Maharashtra News Live Update Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Marathi Breaking Live Headlines Updates : कोल्हापूरमध्ये गोकुळसाठी मतदान, ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी, महाराष्ट्रात पावसाचा इशारा, नवरात्रौउत्सव, राज्यातील काही जिल्ह्यात पावसाचा इशारा, देशातील राजकीय घडामोडी, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

अभिनेता रणवीर शौरी यांना जीवे मारण्याची धमकी; राज परिहारविरोधात गुन्हा दाखल

अभिनेता रणवीर शौरी यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे नाव राज परिहार असल्याचे सांगितले आहे. १२ ऑक्टोबर रोजी रणवीर शौरी घरी असताना त्यांच्या वैयक्तिक जीमेलवर अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा संदेश आला. पुढील वर्षी सार्वजनिक ठिकाणी दिसल्यास चार ते पाच जणांकडून डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करण्याची, तसेच एका फटक्यात कवटीचे दोन तुकडे करण्याची धमकी या संदेशातून देण्यात आली.

फॉर्म ६ मधील त्रुटींप्रकरणी मनसेची तक्रार; निवडणूक आयुक्तांनी पत्र पाठवल्याची संदीप देशपांडेंची माहिती

फॉर्म ६ संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाराष्ट्राचे राज्य निवडणूक आयुक्त चोकलिंगम यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत चोकलिंगम यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पत्र लिहून फॉर्म ६ मध्ये त्रुटी असल्याचे आणि त्यात बदल करणे आवश्यक असल्याचे नमूद केल्याची माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली. चोकलिंगम यांनी यासंदर्भात अनौपचारिक माहिती दिल्याचेही देशपांडे यांनी सांगितले. या प्रकरणी संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. तसेच, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली.

वांद्रे परिसरात पोलिसांची कारवाई; पिस्तूल आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्याला अटक

मुंबईतील वांद्रे रिक्लेमेशन परिसरात १५ ऑक्टोबर रोजी पहाटे सव्वातीनच्या सुमारास पोलिसांनी कारवाई करत बेकायदेशीर पिस्तूल आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या अहमद अली हसरत अली याला अटक केली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडून काळ्या रंगाचे देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. पिस्तुलाची अंदाजे किंमत २५ हजार रुपये, तर काडतुसांची किंमत ५ हजार रुपये असल्याची माहिती आहे. आरोपीकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याचे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. संबंधित आरोपी हे पिस्तूल घेऊन नेमका कुठे जात होता, याचा तपास पोलीस करत आहेत.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय; विभागांच्या खर्चात २० टक्के कपातीच्या सूचना

दुष्काळी संकट आणि राज्याच्या तिजोरीवरील वाढता आर्थिक ताण लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व विभागांना खर्चात काटकसर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व विभागांच्या निधी खर्चात २० टक्के कपात करण्याचे निर्देश देण्यात आले असून, रस्ते आणि सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळण्यास सांगण्यात आले आहे.

मात्र, शिक्षण, आरोग्य, कर्जमुक्ती आणि लाडकी बहीण यांसारख्या योजनांच्या निधीत कपात न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, जलसंधारण, पाणीपुरवठा आणि चारा योजनांसाठी निधीचा योग्य वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जागतिक अस्थिरता, आर्थिक मंदी आणि दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विभागप्रमुखांनी काटकसरीचे धोरण स्वीकारावे आणि सचिवांनी सद्सद्विवेकबुद्धीने निर्णय घ्यावेत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

रावेत परिसरात मध्यरात्री स्पोर्ट्स कारचा भीषण अपघात; चालक जखमी

पिंपरी-चिंचवड शहरातील रावेत परिसरात जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुलाजवळ काल मध्यरात्री अडीचच्या सुमारास स्पोर्ट्स कारचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्त्यावरील दुभाजकाला जाऊन धडकली. या अपघातात कारचालक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

नांदुरी येथे भरधाव कारची पोलिसांना धडक; पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू, ११ हून अधिक जण गंभीर जखमी

नांदुरी येथील अभोणा चौफुलीवर भरधाव कारने बंदोबस्तावरील पोलिसांना जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर ११ हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि भाविक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर वणी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून, गंभीर जखमींना पुढील उपचारांसाठी नाशिक येथे हलवण्यात आले आहे. नवरात्रोत्सवानिमित्त नांदुरी गावात मोठ्या प्रमाणात बॅरिकेडिंग करण्यात आलेले असतानाही हा अपघात घडला.

दुष्काळजन्य परिस्थितीमुळे नारायणगडावरील दसरा मेळावा साध्या पद्धतीने होणार; महंत शिवाजी महाराज यांचे आवाहन

बीड जिल्ह्यात यंदा दोन दसरा मेळावे होत आहेत. नारायणगडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा, तर सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर मंत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होणार आहे. नारायणगडावरील मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, यंदा हा मेळावा साध्या पद्धतीने आणि कोणताही गाजावाजा न करता पारंपरिक स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे.

पुण्यातील सेव्हन लव्ह चौकात तरुणांच्या दोन गटांत तुफान हाणामारी

पुण्यातील सेव्हन लव्ह चौकात जुन्या वादातून तरुणांच्या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या प्रकरणी पोलिसांकडे अद्याप कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नसली, तरी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणाची प्राथमिक सुनावणी २१ ऑक्टोबर रोजी ठाणे न्यायालयात होणार आहे. कार्यालयीन त्रुटी दूर झाल्यानंतर हे प्रकरण सुनावणीसाठी सूचीबद्ध करण्यात आले आहे. कथित मानहानीकारक पोस्ट आणि व्हिडिओ हटवण्यासह संबंधितांनी सार्वजनिक माफी मागावी, अशी मागणी दाव्यात करण्यात आली आहे.

तसेच, २ हजार कोटी रुपयांची बँक गॅरंटी आणि मालमत्ता जप्त करण्यासंदर्भात अंतरिम दिलासा देण्याची मागणीही करण्यात आली आहे. सतीश सालियन यांच्या वतीने अधिवक्ता ईश्वरलाल अग्रवाल आणि तन्वीर निजाम न्यायालयात बाजू मांडणार आहेत. या दाव्यातील आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत.

येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!"

वन खात्यामध्ये आगामी काळात ऐतिहासिक आणि मोठ्या प्रमाणावर बदल घडवून आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचाच एक भाग म्हणून, आगामी तीन वर्षांच्या कालावधीत वन खात्यात साधारणपणे २५ हजार ते ३० हजार लोकांची नवीन भरती केली जाणार असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी केली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या या भरतीमुळे वन विभागाच्या कामकाजात अमुलाग्र बदल घडण्यास मदत होईल, असा विश्वास यादरम्यान व्यक्त करण्यात येत आहे.

धाराशिवमध्ये दुष्काळाची दाहकता, मेंढपाळांची मेंढ्यांना जगवण्याची धडपड

धाराशिव जिल्ह्यावर यंदा दुष्काळाचे सावट आहे पाऊस नसल्याने नदी नाले कोरडेठाक पडले आहेत.तर जनावरांना हिरवा चारा देखील उपलब्ध नाही त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत अशातच मेंढपाळांना देखील आपल्या मेंढ्याना जगवण्यासाठी मोठी धडपड करावी लागत आहे. कर्नाटकातील विजापूर मधील मेंढपाळ धाराशिवमध्ये दाखल झाले आहेत मात्र चारा व पाण्या अभावी त्यांचे देखील मोठे हाल होत आहे.सोयाबीनची काढणी झालेल्या शेतात पडलेला पालापाचोळा व मिळेल तिथे पाणी पाजुन या मेंढ्या जगवण्याची मेंढपाळ धडपड करत आहेत.

रत्नागिरी पोलिसांचे जवान सागरी सुरक्षेसाठी सज्ज; १८ जवानांना बोट सेलिंगचे प्रशिक्षण!

सागरी सुरक्षेसाठी रत्नागिरी पोलीस दलाच्या क्विक रिस्पॉन्स टीमची सज्जता वाढवण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून भाट्ये समुद्रकिनारी १८ जवानांना बोट सेलिंगचे प्रशिक्षण देण्यात आले. २ महाराष्ट्र नेव्हल युनिट एनसीसीच्या वतीने आयोजित ‘मेन्यू-२७’ शिबिरात हे प्रशिक्षण पार पडले. ७ दिवस चाललेल्या या शिबिरात जवानांना बोट चालवण्याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले. सागरी आपत्कालीन परिस्थिती, बचावकार्य आणि किनारपट्टीवरील सुरक्षा अधिक प्रभावीपणे हाताळण्यासाठी या प्रशिक्षणाचा उपयोग होणार आहे.

चिपळूणमधील ऐतिहासिक भूकंपमापक केंद्र झाडाझुडपांत हरवले

एकेकाळी भूकंपाच्या अभ्यासासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे केंद्र आज झाडाझुडपांत हरवले आहे! चिपळूणमधील विंध्यवासिनी मंदिर परिसरात असलेली ही ऐतिहासिक वास्तू आता दुर्लक्षित अवस्थेत आहे. १० डिसेंबर १९६७ रोजी झालेल्या कोयना भूकंपानंतर भूगर्भातील हालचालींचा अभ्यास करण्यासाठी हे केंद्र उभारण्यात आले होते. सुमारे दोनशे फूट खोल विहिरीसदृश रचनेतून भूगर्भातील कंपनांचा अभ्यास केला जात होता. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानामुळे केंद्र दुसरीकडे हलवण्यात आले आणि जुन्या वास्तूची देखभाल दुर्लक्षित राहिली. इतिहासाची साक्ष देणाऱ्या या केंद्राचे जतन आणि संवर्धन करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: महिन्याच्या शेवटी खिशात पैसा राहात नाही? आजच करा हे ५ सोपे उपाय; कधीही भासणार नाही पैशांची चणचण

Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते प्रलंबित, शेतकऱ्यांच्या खात्यात ₹4,000 कधी येणार?

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सवात काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT