Maharashtra Breaking Live Marathi news Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live Update: मुंबई पश्चिम उपनगरात कांदिवली बोरिवली परिसरात माघी गणेशोत्सवाची धामधूम

Maharashtra Breaking Live Marathi Headlines Updates 11th February 2025 : आज मंगळवार, दिनांक ११ फेब्रुवारी २०२५. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडीचा वेगवान आढावा, राज्यात आज बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

मुंबई पश्चिम उपनगरात कांदिवली बोरिवली परिसरात माघी गणेशोत्सवाची धामधूम

मुंबई पश्चिम उपनगरात कांदिवली बोरिवली परिसरात माघी गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. प्रदूषणाचे कारण पुढे करत उच्च न्यायालयाने समुद्रात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जन करण्यास मनाई करण्याचे आदेश दिले होते. यानंतर सातव्या दिवसाचे गणपती विसर्जनसाठी गेलेल्या मूर्ती पुन्हा एकदा मंडपात आणून ठेवल्या. यानंतर आज कांदिवली स्त्री गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू झाली . तरी मारवे समुद्रात गणपती विसर्जन करण्यास पालिका आणि पोलिसांनी परवानगी नाकारल्यास गणपती विसर्जन न करता मूर्ती पूर्ण मंडपात आणणार असल्याची भूमिका मंडळाकडून घेण्यात आली आहे.

पुण्यात आज नवीन 5 जीबीएसचे रुग्णांची नोंद

एकूण जीबीएस रुग्णांची संख्या 197 वर पोहोचलीय. आतापर्यंत जीबीएसने 7 रुग्णांचा मृत्यू झालाय. 40 रुग्ण पुणे मनपा हद्दीतील, 92 रुग्ण नवीन समाविष्ट गावातील, 29 रुग्ण पिंपरी चिंचवड मधील, 28 रुग्ण पुणे ग्रामीणमध्येझ ,8 रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत. आतापर्यंत 104 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे, 50 रुग्ण आयसीयू मध्ये आहेत तर 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

शिर्डी शहरातील श्रीरामनगर परिसरात एका युवकावर प्राणघातक हल्ला

शिर्डीत तरुणावर चाकू हल्ला झालाय. निवृत्त नगरपालिका कर्मचाऱ्याच्या मुलावर हा हल्ला झालाय. काही दिवसांपूर्वी निवृत्त नगरपालिका कर्मचारी शौकत शेख यांना गुंडांकडून धमकी मिळाली होती. 35 वर्षीय सादिक शेख या तरुणावर शिर्डी शहरातील श्रीरामनगर परिसरात प्राणघातक हल्ला झालाय. जखमी तरुणावर साईबाबा सुपर स्पेशलिटी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या चकमकीत एक जवान शहीद, एक जखमी

जिल्ह्याच्या छत्तीसगड सीमेवरील भामरागड तालुक्यातील दिरंगी आणि फुलनार गावच्या जंगल परिसरात आज पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत एक पोलीस जवान शहीद तर एक पोलीस जवान जखमी झाला. जखमी जवानावर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून महेश नागुलवार असे शहीद जवानाचे नाव आहे.

फुलणार आणि दिरंगी गावाच्या जंगलात नक्षलवाद्यांचा कॅम्प लागल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सीआरपीएफ आणि गडचिरोली पोलिसांचे 18 सी -60 पथक नक्षल अभियानावर होते. आज सकाळच्या सुमारास नक्षलवाद्यांसोबत चकमक उडाली. सुमारे दिवसभर ही चकमक चालली. सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने नक्षल तळ उध्वस्त केला. मात्र एका जवानाच्या पोटाला गोळी लागल्याने ते शहीद झाले. तर दुसऱ्या जवानाच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी आहेत.

शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांचा सत्कार

दिल्लीत शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौरव

महादजी शिंदे पुरस्काराने केला एकनाथ शिंदे यांचा सन्मान

पाण्यासाठी उपसरपंचाचं आंदोलन, अखेर 10 तासानंतर स्थगित

लातूरच्या महाराणा प्रताप नगर परिसराला सुरळीत पाणीपुरवठा करा, तसेच कार्यान्वित असलेल्या पाणीपुरवठा पाईपलाईनचे काम त्वरित चालू करा., या मागणीसाठी माजी उपसरपंच सुभाष जाधव यांनी सकाळपासून पाण्याच्या टाकीवर चढत शोले स्टाईल आंदोलन सुरू करत, मागण्या नाही झाल्यास टाकीवरून उडी घेत आत्मदहनाचा इशारा देखील दिला होता. मात्र प्रशासनाने सर्व मागण्या मान्य केल्यानंतर माजी उपसरपंच सुभाष जाधव यांना ग्रामस्थानी खांद्यावर घेत मिरवणूक काढलीय, अखेर 10 तासानंतर आंदोलन देखील मागे घेण्यात आलय.

ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक आणि पत्नी स्नेहा नाईक यांची एसीबी चौकशी संपली

रत्नागिरी एसीबी कार्यालयात नाईक दाम्पत्याची दुपारी 12 वाजल्यापासून चौकशी सुरू होती.

साडेसहा तासाहून अधिक काळ एसीबी चौकशी सुरू होती.

संपत्तीच्या चौकशीच्या अनुषंगाने नाईक दाम्पत्याने विविध कागदपत्रे सादर केली.

बँकॉकला 'बिझनेस ट्रिप'साठीच चाललो होतो, ऋषीराज सावंत यांची पोलिसांना कबुली

ऋषीराज सावंत यांच्या सोबत असलेल्या इतर २ जणांचे पोलिसांनी नोंदवले जबाब

ऋषीराज सावंत यांच्यासोबत निघालेल्या २ मित्रांचे सुद्धा पुणे पोलिसांनी नोंदवले जबाब

प्रवीण प्रदीप उपाध्याय आणि संदीप श्रीपती वसेकर यांचे जबाब पोलिसांनी नोंदवले

एका खाजगी विमानाने ७८ लाख ५० हजार रुपये देऊन ऋषीराज सावंत हे त्यांच्या २ मित्रांना घेऊन बँकॉकच्या दिशेने निघाले होते

HSC Exams : बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी 42 गैर प्रकरणाची नोंद

आज पहिलाच इंग्रजी विषयाचा पेपर होता.

9 विभागीय मंडळात आजपासून बारावी परीक्षा सुरू झाली आहे.

सर्वाधिक 26 गैरप्रकार छत्रपती संभाजीनगर मध्ये घडले असल्याचे समोर आले आहे.

मुंबई,कोल्हापूर आणि कोकण विभागात एकही गैरप्रकार नाही.

Pune : लाडक्या बहिणीला अपात्र करण्यासाठी आरटीओची मदत

लाडकी बहिण योजनेच्या लाडक्या बहिणींना अपात्र करण्यासाठी राज्य सरकारच्या परिवहन प्राधिकरणाचा (RTO) आधार घेतला जाणार यासाठी जिल्हा परिषदेचा महिला बाल कल्याण विभाग अलर्ट झालाय.

पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत अंगणवाडी सेविकांच्या मदतीने लाडक्या बहिणीच्या कुटुंबात चारचाकी वाहन आणि ६५ वर्षी पुढील,संजय निराधार योजना लाभार्थी ची तपासणी केली जाणार आहे.

पुणे जिल्हात ५० हजारांच्या जवळपास लाडक्या बहिणीची व कुटुंबाची तपासणी केली जाणार असुन यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन (RTO) ची मदत घेतली जाणार आहे.

शासकीय यंत्रणांचा गैरवापर केल्या बद्दल तानाजी सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करावा – सुनील माने

मुलगा ऋषिराज याचे अपहरण झाल्याचा बनाव रचून सरकारी यंत्रणांना वेठीस धरणाऱ्या तानाजी सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सुनील माने यांनी केली आहे.

महादेव मुंडे कुटुंबीय घेणार आता अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची भेट

बीड पोलीस अधीक्षक नवनीत काँवत शासकीय कामानिमित्त बाहेर असल्याने अप्पर पोलीस अधीक्षकांची घेणार भेट

Jalna News : जालन्यात बारावीच्या पहिल्याच पेपरला कॉपी करणाऱ्यांचा सुळसुळाट

जालना जिल्ह्यात कॉपीमुक्ती अभियानाचा बोजवारा उडाल्याचं पाहायला मिळत आहे. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातल्या ढोकसाळ येथे एका परीक्षा केंद्रावरती कॉपी करणाऱ्यांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे.

Kalyan News : कल्याणमधील 105 बाधितांचा पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर

कल्याणमधील गोविंदवाडी बायपास रस्त्यासाठी केडीएमसीने अनेकांच्या घरांवर बुलडोझर चालवला. या रस्त्यातील बाधितांना पुनर्वसनाचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र 22 वर्ष उलटूनही अद्यापही या प्रकल्पातील 105 बाधित पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत.

Pune News : टेम्पोवर चालू विजवाहक तार पडताच टेम्पोने घेतला पेट  

पुण्याच्या मुळशीमध्ये रस्त्याशेजारी थांबलेल्या टेम्पोवर चालू विजवाहक तार पडल्याने टेम्पोने पेट घेतल्याची घडली घटना

मुळशीमधील लवळे फाट्याजवळ मयुर इंडस्ट्रीयल वर्क कंपनीजवळ काल संध्याकाळच्या सुमारास घडली घटना

ट्रकवर विजेची तर पडताचं ट्रकच्या टायरने घेतला पेट

Nandurbar News : अक्कलकुवात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या दोन विदेशी नागरिकांवर कारवाई

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे असलेल्या जामिया इस्लामिया इशातुल उलूम इन्स्टिट्यूटच्या परिसरात बेकायदेशीर पद्धतीने राहणारे दोन यमनचे नागरिक आढळून आल्याचे समोर आले आहे. दोन्ही नागरिक नवरा-बायको असल्याची प्राथमिक माहिती आहे. ते वर्ष 2015 मध्ये वैद्यकीय विजावर भारतात आले होते. त्यानंतर त्यांच्या विजा मुदत वाढ न करता तरी देखील ते भारतात राहत होते.

buldhana news : बुलढाण्यातील केस गळती आजाराचा आता खामगाव शिरकाव

केस गळती आजाराचा आता खामगाव तालुक्यात शिरकाव...

केस गळतीचे नक्की निदान नाही...

खामगाव तालुक्यातील जयपूर लांडे गावात आढळली एक महिला रुग्ण...

ग्रामस्थ भयभीत, आरोग्य यंत्रणा बारकाईने लक्ष ठेवून..

अजूनही केस गळतीच नेमकं निदान नाही...

शेगाव, नांदुरा आणि खामगाव तालुक्यातील 17 गावांमध्ये 264 रुग्ण...

तुर्भेतील डम्पिंग ग्राउंडला आग

डम्पिंग ग्राउंडला भीषण आग लागली आहे. तुर्भेमधील हनुमान नगरच्या मागे असलेल्या डम्पिंग ग्राउंडला आग लागलीय. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

'सरनाईक साहेब प्लीज, एकनाथ शिंदे साहेब देवमाणूस आहेत', रिक्षा संघटनेकडून लावण्यात आले बॅनर

'सरनाईक साहेब प्लीज, एकनाथ शिंदे साहेब देवमाणूस आहेत, त्यांचे निर्णय बदलू नका', असा मजकूर असलेले बॅनर पुण्यात लागले आहेत. बाईक टॅक्सीबद्दल एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्यानं रिक्षा संघटनेकडून हे बॅनर्स लावण्यात आले आहेत.

'ज्या रंगाचा चष्मा असतो त्या रंगाचे जग दिसते', राऊतांच्या वक्तव्यावर अण्णा हजारेंची प्रतिक्रिया

'अण्णा हजारे यांना महात्मा करण्याचं काम केजरीवाल, सिसोदिया यांनी केलं, नाहीतर ते राळेगणचे दैवत होते. शिंदे फडणवीस सरकार असताना अण्णा हजारे यांनी साधी कुसही बदलली नव्हती. अण्णा हजारे यांची भूमिका संशयास्पद आहे', अशी टीका खासदार संजय राऊत यांनी अण्णा हजारेंवर केली होती.

यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'ज्या रंगाचा चष्मा असतो त्या रंगाचे जग दिसते. चष्माच त्या रंगाचा आहे तर, जग दिसणारच तसं', असं अण्णा हजारे म्हणाले.

मुंबईच्या वांद्रे परिसरात ज्येष्ठ महिलेची निर्घृण हत्या, आरोपी ताब्यात

मुंबईच्या वांद्रे परिसरातील ज्येष्ठ महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. रिक्लेमेशन परिसरातील इमारतीत राहणार्‍या रेखा खोंडे यांचा हात बांधून गळा कापून त्यांची हत्या करण्यात आली आहे. ज्येष्ठ महिलेची निर्घृण हत्या झाल्यानं वांद्रे परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र, पोलिसांनी अवघ्या दोन तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

धुळे तालुक्यातील वरखेडी शिवारात भीषण अपघात : डंपरच्या धडकेत मजुराचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

धुळे तालुक्यातील वरखेडी-आर्णी रस्त्यावर वरखेडी शिवारात भीषण अपघात झाला आहे, धुळे-नरडाणा रेल्वे मार्गाच्या कामासाठी वापरला जाणारा डंपर आणि दुचाकी यांच्यात जोरदार धडक होऊन हा अपघात झाला असुन, दुचाकी धारक मजुराचा या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे, तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत,

बीड: महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांच्या भेटीला दाखल...!

:महादेव मुंडे यांच्या पत्नी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांच्या भेट घेण्यासाठी बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाल्यात आहेत . या प्रकरणातील आरोपी अटक केले जावे अन्यथा याचा तपास एसआयटी किंवा सीआयडी कडे देवून न्याय द्यावा अशी मागणी मृत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे ह्या पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांची भेट घेऊन मागणी करणार आहेत.

"एकनाथ शिंदे देवमाणूस", पुण्यात लागले उपमुख्यमंत्री यांचे बॅनर

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना सुद्धा या बॅनरमार्फत करण्यात आली विनंती

सरनाईक साहेब प्लीज, एकनाथ शिंदे साहेब देवमाणूस आहेत, त्यांचे निर्णय बदलू नका, असा मजकूर असलेले फ्लेक्स पुण्यात लागले आहेत

बाईक टॅक्सी बद्दल एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याने रिक्षा संघटनेकडून हा बॅनर लावला आहे

Pune News: "एकनाथ शिंदे देवमाणूस", पुण्यात लागले उपमुख्यमंत्री यांचे बॅनर

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना सुद्धा या बॅनरमार्फत करण्यात आली विनंती..

सरनाईक साहेब प्लीज, एकनाथ शिंदे साहेब देवमाणूस आहेत, त्यांचे निर्णय बदलू नका, असा मजकूर असलेले फ्लेक्स पुण्यात लागले आहेत...

बाईक टॅक्सी बद्दल एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याने रिक्षा संघटनेकडून हा बॅनर लावला आहे

19 जानेवारी 2023 रोजी बेकायदा बाईट टॅक्सीवर बंदी आणण्यासाठी जीआर काढला होता परंतु प्रताप सरनाईक हे बाईक टॅक्सी चालू करण्याचा प्रयत्न असल्याची विधाने करत असल्याचा आरोप रिक्षा संघटनांनी केला आहे...

रिक्षा चालकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष असून एकनाथ शिंदे यांचा निर्णय त्यांच्याच पक्षाचे परिवहन मंत्री यांनी फिरवू नये व तसे केल्यास रिक्षा चालक तीव्र आंदोलन करतील असा इशारा रिक्षा संघटनेने दिला आहे...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी आज सकाळी काही महत्त्वाची माहिती पाठवली. आज कॅबिनेटची बैठक आहे मला वाटतंय. आज तरी मित्राला न वाचवता महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी कारवाई करावी. आज चौकशीची घोषणा करावी अशी माझी विनंती आहे
अंजली दमानिया

yavatmal News : दोन ऑटोमध्ये झालेल्या अपघातात विद्यार्थ्यांचा मृत्यू

यवतमाळच्या पुसद शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या साई मंदिर रोडवर दोन ऑटो मध्ये झालेल्या अपघातात एका विद्यार्थ्याच्या मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली असून दहिवड येथील रहिवासी असलेला विद्यार्थी सौरव भिका राठोड वय तेरा वर्षे हा पुसद येथील श्रीराम असेगावकर विद्यालयात वर्ग सातवीत शिकत होता. इतर विद्यार्थ्यांसोबत ऑटो मध्ये बसून पुसदला येत असताना विद्यार्थी नेणाऱ्या दोन ऑटो मध्ये पुसद रोडवरील साई मंदिर परिसरात अपघात झाला. या अपघातात दोन्ही ऑटोतील विद्यार्थी हे किरकोळ जखमी झाले मात्र या अपघातात सौरव हा जागीच ठार झाला. घटनेची माहिती कळताच पालकांसह नागरिकांनी एकच गर्दी केली होती.जखमींना उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.

‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

पुण्यातील सरहद संस्थेच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण दिल्ली येथे होणार आहे, याचे औचित्य साधून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी मंत्रालयातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयात आज उपस्थित असलेल्या उपमुख्यमंत्री शिंदे यांना पुष्पगुच्छ देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले.

ओशिवरा परिसरात मोठी आग

ओशिवरा येथील फर्निचर मार्केटला मोठी आग लागल्याची घटना घडली

अंधेरी पश्चिमेकडील जोगेश्वरी ओशिवरा येथील फर्निचर मार्केटला सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास लागली आग

आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळाकडे रवाना

आगीवर नियंत्रण मिळवण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू

चेंबूर पोलीस ठाणे उडवून देऊ म्हणून पोलिस कंट्रोलला कॉल

लोहमार्ग पोलिसांना ५ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात इसमाचा फोन

चेंबूर पोलीस ठाणे उडवून देणार असल्याची धमकी

चेंबूर पोलीस ठाण्यात बॉम्ब शोधक पथकाने केली तपासणी

अफवा असल्याचे समोर

फोन करणाऱ्या व्यक्तीचा एटीएस कडून तपास सुरू

 वैभव नाईक एसीबीच्या चौकशीसाठी दाखल

एसीबीच्या अधिकाऱ्यांना यापूर्वी मी माहिती दिलेली आहे. त्यांनी यापूर्वी ज्या फॉर्मेटमध्ये माहिती मागितली देण्यात आलेली आहे. त्यानंतर त्यांनी वेगळ्या पद्धतीने माहिती मागितली ते घेऊन आम्ही आलेलो आहोत. ही चौकशी त्रास देण्यासाठी असू शकते. ज्या लोकांच्या चौकशी सुरू आहेत आणि त्यांनी पक्षांतर केल्यानंतर त्यांची चौकशी थांबलेली आहे. दरम्यान मी टॅक्स पूर्वीपासून भरत आहे आणि त्याची माहिती देखील मी दिलेली आहे. माझी पत्नी देखील या चौकशीला सामोरे जाईल. अशी प्रतिक्रिया वैभव नाईक यांनी रत्नागिरी येथील एसीबी कार्यालयात चौकशीसाठी आल्यानंतर दिली आहे.

दोन किलो गांजा राजारामपुरी पोलिसांनी केला जप्त : दोघांना अटक

विक्रीसाठी गांजा घेऊन फिरणाऱ्या दोघांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केलीय. त्यांच्याकडून 44 हजार रुपयांचा दोन किलो गांजा जप्त केला आहे. तसेच दोन दुचाकी ही जप्त केल्यात याप्रकरणी सुदर्शन हवालदार आणि मोहम्मद सिद्दिकी यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या दोघांना राजारामपुरी पोलिसांनी मुख्य रस्त्यावरून फिरवत त्यांची धिंड काढलीय.

आमच्या घरात कुठला ही वाद नाही.
गिरीराज सावंत

Chhatrapati Sambhajinagar - फळविक्रत्यांचा रस्त्यावर राडा

छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळा समोर फळ विकणाऱ्या गाड्यांना हटवले म्हणून फळ विक्रेत्यांनी रहदारी असलेल्या जालना रोडवर प्रचंड राडा घातला. रस्त्यावर रडा घालणाऱ्या फळ विक्रेत्यांचा रस्त्यावर मोठा जमाव जमला आणि रात्री 9 च्या आसपास तासभर रस्ता अडवला. त्यात रस्त्यावर फळ फेकून हे विक्रेते थेट गाड्यांच्या समोर जाऊन बसले.

काही महिन्यात सोना चांदी दरवाढ सुवर्ण बाजार चकाकले

जळगाव गेल्या पाच वर्षात सोने भाव दुप्पट झाले आहेत. सन २०२१ मध्ये ४५ हजारांवर असलेले सोने सध्या ८६ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले त्यामुळे गेल्या पाच वर्षात सोन्यातून मोठा परतावा गुंतवणूकदारांना मिळनार सन २०२१मध्ये ४५ हजार,सोन होते २०२२मध्ये ५३,५००, सोन दर होता २०२३मध्ये ६२,१००,इतका दर २०२४ मध्ये ऑक्टोबर महिन्यात सोने ८० हजारांवर पोहचले. त्यानंतर काही दिवस भाव कमी झाले होते.गेल्या पाच वर्षातील सोन्याचे दरात पाहता ते जवळपास दुप्पट झाले आहे. २०२१मध्ये सोने ४५ हजार रुपयांवर होते. ते आता थेट ८६ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहे.

Maharashtra Live Update : लाडका भाऊ योजना बंद होण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनामुळे ही योजना बंद होणार असल्याचे समजतेय.

Maharashtra Live Update : जरांगेंनी मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना संयम बाळगावा- उद्योगमंत्री उदय सामंत

मराठा आरक्षणाबाबत शिंदे समिती मुदतवाढ घेत आहे.. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना दहा टक्के दिलेला आरक्षण टिकलं पाहिजे निजाम कालीन कुणबी नोंदी मराठा समाजाला त्यानुसार प्रमाणपत्र मिळाले पाहिजे अशी आमची भूमिका आहे. आणि जरांगेंनी सरकारशी संवाद साधावा जरांगे हे माझे चांगले मित्र आहेत. त्यांना मी विनंती करतो की मुख्यमंत्र्यावर बोलताना संयम बाळगावा ... मुख्यमंत्री जनतेतून निवडून आलेले आहेत.. कोणाचं काही ऐकून बोलण्यापेक्षा थेट सरकारशी संवाद साधला पाहिजे अशी प्रतिक्रिया सामंत यांनी सांगली मध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.

Maharashtra Live Update : पनवेल सायन मार्गावरील कळंबोली सर्कलवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

पनवेल सायन मार्गावरील कळंबोली सर्कल वर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

गेल्या एक तासापासून वाहतूक कोंडी

कळंबोली सर्कलच्या मध्येच एक ट्रक व बस बंद पडल्याने वाहतूक कोंडी

वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु

पनवेल सायन मार्ग, जेएनपीटी , तळोजाकडे , तसेच मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर आता वाहतूक कोंडी झाल्याचं दिसत आहे

कळंबोली सर्कल हा सर्वात मोठा जंक्शन समजला जातो, याच ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याने वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतए आहे

Chhatrapati Sambhajinagar - बारावी परीक्षा सुरू

छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यामध्ये बारावीचा पहिला पेपर आजपासून सुरळीत सुरू झाला. परीक्षा सुरू होण्याअगोदरच पालक आणि परीक्षार्थींची काही केंद्रावर धावपळ दिसून आली. कॉपीमुक्त परीक्षेसाठी बोर्डाने वेगळी पथके नेमली आहेत. आज परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षा हॉलमध्ये आणि केंद्रामध्ये जाताना तपासून सोडण्यात आले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४९५ महाविद्यालयांतील सुमारे ६३ हजार ९१८ विद्यार्थी १६१ केंद्रांवर परीक्षा देत आहेत. परीक्षा केंद्राच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. शिवाय पालकांना परीक्षा केंद्राच्या परिसरात गर्दी करू नये असा आवाहन करण्यात आले आहे. परीक्षा शांततेत आणि सुरळीत पार पाडावी यासाठी सर्व केंद्र संचालक, प्राचार्य, मुख्याध्यापक आणि शिक्षकांना सूचना देण्यात आल्या आहेत.

Maharashtra Live Update : सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रासाठी कुठलीही नव्याने मुदतवाढ नाही... पणन विभागाचे स्पष्टीकरण

राज्यातील सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रासाठी नियमानुसार 90 दिवसाचा कालावधी देण्यात आलेला होता .. मात्र शेतकऱ्याची वाढती मागणी पाहता 13 जानेवारी 2025 पासून 6 फेब्रुवारी 2025 पर्यंत अशी एकूण 24 दिवसाची सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ देण्यात आली होती.. तर सद्यस्थितीला सोयाबीन खरेदीसाठी कुठलीही मुदतवाढ देण्यात आली नाही असं स्पष्टीकरण पणन विभागाच्या वतीने देण्यात आलं आहे.

मनसेचे महावितरण विरोधात आंदोलन

माढा येथील महावितरण कंपनीच्या विरोधात मनसे आक्रमक झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून शेतीपंपाला नियमीत वीजपुरवठा होत नाही. वीज पुरवठा सुरळीत नसल्याने शेती पिकांचे नुकसान झाले आहे. वीज पुरवठा सुरळीत करावा‌ या मागणीसाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांच्या नेतृत्वाखाली मोडनिंब येथे महावितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.‌यावेळी संतप्त झालेल्या शेतकरी व कार्यकर्त्यांनी वीज बिलची होळी केली.

HSC Exam : नंदूरबार जिल्ह्यातील एकूण 17 हजार 611 विद्यार्थी देणार 12 चा पहिला पेपर.....

12 वी च्या परीक्षांना सुरवात होत असून पहिला पेपर हा इंग्रजी भाषेचा असणार आहे नंदुरबार जिल्ह्यातील 28 केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार असून 17 हजार 611 विद्यार्थी आज पेपर देणार आहे.28 केंद्रापैकी 6 केंद्र हे संवेदनशील केंद्र असून या केंद्रांवर प्रशासनाचे विशेष लक्ष असणार आहे.. विद्यार्थीसाठी आवश्यक सुविधा असणार आहे परीक्षा काळात गैरप्रकार रोखण्यासाठी ड्रॉन आणि सीसीटीव्ही कॅमेरे यासोबतच व्हिडिओ शूटिंग करण्यात येणार आहे.परीक्षा केंद्राचा 100 मीटर आणि 500 मीटर अंतराव झेरॉक्स सायबर कॅफे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

भुजबळांच्या वक्तव्याचा भाजपच्या तुषार भोसलेंकडून समाचार

- हिमालयातील साधू संतांचा आपल्याला काय उपयोग असे भुजबळ यांनी केले होते काल विधान

- भुजबळांचा या वक्तव्याचा भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांच्याकडून समाचार

- काही साधू संत हे समाजासाठी काम करत असतात

- तुमच्या पक्षाने तुम्हालाच हिमालयात पाठवले आहे

- यापूर्वीही भुजबळांनी सरस्वती पूजेवरून केले होते वादग्रस्त विधान

- याच सगळ्या विधानांमुळे छगन भुजबळ यांच्या उमेदवारीला लोकसभेवेळी झाला होता विरोध

घोडा यात्रेला उसळली भाविकांची गर्दी

संपूर्ण विदर्भात प्रसिध्द असलेली चिमूरची घोडा यात्रा रात्री मोठ्या उत्साहात पार पडली. चिमुरचे ग्रामदैवत असलेल्या श्रीहरी बालाजीची रात्री बारानंतर लाकडी घोड्याच्या रथावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. जग्गन्नाथ पुरीप्रमाणे इथेही हाताने लाकडी रथ ओढण्याची प्रथा आहे. मध्यरात्री झालेल्या विशेष पूजेनंतर बालाजीच्या उत्सवमूर्तीला लाकडी रथावर विराजमान करण्यात आले व त्यानंतर तिची पहाटेपर्यंत शहरातून मिरवणूक काढण्यात आली. ही यात्रा पाहण्यासाठी आणि हा रथ ओढण्यासाठी हजारो लोकांनी इथे एकच गर्दी केली. जवळ-जवळ तीनशे वर्षांपासून सुरु असलेल्या या घोडा-रथ यात्रेला पेशव्यांच्या काळापासून सुरुवात झाली. पेशवाईतल्या साडेतीन शहाण्यांपैकी एक असलेले देवाजीपंत चोरघडे यांनी नागपूरकर भोसलेंच्या मदतीने या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि तेव्हापासून वार्षिक उत्सव म्हणून या घोडा यात्रेची सुरुवात झाली. या यात्रेसाठी चंद्रपूर जिल्ह्यासह विदर्भातील लाखो लोक चिमूरमध्ये दाखल होतात. तिरुपतीला बोललेला नवस इथे फेडता येत असल्याची लोकमान्यता असल्यामुळे सुध्दा या काळात चिमूरमध्ये लोकांची मोठी गर्दी होते. १९४२ ला इंग्रजांविरुध्द झालेल्या चिमूर क्रांतीमध्ये सुध्दा या बालाजी मंदिराची भूमिका महत्वाची होती आणि त्यामुळे हे मंदिर आणि यात्रा इतक्या वर्षानंतर सुध्दा लोकांमधले आपले स्थान अजूनही कायम ठेवून आहे.

वैभव नाईक व त्यांची पत्नी स्नेहा नाईक हे Acb चौकशीसाठी रत्नागिरी येथे रवाना

माजी आमदार वैभव नाईक यांच्या पत्नीला लाचलुचपत विभाग रत्नागिरी विभागाकडून चौकशीसाठी उपस्थित राहण्याची नोटीस बजावण्यात आली होती. त्या अनुषंगाने वैभव नाईक व त्यांची पत्नी स्नेहा नाईक हे दोघेही चौकशीसाठी आता कणकवलीवरून रत्नागिरीकडे निघाले आहेत. थोड्याच वेळात ते Acb कार्यालयात पोहोचतील. 20 वर्ष मागील संपत्तीची माहिती सादर करण्यास Acb ने सांगितले असल्याने अधिकारी नेमके कोणते प्रश्न विचारतात कोणती माहिती त्यांच्याकडून जाणून घेतात हे आता चौकशी नंतर समजणार आहे.

Nashik News Update

- नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटत नसल्याने स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार आज नाशिक जिल्हा नियोजन समितीची बैठक

- व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अजितदादा घेणार नाशिक जिल्हा जिल्हा नियोजन समितीची बैठक

- पालकमंत्री पदाचा तिढा सुटत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून जिल्हा नियोजन समितीची बैठक रखडली होती

- जिल्ह्यातील सर्व आमदारांना ऑनलाइन उपस्थित राहण्याचा सूचना

- शिक्षण मंत्री दादा भुसे राहणार नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून ऑनलाईन उपस्थित

Maharashtra Live Update : ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा.रं.बोराडे यांचं वृद्धापकाळाने निधन

मराठी साहित्यातील कृतीशील आणि सामाजिक बांधिलकीचे व्रत जोपासणारे ग्रामीण साहित्यिक म्हणून होती ओळख

संभाजीनगर मधील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन

कथा, कादंबरी नाटक आणि समीक्षा या प्रकारात त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण साहित्यनिर्मिती केली.

कथा, कादंबरी, बालासाहेब त्यात लेखन

अनेक पुरस्कारांने सन्मानित

एपीएमसी मार्केट मध्ये रात्री बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या कामगारांची हकालपट्टी, कामगारांनी सुरक्षा रक्षकांना घेराव घातल्याने काळीकाळ तणाव 

एपीएमसी पोलिसांकडून एपीएमसी मार्केट मधील गाळ्यांवर बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या कामगारांची झाडाझाडती घेत कागदपत्रांची पडताळणी केली. बाजार आवारात वास्तव्य करत असल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना थारा मिळत असून काही बांगलादेशी नागरिक कामगार म्हणून देखील राहत असल्याची शक्यता वर्तविण्यात येतेय. त्याच अनुषंगाने बाजार आवारातील सुरक्षेच्या दृष्टीने व्यापारी गाळ्यांमध्ये कामगारांच्या वास्तव्यावर आक्षेप घेऊन त्यांची हकालपट्टी करण्यास सुरुवात केलेय. कामगारांनी मात्र याचा विरोध करत सुरक्षारक्षकांनाच घेरण्याचा प्रयत्न केला मात्र सुरक्षा अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत कामगारांना मार्केट बाहेर राहण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले यामुळे एपीएमसी मार्केट परिसरात काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

कोल्हापूर महानगरपालिका शाळेत शिकणारे 21 विद्यार्थी इस्रो भेटीसाठी रवाना

कोल्हापूर महानगरपालिका शाळेत शिकणारे 21 विद्यार्थी इस्रो भेटीसाठी रवाना झालेत. शिष्यवृत्ती परीक्षेत प्राविण्य मिळवलेल्या या विद्यार्थ्यांना विशेष विमानाने नेऊन इस्रोची सफर घडवण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. इस्रोची माहिती, सध्या सुरू असलेल्या मोहीमा आणि अवकाश संशोधनाबाबत इत्यंभूत माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. विद्यर्थ्यांना शैक्षणिक पाठबळ देण्यासाठी हा उपक्रम हाती घेतल्याचे महापालिकेच्या उपायुक्त साधना पाटील यांनी सांगितले तर विद्यार्थ्यांना स्वप्नवत इस्रो भेट आणि विमान प्रवास अस्तित्वात येणार असल्याने ते चांगलेच खुश झाले आहेत.

Solapur News : उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा 'रमाईची लेक' पुरस्काराने करण्यात आला सन्मान

डॉल्बीमुक्त जयंतीच्या संकल्पनेतून रमाई आंबेडकर यांची वैचारिक जयंती व्हावी यासाठी पुरस्कार सोहळ्याची करण्यात आली आहे सुरुवात

रमाई आंबेडकर यांच्या 127 व्या जयंती निमित्त रमाई सेवाभावी शिक्षण प्रसारक मंडळाकडून करण्यात आला सन्मान

सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील 11 कार्बगार महिलांना पुरस्कार देऊन करण्यात आलं सन्मानित

सोलापूर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते निर्मलकुमार फडकुले सभागृहात पार पाडला पुरस्कार वितरण सोहळा

रमाई सेवाभावी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजू माने यांच्या संकल्पनेतून पार पाडला पुरस्कार सोहळा

सामाजिक, राजकीय,आर्थिक, पत्रकारिता,आरोग्य,रेल्वे,पोलीस प्रशासन,वैद्यकीय,कला क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा यावेळी करण्यात आला सन्मान

सिना कोळेगाव धरणातून कंडारी कॉलव्यात सोडलेले पाणी बंद केल्याने शेतकरी आक्रमक

परंडा तालुक्यातील सिना कोळेगाव धरणातून कंडारी कालव्यात तात्काळ पाणी सोडण्यात यावे अन्यथा जलसमाधी आंदोलन करणार असा इशारा कंडारी परिसरातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिलाय.दरम्यान परंडा तालुक्यातील भोंजा,कुंभेंजा परिसरातील शेतकऱ्यांनी कंडारीला सोडलेल्या पाण्याला विरोध केला होता यामुळे पाणी बंद करण्यात आले होते.दरम्यान सिना कोळेगाव धरणातून कंडारी कालव्यात सोडलेले पाणी बंद करण्यात आल्याने शेतकरी आक्रमक झाले असून कंडारी परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी नियमा नुसार पाणी मागणी अर्ज भरलेले असताना कंडारी कालव्यात सोडलेले पाणी बंद करण्यात आले आहे.बंद केलेले पाणी तात्काळ सोडण्यात यावे अन्यथा जल समाधी आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय.

Crime : मूल होत नसल्याने उपचार करतो म्हणत मांत्रिकांने 20 वर्षाच्या विवाहितेवर केला अत्याचार..

मूल होत नसल्याने उपचार करतो म्हणत मांत्रिकांने 20 वर्षाच्या विवाहितेवर केला अत्याचार..

अमरावतीच्या गाडगे नगर पोलीस स्टेशन हद्दीतील घटना.

पीडित महिलेच्या डोक्यावर मांत्रिकाने मंत्र उच्चारत तिच्यावर जबरीने केला अत्याचार..

