पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात लोणीहून धामणीकडे येत असताना अक्षय विधाटे या पंचवीस वर्षीय तरुणावर बिबट्याने अचानक प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अक्षयला तातडीने मंचर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळतेय.
नाशिक जिल्ह्यात संध्याकाळ पासून सर्वत्र पावसाने हजेरी लावली असून मनमाड शहरात 7 वाजे पासून मध्यम स्वरूपात पाऊस सुरू झाल्याने संध्याकाळच्या सुमारास हनुमान जयंती निमित्ताने प्राचीन बुरुड मारुती मंदिरात संध्याकाळी ठेवण्यात आलेल्या महाप्रसादाचा कार्यक्रमावर परिणाम झाल्याचे चित्र पहावयास मिळाले सुरू असलेल्या पावसामुळे मंदिरात अखेर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले
सिंधुदुर्गातील सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यात दुपारनंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण आज पाहायला मिळाले. दुपारनंतर उष्णता वाढत गेली आणि जिल्ह्यातल्या काही भागात पाऊस पडला आहे. सावंतवाडी शहरात अचानक आलेल्या पावसाने आंबा विक्रेते,भाजी विक्रेते आणि व्यापाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. या अवकाळी पावसाने आंबा आणि काजू पिकाला फटका बसणार आहे.
उद्या पुण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची बैठक
उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बैठक होणार
पुणे महापालिका निवडणुकीनंतर शिवसेनेची पहिल्यांदाच मोठी बैठक
विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे या बैठकीत काही बोलतात का यावर सुद्धा लक्ष
पक्षातील काही लोकांनी खरात प्रकरणात नाव गोवल्याचे निलम गोऱ्हे यांनी केली होती खंत व्यक्त
संध्याकाळी ५ वाजता पुण्यातील एका हॉटेल मध्ये होणार शिवसैनिकांची बैठक
सतीश उर्फ खोक्या भोसले याला बीड न्यायालयाने मारहाण प्रकरणातुन निर्दोष मुक्त केले आहे. काही महिन्यांपूर्वी सतीश उर्फ खोक्या भोसले याने एका व्यक्तीला बॅटने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर त्याला छत्रपती संभाजीनगर येथील कारागृहात ठेवण्यात आले होते. काल बीड न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केल्यानंतर तो आज कारागृहातून बाहेर आला आहे.
साक्री तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे उंबराचे झाड अंगावर पडून बैलाचा दुर्दैवी मृत्यू
साक्री तालुक्यातील जैताने शिवारातील शेतकरी हासाराम भावराम न्याहाळदे यांचा बैल शेतात झाडाखाली उभा असताना त्याच्या अंगावर उंबराचे झाड पडुन त्यात बैलाचा मृत्यू
कष्टाने उभं केलेलं कांद्याचं पिक पाण्यात जात असून, शेतात काढून ठेवलेला कांदा पावसात भिजत आहे. डोळ्यासमोर मेहनतीचं नुकसान होत असताना, नाईलाजाने शेतकऱ्यांना घराचा आश्रय घ्यावा लागत आहे. पावसाने शेतकऱ्यांची ही दैनीय अवस्था निर्माण केली आहे.
सातारा जिल्हा परिषद सभापती निवड 4 तारखेला पडणार पार...
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडी दरम्यान झालेल्या राड्यानंतर जिल्हाधिकारी संतोष पाटील ॲक्शन मोडवर...
4 तारखेच्या सभापती निवडी दरम्यान सकाळी 7 वाजल्या पासून निवड प्रक्रिया होईपर्यंत जिल्हा परिषद च्या परिसरात 100 मीटर अंतराच्या आत मध्ये येण्यास सदस्य,पोलीस प्रशासन व अधिकाऱ्यांशिवाय इतरांना बंदी...
- शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार अवकाळी पावसाची हजेरी
- काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस
- अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ
- तर कांदा, गहू, द्राक्षासह अन्य पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता
अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना गर्मीपासून मिळाला दिलासा
दोंडाईचा येथील मालपुर परिसरामध्ये गारपीट
हवामान विभागातर्फे धुळे जिल्ह्याला देण्यात आला आहे रेड अलर्ट
हवामान विभागातर्फे देण्यात आलेल्या अंदाजानुसार धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसाला सुरुवात
परभणी जिल्हा परिषदेच्या ४ विशेष समित्यांची निवड प्रक्रिया आज पार पडली नाट्यमय घडामोडींनंतर ४ ही विशेष समित्या अखेर बिनविरोध पार पडल्या ज्यात महत्वाचे म्हणजे अध्यक्ष उपाध्यक्ष निवडी वेळी नाराज झालेल्या शिंदे यांच्या शिवसेनेचा १ सभापती पद देवून त्यांची नाराजी भाजपने दूर केली आहे.
सौ ऐश्वर्या अजय चव्हाण,पार्वती प्रल्हाद मुंडे ह्या भाजपच्या,कौशल्याबाई शिंदे ह्या शिवसेनेच्या तसेच सौ वैशाली पंकज जाधव ही बिनविरोध सभापती झाल्या आहेत.जिल्हा परिषदेत आम्ही सर्व महिला सर्व पक्षांना घेऊन विकास करू असे आश्वासन यावेळी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले आहे तर आमची नाराजी दूर झाली भाजप सोबत आम्ही सत्तेत राहून लोकांचे प्रश्न सोडवणार असल्याचे शिंदे शिवसेनेचे नेते सईद खान यांनी सांगितले आहे..
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा गावात दोन समाजामध्ये वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज ओबीसी नेते लक्ष्मण हाके येथील धनगर बांधवांना भेटण्यासाठी दाखल झाले आहेत.
लक्ष्मण हाके यांना गावात येण्यास मराठा समाजाचा विरोध आहे. तरी ही लक्ष्मण हाके पोलिस संरक्षणात दाखल झाले आहेत. मराठा विरुद्ध धनगर समाजामध्ये तणाव निर्माण झाला आहे.
नाशिकच्या येवला–नाशिक महामार्गावरील मुखेड फाटा येथे दोन बसची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात सुमारे आठ ते दहा प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती समोर आली असून त्यांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर तालुक्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे. यामुळे शेतमालासह पशुधन फटका बसतोय.
उत्तमनगर परिसरात अनेक गाड्या आणि रिक्षा सुद्धा अडकल्या
कोपरगाव, संगमनेर आणि राहुरी तालुक्यात जोरदार गारपीट...
शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान...
गहू, कांदा पिकासह फळबांगाचे मोठे नुकसान...
अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल..
सिमेंटने भरलेला ट्रक करूळ घाटात कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात विजापूर येथील बाप-लेकांचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रक सुमारे 500 फूट खोल दरीत कोसळल्याने मृतदेह बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. करुळ येथील सह्याद्री जीव रक्षक टीमच्या मदतीने बचावकार्य राबविण्यात आले. मोठ्या प्रयत्नांनंतर दोन्ही मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात यश आले.
पुण्यात सलग चौथ्या दिवशी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. पुणे जिल्ह्याला आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. अचानक आलेल्या पावसाने पुणेकर हैराण झाले.
पुण्यातील हडपसर मध्ये कार्यरत असलेल्या ऑफिस मध्ये शॉर्टसर्किट
शॉर्टसर्किट मुळे कंपनीच्या कार्यालयात लागली आग
अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आणली आटोक्यात
दक्षिण रायगडमध्ये ढगाळ वातावरणासह जोरदार वारे
हवामान खात्याने रायगडला दिला आहे अवकाळी पावसाचा इशारा
सकाळी सर्वसाधारण वातावरण होते तर दुपारी वातावरणात बदल झाला आणि ढगाळ वातावरण दाटून आले
वारे सुटल्याने काही भागातील विज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे
पुण्यात चक्क "पोर्टर" डिलिव्हरी ॲपवरून ड्रग्स विक्री
पुण्यातील वारजे परिसरात मोठं ड्रग्स रॅकेट
तब्बल ३०० जण पुणे पोलिसांच्या रडावर
सोलापूर जिल्ह्यातील विविध नगरपंचायतींचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आज जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र जमत कलम ६४ अंतर्गत नगराध्यक्षांना असलेल्या स्वाक्षरी अधिकारावर गदा आल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
नगराध्यक्षांच्या म्हणण्यानुसार, मागील दोन महिन्यांपासून त्यांचे साइनिंग ऑथॉरिटीचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत.त्यामुळे प्रशासकीय कामकाज आणि आर्थिक खर्चावर त्यांचे नियंत्रण राहिलेले नाही.
किल्ले रायगडावरील शिवसमाधी स्थळी असलेला अनधिकृत बोर्ड रायगडचे जिल्हाध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी हटवला
किल्ले रायगडावरील शिवसमाधी स्थळी शांतता राखा अशा मजकुराचा अनधिकृत बोर्ड लावुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देण्यावर देखील बंदी घातली जात होती
बुधवारी रात्री रायगडचे जिल्हाध्यक्ष मंगेश वाकडीकर शिवसमाधी स्थळी गेले असता शिवप्रेमींनी याबाबत तक्रार केली
महाराष्ट्र शासन, पुरातत्व विभाग या पैकी कोणाचाच हा बोर्ड नसल्याने वाकडीकर यांनी शिवप्रेमींना तो बोर्ड काढण्यास सांगितल
"चार बॉटल व्होडका"! हनी सिंगला गाणं गायला विरोध, चंदीगड मधून पुणे पोलिसांना पत्र
पुण्यात होणारा यो यो हनी सिंग चा म्युझिकल कॉन्सर्ट अडचणीत?
चंदीगड येथील व्यक्तीचे पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र
चार बॉटल व्होडका, मिलियनएर गाणं तंबाखूजन्य पदार्थांचा प्रसार करत असल्याने हनी सिंगला गाण्यास विरोध
येत्या ४ तारखेला पुण्यातील महालक्ष्मी लॉन्स येथे यो यो हनी सिंग चा म्युझिकल कॉन्सर्ट
यवतमाळ जिल्हा कर्मचारी आशा-गटप्रवर्तक युनियनच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर काळे कपडे घालून तीव्र निदर्शने करण्यात आली
प्रलंबित मोबदला आणि शासनाच्या उदासीन धोरणांच्या निषेधार्थ जिल्हाध्यक्ष कॉ. कुमार मोहरमपुरी आणि जिल्हासचिव कॉ. उषा मुरखे यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
हनुमान जयंती आज सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी होत असून मनमाड-येवला मार्गावरील धानोरे शिवारात असलेल्या 51 फूट उंचीचा मारुतीच्या दर्शनाला सकाळ पासून पंचक्रोशीतील भाविकांची गर्दी होत आहे.
सकाळ पासून या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम सुरू असून महाप्रसादाचा कार्यक्रम दुपारी होणार आहे,जागृत स्थान म्हणून ओळखल्या जाणारे हे स्थान रस्त्यावर असल्याने अनेक रस्त्याने जाणारे भाविक,प्रवाशी आवर्जून या मारुतीच्या दर्शनाला थांबत असतात.
बीड जिल्ह्यामध्ये काल सर्व दूर पावसाचा तडाखा पाहायला मिळाला आहे वादळी वाऱ्यासह बीड जिल्ह्यामध्ये सर्वच तालुक्यांमध्ये धुवाधार पाऊस झाला जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस झाला.
यामध्ये ज्वारी बाजरी गहू हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांनी ज्वारी बाजरी या पिकांची कापणी केली आणि पिके ही शेतामध्ये पडून आहेत मात्र जोरदार झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाची माती होताना पाहायला मिळत आहे.
मुंबई मेट्रो ९ च्या दहिसर-काशीगाव मार्गाचे 6 एप्रिलला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून प्रवाशांची प्रतीक्षा संपणार आहे.
मात्र, या सोहळ्यापूर्वीच भाजप आणि शिवसेनेत मेट्रोच्या श्रेयासाठी बॅनरबाजीची युद्ध सुरू झाले असून राजकीय वातावरण तापले आहे.
'मेट्रोचा खरा शिल्पकार कोण?' या प्रश्नावरून युतीमध्ये जुंपली असून मनसेने या श्रेयवादाच्या राजकारणावर जोरदार टीका केली आहे.
युद्धामुळे आखाती देशातून भारतात पुरवठा केल्या जाणाऱ्या घरगुती, व्यावसायिक गॅस पाठोपाठ आता एलपीजी गॅसची देखील मोठया प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे.
मनमाड शहरात एकमेव असलेला गोगॅस पंप ड्राय झाला असून गेल्या 3 ते 4 दिवसा पासून पंपावर एलपीजी गॅस मिळत नाही त्यामुळे शेकडो वाहन धारकांची गैरसोय झाली आहे.
हनुमान जयंती निमित्त शिर्डी येथे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. शक्ती आणि भक्तीचे प्रतीक असलेल्या बजरंगबलींचा जयघोष करत अनेक तरुणांनी पारंपरिक बजरंग गोटा उचलण्याच्या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. दरवर्षीप्रमाणे यंदाही 125 किलो वजनाचा दगडी गोटा उचलण्याची स्पर्धा साईमंदिर परिसरातील हनुमान मंदिरात आयोजित करण्यात आली होती. सकाळी आरतीनंतर स्पर्धेला सुरुवात झाली आणि “जय बजरंगबली”च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. अनेक तरुणांनी हा गोटा उचलून आपल्या शक्तीचे प्रदर्शन केले. या स्पर्धेनंतर पारंपरिक जोर स्पर्धेचंही आयोजन करण्यात आलं असून भाविकांनी या कार्यक्रमाचा उत्साहात आनंद घेतला..
अशोक खरात प्रकरणी थोड्याच वेळात नाशिक न्यायालयात सुनावणी
सुरक्षेच्या कारणास्तव खरातला व्हीसीद्वारे हजर करण्याची शक्यता
दुसऱ्या गुन्ह्यात SIT ने काल घेतलाय अशोक खरातचा ताबा
अत्याचारानंतर जबरदस्तीने गर्भपात घडवून आणल्याच्या गंभीर गुन्ह्यात आज सुनावणी
एका घटस्फोटित पीडित महिलेने सरकारवाडा पोलिस ठाण्यात दिली होती तक्रार
न्यायालयात SIT करणार खरातच्या पोलीस कोठडीची मागणी होणार
सरकारी पक्षाकडून कोठडीसाठी ठोस कारणे मांडली जाण्याची शक्यता
या सुनावणीदरम्यान तपासाची पुढील दिशाही स्पष्ट होण्याची शक्यता
भंडारा जिल्ह्यात काल रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लागली. या अवकाळी पावसाचा कापणीला आलेल्या गहू पिकाला चांगलाचं फटका बसलाय. पावसाच्या मारामुळे कापणी योग्य गहू काळवंटणार असून याला विक्री योग्य दर मिळणार नसल्याची चिंता आता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. यासोबतच मका पिकालाही चांगलाच फटका बसला असून वादळी वाऱ्यानं अनेक क्षेत्रातील मका पीक जमीनदोस्त झाला आहे. कडधान्या सोबतच भाजीपाला धारजींनी पिकांनाही याचा फटका बसला असून फळबागायतदारांनाही याचा फटका बसल्याचे चित्र आहे भंडारा जिल्ह्यातील अनेक आंबा बागायतदारांनाही फटका बसला असून अनेक ठिकाणचा आंबा गळून पडल्याचं चित्रही अनेक शेतशिवारात बघायला मिळत आहे.
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातचा २ दिवसांपासून पोलीस यंत्रणांना लागेना शोध
SIT आणि शिर्डी पोलीसांची पथके फरार कल्पना खरातच्या मागावर
कल्पनाचा मोबाईल नॉट रिचेबल असल्याने लोकेशन मिळण्यात अडचणी येत असल्याची सूत्रांची माहिती
खरात कुटुंबाचा देखिल आर्थिक व्यवहारात सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात असतांनाच SIT कडून कुटुंबावर वॉच का ठेवण्यात आला नाही ? हा देखिल प्रश्न उपस्थित
भोंदू अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात करणार हजर
अशोक खरातला काल पहिल्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर पुन्हा दुसऱ्या गुन्ह्यात पोलीस कोठडी देण्याची SIT ने केली होती मागणी
अशोक खरातवर आतापर्यंत ११ गुन्हे दाखल
११ पैकी ८ गुन्हे अत्याचार आणि लैंगिक शोषणाचे
आज दुसऱ्या गुन्ह्यात खरातला पुन्हा पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती
जळगाव शहरास, धरणगाव एरंडोल तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस..
धरणगाव तालुक्यातील वराड गावात अवकाळी पावसाचा शेंगदाण्याच्या आकारा एवढी गारपीट
गेल्या दोन दिवसांपासून अचानक वातावरणात बदल होऊन वादळीवारासह अवकाळी पाऊस...
आज रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यासह धरणगाव , एरंडोल तालुक्यात अवकाळी पावसाने पुन्ह हजेरी लावली.
जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमध्ये विजांच्या कळकटाटासह वादळी वारा अवकाळी पाऊस...तर काही गावांमध्ये गारपीट
मका, ज्वारी दादर या पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांच्या हातातून अशी आलेला घास निसर्गाने हिरावला, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसोबत आमचे प्रतिनिधी संजय महाजन यांनी केलेली बातचीत
किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 346 वी पुण्यतिथी आणि अभिवादन कार्यक्रम
भाजपचे खासदार राष्ट्रीय प्रवक्ते डॉ सुधांशू त्रिवेदी,मंत्री भरत गोगावले,यांची प्रमुख उपस्थिती
राजसदरेवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मेघडबरी ला आकर्षक फुलांची सजावट
गडावरील छत्रपतींच्या नव्याने बांधण्यात आलेल्या समाधी स्थळाला आज 100 वर्ष पूर्ण
श्री शिवाजी स्मारक मंडळाकडून रायगडावर आज विविध कार्यक्रमाचे आयोजन
वाशीम जिल्ह्यात वाशिम,मालेगाव आणि रिसोड तालुक्यात काल सायंकाळी झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे बिजवाई कांद्याच नुकसान झाल्याच समोर आल आहे, रिसोड तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे बीजवाई कांद्याच नुकसान झाल असून, कांदा पूर्णपणे आडवा पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने पुन्हा हिरावून घेतला आहे, त्यामुळं शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे...
जालन्यातील समृद्धी महामार्ग अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल
पोलीसांच्या फिर्यादीवरून तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
प्रकाश रमेश राजभर असं या ट्रक चालकाचे नाव असून त्या विरोधात तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ट्रक चालकाच्या तोंडातून दारूचा उग्र वास आणि असंबंध बोलत असल्याचं एफ आय आर मध्ये नमूद
सध्या या ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अटक करण्यात आली आहे.
काल सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील कडवंची शिवारात एका ट्रक चालकाने समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या महिला मजुराच्या वाहनाला धडक दिली होती या अपघातात 8 महिलांचा मृत्यू झालाय..
जळगावच्या जामनेर तालुक्यातील रोटवद हनुमान मंदिर भाविकांची पहाटेपासून दर्शनासाठी मोठे गर्दी
नवसाला पावणारा मारुती, महाराष्ट्रातील सर्वात उंच मूर्ती आहे कशी आहे या हनुमानाच्या तीर्थक्षेत्राची ओळख..
दरवर्षी हनुमान जयंतीला मध्यरात्रीपर्यंत लोणी मिश्रित शेंदूर तयार करून मूर्तीला लेपन केले जाते.
मूर्ती सजावटीसाठी कागदाने हुबेहू ब मनुष्याप्रमाणे मूर्तीला डोळे व इतर अवयव कागद कटिंग करून मूर्तीवर लावले जातात.
सकाळी हनुमान जन्माच्या वेळेस सूर्योदयाला महा आरती साठी भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी झाली
नवसाला पावणारा मारुती अशी ओळख असल्याने मनोकामना पूर्ण झाल्यानंतर राज्यभरातून भाविक नवस फेडण्यासाठी येतात.
ऐतिहासिक संदर्भ असल्याने या मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, व राज्यभर हे मंदिर प्रसिद्ध व्हावे अशी भाविकांची मागणी आहे.
भंगार विक्रीतून मध्य रेल्वे मालामाल; ४६० कोटींची कमाई
मध्य रेल्वे २०२५-२६ या आर्थिक वर्षात भंगार विक्रीतून अक्षरशः मालामाल झाली.
भंगार विक्रीद्वारे रेल्वेच्या तिजोरीत ४५९.५२ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला.
रेल्वे बोर्डाने निश्चित केलेल्या ४५० कोटींचे लक्ष पूर्ण करत गेल्या दोन वर्षातील सर्वाधिक कमाई केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या उपक्रमांतर्गत रेल्वेच्या कार्यशाळा, यार्ड आणि विभागांमध्ये साठलेले अनुपयोगी साहित्य शोधून त्याची विल्हेवाट लावण्यावर भर देण्यात आला.
या मोहिमेत कुर्ला कटिंग यार्ड, ट्रॅक्शन मशीन वर्कशॉप, परळ वर्कशॉप आणि मनमाड वर्कशॉप यांसह सर्व पाच विभागांमध्ये विशेष मोहीम राबवण्यात आली.
पुणे शहरासह जिल्ह्याला आजही यलो अलर्ट
शहरासह जिल्ह्यात आज संध्याकाळी पुन्हा वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता
हवामान विभागाचा इशारा
शहरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी पावसाचा मुक्काम आजही कायम राहणार
पुणे शहरासह जिल्ह्यासाठी पुणे वेधशाळेने नेमका काय अंदाज वर्तवला आहे?
पुढील २४ तासासाठी पुणे वेधशाळेने पावसाचा यलो अलर्ट दिला असून, पुढील दोन दिवस दुपारनंतर किंवा सायंकाळी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
दुपारी उन्हाचा चटका जाणवेल.त्यानंतर अवकाळी पावसाचा जोर ओसरेल आणि घटलेल्या कमाल तापमानात पुन्हा वाढ होण्यास सुरवात होईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे
गॅस सिलेंडर मिळावा म्हणून मागचे काही दिवस गॅस एजन्सी बाहेर रांगा लागल्या होत्या. आता गॅस सिलेंडरचे इतकं महत्त्व वाढले की त्याची चोरी होऊ लागलीय. छत्रपती संभाजीनगर लाडगाव येथे घरगुती गॅसची मागणी अधिक वाढल्यानं सध्या गॅस एजन्सी कडून सिलेंडर लवकर दिले जात नाही. दुसरीकडे सातत्याने सोशल मीडियावरच्या अफवांमुळे गॅस मिळेल की नाही याची लोकांना भीती वाटतेय. घराच्या बाहेर कंपाऊंडमध्ये ठेवलेल्या भरलेल्या गॅस सिलेंडरची चोरी झाल्याची घटना घडली. फोन वर बोलत चोरटा थेट आत घुसून गॅस सिलेंडर उचलून नेताना सीसीटीव्हीत कैद झाला आहे. रात्री साधारण आठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
रत्नागिरी नगर परिषदेनं प्लास्टिक विरोधी मोहीम सुरु केलीय. शहरातील मारुती मंदिर परिसरात ज्या दुकानदारांकडे प्लास्टिक पिशव्या आहेत अशा दुकानदाराकडून प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच सर्व दुकानदारकांना नगरपरिषदेमार्फत प्लास्टिक पिशव्या वापरू नये असे आवाहन देखील करण्यात आलय. य. याव्यतिरिक्त जर कोणी प्लॅस्टिक पिशवी वापरली जात असेल असे निदर्शनास आले तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात केली जाणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 56 वर असलेली 105 फूट उंच अशी विशाल काय हनुमानाच्या मूर्तीला आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने सूर्योदया वेळी जलाभिषेक करण्यात आला आज दिवसभर नांदुरा येथील तिरुपती बालाजी संस्थान येथील 105 फूट उंच अशा विशाल काय मूर्तीच्या बाजूला विविध धार्मिक कार्यक्रमांनी हनुमान जन्मोत्सव साजरा होणार आहे सकाळपासूनच भाविकांनी येथे गर्दी केली आहे.
हवामानात झालेल्या अचानक बदलाने कमी दाबाचा पट्टा तयार झालाय बाष्प घेऊन जिल्ह्यात गोंगावणारे बारावी सर्वत्र बरसात आहे आज आणि उद्या पाऊस बरसण्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे यामुळे काढणीला आलेला पिकांना जपावे लागणार आहे एक दोन ठिकाणी विजांच्या कडकडांस गारपीट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये ढगाळी वातावरण आहे.
तुळजाभवानी मातेची धाकटी बहीण म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या चैञ पोर्णिमा याञा महोत्सवाला सुरूवात झाली आहे.येरमाळा नगरी भाविकांनी फुलुन गेली असुन डोंगर परीसरात खेळणी व साहीत्याची दुकाने सजली आहेत.याञा काळात वाहतुक कोंडी टाळण्यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने अवजड वाहनांची बाह्य़वळण २ ते ५ एप्रिल पर्यंत निश्चित केले आहेत.तसेच मुख्य ठिकाणी सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत तर तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.उद्या याञेतील मुख्य चुनखडी वेचण्याच्या कार्यक्रम असुन यासाठी राज्यभरातुन १५ लाख भाविक उपस्थित राहतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे कांद्याची निर्यात ठप्प झाल्याने बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर कांदा आणि बटाटा साठून राहिला आहे. त्यातच अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावल्याने उघड्यावर ठेवलेला कांदा आणि बटाटा पूर्णपणे भिजून खराब झाला आहे. बाजार समितीत कांदा साठवणुकीसाठी पुरेशी जागा नसल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. आधीच घसरलेले बाजारभाव आणि वाढलेला उत्पादन खर्च यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
नुकसानग्रस्त शेती, फळबागा आणि घरांच्या पडझडीचे महसूल आणि कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहेत पंचनामे
यावेळी पुणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी भोर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीला भेट देऊन शेतीची पाहणीही केलीय
रविवारी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विज्यांच्या कडकडाटात गारांचा मुसळधार पाऊस झाला.या गारांच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेल्या आंबा, कांदा,गहू, ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे..
मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.. त्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडून नुकसानीच्या पाहणीला सुरुवात करण्यात आलीय..
रात्री झालेल्या वादळीवारा आणि अवकाळी पावसामुळे लातूरच्या ग्रामीण भागात शेती पिकांचे मोठं नुकसान झाल आहे, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी, हरभरा, यासह आंबा फळबागेचे मोठे नुकसान झाल आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडे आडवी पडली आहेत,तर रेनापुर तालुक्यातील काही भागातील विद्युत पुरवठा देखील रात्रीपासून खंडित आहे. दरम्यान लातूर शहरात देखील मध्यरात्री तुफान पाऊस झाला आहे, अवकाळी मुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठ नुकसान झाल आहे.
मावळ तालुक्यातील देहूगाव देहूरोड येळवाडी या मेघगर्जनेसह मोठ्या प्रमाणात गारांसह अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका कांदा पिकाला बसला आहे. येलवाडीच्या शशिकांत काळोखे यांना तर फारच मोठा उसाचा फटका बसला आहे. यांच्या दोन एकरांतील कांदा पूर्णतः खराब झाला आहे. काळोखे यांनी आंतरपीक म्हणून पपईचे पीक घेतले होते मात्र गारांच्या मारामुळे तेही पूर्ण जमीनदस्त झाले आहे. कांदा पूर्ण तयार होऊन काढणीस आलेला होता मात्र अवकाळी पावसाने तोंडाचा घास फिरवून घेतला त्यामुळे अक्षरशा रडण्याची वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे. शेतीसाठी लागणारी खतं, कामगारांची मजुरी तसेच तीन महिने शेतात राबून कांद्यासाठी केलेले शेतकऱ्याचे कष्ट वाया गेले आहेत. आंतर पिकासाठी त्यांनी पपईचे एक रोप वीस रुपयांना घेतले होते, अशा सुमारे दोन हजार रोपांचे गारपिटीमुळे नुकसान झाले आहे.
राजापूर तालुक्यातील जुवाठी शिर्केवाडीतील रामचंद्र नारायण भारती यांच्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाने जीवनदान दिलेय. जुवाठी शिर्केवाडीतील रामचंद्र नारायण भारती यांच्या विहिरीत बिबट्या पडला असल्याची माहिती वनविभागाला मिळाली तात्काळ वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली.जवळपास 40 फूट खोल विहीरीत हा बिबट्या पडला होता. या बिबट्याला सुखरूप पिंजऱ्यात जेरबंद करून बाहेर काढण्यात आले. बिबट्या हा मादी जातीचा असून वय सुमारे दीड ते दोन वर्ष आहे.वैद्यकीय तपासणीनंतर या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
जुन्नर तालुक्यातील बेळेआळी रोडवरील कुकडी नदीच्या पुलावर बिबट्याचा मुक्त संचार पुन्हा एकदा समोर आला आहे. रात्रीच्या वेळी हा बिबट्या पुलावरून निवांत फिरताना कॅमेरात कैद झाला असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, या भागात बिबट्यांचा वावर वाढत असल्याने स्थानिकांनी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रावर अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पुणे, सोलापूर, अहिल्यानगरसह राज्यात गारपिठासह पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे शेतकरी राजा संकटात आला आहे. हातातोंडाशी आलेलं पिक गेल्यामुळे शेतकरी राजा हताश झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.