Maharashtra News Live Update Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update : अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची लोणावळामध्ये कारवाई

Marathi Breaking Live Headlines Updates : राहुल गांधी आंदोलन, शिवसेना सुनावणी, राज्यातील हवामानाचा अंदाज , महाराष्ट्र दुष्काळ, महाराष्ट्रासह देशातील राजकीय घडामोडी, महाराष्ट्रातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Alisha Khedekar

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने भारतीय कलाविश्व आणि समाजकारणाची मोठी हानी - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड, दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि मनाला चटका लावणारी आहे. त्यांच्या जाण्याने मराठी तसेच भारतीय कलाविश्वाने एक हरहुन्नरी आणि संवेदनशील कलाकार गमावला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

​आपल्या शोकसंदेशात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, "नाना पाटेकर हे केवळ एक उत्कृष्ट अभिनेते नव्हते, तर अभिनयाचा अस्सल आविष्कार आणि संवेदनशील सामाजिक जाणिवांचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. रंगभूमीपासून रुपेरी पडद्यापर्यंत आपल्या सहज आणि प्रभावी अभिनयाने त्यांनी अनेक व्यक्तिरेखा अजरामर केल्या. 'नटसम्राट', 'क्रांतिवीर', 'परिंदा' यांसारख्या कलाकृतींमधून त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीवर उमटवलेली अमीट छाप रसिकप्रेक्षकांच्या मनात सदैव कायम राहील."

​नाना पाटेकर आणि पवार कुटुंबातील आपुलकीच्या संबंधांचा उल्लेख करताना त्या भावूक झाल्या. "नानांचे आदरणीय अजितदादांशी अतिशय जिव्हाळ्याचे, आपुलकीचे आणि स्नेहाचे संबंध होते. कौटुंबिक सुख-दुःखाच्या प्रत्येक प्रसंगात ते नेहमी पाठीशी उभे राहिले. त्यामुळे त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी ही माझ्यासाठी आणि आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत वैयक्तिक आणि विशेष दुःखद आहे," असे त्या म्हणाल्या.

निफाड मध्ये सोयाबीन उत्पादक शेतकरी तिहेरी संकटात, नुकसानभरपाईची मागणी

नाशिकच्या निफाड तालुक्यात सोयाबीन उत्पादक शेतकरी तिहेरी संकटात सापडला आहे,गेल्या दीड ते दोन महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने पिकाला पाण्याची गरज असताना एकीकडे उन्हाचा पारा वाढला आहे,त्यातच सोयाबीनवर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. एकरी २५ ते ३० हजार रुपयांचा उत्पादन खर्च होत असल्याने खर्चही वसूल होईल की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करून उत्पादन खर्च भरून निघेल इतकी नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी सोयाबीन उत्पादक शेतकरी करत आहे

चारचाकी वाहन थेट चढले दुभाजकावर; अमरावती–वलगाव रोडवर रजनी मंगलमजवळ अपघात

अमरावती–वलगाव रोडवरील रजनी मंगलम कार्यालयाजवळ चारचाकी वाहनाच्या अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगात असलेले एक चारचाकी वाहन थेट रस्त्यावरील दुभाजकावर (डिव्हायडर) जाऊन चढले. या अपघातात वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

रस्त्याचे बांधकाम सुरू असल्याने आणि अंधारात किंवा अनपेक्षितपणे दुभाजकाचा अंदाज न आल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनाचा पुढील भाग चकनाचूर झाला आहे...या मार्गावर सुरू असलेल्या कामांमुळे अपघात होत असल्याचे सांगत, प्रशासनाने त्वरित योग्य उपाययोजना आणि दिशादर्शक फलक लावावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.

नागपुरात निवडणूक आयुक्त विरोधात इंडिया आघाडी कडून जिल्हाधिकाऱ्यावर मोर्चा

- सकाळी दहा वाजता नागपूरच्या व्हेरायटी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार भव्य मोर्चा

- मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांच्या कार्यपद्धतीचा निषेध व्यक्त करण्यात येणार.

- या मोर्चामध्ये इंडिया आघाडीतील घटक पक्ष होणार सहभागी.. त्यामुळे मोर्चा अधिक आक्रमक होण्याची शक्यता.

Pune : अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्स ची लोणावळामध्ये कारवाई

अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्स ची लोणावळा मध्ये कारवाई

७४.१५ लाख रुपयांचे कोकेन जप्त, एक आरोपी ताब्यात

आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट उद्ध्वस्त होण्याची शक्यता

Yavatmal : बोटोणी येथील आश्रम शाळेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

यवतमाळच्या मारेगांव तालुक्यातील बोटोणी येथील शासकीय आश्रम शाळेला जिल्हाधिकारी विकास मीना यांनी अचानक भेट देऊन शाळेची पाहणी केली

यावेळी त्यांनी आश्रम शाळेतील विविध सोयी सुविधांबाबत शाळा प्रशासनाची झाडाझडती घेत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : बीएमसीच्या जेन झी फेलोशिपमध्ये घोळ? 150 जणांची निवड, गुण मात्र गुलदस्त्यात

Nana Patekar : मुरूडच्या किनाऱ्यापासून अभिनयाच्या शिखरापर्यंत... असा राहिला भारतीय सिनेसृष्टीच्या 'नटसम्राट'चा जीवनप्रवास

EPFO Update : PF खातेदारांसाठी मोठी बातमी! आता UPIद्वारे काढता येणार PFचे पैसे; जाणून घ्या नवी सुविधा

Navratri 2026: नवरात्रीत रोज दिसा हटके! नवरात्रीच्या ९ दिवसांसाठी परफेक्ट लूक आयडिया

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना दसऱ्याचं गिफ्ट मिळणार, या तारखेला खात्यात ₹१५०० जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT