्याने केलाय.

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे कोल्हापूर दौऱ्यावर येत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

कोल्हापुरातील सर्किट हाऊस इथं पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

शेतकऱ्यांविषयी अपशब्द काढणाऱ्या कृषी मंत्र्यांना जाब विचारण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार आहे आंदोलन

आंदोलना अगोदरच सर्किट हाऊस इथून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चार कार्यकर्त्यांना घेतलं पोलिसांनी ताब्यात

आमदार सुधाकर अडबाले यांच्यासह 20 जणांवर गुन्हे दाखल

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात असलेल्या ग्रेटा कंपनीच्या आंदोलन करणारे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्यासह 20 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. आमदार अडबाले यांच्या नेतृत्वात स्थानिकांच्या मागण्यांसाठी एक बैठक घेण्यात आली. यात उपस्थितांनी भडकाऊ भाषणे केल्याचा ठपका पोलिसांनी ठेवलाय. याशिवाय कंपनीच्या अधिकाऱ्याची कार फोडून त्याला शिवीगाळ v मारहाण करण्यात आली. कंपनीचा फलक तोडण्यात आला.

परळी मधील व्यापारी महादेव मुंडे खून प्रकरणी सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दोन दिवसांपूर्वी महादेव मुंडे यांच्या कुटुंबाशी भेट घेऊन सांत्वन केले होते

त्यानंतर पुन्हा ज्ञानेश्वरी मुंडे यांना दोन वेळेस व्हिडिओ कॉल करत काही काळजी करू नका मी तुमच्या पाठीशी आहे तुमच्या कुटुंबाला न्याय दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही

या संदर्भात मी मुख्यमंत्री यांची भेट घेणार आहे.. असे आश्वासन सुप्रीया सुळे यांनी दिलं..

माजी नगरसेवकाचे घर फोडले, 28 तोळ्यांची दागिने अज्ञात चोरट्याने लांबवले

नाशिक रोडच्या शिखरेवाडी परिसरात शिवसेनेचे माजी नगरसेवक सुनील गोडसे यांच्या घरी चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुनील गोडसे यांच्या बंद फ्लॅटचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरातून साडे सोळा लाख रुपये किमतीचे 28 तोळ्यांचे दागिने भर दिवसा चोरले आहे. या घरफोडीने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून दुचाकीवर आलेले हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेत. पुढील तपास आता उपनगर पोलीस करत आहे

कृषी सहायक योगेश शिवराम सोनवणे यांची वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून कार्यालयातच गळफास

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी सहायक योगेश शिवराम सोनवणे यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी तालुका कृषी अधिकाऱ्यासह एका सहायकावर गुन्हा दाखल झाला.

Nerul News: नेरुळ येथील चिंचोली तलावात आढळला महिलेचा मृतदेह

30 ते 35 वर्षीय महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसल्याने खळबळ.

पोलीस, मनपा आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी.

अग्निशमन दलाच्या जवानांकडून कडून मृतदेह बाहेर काढण्यात आला.

मृतदेह वाशी येथील मनपा रुग्णालयात नेण्यात आला असून महिलेची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

नेमकी या महिलेची हत्या झालेय की आत्महत्या आहे याचा तपास पोलीस करत आहेत.

पुण्यात बुलेट चालकांवर कारवाई

कर्णकरकश्य आवाजाचे सायलेन्सर वापरणाऱ्या बुलेट चालकांवर लोणी काळभोर पोलिसांची कारवाई

कारवाई करत २२ बुलेट पुणे पोलिसांनी केल्या जप्त

सायलेन्सर मधून फटाक्याचा आवाज काढणाऱ्या चालकांवर पोलिसांनी केली कारवाई

गाड्या जप्त करत नियम न पाळणाऱ्यांकडून २५००० लाख रुपयांचा दंड पोलिसांकडून वसूल

पुढे शहरात अनेक ठिकाणी सायलेन्सर मध्ये फटाके वाजवत बुलेट चालकांनी घातला आहे धुमाकूळ

अशाच नियम न पाळणाऱ्या बुलेट चालकांवर पुणे पोलीस करणार कारवाई

प्रकाश आंबेडकरांची आज कोरेगाव भीमा आयोगासमोर पुन्हा चौकशी

कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगली प्रकरणी आज पुन्हा प्रकाश आंबेडकरांचा जबाब नोंदवला जाणार

आयोगासमोर प्रकाश आंबेडकर सादर करणार त्यांचा लेखी जबाब

आयोगासमोर समोर जबाब देण्यासाठी प्रकाश आंबेडकर उपस्थित

आयोगाकडून प्रकाश आंबेडकरांची कोरेगाव भीमा प्रकरणी पुन्हा फेर चौकशी होणार

याप्रकरणी याआधी देखील अनेक जणांची जबाब कोरेगाव भीमा आयोगाने नोंदवले आहेत

प्रकाश आंबेडकरांनी देखील अनेकदा आयोगासमोर दिली आहे साक्ष

परसाळे गावात गुरांच्या गोठ्याला अचानक आग; एक बैल जागीच ठार अडीच ते तीन लाखाचे नुकसान

दहिगाव ता यावल तालुक्यातील पावसाळे गावात गुरांच्या गोठ्यात अचानक आग लागून अडीच ते तीन लाखाचे नुकसान झाले मात्र पंचनामा केला गुरांचे गोठ्यात अचानक आग लागली आगेत 80 हजार रुपये किमतीची बैलजोडी जळाली यात एक बैल जागी ठार झाला तर दुसरा चाळीस ते पन्नास टक्के जळाला आहे त्याचे वर वैद्यकीय अधिकारी उपचार करीत आहेत या व्यतिरिक्त गुरांचा चारा पत्रांचे शेड मटेरियल 60 ते 70 हजार रुपये किमतीचे आणि शेती उपयोगी अवजारे असे साहित्य जळून खाक झाले

नांदेड केसरी कुस्ती दंगलीला सुरुवात;चार राज्यातील पैलवान दाखल

शिवजयंती निमित्त नांदेड केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या कुस्ती स्पर्धेत सर्वच वयोगटातील कुस्त्या होणार आहेत.या नांदेड केसरी कुस्ती स्पर्धेत पंजाब,हरियाणा,दिल्ली आणि महाराष्ट्रतून जवळपास तीनशे पैलवान दाखल झाले आहे.दरम्यान प्रथम पारितोषिक 51 हजार व दोन किलो चांदीची गधा देण्यात येणार आहे तर संपूर्ण पारितोषिक हे सात लाख रुपयां पर्यंतचे असतील. आयोजकामार्फत परराज्यातून आलेल्या सर्व स्पर्धकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी देणाऱ्या दोन तरुणांना अटक

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्ब निवडून देण्याची धमकी देणाऱ्या दोन तरुणांना अटक

गोरेगाव पोलीस ठाणे येथे ई-मेलवरून शिंदे यांची गाडी उडून देण्याची मिळाली होती धमकी

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुलढाणा पोलिसांच्या मदतीने दोघांना केली अटक

मंगेश अच्युतराव वायाळ 35 वर्ष आणि अभय गजानन शिंगणे 22 वर्ष अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे

अटक करण्यात आलेले दोघेही तरुण देऊळगाव राजा बुलढाणा येथील रहिवासी

मुंबई पुणे शाखेची टीम या दोन्ही तरुणांना मुंबईसाठी घेऊन येत आहेत

कोल्हापुरातील वृद्धाचा जीबीएसने मृत्यू

कोल्हापुरातल्या छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालय अर्थात सीपीआर हॉस्पिटल मध्ये जीबीएस आजारामुळे एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. शाहू मिल कॉलनी इथं राहणारे रंगराव गणपतराव माने या 80 वर्षीय वृद्धाचा जीबीएस आजाराने मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. गेले नऊ दिवस सीपीआरमध्ये माने यांच्यावरती उपचार सुरू होते. सध्या सीपीआर मध्ये बारा रुग्णांवर उपचार सुरू असून त्यापैकी तीन रुग्ण व्हेंटिलेटर वर आहेत. तर एका बारा वर्षीय मुलीला जीबीएस ची लक्षणे दिसत असल्याने शासकीय रुग्णालयात बालरोग विभागात तिच्यावर उपचार सुरू आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले

मनोज जरांगे पाटील आज मसाजोग गावात; देशमुख कुटुंबियांची घेणार भेट

अन्नत्याग आंदोलन आणि देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासा संदर्भात करणार ग्रामस्थांशी चर्चा

सरपंच देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील आज पुन्हा मस्साजोग गावात देशमुख कुटुंबाची भेट घेणार आहे. मस्साजोग ग्रामस्थांनी 25 फेब्रुवारी पर्यंत राज्य सरकारला अल्टीमेटम दिला आहे. याच अनुषंगाने जरांगे पाटील यांची ही भेट होईल.

17 फेब्रुवारी रोजी मस्साजोग ग्रामस्थांची बैठक झाली. या बैठकीत राज्य सरकारला 25 तारखेपर्यंत अल्टीमेटम देण्यात आला आहे. अन्यथा देशमुख कुटुंबासह संपूर्ण ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलन करणार आहे.

याच अन्नत्याग आंदोलन आणि आतापर्यंत झालेल्या तपासा संदर्भात चर्चा करण्यासाठी जरांगे पाटील साधारण साडेअकरा वाजता देशमुख कुटुंब आणि ग्रामस्थांशी चर्चा करणार आहेत.

कुख्यात गुंड गजानन मारणे टोळीचा कोथरूड मधे धुमाकूळ

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या आँफीस मधे सोशल मिडियाचे काम करणाऱ्यास मारणे टोळीने बेदम मारहाण केली.

या मारहाणीत त्याच्या नाकावर गंभीर जखम झाली आहे.

हाँर्न वाजवत गाड्यांचा ताफा घेऊन जाताना वाद झाल्याची माहिती. केंद्रीय मंत्र्यांनी व्हिडीओ काँलवर करून जखमी ची चौकशी केली.

सर्व आरोपी नुकतेच जामीनावर बाहेर आले आहेत. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून मारणेचा भाचा फरार आहे.

ग्राहकांची फसवणूक झाल्यास बँक जबाबदार सर्वोच्च न्यायालयाचा निकाल : खातेदारांना मोठा दिलासा

'ग्राहकांच्या बँक खात्यांमधून फसवणुकीने पैसे काढले गेल्यास त्यास बँक जबाबदार असल्याचा निकाल एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निकालामुळे ग्राहकांच्या फसवणुकीच्या प्रकरणात संपूर्ण जबाबदारी ही बँकांची असल्याचे स्पष्ट करत खातेदारांना मोठा दिलासा मिळाला आहे,'

विक्रोळीत बनावट नोटांचा कारखाना उद्धवस्त

मुंबईमधील विक्रोळी पार्क साईड परिसरात विक्रोळी पोलिसांनी बनावट नोटांवर छापा मारला आहे. घरात भारतीय चलनातील नकली नोटांसह, बनावट नोटा तयार कारण्याचे साहित्य आढळून आले आहे. या प्रकरणात कुलबीर लालसिंग वाडा या आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Maharashtra Live Update : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा न्यायालयात अर्ज

- खालच्या कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेला माणिकराव कोकाटे वरच्या कोर्टात आव्हान देणार

- कालच कोकाटे यांना मंजूर झालाय जामीन

- शासनाच्या सदनिका फसवणूक करून लाटल्याप्रकरणी कोकाटे आणि त्यांच्या बंधूंना झालीय दोन वर्षांची शिक्षा

- अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या निर्णयाविरोधात कोकाट यांचा सत्र न्यायालयात अर्ज

- सत्र न्यायालयात कोकाटे याना दिलासा मिळणार का? याकडे लक्ष

...तर आम्हीपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार - शंभूराज देसाई यांचे विधान

सातारा जिल्ह्यातील निवडणुका भाजपपक्ष स्वबळावर लढवणार असल्याची प्रतिक्रिया भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी साताऱ्यातील शासकीय विश्रामगृह येथे दिलिये. याविषयी मंत्री शंभूराज देसाई यांनी आपली प्रतिक्रिया देत... हा निर्णय महाराष्ट्र प्रदेश पातळीवर होतो. मात्र स्थानिक पातळीवर भाजपमधून जर सातारा जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढवण्याची भाषा करत असतील तर आम्ही सुद्धा येणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढवू असा इशारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुळजापुरचे शिष्टमंडळ भेटणार - ड्रग्ज रॅकेट मोडून तस्करावर कारवाईची करणार मागणी

तुळजापूरच्या ड्रग्ज तस्करीचा विषय आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दरबारात मांडला जाणार आहे. तुळजापूर शहरात सुरु असलेले ड्रग्ज तस्करीचे रॅकेट मोडीत काढुन आरोपीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी तुळजापूर शहरातील पुजारी, व्यापारी व प्रतिष्ठित नागरिक यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कारवाईची मागणी करणार आहे. तस्करावर कारवाई न झाल्यास तुळजापूर शहर बंद व आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे.तुळजापूर येथील नागनाथ भाऊ भांजी यांनी याबाबत माहिती दिली.तुळजाभवानी देवीच्या तुळजापूर तीर्थक्षेत्रात गेल्या काही वर्षांपासुन ड्रग्ज तस्करी होत असल्याचा आरोप केला आहे.

अपुऱ्या वीज पुरवठ्याने भंडारा जिल्ह्यातील उन्हाळी धानपिक प्रभावीत....... अनेकांची रखडली रोवणी

रब्बी हंगामातील पीक परिपक्व होवून काढणी सुरू झाली आहे. त्याचदरम्यान ६४ हजार हेक्टरवर उन्हाळी धान लागवडीला प्रारंभ झाला आहे. गत दोन आठवड्यापासून मार्च महिन्यसारखी कडक उन तापायला लागली आहे. परिणामी, उन्हाळी धानासाठी पाण्याची गरज वाढली असताना अपुऱ्या आठ तास वीज पुरवठ्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. केवळ आठ तासात शेती पिकवायची कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक शेती यंदा ६४ हजार हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी धानाची लागवड होणार आहे. परंतु, दुसरीकडे महावितरणद्वारे कमी दाबाचा वीजपुरवठा, अनियमित भारनियमन व अवेळी वीज पुरवठ्याच्या समस्येमुळे उन्हाळी धान हंगाम प्रभावीत झाले आहे. नाले, विहिर व बोरवेल्सच्या माध्यमातून सिंचीत होत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणत विद्युत पंपांचा वापर केला जातो. परंतु, ऐन हंगामात शेतकऱ्यांना अनियमित वीज पुरवठा केला जात आहे. परिणामी, अनेक शेतकऱ्याची रोवणी रखडली आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली

या महामार्गाव एकमेव असलेला कशेडी बोगद्याची देखील केली पाहणी

कशेडा बोगद्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि अंतर देखील वाचणार आहे

परंतु कशेडी बोगद्याला गळती लागत असल्याने तो धोकादायक ठरु शकतो

निसर्गाच्या पुढे जाऊ शकत नाही

धोका निर्माण होऊ नये यासाठी गळती थांबवण्याचे प्रयत्न केले जातील - शिवेंद्रसिंह राजे

बुलढाणा शहराची पाणी वितरण व्यवस्था विस्कळीत

पाणी पुरवठा करणाऱ्या येळगाव धरणात मुबलक साठा असताना शहरात पाणी टंचाई..

जिल्ह्याच्या मुख्यालयी 10 दिवसानंतर पाणी पुरवठा, नागरिक त्रस्त

बुलढाणा शहरात भीषण पाणी टंचाई. ..

व्ही आय पी लोकांच्या घरी 24 तास पाणी...

तर दुप्पट पाणी कर भरणारे शहरवासी तहानलेलेच...

बुलढाणा नगरपालिकेचा मनमानी कारभार. ..

बुलढाणा नगरपालिका प्रशासन सुस्त, करदाते त्रस्त

जिल्हाधिकारी लक्ष देतील का..सामान्य नागरिकाचा प्रश्न..

हिवाळ्यातच बुलढाणा शहरात पाणी टंचाई. ..

बुलढाणा नगरपालिकेवर नागरिका काढणार हंडा मोर्चा

जालन्यात वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर मौजपुरी पोलिसांची कारवाई,कारवाईत 15 लाखांचा मुद्देमाल जप्त.

अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलय.जालन्यातील मौजपुरी पोलिसांनी अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टरवर कारवाई करत 15 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. जालन्यातील घेटोळी आणि कवठा परिसरात नदीपात्रात मौजपुरी पोलिसांनी कारवाई केली आहे.या कारवाईत तीन विना क्रमांकाचे ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर चालक आणि मालक यांच्या विरोधात जालन्यातील मौजपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

आरोग्य मित्रांचे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन,

सेंटर फॉर इंडियन शी संलग्न ट्रेंड युनियनशी संलग्न महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन सुरू असून अद्यापही कोणताही तोडगा निघाला नाही, आयुष्यमान आरोग्य योजनेमध्ये आरोग्य मित्रांना 36 हजार रुपये पर्यंत मानधन वाढवून द्यावे व दरवर्षी दहा टक्के वाढ करावी यासह इतर सुविधा लागू कराव्या या मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसापासून आरोग्य मित्र अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर धरणे आंदोलन करत असल्याने जिल्ह्यातील आयुष्यमान योजना पूर्णपणे राखडली आहे. याचा फटका ग्रामीण भागातील व गरजू रुग्णांना मोठ्या प्रमाणात बसत आहे, त्यांना शासकीय आरोग्य योजनेपासून वंचित रहावे लागत आहे, त्यामुळे शासनाने या व तात्काळ तेव्हा काढावा व जनतेला आरोग्य योजना सुरू करून द्यावी अशी मागणी सामान्य नागरिक करत आहे

भिवंडीत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकीला लागलेल्या आगीत पाच दुचाकी जळून खाक,घटना सी सी टीव्ही मध्ये कैद

भिवंडी शहरातील अंजुर फाटा परिसरातील श्रीहरी कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकीला रात्री अचानक आग लागल्याची घटना घडली आहे.या आगीच्या छळा लागल्याने दुर्घटनाग्रस्त दुचाकी नजीक उभ्या असलेल्या पाच दुचाकी या आगीत पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत.आग लागल्याचे लक्षात येताच घटनास्थळी स्थानिकांनी तात्काळ धाव घेत पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवले.मात्र आग आटोक्यात येण्यापूर्वीच पाचही दुचाकी जळून गेल्या आहेत.या इमारतीच्या सीसीटीव्ही मध्ये दुचाकीला लागलेल्या आगीची घटना कैद झाली असून,फुटेजच्या तपासणीमध्ये एका दुचाकीची बॅटरी शॉर्टसर्किटमुळे पेटल्याचे स्पष्ट झाले आहे. बॅटरी पेटल्यानंतर लगेचच आगीने शेजारी उभ्या असलेल्या चार दुचाकींना वेढले,ज्यामुळे पाचही दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

बारावी च्या परिक्षेवेळी गैरहजर 10 पर्यवेक्षक शिक्षकांचे अहवाल झाले दाखल

धाराशिव मध्ये बारावी परिक्षेवेळी भोसले हायस्कुलमधील परिक्षा केंद्रावरील दहा पर्यवेक्षक गैरहजर असल्याचे सिईओ मैनक घोष यांच्या भेटीदरम्यान समोर आले होते या सर्वांना नोटीसा देण्यात आल्या होत्या त्यांचे खुलासे आले असुन अहवाल शिक्षणाधिकारी यांच्याकडे दिला आहे त्यामुळे संबधिताविरुध्द काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.बारावीच्या इंग्रजीच्या पेपर सुरू असताना सिईओ मैनक घोष व शिक्षणाधिकारी सुधा साळुंके यांनी भोसले हायस्कुल येथे अचानक भेट दिली असता 10 पर्यवेक्षक गैरहजर असल्याची बाब समोर आली होती.

आजपासून दहावीची परीक्षा

आजपासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे. यासाठी कोकण बोर्ड सज्ज झालं आहे. जिल्ह्यात १८ हजार ८३४ विद्यार्थी परीक्षेला बसणार असून ७३ परीक्षा केंद्रे आहेत. कॉपीमुक्त परीक्षा अभियानासाठी बोर्डाकडून विविध उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत. दहावीच्या बोर्ड परीक्षेच्या संचलनात हयगय केल्यास कडक कारवाईचा इशारा विभागीय मंडळाने क्षेत्रीय यंत्रणांसहित शाळांना दिला आहे.

Crime : इचलकरंजीतील जर्मनी गॅंगच्या सातारा पोलिसांनी आवळल्या मुस्क्या 

सातारा पोलिसांनी दरोडाच्या संशयातून अटक केलेल्या आरोपींकडून खुनाच्या सुपारीचा उलगडा झाला आहे. मारहाणीच्या वादातून धीरज ढाणे याच्या खुनाची सुपारी वाजवण्यासाठी साताऱ्यामध्ये आलेल्या इचलकरंजीतील जर्मनी गँगच्या मुस्क्या सातारा पोलिसांनी आवळल्या आहेत.या प्रकरणात या टोळीतील इचलकरंजी आणि साताऱ्यातील 7 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 2 पिस्टल, कोयता, जिवंत काडतुसे असा एकूण 5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.विशेष म्हणजे यामधील सूत्रधार हा माजी नगरसेवक वसंत लेवे यांचा मुलगा निलेश लेवे हा असून.त्याने या टोळीला धीरज ढाणे याला मारण्यासाठी 20 लाखांची सुपारी दिली असून त्या पैकी 2 लाख रुपये दिले असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT