Maharashtra News Live Update Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील धामणा धरणात केवळ 2 टक्के जिवंत पाणीसाठा शिल्लक

Marathi Breaking Live Headlines Updates : MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन, राज्यात उकाडा वाढला, दुष्काळग्रस्त भागांचा पंचनामा, शिवसेना सुनावणी, राहुल गांधी आंदोलन, महाराष्ट्रासह देशातील राजकीय घडामोडी, महाराष्ट्रातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Alisha Khedekar

जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील धामणा धरणात केवळ 2 टक्के जिवंत पाणीसाठा शिल्लक

जालना जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता मोठ्या प्रमाणात वाढली असून मध्यम प्रकल्प आणि छोटे-मोठे तलाव यामधील पाणीसाठा आटत चाललाय, प्रशासनाकडून काही जलसाठ्यातील पाणी हे पिण्यासाठी राखीव करण्यात आले आहे, जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील धामणा धरणात केवळ दोन टक्केच पाणी साठा शिल्लक राहिल्याने पोलीस आणि महसूल विभागाच्या पथकाकडून अवैध पाणी उपसा होऊ नये याकरिता रात्रंदिवस पहारा देण्यात येत आहे.

पेपर फोडणाऱ्या विरोधात ठोस कारवाई झाली पाहिजे - सुजात आंबेडकर

तुम्ही दाखवून दिले विद्यार्थी आंदोलने संपली नाहीत. मला प्रेरणादायी आणि आशादायी आहे

येणारे अधिकारी चांगले असतील. तुमच्या सगळ्या मागण्याला माझा पाठिंबा आहे. मी इथे प्रचार करणार नाही. आपण राजीनामा मागत आहे. आपल्याला व्यवस्था बदलली पाहिजे, पेपर फुटला नाही पाहिजे, मेहनत वाया नाही गेली पाहिजे, असं सुजात आंबेडकर म्हणालेत.

पुढील दोन दिवसात परीक्षा घेऊ- महाज्योती

एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन मंत्रायलयावर धडकणार; खासदार प्रणिती शिंदेंचा इशारा

देशात अहकांरी शक्ती आहे. मला डोळ्यात पाणी आले आनंद ही वाटला. एक राजकीय शक्ती कमी पडली तरी युवा शक्ती कामाला आलीय. देशांचा डीएनए नाही बदलू शकत. 'जब भी मोदी डरता है पोलीस आगे करता है' असं म्हणत प्रणिती शिंदेंनी भाजपवर हल्लाबोल केलाय. सरकार अहंकारी असून जोपर्यंत सरकार झुकत नाही तोपर्यंत आपण मागे हटणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय.

खराडी परिसरातील खेळाच्या मैदानावरील अनधिकृत इमारत जमीनदोस्त, महापालिकेची कारवाई

खेळाच्या मैदानासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर अनधिकृतपणे उभारण्यात आलेले सुमारे २१ हजार चौरस फुटांचे बांधकाम पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने जमीनदोस्त केले. यापूर्वी तीन वेळा याठिकाणी कारवाई करूनही पुन्हा सात मजली इमारत बांधल्याने संबंधित बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे.

Pune: एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी अध्यक्ष विवेक भिमनवार यांचा दहा तोंडी बॅनर जाळला

पुणे -

पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थी आक्रमक

एमपीएससी अध्यक्ष विवेक भिमनवार यांचा १० तोंडी बॅनर जाळला

एमपीएससी अध्यक्षाच्या राजनाम्यासाठी विद्यार्थी करत आहेत आंदोलन

Ahilyanagar: अहिल्यानगर शहरातील बालिकाश्रम रोडवर एकाची हत्या

अहिल्यानगर -

नगर शहरातील बालिकाश्रम रोडवर एकाची हत्या

रवींद्र चव्हाण असे मयत व्यक्तीचे नाव

रवींद्र चव्हाण यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी केला हल्ला

या हल्ल्यात ते झाले होते गंभीर जखमी; मात्र जिल्हा रुग्णालयात उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू

Kolhapur: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची कोल्हापुरात बैठक सुरू

कोल्हापूर -

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची कोल्हापुरात बैठक सुरू

मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार विनय कोरे, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह अन्य महायुतीचे नेते बैठकीला उपस्थित

कोल्हापुरातील एका खाजगी हॉटेलमध्ये बैठकीला सुरुवात

गोकुळ निवडणुकीसाठी जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला ठरणार

मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया

Pune: पुणे शिक्षक विधान परिषद निवडणुकीसाठी 48 उमेदवार रिंगणात

पुणे -

पुणे शिक्षक विधान परिषद निवडणुकीसाठी 48 उमेदवार रिंगणात

तर पदवीधर विधान परिषद निवडणुकीसाठी 69 उमेदवार रिंगणात

आज झाली अर्जांची छाननी

९ तारखेला उमेदवारी अर्ज माघारी घ्यायची शेवटची तारीख

किती उमेदवार राहणार याकडे सर्वांचे लक्ष

महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये झाली आहे बंडखोरी

Ahilyanagar: अहिल्यानगरच्या मिरी येथे उपबाजारासाठी ४ हेक्टर जमीन, महसूल मंत्री बावनकुळे यांचा निर्णय

अहिल्यानगरच्या मिरी येथे उपबाजारासाठी ४ हेक्टर जमीन

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून महसूल मंत्री बावनकुळे यांचा निर्णय

शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी स्थानिक बाजारपेठ उपलब्ध होणार

पाथर्डी बाजार समितीला नाममात्र एक रुपया दराने जमीन

Delhi: राहुल गांधी, प्रियंका गांधी यांना पोलिसांनी घेतला ताब्यात

दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाच्या विरोधात इंडिया आघाडीचे आंदोलन

जतंर-मंतरकडे कूच करणाऱ्या खासदारांना पोलिसांनी अडवलं

राहुल गांधी, प्रियंका गांधी यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Kolhapur: गोकुळ निवडणुकीसाठी महायुतीच्या बैठकांचा सिलसिला सुरूच

कोल्हापूर -

गोकुळ निवडणुकीसाठी महायुतीच्या बैठकांचा सिलसिला सुरूच

जागा वाटपाचा फॉर्मुला ठरला मात्र कोणी कोणत्या जागा घ्यायच्या यावर खलबत सुरूच

महायुतीकडून संधी न मिळणारे अनेक जण सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीच्या संपर्कात असल्याने महायुतीकडून अखेरपर्यंत सस्पेन्स कायम

Buldhana: SIRच्या नावाखाली मतदार वगळण्याचा आरोप, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची महाविकास आघाडीची मागणी

बुलडाणा -

SIRच्या नावाखाली मतदार वगळण्याचा आरोप

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची महाविकास आघाडीची मागणी

बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर MVAचे निदर्शने

SIR प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी

दिल्लीत CM फडणवीसांनी घेतली अमित शाहांची भेट

दिल्लीत CM फडणवीसांनी घेतली अमित शाहांची भेट

राज्याच्या दुष्काळाच्या स्थितीवर चर्चा

शाहांकडून मदतीचे आश्वासन

Beed: सातपुड्यातील सावरिया दिगर गावात आढळला तब्बल 10 फूट लांबीचा दुर्मिळ अजगर...

सातपुड्याच्या अतिदुर्गम अशा नर्मदा काठावरील सावरिया दिगर गावात एका शेतात तब्बल 10 फूट लांबीचा आणि 15 किलो वजनाचा दुर्मिळ अजगर आढळल्याने खळबळ उडाली. या विशाल अजगराला पाहून ग्रामस्थ भयभीत झाले होते. घटनेची माहिती मिळताच वन्यप्राणी संरक्षण आणि बहुउद्देशीय संस्था, नंदुरबार चे सर्पमित्र कान्हा वळवी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आपल्या अथक परिश्रमाने व कौशल्याने त्यांनी या महाकाय अजगराला कोणतीही इजा न पोहोचवता सुरक्षितपणे जिवंत पकडले. त्यानंतर या अजगराला त्याच्या नैसर्गिक आणि सुरक्षित जंगल अधिवासात सोडून देण्यात आले आहे. या यशस्वी बचावकार्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून सर्पमित्राचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दिल्लीच्या सीमापुरी परिसरात 3 मजली इमारत कोसळली

दिल्लीच्या सीमापुरी परिसरात 3 मजली इमारत कोसळली असून अनेक जण दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

राहुल गांधी खासदारांसह जंतरमंतरकडे निघाले

विरोधीपक्षनेते राहुल गांधी 3 बस घेऊन जंतरमंतरकडे निघाले,

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी दिल्लीत इंडिया आघाडीचे आंदोलन

राहुल गांधी खासदारांसह जंतरमंतरकडे निघाले

दादांच्या जाण्याने माझ्या घरावर आभाळ कोसळलं-उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

_बारामती तालुक्यात श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे तीन दिवसांपासून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामतीत कार्यकर्त्यांच्या संवाद बैठका घेत आहेत.

दरम्यान चोपडज येथील संवाद बैठकीत सुनेत्रा पवार अतिशय भावुक झालेल्या पाहायला मिळाल्या.

"प्रचार करण्याशिवाय माझा प्रत्यक्ष राजकारणाशी दुरान्वये संबंध नव्हता. पण अपघाताने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्याने आपण सर्वच पोरके झालो. माझ्या घरावर तर आभाळच कोसळलं, जे होऊ नये ते घडलं.दादा नंतर आम्ही तर पोरके झालोच पण आपण सर्व पोरके होऊ नयेत म्हणून त्यांची जागा मी घेतली" असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे.

सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीतील विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या बंडखोरीवरून ही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी वक्तव्य केल आहे.

दादांना जाऊन केवळ आठ महिने झालेत, दादा गेल्यानंतर जे काय चाललं आहे ते आणि जे काय बघत आहे आणि जे काय माणसं विचार करत आहेत यावरून माझ्या हे लक्षात येतंय की खरंच माणसं कशी विचार करतात आणि कसे आहेत. जी माणसं एकीकडे दादांचा ढोल ताशा लावून गजर करतात आणि तीच माणसं दादांच्या पाठीत खंजीर खुपसत आहेत. पाठीमागं काय काय बोलत आहेत. जग आहे अनुभव येतात पण मी प्रत्यक्ष अनुभवत आहे असंही सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे.

त्यांच्या जागावर लोकांसाठी लोकांना आधार देण्यासाठी मी उभा राहिले, जन माणसांच्या अनेक अपेक्षा दादांकडून होत्या आणि दादांची देखील अनेक स्वप्न होती. ती पूर्ण करण्यासाठी मी उभा राहिले लोकांनी काय अर्थ घेतला काय नाही मला माहित नाही. मी जसं जमतय जेवढं कळतंय तेवढं कळण्याचा प्रयत्न करते. एक झालं की एक दुसरं सुरूच आहे अशी खंतही सुनेत्रा पवार यांनी बोलून दाखवली आहे.

मतदार यादी निरीक्षकांचा १६ ऑक्टोबरला पुणे जिल्हा दौरा; BLO व मतदारांशी साधणार संवाद

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR)-२०२६ अंतर्गत पुणे विभागाचे विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक शीतल तेली -उगले यांचा पुणे जिल्ह्याचा द्वितीय दौरा शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार आहे. सकाळी ११.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथून सुरू होणारा हा दौरा पुरंदर, बारामती, इंदापूर व दौंड तालुक्यांतील विविध मतदान केंद्रांना भेट देत सायंकाळी ७.३० वाजता वरवंड येथे संपणार आहे.

MPSC आंदोलनापासून इथेनॉल धोरणापर्यंत; अमोल कोल्हेंचा सरकारवर निशाणा

पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भेट देत पाठिंबा दर्शवला. तरुणांच्या स्वप्नांपासून साखर कारखानदारीच्या प्रश्नांपर्यंत कोल्हे यांनी सरकारच्या धोरणांवर सवाल उपस्थित केलेत.

MPSCचा कारभार पारदर्शक असावा, ही विद्यार्थ्यांची मागणी रास्त असल्याचं अमोल कोल्हे यांनी म्हटलंय. आयोगाच्या अध्यक्षांनी नैतिकतेच्या आधारावर स्वतःहून राजीनामा का देऊ नये, असा सवाल करत सरकार नेमकं कोणाला पाठीशी घालतंय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. विद्यार्थ्यांच्या अपेक्षांचा कडेलोट करू नका, अन्यथा देशाचं भविष्य सुरक्षित राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

“दादांनंतर आम्ही पोरके झालो; तुम्ही पोरके होऊ नये म्हणून मी जबाबदारी घेतली” — सुनेत्रा वहिनी

चोपडा गावातील शेतकरी सभासद आणि ग्रामस्थांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांनी स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याचा आणि बारामतीच्या विकासातील त्यांच्या योगदानाचा उल्लेख करत ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधला.