Maharashtra Live Update: वैभव नाईक आणि पत्नी स्नेहा दोघे सकाळी ११ वाजता रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयात हजर राहणार

संपत्तीच्या चौकशीच्या अनुशंघाने नाईक दांमपत्य विविध कागदपत्रे सादर करणार

डिसेंबर २०२२ मध्ये उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांना एसीबीची पहिली नोटिस

लोकप्रतिनिधी असतानाच्या कालावधीत मालमत्ता उत्पन्न आणि खर्चाची माहिती मागवून सादर करणार असल्याचा दिला होता जवाब

त्यावेळची कागदपत्रांची पूर्तता न केल्याने ती करण्यासाठी एसीबी कडून पाठवण्यात आली होती नोटिस

एसीबीचे पोलिस उप अधिक्षक अविनाश पाटील यांनी काढली आहे नोटिस

कोल्हापूर हद्दवाढ प्रश्नावर पोस्टर वॉर

कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा मुद्दा आता चांगलाच तापलायं. हद्दवाढ कृती समितीने कोल्हापूर शहरात हद्दवाढीच्या समर्थंनात डिजिटल फलक लावत एकप्रकारे ग्रामीण भागातील नागरिकांना इशाराच दिलायं. तर याला हद्दवाढ विरोधी कृती समितीने देखील गावागावात हद्दवाढीच्या विरोधात डिजिटल फलक लावून चोख उत्तर दिलयं. हद्दवाढीच्या विरोधात पाचगाव इथं लावलेला बॅनर चांगलाच चर्चेत आला आहे. कारण या बॅनरवरच्या मजकूरातून हद्दवाढ विरोधी समितीने हद्दवाढीचं समर्थन करणाऱ्यांना सणसणीत टोला लगावलायं. पोरगं राहीलं उपाशी, पावण्याला आवतण तुपाशी. पहिल्यांदा शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा द्या आणि त्यानंतर हद्दवाढीच्या फुशारक्या मारा. अशा आशयाचा उल्लेख या डिजिटल फलकावर करण्यात आलायं. दरम्यान जर हद्दवाढ कृती समितीने ग्रामीण भागातील लोकांना डिवचण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्या पुढे दोन पाऊलं टाकू आणि जशास तसं उत्तर देवू असा इशाराही हद्दवाढ विरोधी कृती समितीने दिलायं.

Chhatrapati Sambhajinagar - आजपासून बारावी परीक्षा

छत्रपती संभाजीनगर बोर्डातील पाच जिल्ह्यांमध्ये 460 केंद्रावर बारावीचे 1 लाख 85 हजार विद्यार्थी आजपासून परीक्षा देणार आहेत. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली या पाच जिल्ह्याचा छत्रपती संभाजीनगरच्या बोर्डामध्ये समावेश आहे. परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी बोर्डकडून पूर्ण तयारी करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक परीक्षा हॉलमधील पर्यवेक्षकांकडील मोबाइलचे कॅमेरे सुरू ठेवले जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४९५ महाविद्यालयांतील सुमारे ६३ हजार ९१८ विद्यार्थी १६१ केंद्रांवर आपल्या करिअरविषयक भवितव्याचा सोडवणार आहेत. यंदा विभागातील जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, परभणी व हिंगोली या पाच जिल्ह्यांतील १४०८ शाळा महाविद्यालयांतून बारावीच्या परीक्षेला १ लाख ८५ हजार ३३० विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. त्यासाठी ४६० परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली असून ५९ परीरक्षक केंद्र असणार आहेत. मागील पाच वर्षांत विभागात बारावीच्या २०५ केंद्रांवर गैरप्रकार झाले आहेत, यासर्व परीक्षा केंद्रांवर 'पर्यवेक्षण टीम रोटेशन' करण्यात येणार असल्याचे विभागीय मंडळातर्फे सांगण्यात आले आहे. याशिवाय कॉपीसारखा गैरप्रकार आढळून आल्यास आता संबंधित विद्यार्थ्यासह तेथील केंद्र संचालक, पर्यवेक्षकाविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचा इशारा देखील बोर्डाने दिला आहे.

Maharashtra Live Update: सोलापूर - अक्कलकोट रस्त्यावर पेट्रोल घेऊन जाणाऱ्या टँकरचा झाला अपघात

सोलापुरातील एसव्हीसीएस शाळा, एमआयडीसी परिसरात झाला अपघात

सोलापूरहुन गुलबरग्याकडे पेट्रोल घेऊन जाणाऱ्या टँकरचा पहाटेच्या सुमारास झाला अपघात

भरधाव वेगात जाणाऱ्या टँकरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाला अपघात,चालक घटनास्थली टँकर सोडून झाला फरार

अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल

या अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी नाही,मात्र टँकर मधून पेट्रोलची मोठ्या प्रमाणात होत आहे गळती

प्रवाश्यांना वाहतूकचा त्रास होऊ नये म्हणून लवकरात लवकर टँकर रस्त्यावरून बाजूला हाटवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु

Chhatrapati Sambhajinagar - सरकारी कर्मचाऱ्यांचे रेशन कार्ड रद्द

छत्रपती संभाजीनगरमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना पुरवठा विभागाने दणका देत जिल्ह्यातील 4 हजार सरकारी कर्मचाऱ्यांचे रेशन कार्ड केले आहेत. स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून गरीब लाभार्थींना अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. ते धान्य अत्यल्प दरात पुरविले जाते. मात्र चांगला पगार असलेले सरकारी कर्मचारी देखील या गरिबांच्या अन्नधान्यावर डल्ला मारत असल्याचा प्रकार निदर्शनास आला होता. धान्य वाटपाचा लाभ जिल्ह्यातील असंख्य शासकीय कर्मचारी घेत होते. त्यामुळे जिल्हा पुरवठा विभागांनी विशेष मोहीम राबवून पडताळणी केली. या पडताळणीनंतर जिल्ह्यातील 4 हजार 427 शासकीय कर्मचाऱ्यांचे रेशन कार्ड रद्द केले आहेत.

Chhatrapati Sambhajinagar - जायकवाडी पाणीसाठा सुस्थितीत

मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणाची पाणीपातळी गतवर्षाच्या तुलनात यंदा सुस्थितीत आहे. मात्र, बाष्पीभवन वाढत चालल्याची चिंता वाढली आहे. मागच्या वर्षी 10 फेब्रुवारीला 34 टक्के जलसाठा होता. मात्र यंदा तो दुपटीने म्हणजेच 76 टक्के आहे. मात्र आतापासूनच ऊन वाढत असल्यामुळे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होईल अशी भीती व्यक्त केली जाते. कारण गेल्या काही वर्षांपासून जायकवाडी धरणातील पाण्याचे बाष्पीभवनचे प्रमाण अधिक वाढलेले आहे. उन्हाळा सुरू होताच धरणातून पाण्याचे बाष्पीभवनलाही सुरुवात झाल्याने दररोज 0.917 दलघमी पाण्याची बाष्पीभवन होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडीमध्ये पाणीपातळी सुस्थितीत असल्याने उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा कमी जाणवतील असं दिसतंय.

पुणे विद्यापीठात पिण्याच्या पाण्याच्या कुलरमध्ये पाय टाकून पाणी बाहेर काढण्याचा प्रकार?

विद्यापीठातील आदर्श कॅन्टीन मध्ये एक कर्मचारी पिण्याच्या पाण्याच्या कुलर मध्ये पाय टाकून पाणी बाहेर काढतो आहे असा व्हिडिओ आता समोर आला आहे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरामध्ये असलेल्या कॅन्टीन , मेस व उपहारगृहात जेवणामध्ये आळी , झुरळे निघण्याच्या घडत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप

तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्याच नव्याने बांधकाम करा, 5240 सह्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

तुळजाभवानी देवीच्या मंदिराचे जतन व संवर्धनाचे काम करत असताना देवीच्या मुख्य गाभाऱ्यातील चार शिळांना तडे गेल्याची बाब समोर आली. त्यानंतर तुळजापुरातील पुजारी मंडळाकडून गाभाऱ्याचे नव्याने बांधकाम करावे अशी मागणी होत आहे. तुळजाभवानी मूर्ती रक्षणासाठी एक स्वाक्षरी देवीच्या गाभारा संवर्धनासाठी अशी मोहीम शहरात राबवन्यात आली. त्यानंतर गाभाऱ्याचे नव्याने बांधकाम करा या मागणीसाठी तब्बल 5240 स्वाक्षऱ्यांच निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.यानंतरही गाभाऱ्याच्या बांधकामाचा निर्णय घेतला नाही तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Crime : उरण बोरखारमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकाची मुलींना अमानुष मारहाण, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल.

समस्त पालकांच्या मनात धडकी भरवणारी घटना उरणमध्ये घडली आहे. उरणच्या बोरखारमधील जिल्हा परिषद शाळेत एका शिक्षकाने शाळेतील इयत्ता तिसरी आणि चौथीतील मुलींना अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आलेय. अशोक कुटे असे या शिक्षकाचे नाव असून विद्यार्थ्यांना दिलेला परिपाठ पूर्ण केला नाही या रागातून त्याने शाळेतील विद्यार्थ्यांना आणि विशेषतः मुलींना अंगावर, गालावर लाल चट्टे उठेपर्यंत मारहाण केलेय. या मारहाणीने मानसिक धक्का बसलेल्या विद्यार्थिनीना अश्रू अनावर झाल्याने त्या रडू लागल्या. संबंधित घटना पालकांना कळताच पालकांनी शाळेत येत शिक्षकाला धारेवर धरले. पालकांनी शिक्षकाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली असून शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी पालकांनी केलेय. तर पोलीसांनी शिक्षक अशोक कुटे याला ताब्यात घेतले असणार अधिक चौकशी करण्यात येतेय.

Maharashtra Live Update: यवतमाळ जिल्ह्यात साडे तीन हजार लाडक्या बहिणी अपात्र

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील तीन हजार 891 लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या असून ही कारवाई मंत्रालय स्तरावरून करण्यात आली आहे या महिलांना आता पुढील हप्ते मिळण्यावर निर्बंध येणार आहेत यवतमाळ पुसद आणि महागाव तालुक्यातील सर्वाधिक लाडक्या बहिणींचा यात समावेश आहे.

राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आज अनेक संघटनांकडून आंदोलनं

सोलापूरकर यांच्या निवासस्थानाच्या बाहेर विविध संघटनांच्या वतीने करण्यात येणार आंदोलनं

सोलापूरकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्यं केल्याप्रकरणी अनेक संघटनांकडून निषेध व्यक्त

सोलापूरकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आंदोलनं

पुणे ते दिल्ली आणि दिल्ली ते पुणे अशी विशेष रेल्वे गाडी धावणार

दिल्लीत होत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पुणे ते दिल्ली आणि दिल्ली ते पुणे अशी विशेष रेल्वे गाडी धावणार

मध्ये रेल्वे पुणे विभागाकडून पत्रकाद्वारे देण्यात आली माहिती

यंदाच्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद राजधानी दिल्लीकरांकडे आहे

दिल्लीसाठी विशेष रेल्वे सोडण्यात यावी, अशी मागणी साहित्यिकांकडून करण्यात येत होती

१९ फेब्रुवारीला पुणे ते दिल्ली-सफदरजंग ही रेल्वे दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी सुटेल

रविवारी (२३ फेब्रुवारी) दिल्ली सफदरजंग स्थानकावरून रात्री १०.३० वाजता पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होईल

तानाजी सावंत यांच्या मुलाचा पोलिसांनी नोंदवला जबाब

काल पुणे विमानतळावरच ऋषिराज सावंत याचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला

खरंच घरी न सांगता ऋषिराज सावंत बँकॉकच्या दिशेने निघाले होते का?

बँकॉकला जाण्यासाठी सोमवारी केले होते विमानाचे बुकिंग

६८ लाख रुपये देऊन एका खाजगी विमानाने सावंत यांचे चिरंजीव निघाले होते बँकॉक ला

नेमकं कुठल्या कारणावरून तानाजी सावंत यांनी अपहरणाची तक्रार दिली याचा तपास सुद्धा पोलिस करण्याची शक्यता

तानाजी सावंत यांना त्यांचा मुलगा बँकॉकला गेलाय हे माहिती होतं?

समय रैनाच्या कार्यक्रम विरोधात राष्ट्रीय मानवी हक्क आयोग (NHRC) ची कारवाई

रणवीर अलाहाबादिया चा "तो" व्हिडिओ तातडीने काढून टाकण्याचे सुद्धा दिले आदेश

राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने घेतली ‘India’s Got Latent’ कार्यक्रमाची गंभीर दखल

समय रैनाच्या या शोमधील अश्लील, अशोभनीय आणि अनुचित कन्टेन्ट ची आयोगाकडून गंभीर दखल

या कार्यक्रमाची युट्यूबकडे तक्रार दाखल

तक्रारीत भारतीय समाज, महिला आणि मुलांविरोधात अवमानकारक वक्तव्यांचा suddha आरोप

IT Act आणि POCSO Act अंतर्गत कायदेशीर उल्लंघनांची चौकशी सुरू करण्याचे दिले आदेश

Pune : पुण्यात आणखी एका जी बी एस रुग्णाचा मृत्यू

पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात ३७ वर्षीय रुग्णाच्या मृत्यूची नोंद

पुण्यातील बिबवेवाडीतील अप्पर इंदिरानगरमधील रहिवासी वाहनचालक म्हणून करीत होता काम

या रुग्णाला ३१ जानेवारीपासून अशक्तपणा जाणवत होता

यामुळे राज्यात आतापर्यंत जी बी एस मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या सात वर

आता संशयित जीबीएसची रुग्णसंख्या १९२ त्यातील १६७ रुग्णांचे जीबीएस निदान झाले आहे.

पुणे महापालिका ३९, महापालिकेत नव्याने समाविष्ट गावे ९१, पिंपरी-चिंचवड महापालिका २९, पुणे ग्रामीण २५ अशी रुग्णसंख्या आहे

राज्यात इतर जिल्ह्यांत आतापर्यंत ८ रुग्ण आढळून आले आहेत

राज्यात आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी ४८ जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याचबरोबर २१ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत

Crime News : अमरावतीत उभ्या कारमध्ये आढळला मृतदेह

अमरावतीच्या काँग्रेस नगर रोड वरील होमगार्ड मुख्यालय बाजूला चारचाकी वाहनात एका 29 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे, घटनास्थळी फॉरेन्सिकच्या टीमकडून बंद कारची तपासणी केली गेली गाडीवरचे फिंगरप्रिंट घेण्यात आले असून डॉग्स कॉट पण बोलण्यात आले, तर कारचे लॉक तोडून मृतदेह बाहेर काढण्यात आला,या घटनेचा उलगडा उघडायचा आहे आत्महत्या की हत्या पोलीस तपासात समोर येईलच या मृतकाची ओळख पटली असून हा अमित आठवले असून राहणार वडाळी या परिसरात राहत आहे,मृतक अमित या गाडीमध्ये कसा आलेला याचा मृत्यू कसा झाला याचा शोध सद्या फेजरपुरा पोलीस घेत आहेत..कारण मृतदेहाच्या कानातून नाकातून रक्त वाहत होते त्यामुळे हत्या की आत्महत्या या दोन्ही अनुषंगाने पोलीस तपास करीत आहे...

Nashik  : पाकिस्तानसाठी हेरगिरी, नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमधील २ जवानाना पंजाबमध्ये अटक

- पंजाब पोलिसांची कारवाई, तर तिसरा संशयित नाशिकच्या छावणीतून फरार

- १५ लाख रुपये घेऊन शस्त्रास्त्रांची माहिती, नकाशे आणि गोपनीय माहिती पुरवली

- अटक करण्यात आलेले जवान आणि फरार जवान पंजाबचे

- सुटीवर गावी आल्यानंतर ड्रग्स आणि शस्त्र विक्री रॅकेट चालवत असल्याचं देखील पंजाब पोलिसांच्या तपासात उघड

- आयएसआय एजंटच्या संपर्कात असल्याचं समोर आल्यानंतर पंजाब पोलिसांकडून आरोपींचे ३ मोबाईल जप्त, फॉरेन्सिक टीमकडून तपास सुरू

Maharashtra Live Update: उल्हासनगरात कारने दुचाकीला उडवलं

उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्प चौकात एका दुचाकीवरून दोन इसम रस्ता क्रॉस करत होते. याचवेळी तिथून जाणाऱ्या कारची या दुचाकीला धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती, की दुचाकीवरचे दोघे जण रस्त्याच्या बाजूला फेकले गेले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. दुचाकीवरील दोघांना फारशी गंभीर इजा झालेली नसून याप्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली नसल्याचंही सांगितलं जातंय.

शिवप्रतिष्ठानच्या धारातीर्थ मोहिमेची आज किल्ले रायगडावर होणार सांगता

संभाजी भिडे यांच्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेने आयोजित केलेल्या धारातीर्थ यात्रा या गडकोट मोहिमेची आज किल्ले रायगडावर सांगता होत आहे. या सांगता समारंभा निमित्ताने होळीच्या माळावर होणाऱ्या कार्यक्रमात संभाजी भिडे धारकऱ्याना संबोधित करतील. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या उमरठ येथील समाधीचं दर्शन घेऊन 7 फेब्रुवारी रोजी या पदयात्रा मोहिमेला प्ररंभ झाला. राज्यभरातून 80 हजारा पेक्षा अधिक धारकरी या मोहिमेत सहभागी झाले आहेत. आजच्या सांगता कार्यक्रमात संभाजी भिडे धारकऱ्यांना काय मार्गदर्शन करतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Agro News : दहा दिवसानंतर सीसीआयची कापूस खरेदीला सुरुवात

कापूस ठेवण्यासाठी जागा नसल्याच्या कारणावरून सीसीआयने कापूस खरेदी थांबवली होती मात्र दहा दिवसानंतर यवतमाळ जिल्ह्यात सीसीआयने कापूस खरेदी पुन्हा सुरू केली. परंतु नोंदणी होत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्य निर्माण झाले असून सर्व्हर सुरू होत नसल्याने सीसीआयचीसुद्धा कापूस खरेदी करण्याची मानसिकता दिसत नसल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू असून शेतकऱ्यांना मिळेल त्या दरात कापूस खाजगी बाजारात विक्री करण्याची वेळ येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Washim News : वाशीम शहरातील मुख्य रस्त्यांची दुरावस्था वाहनचालकांचे हाल...

वाशीम शहरात सर्वच प्रमुख रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. यात प्रामुख्याने नगरपरिषद ते जिल्हा सामान्य रुग्णालय या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे, पोलिस स्टेशन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मुख्य रस्त्यांची सुद्धा मोठी दुरावस्था झाली आहे. या रस्तावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे चुकवण्याच्या नादात रोज अपघात घडत आहेत. या रस्त्याची इतकी दुरावस्था झाली आहे की, अनेक रस्त्यावरचे डांबर उघडून चुरी उघडी पडली आहे, त्यामुळे अनेकांना धुळीचा त्रास सहन करावा लागतोय. अनेक वेळा मागणी करूनही रस्त्याची परिस्थिती जैसे ते तशीच आहे. त्यामुळे शहरातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

dharashiv : धाराशिव मध्ये शिवजयंती निमित्त शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आकर्षण विद्युत रोषणाई

छञपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीनिमित्त धाराशिवमध्ये जय्यत तयारी करण्यात आली असुन छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आकर्षण अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तसेच पुतळ्याभोवती आकर्षण राजवाड्याचा देखावा साकारण्यात आला आहे. मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समीतीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले मंञी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते या शिवजन्मोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले दरम्यान आगामी 19 फेब्रुवारी पर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

buldhana News : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत खोदलेल्या विहिरीचा तात्काळ अनुदान देण्याची लाभार्थ्यांची मागणी...

बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव, आसा दुधा शिवारातील अनुसूचित जातीतील काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत विहीर खोदली आहे, त्यासाठी राज्य सरकारकडून अडीच लाख रुपयांचे अनुदान देण्यात येते, मात्र तीन महिने उलटूनही अनुदान मिळाले नाही, या शेतकऱ्यांनी व्याजाने पैसे काढून विहिरीचे खोदकाम केले आणि अनुदानासाठी संबंधित कार्यालयामध्ये चकरा मारून ही अनुदान मिळत नसल्याने, संतप्त झालेल्या या शेतकऱ्यांनी बुलढाणा जिल्हा परिषदेच्या जिल्हा कृषी अधिकारी यांची भेट घेत तात्काळ अनुदान खात्यात जमा करण्याची मागणी केली आहे.. अन्यथा कार्यालयातच आत्महत्येचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे...

Beed News : बीड जिल्ह्यातील 43 हजार 756 विद्यार्थी देणार परीक्षा.. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी 106 बैठे पथक..

बारावीच्या परीक्षेला आज पासुन सुरूवात होत आहे. बीड जिल्ह्यातील ४३ हजार ७५६ विद्यार्थी या परीक्षेसाठी बसणार आहेत. बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाकडून परिपूर्ण नियोजन केले आहे. परीक्षा केंद्रावर पूर्णवेळ बैठे पथक राहणार असुन..सात भरारी पथकांची परीक्षा केंद्रांवर नजर राहणार आहे.. तसेच ४९ परीक्षा केंद्रावरील शिक्षक, कर्मचारी बदलले आहेत.. सर्व परीक्षा केंद्र जवळ कलम 144 मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत..

Washim News : पाणी पुरवठा सुरू करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरपंचासह गावातील महिलांचे साखळी उपोषण

वाशिमच्या रिसोड तालुक्यातील वाकद येथे जनजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकीचे काम मुदत संपूनही पूर्ण झाले नाही. त्यामुळे गावातील महिलाना हंडाभर पाण्यासाठी दोन किलोमीटर वरून पायपीट करावी लागत आहे. दरम्यान,पाणी पुरवठा सुरू करण्याच्या मागणीसाठी गावातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर घागर मोर्चा काढल्यानंतर आता सोमवारपासून वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरपंचासह ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील नागरिक साखळी उपोषणाला बसले आहेत.

HSC Exam : अमरावती विभागात १ लाख ५२ हजार ९८२ विद्यार्थी परीक्षेला बसणार,

आजपासून बारावीच्या परीक्षाला सुरवात होणार आहे, अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशीम या पाच जिल्ह्यांतील १ लाख ५२ हजार ९८२ विद्यार्थी 12 वीच्या परीक्षेला बसणार आहेत. ही परीक्षा ५४२ परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे. परीक्षा काळात भयमुक्त व कॉपीमुक्त परीक्षा पार पडावी यासाठी ९ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. या पथकांमध्ये विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, प्राचार्य, तसेच शिक्षण विभागातील महिला अधिकाऱ्यांचे स्वतंत्र महिला भरारी पथक कार्यरत असणार आहे. तर संवेदनशील परीक्षा केंद्रावर ड्रोन कॅमेराची निगराणी असणार आहे,त्यामुळे परीक्षा काळात कोणत्याही प्रकारच्या गैरसाहित्याचा वापर करू नये व परीक्षेला प्रामाणिकपणे सामोरे जावे. परीक्षा केंद्रावर पोलिसांचा कडक तैनात केला जाणार आहे, परीक्षा केंद्राच्या पाचशे मीटर बाहेर झेरॉक्स सेंटर बंद असणार आहे,परीक्षेच्या सुरळीत आयोजनासाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली असून, विद्यार्थ्यांना कोणताही अडथळा येऊ नये यासाठी दक्षता घेतली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT