सरकारने सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते ते पूर्ण करावे विकलेल्या कांद्याला पंधराशे रुपये पर्यंत अनुदान द्यावे शासकीय मका खरेदी केंद्र बंद झालेले मका केंद्र खरेदी पुन्हा सुरू करावे अशा विविध प्रश्नांवर राजापूर, सोमठाण जोश सह परिसरातील गावांमधील शेकडो शेतकऱ्यांनी राजापूर चौफुली येथे महामार्ग रोखून धरला असून जोपर्यंत शासनाचा प्रतिनिधी आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवत नाही तोपर्यंत रास्ता रोको मागे घेणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला होता . पोलीस प्रशासनाने विनंती केल्यानंतर निवेदन देऊन आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले मात्र मागण्या मान्य न झाल्यास पुढील आंदोलन आणखी तीव्र केले जाईल असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे.
सरकारने सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते ते पूर्ण करावे विकलेल्या कांद्याला पंधराशे रुपये पर्यंत अनुदान द्यावे शासकीय मका खरेदी केंद्र बंद झालेले मका केंद्र खरेदी पुन्हा सुरू करावे अशा विविध प्रश्नांवर राजापूर, सोमठाण जोश सह परिसरातील गावांमधील शेकडो शेतकऱ्यांनी राजापूर चौफुली येथे महामार्ग रोखून धरला असून जोपर्यंत शासनाचा प्रतिनिधी आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवत नाही तोपर्यंत रास्ता रोको मागे घेणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला होता . पोलीस प्रशासनाने विनंती केल्यानंतर निवेदन देऊन आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले मात्र मागण्या मान्य न झाल्यास पुढील आंदोलन आणखी तीव्र केले जाईल असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे.
अकोला शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली आहे. अकोला बार्शीटाकळी रस्त्यावरील शिवापूर फाट्याजवळ ही जलवाहिनी फुटली आहेये.. विशेष म्हणजे, जलवाहिनी फुटल्यावर 80 ते 90 फुटांपर्यंत उंच असे पाण्याचे फवारे उडताना पाहायला मिळालेये.. रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर हे पाण्याचे फवारे उडत आहेत.. शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी अक्षरशः रस्त्यावर वाया गेलेये.. याचा फटका अकोला शहराला बसण्याची शक्यता व्यक्त होत असून पाणीपुरवठा विस्कळीत होण्याचा अंदाज व्यक्त होतोय..
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धाराशिव दौऱ्या दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या नाराज शिवसैनिकांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे.दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुमारे ५० शिवसैनिकांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवले होते.या कारवाईमुळे पक्षातील अंतर्गत नाराजी उघडपणे समोर आली आहे.आज हे सर्व कार्यकर्ते खासदार श्रीकांत शिंदे यांची सोलापूर येथे भेट घेऊन आपली कैफियत मांडणार आहेत.तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही भेटण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे.जिल्हा परिषद निवडणुकांपासून सुरू झालेली शिवसेनेतील गटबाजी आता पुन्हा तीव्र होताना दिसत आहे,यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेतील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पंढरपूर येथील तरुणीवर केलेल्या ऍसिड हल्ल्याला आता वेगळे वळण लागले आहे. कोणी अज्ञात आणि हल्ला केला नसून तो स्वतः तरुणीने ऍसिड हल्ला करून घेतल्याचा जबाब पोलिसांना दिला आहे
घरातील कौटुंबिक वाद आणि घरातील कारणांमुळे नैराश्यातून तिने हा प्रकार केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.
नांदेडच्या बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे महादेवाची काठी यात्रा भरली आहे. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेत विविध धार्मिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. साडेतीनशेहुन अधिक वर्षाची परंपरा या यात्रेला लाभली आहे.शिखर शिंगणापूर येथून 28 दिवसाचा पायी प्रवास करून पदयात्रा रविवारी सगरोळी येथे पोहोचली.या संपूर्ण प्रवासात 33 किलो वजनाची काठी खांद्यावर घेऊन वाहिली जाते.शिखर शिंगणापूरहून ही काठी पोहोचल्यानंतर यात्रेला सुरुवात होते.
पिकअप टेम्पो, कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या अपघातात चार तरुण गंभीर जखमी झाले आहेत या अपघातातील तिन्ही वाहनांमध्ये झालेल्या जोरदार धडकेत चार तरुणांना गंभीर दुखापत झाली स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे काही काळ महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. दरम्यान, एक वाहन रॉंग साइडने येत असल्यामुळे हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.