Pune : आंबेगाव मधील शिष्यवृत्ती परीक्षेत दरम्यान झालेल्या गोंधळानंतर सर्व विद्यार्थी एस एम जोशी पुलावर सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलन स्थळाकडे येत आहेत

राजधानी दिल्लीमध्ये आपचे आंदोलन

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीमध्ये आपकडून जोरदार आंदोलन सुरू आहे. पोलिसांचा फौजफाटा तैणात करण्यात आला आहे.

भंडाऱ्यात संतप्त शेतकऱ्यांनी महाराष्ट्र - मध्यप्रदेश महामार्ग रोखला

राज्य सरकारने घोषित केलेली धान बोनसची राशी तात्काळ बँक खात्यात जमा करावी, तुमसर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, छत्तीसगडच्या धर्तीवर झाला हमीभाव द्यावा, नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन राशी द्यावी यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील हरदोली इथं शेतकऱ्यांचं जनआंदोलन होतं. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी महाराष्ट्र - मध्यप्रदेश सीमेवरील हरदोली इथं आक्रमक भूमिका घेत आंतरराज्यीय महामार्गावर ठिय्या आंदोलन करून तो रोखून धरला.

विक्रोळीत टागोर नगरमध्ये दुकान फोडून चोरी करणारे दोन आरोपी जेरबंद लॅपटॉप, मोबाईलसह संपूर्ण मुद्देमाल हस्तगत

आरती एंटरप्राईजेस दुकानाची खिडकी तोडून चोरी करणाऱ्या दोन आरोपींना 24 तासाच्या आत विक्रोळी पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून चोरीस गेलेला HP कंपनीचा लॅपटॉप, Samsung मोबाईल, 40 मीटर कंट्रोल व्हॉल्व, 200 फ्लेक्स कोअर पाईप आणि 30 रायझर आयसोलेशन व्हॉल्व असा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. चोरीच्या मालाची एकूण किंमत 87000 इतकी असून पोलिस या प्रकरणाचा आता अधिक तपास करत आहे.

उमरा मोठा धरण परिसरातून ५० ते ६० मोटारींच्या केबल चोरीला...

वाशिम तालुक्यातील वारा जहागीर आणि उमरा मोठा धरण परिसरातून ५० ते ६० मोटारींच्या केबल चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. उमरा येथून अनसिंगला पाणीपुरवठा करणाऱ्या फिल्टर प्लांट परिसरातूनही केबल चोरी झाल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे, या फिल्टर प्लांटवर काम करणारा चौकीदार सध्या फरार असून, त्याच्यासोबत आणखी दोन ते तीन साथीदारही फरार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या चोरीच्या प्रकरणात चौकीदारासह त्याच्या साथीदारांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे धरण परिसरातील सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला असून अनसिंग पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.

शिरूरमध्ये वाढत्या गुन्हेगारीविरोधात मोर्चा; अवैध धंद्यांवर कारवाईची मागणी

शिरूर तालुक्यातील गुन्हेगारीच्या मुद्द्यावर मल्हार बहुजन सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. महिला आणि पुरुषांच्या सहभागातून मोर्चा काढत प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलं.

मुख्यमंत्री एक हाती कारभार करत असल्याची सतेज पाटील यांची टीका

महाराष्ट्रात सरकारचा कारभार एकहाती सुरू असल्याची टीका काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकहाती सत्ता चालवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. कृषिमंत्री दत्ता भरणे यांना कर्जमाफीचा आकडा माहिती नसल्याचा दावा करत, दुष्काळाच्या पंचनाम्याची जबाबदारी कृषिमंत्र्यांकडे असताना त्यांच्या डोक्यावर बावनकुळे यांची कमिटी ठेवण्यात आल्याचं सतेज पाटील म्हणाले.

तसंच, वीज दराच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांकडून सभागृहात चुकीची माहिती दिली जात असून आकडेवारी लपवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. ‘खोटं बोल पण रेटून बोल’, अशा शब्दांत सतेज पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

महाज्योती आणि वनआरटी संयुक्त गट-ब आणि गट-क परीक्षेदरम्यान गोंधळ

नांदेडमध्ये महाज्योती आणि वनआरटी संयुक्त गट-ब आणि गट-क परीक्षेदरम्यान गोंधळ निर्माण झाला.नांदेड शहराजवळच्या मराठवाडा इकरा इंटरनॅशनल स्कूल या परीक्षा केंद्रावर अनेक विद्यार्थ्यांचे लॉगिन झाले नाही.त्यामुळे या ऑनलाईन परीक्षा प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला. विशेष म्हणजे हे केंद्र यापूर्वी ब्लॅकलिस्ट करण्यात आले होते. मात्र केंद्राचे नाव बदलून पुन्हा याच ठिकाणी परीक्षा केंद्र देण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला.परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना या प्रकाराचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.ठराविक वेळेत लॉगिंग न झाल्याने विद्यार्थ्याचा बराच वेळ वाया गेला.आज दिवसभरात तीन पेपर होते.परंतु सकाळच्या पहिल्या ऑनलाईन पेपारला अडथळे आल्याने आज दिवसभरात तीन वेळा होणारी परीक्षा रद्द करण्यात आली.

आदित्य ठाकरे यांचे राज्यपालांना पत्र

MPSC अध्यक्षांविरोधातील तक्रारींच्या चौकशीसाठी समितीची शिफारस

चौकशी सुरू असताना MPSC अध्यक्षांनी पदावर राहणे योग्य नसल्याचे पत्रात नमूद.

चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक होण्यासाठी अध्यक्षांना पदावरून दूर करण्याची मागणी.

राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे अध्यक्षांना पदावरून हटवण्याची शिफारस करावी, अशी आदित्य ठाकरे यांची मागणी.

सरकारने दोन दिवसांचा विशेष अधिवेशन घेऊन शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करावी - विजय वडेट्टीवार

सरकारने दोन दिवसांचा विशेष अधिवेशन घेऊन शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.

एकदा बाहेर ते कायमचे बाहेर ; सुनेत्रा पवारांचा नाव न घेता पुरुषोत्तम जगताप यांना इशारा

बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नाव न घेता बंडखोर केलेले पुरुषोत्तम जगताप यांना थेट इशारा दिला आहे.

आपल्या सर्वांचे संबंध चांगले आहेत नंतर कोण जवळ येणार अशा अनेक अफवा आहेत.कुठल्याही चुकीच्या अफवेला बळी पडू नका, एकदा बाहेर ते कायमचे बाहेर एवढे लक्षात ठेवा.दादा खूप मोठ्या मनाचे होते दादांसारखी मी नाही. असा थेट इशाराच सुनेत्रा पवारांनी नाव न घेता पुरुषोत्तम जगताप यांना दिला आहे मागे.

अनेक चुकीच्या अफवा ऐकायला येत असून कारखान्याचा अध्यक्ष हा सर्वसमावेशक असेल सर्वांच्या मर्जीनुसार अध्यक्षाची निवड केली जाईल. अध्यक्ष अगोदर ठरवलेला नाही निवडणुकीच्या निकालानंतर कोण अध्यक्ष ते ठरवू असंही सुनेत्रा पवार म्हणाल्या आहेत.

स्मृती मानधनाच्या कर्णधारपदी निवड नंतर मानधना कुटुंबात आनंदोत्सव

सांगलीची कन्या व स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना हिची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधार पदी निवड झाली आहे.या निवडीनंतर मानधना कुटुंबात स्मृतीच्या कामगिरीचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे.कर्णधार निवडीनंतर स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांनी स्मृतीच्या कर्णधारपदी निवड झाल्याचे कौतुक करत आनंद व्यक्त केला आहे,त्याचबरोबर स्मृतीच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघ हा टी-20 वर्ल्ड कप जिंकून दाखवेल,असा विश्वास व्यक्त केला आहे.

अमरावतीत सर्वोच्च तापमानाची नोंद, ३७ वर्षानंतर ३९.६ अंश तापमान 

अमरावती जिल्ह्यात राज्यात सर्वोच्च ३९.६ तापमानाची नोंद झाली.. राज्यात सर्वात उष्ण शहर अमरावती ठरले आहे.. यावर्षी 37 वर्षानंतर प्रथमच ऑक्टोंबर महिना हिट झाला आहे,दुपारच्या वेळी रस्त्यावर तप्त उन्हाच्या झळा जाणवत आहे.. उष्णतेमुळे आणि उकाळ्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे, रात्रीच्या वेळी देखील तापमान 22 अंश आसपास आहे. त्यामुळे नागरिक नागरिक उकाड्याने हैराण झाले आहे.. दर दिवशी पाऱ्यात होणाऱ्या वाढीमुळे उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

प्रेमसंबंधाला विरोध करणाऱ्या तरुणाचा त्रासाला कंटाळून तरुणाने घेतला टोकाचा निर्णय: जळगावात खळबळ

प्रेमसंबंधाला विरोध करणाऱ्या तरुणाचा त्रासाला कंटाळून तरुणाने घेतला टोकाचा निर्णय: जळगावात खळबळ

धमक्या आणि त्रासाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन: आसोदा उड्डाणपूला जवळील घटना

जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांची गर्दी: दोघांना अटक करण्याची नातेवाईकांची मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदींची सार्वजनिक जीवनातील २५ वर्ष पूर्ण

पंतप्रधान नरेंद्र मोदींची सार्वजनिक जीवनातील २५ वर्ष पूर्ण

शिवसेना राज्यात व देशभरात समाजोपयोगी उपक्रम राबवणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज परभणीत भव्य कार्यक्रम

विद्यार्थीनींना २५ हजार सायकली, महिलांना २५ हजार शिलाई मशीनचे वाट

मनमाड इंदुर पुणे महामार्गावर आयशरखाली सापडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

मनमाड इंदुर पुणे महामार्गावर आयशरखाली सापडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

इंदुर पुणे महामार्ग बनला मृत्युचा सापळा

कोमल पगारे असे मयत तरुणीचे नाव

इंदूर पुणे महामार्गावर गतिरोधक बसवण्याची नागरिकांची मागणी

अहिल्यानगर जिल्हा बँकेत सुजय विखेंच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा?

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत माजी खासदार सुजय विखे यांचा बिनविरोधाचा मार्ग मोकळा झाला आहे.

सेवा सोसायटी मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सुजय विखे यांच्या अर्जावर त्यांचे विरोधी उमेदवार एकनाथ घोगरे यांनी हरकत दाखल केली होती.

अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी 31 उमेदवारांनी अर्ज दाखल केले

अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक.....

उमेदवारांच्या अर्ज छाननीला सुरुवात...

31 उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज केले दाखल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात दिल्लीला रवाना होणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात दिल्लीला रवाना होणार

उद्या पार पडणाऱ्या जीएसची काऊन्सिलच्या महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित असणार

मालेगावच्या डोंगराळे खटल्याचा आज अंतिम निकाल

मालेगावच्या डोंगराळे खटल्याचा आज अंतिम निकाल..

आरोपीवर न्यायालयाने सिद्ध केले आरोप...

शिक्षेबाबत म्हणणे मांडण्यास आरोपीला दिली होती एक आठवड्याची संधी

वझरा ग्रामपंचायत दारूबंदी मतदानात अजनी गावातील महिलांना डावलल्याचा आरोप

वझरा ग्रामपंचायत दारूबंदी मतदानात अजनी गावातील महिलांना डावलल्याचा आरोप

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू.

Mumbai Goa Accident : मुंबई गोवा महामार्गावर इर्टीगा कारला अपघात

मुंबई गोवा महामार्गावर इर्टीगा कारला अपघात

एक ठार, दोन गंभिर जखमी

मुंबई गोवा महामार्गावर महाड तालुक्यातील केंबुर्ली गाव हद्दीत झाला अपघात

कोकणातून मुंबईच्या दिशेने निघालेली इर्टीगा कार अनियंत्रीत होऊन रस्त्याच्या बाजूला शेतात जाऊन आदळली

ईडी-सीबीआयच्या कारवाईला घाबरून कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न; राजू शेट्टींचा कारखानदारांवर गंभीर आरोप

शेतकरी आणि साखर कारखानदारांच्या हितासाठी सरकारविरोधात आंदोलन करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी काही कारखानदारांवर गंभीर आरोप केले आहेत. ईडी आणि सीबीआयच्या कारवाईला घाबरून काही कारखानदार साखर कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. आंदोलन सुरू असताना कारखाने सुरू करून आंदोलनात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधींचं आंदोलन देशाला बदनाम करण्यासाठी; भाजप नेते परिणय फुके यांचा आरोप

राहुल गांधी यांचं कालचं आंदोलन देशाला बदनाम करण्यासाठी करण्यात आलं, असा आरोप भाजप नेते परिणय फुके यांनी केला. भारत जगात अनेक क्षेत्रांत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. त्यामुळे विकसित देशांची विदेशी गुंतवणूक भारतात येणं थांबावं आणि देशाला बदनाम करण्यासाठी राहुल गांधींना सुपारी देऊन भारताला बदनाम करण्याचं काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

राहुल गांधींनी १३ कोटी लोकांची नावं कापल्याचा आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. मृत व्यक्ती, पत्त्यावर अनुपस्थित असलेले आणि स्थलांतरित लोकांची नावं त्यामध्ये कापली गेली, असा दावा फुके यांनी केला.

देशात महाराष्ट्रातील 'गडचिरोली' ठरला 'अव्वल'

निती आयोगाच्या तिमाही डेल्टा रँकिंगमध्ये पहिला क्रमांक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गडचिरोलीकरांचे मानले आभार

आकांक्षित जिल्ह्यांतील जीवनमानात लक्षणीय बदल घडविल्याने रँक

जम्मू काश्मिर मधील बारामुल्ला जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर

शेती व जलसंधारण क्षेत्रात ही गडचिरोलीची बाजी

नाशिकच्या पेठ तालुक्यातील सावळघाटात रात्रीच्या सुमारास भीषण अपघात

- अपघातात दोघांचा मृत्यू तर 8 जण जखमी

- महेंद्र पाल आणि राहुल ओझा ह्या दोघांचा अपघातात मृत्यू, हे दोघेही गुजरात राज्यातील असल्याची माहिती

- अपघाताबाबत थेट पंतप्रधान कार्यालयाला माहिती देण्यात आल्याने यंत्रणेकडून तातडीने राबवण्यात आले बचावकार्य

- नाशिक अहमदाबाद प्रवास करणाऱ्या खाजगी बसचा अपघात

- जखमी रुग्णांना तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी केले दाखल

महाराष्ट्र प्रदेश भाजपचे नवे प्रभारी मुंबई दौऱ्यावर

नवनियुक्त प्रभारी खासदार वैजयंत पांडा उद्या ८ ऑक्टोबर रोजी मुंबईत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांसह महाराष्ट्र भाजपच्या महत्त्वपूर्ण नेत्यांशी वैजयंत पांडा संवाद साधणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी उद्या संध्याकाळी पार पडणार भाजपच्या महत्वपूर्ण नेत्यांची बैठक

नव्या संघाटनात्मक रचनेत वैजयंत पांडा यांच्याकडे महाराष्ट्र भाजपच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण; निर्णय राखून

दोषींना सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा कायम ठेवण्यासाठी तसेच दोषींनी दाखल केलेल्या अपीलांवरील सुनावणी पूर्ण झाली आहे. याप्रकरणी न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने कोपर्डी गावाला भेट देऊन घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणीदेखील केली होती.

जुलै २०१६ मध्ये अहिल्यानगरमधील कोपर्डी गावात अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्येची घटना घडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. याप्रकरणी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. २०२३ मध्ये पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात मुख्य आरोपी शिंदेने आत्महत्या केल्यानंतर त्याच्याविरोधातील कार्यवाही संपुष्टात आली होती. उर्वरित दोषींना फाशीची शिक्षा कायम ठेवण्याची राज्य सरकारची मागणी आहे.

राहुल गांधींना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसचा रास्ता रोको

दिल्ली येथे निवडणूक आयुक्तांच्या भेटीसाठी निघालेले लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांना दिल्ली पोलिसांनी अडवून ताब्यात घेतले. याच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली मुंबई युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वांद्रे रिक्लेमेशन येथे रात्री ११ वाजता रास्ता रोको आंदोलन केले.

युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन करून वाहतूक बंद केली. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार आणि मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

लातूरमध्ये आणखी एक दुष्काळाचा बळी; नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

लातूर जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येची आणखी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शेतीतील नापिकी आणि वाढत्या कर्जबाजारीपणाच्या आर्थिक विवंचनेतून एका ६० वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. रेनापूर तालुक्यातील पळशी येथील जीवन गव्हाणे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

खासगी बँकेचे ९० हजार रुपये, तसेच सावकाराकडून एक लाख रुपये, असे एकूण १ लाख ९० हजार रुपयांचे कर्ज या शेतकऱ्याच्या अंगावर होते. दरम्यान, शेतीत पीक आले नाही, सावकाराचे पैसे द्यायचे कसे, या विवंचनेतून या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

छत्रपती संभाजीनगर- जिल्ह्यात १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात

दुष्काळी परिस्थितीमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १६ ऑक्टोबरपासून ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणीकपात लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी कडा अधीक्षक अभियंत्यांना दुष्काळी पार्श्वभूमीवर धरणातील पाणीसाठा आरक्षित करण्याच्या अनुषंगाने आदेश दिले आहेत. भविष्यातील परिस्थितीनुसार कपातीचे प्रमाण वाढविण्यात येणार आहे. पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी पाण्याला प्राधान्य असणार आहे.

घरगुती वापरासाठी पाणी एका विशिष्ट मापदंडानुसार घ्यावे. महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायती व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून पाणीगळतीसाठी मोहीम राबवावी. पाण्याचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी महापालिकेला मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी लागणार आहे. उद्याने, दुभाजकातील झाडांसाठी प्रक्रिया केलेले पाणी वापरावे. बांधकाम, औद्योगिक, धुलाई, हरितक्षेत्रांसाठी हेच पाणी वापरावे. तर मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पातून अनधिकृत जलउपसा करणाऱ्या विद्युत मोटारी जप्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले आहेत.

नागपुरात ऑक्टोबरच्या उन्हाचा चटका; तापमान ३६.२ अंशांवर

नागपुरात ऑक्टोबरच्या उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. मंगळवारी कमाल तापमान ३६.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. हे तापमान सरासरीपेक्षा तीन अंशांनी अधिक आहे. सकाळपासूनच सूर्याच्या तीव्र किरणांमुळे नागरिक हैराण होत आहेत. वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण ६३ टक्क्यांवर पोहोचल्याने उकाड्याची तीव्रता अधिक जाणवत आहे

सर्पदंशाच्या ९९.९ टक्के रुग्णांचे प्राण वाचले; पुणे जिल्ह्यात २८ महिन्यांत ३ हजारांहून अधिक घटना

सर्पदंशाला अनेकदा प्राणघातक घटना मानले जाते. मात्र, वेळेत उपचार मिळाल्यास सर्पदंश झालेल्या रुग्णांचे प्राण वाचवता येतात, हे आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून समोर आले आहे. गेल्या अडीच वर्षांत पुणे जिल्हा आणि परिसरात सर्पदंशाच्या ३ हजार ८४ घटनांची नोंद झाली. त्यापैकी ३ हजार ८२ रुग्ण म्हणजेच ९९.९ टक्के रुग्ण उपचारांनंतर सुखरूप बचावले, तर केवळ दोन रुग्णांचा मृत्यू झाला.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, एप्रिल २०२४ ते जुलै २०२६ या २८ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात मंचर, चांदोली, भोर आणि जुन्नर हे सर्पदंशाचे प्रमुख हॉटस्पॉट ठरले. विशेषतः पावसाळ्यात आणि शेतात काम करताना सर्पदंशाच्या घटना सर्वाधिक घडतात. त्यामुळे सर्पदंश झाल्यानंतर घाबरून न जाता वेळेत वैद्यकीय उपचार मिळणे महत्त्वाचे असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होते.

Pune : विधान परिषद निवडणुकीच्या प्रभारीपदी चंद्रकांत पाटील तर निवडणूकप्रमुखपदी राजेश पांडे

विधान परिषद निवडणुकीच्या प्रभारीपदी चंद्रकांत पाटील तर निवडणूकप्रमुखपदी राजेश पांडे

विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची रनधुमाळी सुरू झालेली असताना महायुतीपुढे बंडखोरी रोखण्याचे आव्हान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election: नागपूरमध्ये भाजपचा पराभव; पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत सर्वात मोठा ट्विस्ट

प्रदीप पूर्णेकर हत्येवरून ठाण्यात तणाव; राजेंद्र शिंदेंच्या अटकेसाठी ठाणे जाम

MLC Election: मराठवाडा पदवीधर निवडणुकीत धक्कादायक निकाल; ठाकरे गटाच्या उमेदवारासह 41 पैकी 39 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त

विधानपरिषदेत रीलस्टार्सनं पाजलं दिग्गजांना पाणी, विद्यमान आमदारांच्या विजयाचं गणित बिघडवलं

MLC Election Results: विधानपरिषदेत शरद पवारांचे दोन्ही उमेदवार विजयी, शिंदेंच्या सरदाराची पवारांना साथ

SCROLL FOR NEXT