लातूर जिल्ह्यातील खाजगी शिक्षण संस्थांमध्ये पालकांची सर्रासपणे लूट होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे, जिल्ह्यातील अनेक विनाअनुदानित संस्था शाळेतूनच खुलेआमपणे शालेय साहित्याची अव्वाच्या सव्वा किमतीत विक्री करत असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे. शाळेतूनच वही, पुस्तक, स्कूल बॅग, युनिफॉर्म, यासह इतर साहित्याच्या नावाखाली या संस्थांनी शिक्षणाच व्यावसायिकरण केलं, दरम्यान या सगळ्या प्रकाराकडे शिक्षण विभाग कुठलीच कारवाई का करत नाही असा ही महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो आहे .
बातमी बीड मधून बीड शहरातून खळबळजनक घटना समोर आली आहे. एका बालिका आश्रमातून दोन अल्पवयीन मुली संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळी साडेसातच्या सुमारास ही बाब उघडकीस आली, त्यानंतर आश्रम प्रशासनाने तातडीने शोध सुरू केला मात्र दोघींचा कुठेही मागमूस लागला नाही. नातेवाईकांनाही संपर्क साधून खात्री केल्यानंतर अज्ञात व्यक्तीने फूस लावून अपहरण केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून तपास वेगाने सुरू आहे.
धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथील यात्रेदरम्यान भाविकांना अडवून लुटणाऱ्या तीन दरोडेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले.पोलिसांनी आरोपींकडून दोन मोटरसायकलसह सुमारे १ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.यात्रेच्या गर्दीचा फायदा घेत भाविकांना टार्गेट करून ही टोळी चोरी करत असल्याची माहिती समोर आली आहे.या कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत असून,यात्रेकरूंमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
पोलिस कोठडीच्या पहिल्या दोन दिवसांत पोलिसांचे भविष्य सांगणारा भोंदू अशोक खरात आता आपल्याच भविष्याबद्दल चिंतीत असून आपण लवकरच तुरुंगातून बाहेर पडणार नाही, याची खात्री त्याला झाल्याची माहिती तपास पथकातील सूत्रांनी दिली. खरात कोठडीत जास्त बोलत नाही, जेवणही कमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. न्यायालयातील सुनावणी व्हिसीद्वारेच व्हावी, असे खरात अधिकाऱ्यांना वारंवार सांगत आहे. खरातला तपास अधिकाऱ्यांनी पत्नी कल्पना कुठे असेल? याबाबत पुन्हा पुन्हा विचारले असता देवालाच माहीत, असे उत्तर त्याने दिले. मात्र मुलगा हर्षवर्धन हा खरातचा घरात सर्वात लाडका आहे. त्यामुळे मुलाशी फोनवर बोलू देण्याची विनंती तो तपास यंत्रणांना करत असून मुलाची काळजी वाटते, असे तो वारंवार बोलून दाखवतोय, अशी माहितीही सूत्रांनी दिलीय.
लोणी गवळी येथील जिल्हा परिषद शाळेत घडलेल्या गंभीर पॉक्सो प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आमदारांनी अचानक भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी महिला पालकांशी संवाद साधून त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. दोषींवर कठोर कारवाई होईल व आरोपीला कायद्यानुसार शिक्षा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शाळेत एकूण १७७ विद्यार्थी असून त्यापैकी ८८ विद्यार्थिनी आहेत, मात्र एकही महिला शिक्षिका कार्यरत नसल्याचे समोर आले.
किरकोळ कारणावरून जोरदार हाणामारी,नाचकाम करणाऱ्या महिलांना ही मारहाण झाल्याचा आरोप तर मारहाणीत महिला ही जखमी
हातात कोयते रॉड तलवारी घेऊन घातला गोंधळ, महिलांच्या गळ्याला कोयते लावून रोख रक्कम व सोने नेहल्याचं तक्रारीत उल्लेख
महिलांना मारहाण करणाऱ्या तरुणांनी पूर्ण कला केंद्र टाकले फोडून
तर कला केंद्र चालवणाऱ्या येडशी गावातील एका तरुणाला विनाकारण मारहाण केली म्हणून गावातील तरुण जाब विचारायला गेले असता कला केंद्र चालकांनी मारहाण केल्याचाही ही आरोप
जेवणाच्या आमंत्रणावरून जयंत पाटील, विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांच्यामध्ये चांगलीच टोलेबाजी रंगली. एवढ्या वर्षात जयंत पाटलांनी कधीच जेवणाला बोलावलं नाही.. कधी नाही ते, जयंत पाटलांनी जेवायला बोलावल्याने त्यांच्या घरी जेवण कसं असतं..ते बघायला आलो आहे.. आणि जेवणामुळे भाषण करायची वेळ आली, असं मिश्किल विधान खासदार विशाल पाटलांनी केलं.. तर विशाल पाटलांच्या विधानावरून आमदार विश्वजीत कदम यांनी देखील तुमचं जेवण झालं..आता पुढची बारी आमची असेल आणि आमचा पाहुणचार जोरात असतो..असे विधान केले. तर हे जेवण आपलं नाही,जिल्हा परिषद अध्यक्षांचा आहे.. पण आपलं जेवण नक्की देऊ,असा मिश्किल खुलास आमदार जयंत पाटलांनी यावेळी केला..त्यामुळे एकाच हशा पिकला.. सांगलीच्या कासेगाव येथे जिल्हा परिषद अध्यक्षांच्या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमांमध्ये या तिन्ही नेत्यांमध्ये ही टोली बाजी रंगली.
- तिसऱ्या गुन्ह्यात अशोक खरातला देण्यात आली होती ५ दिवसांची पोलीस कोठडी
- खरात विरोधात दाखल महिला लैंगिक अत्याचाराच्या चौथ्या गुन्ह्यात SIT कडून आज पुन्हा खरातच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार
- मागील काही दिवसांपासून SIT कडून या प्रकरणाची कसून सुरूय चौकशी
- खरातने केलेले अनेक काळे कारनामे झाले आहेत उघड
- अशोक खरातच्या ईशानेश्वर मंदिर, नाशिकचे कार्यालय आणि वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या जमिनीची ईडी अधिकाऱ्यांनी पाहणी केल्याची सूत्रांची माहिती
- SIT अधिकाऱ्यांसोबत ईडी पथकाची संयुक्त कारवाई सुरू झाल्याची माहिती
- प्रॉपर्टीची मोजणी आणि सध्याच्या बाजारमूल्याचा तपास
- प्रॉपर्टी जमा करण्यामागील उद्देश काय? याचा शोध सुरू
- काही प्रॉपर्टीजमध्ये पार्टनर का लावले? याचाही तपास
- सील केलेल्या बँक खात्यांवरील व्यवहारांचं देखील विश्लेषण सुरू
- नाशिकमध्ये यंदाच्या हंगामातील सर्वाधिक ३९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
- नाशिककर घामाघूम, दुपारी बाहेर पडणे कठीण, उकाडा आणि दमटपणामुळे नागरिक त्रस्त
- मागील काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ
- पुढील 5 दिवस उष्णतेची तीव्रता वाढणार, हवामान विभागाचा अंदाज
- तिसऱ्या गुन्ह्यात अशोक खरातला देण्यात आली होती ५ दिवसांची पोलीस कोठडी
- खरात विरोधात दाखल महिला लैंगिक अत्याचाराच्या चौथ्या गुन्ह्यात SIT कडून आज पुन्हा खरातच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार
- मागील काही दिवसांपासून SIT कडून या प्रकरणाची कसून सुरूय चौकशी
- खरातने केलेले अनेक काळे कारनामे झाले आहेत उघड
- धर्मांतराचा प्रयत्न प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणा सक्रिय
- केंद्रीय तपास यंत्रणांकडून गोपनीय पद्धतीने प्रकरणाची चौकशी सुरू, सूत्रांची माहिती
- संबंधित गुन्हा करण्यामागे संघटित प्रयत्न आहेत का? यात काही खास मॉड्यूल अथवा विशिष्ट नेटवर्क सामील आहे का? संशयितांना कुठून फंडिंग येत होत का? याचा तपास सुरू असल्याची सूत्रांची माहिती
- बड्या कॉर्पोरेट, IT क्षेत्रातील नामांकित कंपन्यांमध्ये विशिष्ट विचारसरणीच्या लोकांचे नेटवर्क तयार करून मोक्याची पदं काबीज केली जात असल्याचा संशय
- कंपनीचे अंतर्गत अहवाल, सीसीटीव्ही फुटेज, ईमेल, कॉल रेकॉर्डचीही तपासणी केली जात असल्याची माहिती
सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे राज्य शासनाने शिधापत्रिकेवरून ब्रोकोल देण्याचा निर्णय घेतला आहे प्रति लिटर 62 रुपये या दराने हे रॉकेल उपलब्ध करून दिले जाणार आहे शासनाकडून कमी पुरवठा झाल्याने नगरपालिका क्षेत्र वगळण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे त्यामुळे केवळ ग्रामीण भागातील अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनाच या रॉकेलचा पुरवठा केला जाणार आहे.
पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीचा कणा समजल्या जाणाऱ्या पीएमपीच्या सेवेचा दर्जा घालवल्याने प्रवाशांची पाठ फिरवली असून दरमहा तब्बल एक लाख फेरा रद्द होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे परिसर संस्थेने आयोजित केलेल्या विबिनार मध्ये 2025 च्या सांख्यिकीय माहितीचे विश्लेषण केले असून यात पीएमपीच्या दुरावस्थेची चित्र स्पष्ट झाले आहे....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.