Maharashtra News Live Update: Saam TV Marathi news
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी आरोपी शुभम खैरनारला ५ दिवसांची CBI कोठडी

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा, देशात इंधनाचा पुरवठा किती? राज्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस, राजकीय घडामोडी, पेट्रोल-डिझेलची बचत करा, विदर्भाला उन्हाचा तडाखा, देशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

नीट पेपरफुटी प्रकरणी आरोपी शुभम खैरनारला ५ दिवसांची CBI कोठडी

नीट पेपरफुटी प्रकरणात आरोपी शुभम खैरनारला न्यायालयाने पाच दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. सीबीआयने न्यायालयाकडे केलेली मागणी न्यायालयाने मान्य केली आहे.

jalna : जालन्यातील बदनापुर तालुक्यातील सोमठाणा रोडवर चंदंनझीरा पोलिसांची कारवाई

जालन्यातील बदनापुर तालुक्यातील सोमठाणा रोडवर चंदंनझीरा पोलिसांनी कारवाई करत गुटखा भरलेले वाहन जप्त केल आहे. या कारवाईत पोलिसांनी 25 लाखांचा आणि 8 लाखांचे वाहन असा 33 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. तर दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. चंदनझिरा पोलिसांनी सापळा रचून गुटखा भरलेले वाहन पकडले आहे. या कारवाईमुळे गुटखा तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Pune : नीट पेपर फुटी प्रकरणात मोठी अपडेट; त्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न १०० टक्के जुळले? 

रसायनशास्त्र च्या "गेस पेपर" आणि मूळ प्रश्नपत्रिकेतील प्रश्न १०० टक्के जुळले?

नीट पेपरफुटी प्रकरणात एन टी ए मधील "ते" फुटीर कोण?

एन टी ए कडून अंतर्गत तपासणी दरम्यान २७ जणांची नावे समोर?

एन टी ए कडून सी बी आय ला २७ जणांची यादी सुपूर्द, सूत्रांची माहिती

रसायनशास्त्राच्या पेपर संबंधित २७ जणांचा या यादीत समावेश

२७ जणांपैकी काही जणं पेपर सेटर तर काही जणं ट्रान्सलेटर?

या यादीत काही प्राध्यापकांच्या नावाचा सुद्धा समावेश

jaogaon : पंपावर इंधन मिळेना; शरद पवार गटाकडून आंदोलनाचा इशारा  

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने आज आंदोलनाचा इशारा दिलाय

प्रत्येक तालुक्यात चार पेट्रोल पंप शेतकऱ्यांसाठी डिझेल पेट्रोल उपलब्ध करून द्यावे, नाहीतर अधिकाऱ्यांना व नेत्यांना फिरू देणार नाही, अशा इशा देण्यात आलाय.

दोन दिवसानंतर राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक होणार

nashik : नाशिकच्या पार्किंगच्या वादातून थेट हाणामारी; कोयता उगारत परिसरात दहशत

नाशिकच्या अंबडमध्ये पार्किंगच्या वादातून थेट हाणामारी

कोयता उगारत परिसरात दहशत

छत्रपती संभाजी स्टेडियम मागील मालपाणी मार्केट परिसरातील घटना

मालवाहतूक गाडी पार्किंगवरून दोन गट आमनेसामने

५० वर्षीय शांताराम आव्हाड यांच्यावर लाकडी दांड्याने हल्ला

तोंड आणि छातीवर मार लागल्याने आव्हाड जखमी

Pune: पुण्यातील बालाजीनगर गोळीबार प्रकरण, आंदेकर टोळीवर गुन्हा दाखल

पुणे -

पुण्यातील बालाजीनगर गोळीबार प्रकरण

बंडू आंदेकर आणि आंदेकर टोळीवर गुन्हा दाखल

बदल्याची भूमिकेतून आंदेकर टोळीने अक्षय म्हस्के वर हल्ला केल्याची पोलिसात तक्रार

वनराज आंदेकर खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने रचला अक्षय म्हस्के ला मारण्याचा कट

सहकारनगर पोलिस ठाण्यात बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, रामजी आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर यांच्यासह आणखी ५ जणांवर गुन्हा दाखल

गोळीबारात जखमी अक्षय म्हस्के वर रुग्णालयात उपचार सुरू

Pune: मनिषा मांढरेच्या लॉकरमधून सीबीआयला मिळालेल्या जुन्या प्रश्नपत्रिका

पुणे -

मनिषा मांढरे च्या लॉकर मधून सीबीआयला मिळालेल्या जुन्या प्रश्नपत्रिका

मनिषा मांढरे च्या लॉकर ची सी बी आय कडून झडती

मांढरे शिकवत असलेल्या मॉडर्न महाविद्यालयाच्या कार्यालयात सी बी आय कडून झडती

सी बी आय ला मनिषा मांढरे च्या लॉकर मधून मिळाले काही कागदपत्र

पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मनिषा मांढरे सी बी आय कोठडीत

Pune : बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर यांच्यासह 3 जणांवरती सहकारनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

पुणे -

बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर यांच्यासह तीन जणांवरती सहकारनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

अक्षय म्हस्के याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

पुणे पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू

अक्षय मस्के याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात बंडू आंदेकर कृष्ण आंदेकर च्या अडचणी वाढल्या

Nashik:  कांदा परिस्थितीच्या पाहणीसाठी नाफेडचे केंद्रीय पथक नाशिकमध्ये

नाशिक -

- कांदा परिस्थितीच्या पाहणीसाठी नाफेडचे केंद्रीय पथक नाशिकमध्ये

- नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती

- नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या घेणार जाणून बाजार समित्यांमध्ये समितीकडून पाहणी सुरू

- उद्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा करणार

- शेतकऱ्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने नाफेडचे केंद्रीय पथक नाशिकमध्ये

Amravati: अमरावतीमध्ये अल्पवयीन मुलीवर २ तरुणांनी घरात घुसून केला जीवघेणा हल्ला

अमरावती -

अमरावतीच्या दर्यापूर शहरात एका अल्पवयीन मुलीवर दोन युवकांनी घरात घुसून त्या मुलीच्या अंगावर धारदार शस्त्राने वार करण्याचा प्रयत्न केला .

दर्यापूरच्या आनंद नगर परिसरात घटना.. दोन दिवसांपूर्वी याच परिसरात एका तरुण युवकाची निर्गुण हत्या करण्यात आली होती .

आज पुन्हा दोन युवकांनी तोंडाला रुमाल बांधून त्या अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून त्या मुलीच्या मानेवर व हातावर वार करून तिला जखमी केले आहे.

Bhayandar: मिरा-भाईंदर महानगर पालिकेबाहेर आंदोलनादरम्यान गंभीर जखमी झालेल्या सफाई कामगार महिलेचा मृत्यू

मिरा-भाईंदर -

मिरा-भाईंदर महानगर पालिकेबाहेर आंदोलनादरम्यान गंभीर जखमी झालेल्या सफाई कामगार महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

आशा साहनी (वय ४२) असे मृत महिलेचे नाव असून त्या सफाई कामगार म्हणून कार्यरत होत्या.

वाढीव ग्रॅज्युइटी आणि पगाराच्या मागण्यांसाठी मिरा-भाईंदर महानगरपालिकेतील सफाई कर्मचारी काल महानगरपालिका गेटसमोर आंदोलन करत होते.

यावेळी झालेल्या गोंधळात आशा साहनी यांच्या पायावरून बस गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या.

नाशिकमधील नांदगावमध्ये अवकाळी पावसाला सुरुवात

- नांदगावी अवकाळी पावसाचा तडाखा...

- वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह दमदार पावसाची हजेरी...

- दिवसभराच्या उकाड्यानंतर शहरी भागात कमालीचा गारवा...

- तर ग्रामीण भागात शेतकरी वर्गाचे हाल...

- या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान होण्याची शक्यता...

- शेतात काढून ठेवलेला कांदा भिजण्याची शक्यता,शेतकरी चिंतेत

पनवेलमध्ये संतापजनक प्रकार! अमरधाम स्मशानभूमीत पाणीच नसल्याने मयतावर 'बिसलेरी'च्या पाण्याने विधी करण्याची नामुष्की 

एकीकडे पनवेल महानगरपालिका स्मार्ट सिटीच्या गप्पा मारत असताना, दुसरीकडे मात्र अत्यंत संतापजनक आणि माणूसकीला काळिमा फासणारा प्रकार समोर आला आहे. पनवेल शहरातील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी पाणीच उपलब्ध नसल्याने, नातेवाईकांना चक्क 'बिसलेरी'च्या (पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर) बाटल्या विकत आणून अंतिम विधी करावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

वांद्रे येथे अतिक्रमण, स्थानिकांची दगडफेक

अतिक्रमणावरील कारवाईला विरोध

स्थानिकांकडून दगडफेक करण्यास सुरुवात

बीडच्या वाघिरा फाट्यावर भीषण अपघात 

अहमदपूर ते अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर वाघिरा फाट्यानजीक आज दुपारी 3.30 झालेल्या भीषण अपघातात सैन्यदलात नुकताच भरती झालेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शिवराज मोटेगावकराचे नवनवीन काळे कारनामे समोर, लातूरमध्ये अनधिकृत 8 भूखंड खरेदी केल्याची धक्कादायक माहितीसमोर 

नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयच्या ताब्यात असणाऱ्या प्राध्यापक शिवराज मोठेगावकरचे नवनवीन कारणाने समोर येत आहेत, मोठेगावकर आणि त्याच्या नातेवाईकाच्या नावावर लातूर शहरात कोट्यावधी रुपयाची संपत्ती असल्याची माहिती समोर येत आहे, लातूर शहरातल्या उद्योग भवन परिसरात साडेसहा कोटी रुपयात आठ भूखंड खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे .. दरम्यान उद्योग भवन परिसरातील जागा हस्तांतरित किंवा खरेदी करता येत नसल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली आहे.

Mumbai : मुंबईतील वांद्रे भागात अतिक्रमण कारवाईला विरोध, पोलिसांचा लाठीचार्ज

मुंबईतील वांद्रे भागात अतिक्रमण कारवाईला विरोध होताना दिसत आहे. यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागत आहे.

नीट परीक्षा घोटाळा नंदुरबार मध्ये शिवसेना आक्रमक

नीट परीक्षेतील कथित पेपर फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ युवासेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नंदुरबार मध्ये निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. नीट परीक्षा लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असून पेपर फुटीमुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरत असल्याचा आरोप करण्यात आला.

जालना जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांना 5% इंधन साठा राखीव ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश 

इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचा निर्णय घेत सर्व पेट्रोल पंपांना पाच टक्के इंधनसाठा राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहे तर पेट्रोल पंपावर कॅन,बाटली किंवा प्लास्टिक कंटेनर मध्ये पेट्रोल डिझेल देण्यास देखील बंदी घातली आहे या संदर्भात जालना जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश पारित केले आहेत. दरम्यान जालना जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवरती नागरिकांची डिझेल खरेदी करण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे त्या पार्श्वभूमी जालना जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे

केवायसी केली सगळं केलं तरी पैसे मिळाले नाही, लाडक्या बहिणी कलेक्टर ऑफिसमध्ये संतप्त झाल्या

हिंगोलीत राज्य सरकारच्या विरोधात लाडक्या बहिणी संतप्त झाल्या आहेत केवायसी अपडेट करून देखील मागील तीन महिन्याचे लाडक्या बहिणीचे अनुदान खात्यावर मिळाले नसल्याने या लाडक्या बहिणी आज जिल्हाधिकारी कार्यालयात धडकल्या .

चिंचणीतील वृक्षारोपण कार्यक्रमात गोंधळ; ग्रामस्थांचा भर कार्यक्रमात विरोध

शिरूर तालुक्यातील चिंचणी येथे ग्रामपंचायतीच्या गायरान जमिनीवर सुरू असलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमादरम्यान गोंधळाची घटना घडली.

Sindhudurg: औषध विक्रेत्यांचा सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

ऑनलाईन औषध विक्रीच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या संपाला सिंधुदुर्गातूनही पाठिंबा देण्यात आला आहे. या संपाच्या पाश्र्वभूमीवर औषध विक्रेत्यांनी आज सिंधुदुर्ग जिल्हाधीकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६५० रिटेल औषध विक्रेते या संपात सहभागी झाले आहेत. देशातील सध्याच्या 'ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट'मध्ये ऑनलाईन औषध विक्रीबाबत कोणताही कायदेशीर बदल झालेला नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेली ऑनलाईन औषध विक्री पूर्णपणे बेकायदेशीर असून त्यावर सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही ही विक्री त्वरित बंद व्हावी या प्रमुख मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

Dhule: धुळे पोलीस दलात आजपासून 'हेल्मेट सक्ती' लागू

'कायद्याच्या रक्षकांनीच नियम मोडले, तर सर्वसामान्यांना काय शिस्त लावणार?' याच भूमिकेतून धुळे जिल्ह्यात आजपासून संपूर्ण पोलीस दलासाठी कडक 'हेल्मेट सक्ती' लागू करण्यात आली आहे, पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या निर्देशानुसार आजपासूनच या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि दंडात्मक कारवाईला सुरुवात झाली आहे, आता जर एखादा पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी विनाहेल्मेट दुचाकी चालवताना आढळला, तर त्याला केवळ दंडच भरावा लागणार नाही, तर मोटार वाहन कायद्याचा जाणीवपूर्वक भंग केल्याचा ठपका ठेवत त्याच्या थेट 'सेवापुस्तकात' म्हणजेच सर्व्हिस बुकमध्ये या वर्तणुकीची नोंद केली जाणार आहे,

Vidarbha: विदर्भात तापमानाचा पारा 46 पार...

सध्या संपूर्ण महाराष्ट्र होरपळतोय, पण विदर्भातील अमरावती जिल्ह्यात मात्र उन्हाने अक्षरशः कहर केला आहे. अमरावती शहर आणि संपूर्ण जिल्ह्यात तापमानाने आतापर्यंतचे सर्व उच्चांक मोडीत काढले आहेत, काल अमरावतीचा पारा 46.8 अंशा पार गेला होता ,सूर्य जणू काही आग ओकतोय आणि यामुळे अमरावतीकरांचा जीव कासावीस झालाय."आज आणि उद्या अशीच उष्णतेची लाट कायम राहणार आहे तर 22 नंतर उष्णतेमध्ये घट होणार आहे ,शहरात कुलर आणि एसी लावूनही उन्हापासून सुटका मिळत नाहीये.त्यातच वाढत्या तापमानामुळे उष्माघात होण्याचा धोका वाढला असून,जिल्हा प्रशासनाने नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे."

Yewala: कृषी उत्पन्न बाजार समिती येवल्यात कांद्याचे दर कोसळले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नाफेड व एनसीसीएफ च्या माध्यमातून 1235 रुपये प्रतिक्विंटल भाव देण्याचे जाहीर केले यानंतर देखील नाशिकच्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा दर कोसळले असून,येवल्यात सकाळ सत्रात लिलावा मध्ये किमान कांदा हा 200 रुपये प्रति क्विंटल गेल्याने कांदा शेती परवडत नसल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे असे शेतकऱ्यांनी सांगितले.

Nashik: नाशिक महापालिकेची थोड्याच वेळात महासभा

नाशिक महापालिकेची थोड्याच वेळात महासभा

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महासभेवर आचारसंहितेचे सावट

शहरातील रस्ते, वाहतूक कोंडी, पाणी प्रश्न यावरून गदारोळाची शक्यता

म्हाडा घोटाळ्यातील अधिकाऱ्यांना पाठीशी घालू नका, नगरसेवकांची मागणी

Dhule: धुळे जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांचा आपल्या मागण्यांसाठी पायी मूक मोर्चा

अखिल भारतीय औषध विक्रेत्यांतर्फे आज बेकायदेशीर ऑनलार्सन औषध विक्री आणि कार्पोरेटद्वार अव्यावसायिक होणारी स्पर्धा याविरोधात देशव्यापी बंद पुकारला आहे, या बंदमध्ये धुळे शहर व जिल्ह्यातील 1800 औषधी विक्रेते सहभागी झाल्याचे माहिती जिल्हा केमिस्ट असोसिएनने दिली आहे, शिरपूर शहरातील विक्रेत्यांनी आज शहरातील करवंदनाका येथून तहसील कार्यालयापर्यंत हातात फलक व काळया पट्ट्या बांधून पायी मूक मोर्चा काढला,

पेट्रोल डिझेल पॅनिक होऊन खरेदी करु नका- देवेंद्र फडणवीस

सध्या पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहेत. याचसोबत इंधनाचा तुटवडा होत असल्याच्या बातम्या सगळीकडे पसरत आहेत. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी महत्त्वाचे आवाहन केले आहे. पेट्रोल डिझेल पॅनिक होऊन खरेदी करु नका असं त्यांनी म्हटलं आहे.

Phaltan: फलटणमध्ये ‘कोयता गँग’ची दहशत; जिंती नाक्यावर तरुणांचा हैदोस

फलटण शहरात पुन्हा एकदा ‘कोयता गँग’ची दहशत पाहायला मिळाली असून जिंती नाका परिसरात काही तरुणांनी भररस्त्यात कोयता उगारून दहशत माजवल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा CCTV व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिंती नाका परिसरात सायंकाळ च्या सुमारास काही तरुणांनी हातात कोयते घेऊन रस्त्यावर धुडगूस घातला. यावेळी परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. काही वाहनचालकांनीही भीतीपोटी आपला मार्ग बदलल्याचे सांगितले जात आहे.

हिंगोलीत पेट्रोल डिझेलचा तुटवडा, शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचले

हिंगोलीत शेतकरी डिझेलच्या रिकाम्या कॅन घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले

डिझेल कॅन मध्ये मिळत नसल्याने हतबल शेतकऱ्यांचे निवासी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालय आंदोलन

शेतकऱ्याला डिझेल उपलब्ध करून द्या अन्यथा आत्महत्येची परवानगी द्या डिझेल अभावी अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची मागणी

Nashik: उष्णतेचा दूध डेअरी व्यवसायाला फटका; दूध खराब होऊन उखरड्यावर फेकण्याची वेळ

गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तीव्र उष्णतेचा फटका आता दूध डेअरी व्यवसायिकांना बसू लागला आहे नाशिकच्या लासलगाव परिसरातील तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे गेल्याने दूध साठवण आणि वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होत असून, दूध खराब होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे खराब झालेले दूध उखरड्यावर फेकण्याची वेळ आल्याने डेअरी चालक आणि दूध व्यवसायिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

यवतमाळात औषधी विक्रेत्यांचा भव्य मुक मोर्चा

यवतमाळ शहरात केमिस्ट अॅड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने भव्य मुक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. ऑनलाईन औषधी विक्रीवर बंदी घालावी,स्थानिक औषध विक्रेत्यांचे संरक्षण करावे आदी मागण्यांसाठी शहरातील प्रमुख मार्गाने मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने औषध विक्रेते सहभागी झाले होते. प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

Satara : नगरसेवक निशांत पाटील यांना अपात्र करा-सुशांत मोरे यांची मागणी

सातारा पालिका निवडणुकीवेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप करत भाजप नगरसेवक निशांत पाटील यांना अपात्र घोषित करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली असून 2 जून रोजी सुनावणी होणार आहे.तसेच निशांत पाटील यांनी नैतिकतेच्या आधारावर नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही मोरे यांनी केली आहे.

Accident News : अकोला-शेगाव रस्त्यावर ट्रॅव्हल्स आणि दुचाकीचा अपघात.

अकोला जिल्ह्यातील बाळापूर-शेगाव रस्त्यावरील 'स्वस्थीक ट्रँव्हलस'ची बस ही इंदौर वरुन अकोला येत होती. या बस खाली टुव्हीलर येऊन बसचे टायर फुटले आणि टुव्हीलर बस खाली अडकल्याने ट्रॅव्हल्सने पेट घेतला.

ही बस जळुन खाक झाली आहे. या अपघातामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नाही. ट्रॅव्हल्स मधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

मात्र, दुचाकीचा चालक हा जखमी झाला आहे.

Jalna : जालना जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही इंधन तुटवडा

जालना जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही इंधन तुटवडा

जालना शहरातील एसआरपीएफच्या पंपावर नो स्टॉकचे फलक

Railway News : उन्हाळी सुट्टीत गावी आलेले मुंबईकर चाकरमानी निघाले परतीच्या प्रवासाला

उन्हाळी सुट्टीत कोकणात गावी आलेले मुंबईकर चाकरमानी सध्या परतीच्या प्रवासा निघाले आहेत.

सिंधुदुर्गातील सगळ्याच रेल्वे स्थानकात चाकरमान्यांची लगबग पाहायला मिळत आहे. मालवणी भ्याट सोबत घेऊन हे चाकरमानी पुन्हा कामधंद्या निमित्त मुंबईकडे निघाले आहेत.

या चाकरमान्यांना सध्या रेल्वेच्या विस्कळीत सेवेचा फटका बसत आहे.

दर दिवशी ट्रेन नियोजित वेळेच्या एक ते दिड तास उशीराने धावत आहेत. तर हॉलीडे स्पेशल ट्रेन ह्या चार ते पाच तास उशीरा दाखल होत आहेत.

Nashik : नाशिकमध्ये मेडिकल असोसिएशनच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

* नाशिकमध्ये मेडिकल असोसिएशनच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

* नाशिक जिल्ह्यातील ९ हजारांहून अधिक केमिस्ट संपात सहभागी

* ऑनलाइन औषध विक्रीविरोधात केमिस्ट संघटना आक्रमक

* मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास बेमुदत संपाचा इशारा

* नाशिक शहरातील शंभर टक्के मेडिकल दुकाने आज बंद

Dollar Rates : डॉलरच्या तुलनेत रुपया ४० पैशांनी घसरला

Ahilyanagar : एकाच शेतात पंधरा दिवसात चौथा बिबट्या जेरबंद

श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावात गेल्या पंधरा दिवसात चौथा बिबट्या जेरबंद झाला आहे.. गीताराम ढोकचौळे यांच्या शेतात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात आज चौथा बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.. खंडाळा गावात बिबट्यांची मोठी दहशत निर्माण झाली असून शेतकरी,शेतमजूर आणि ग्रामस्थांना काम करणे जिकरीचे झाले आहे.

Pune : पुण्यातील बालाजी नगरमध्ये गोळीबार

पुण्यातील बालाजी नगरमध्ये गोळीबार

फायरिंग मध्ये एक जण गंभीरित्या जखमी

जुन्या वादातून फायरिंग झाल्याची माहिती

घटनास्थळी पोलीस दाखल

Solapur : सोलापुरात औषध विक्रेत्यांचा मोर्चा निघाला

- सोलापुरात औषध विक्रेत्यांचा मोर्चा निघाला

- ऑनलाइन औषध विक्री विरोधात आज सोलापूर सह देशभरात बंद पुकारण्यात आलाय

- सोलापुरातील चार हुतात्मा स्मारकापासून औषध विक्रेत्यांच्या मोर्चाला सुरुवात

- सोलापूर शहरातील जवळपास 4 हजार मेडिकल दुकान आज असणारे आहेत बंद

- सोलापुरातील पूनम गेट परिसरात मोर्चाचे होणार सभेत रूपांतर

Hingoli : इंधन टंचाई आणि दरवाढीचा फटका, भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले

इंधन टंचाई आणि दरवाढीचा फटका आता भाजीपाल्याला बसला आहे भाजीपाल्याचे दर इंधन टंचाईमुळे गगनाला भिडल्याने सर्वसामान्य ग्राहकांनी गृहिणींचे बजेट कोलमडले आहे

हिंगोलीच्या भाजी मंडई परिसरात आठ दिवसांपूर्वी शेवगा तीस रुपये होता आता या शेवग्याचा प्रति किलो दर 50 रुपये झाला आहे.

तर फूलकोबी, शिमला मिरची, भेंडी, टोमॅटो, बैंगन अशा सर्वच भाजीपाल्यांचे दर कडाडले आहेत

जालन्यात गॅस टंचाईचा फटका,पुरीभाजीच्या दरात 10 रुपयांनी वाढ

जालन्यात गॅस टंचाईचा फटका,पुरीभाजीच्या दरात 10 रुपयांनी वाढ

गॅस टंचाई आणि वाढत्या दरामुळे जालन्यात पुरीभाजी महागली

जालना शहरातील मंठा चौफुली परिसरातील एका हॉटेलबाहेर लावण्यात आले दरवाढीचे फलक

Nagpur : १ जुलैपासून HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई

- २०१९ पूर्वीच्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बंधनकारक

- नागपुरातील जवळपास निम्म्या वाहनांवर अजूनही HSRP नाही

- HSRP बसवण्यासाठी ३० जूनपर्यंत अंतिम मुदतवाढ

- १ जुलैपासून नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई

- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही वाहनचालकांचा हलगर्जीपणा

सायकल वापरा, कमी अंतर असेल तर पायी जा - जिल्हाधिकाऱ्यांचा अजब सल्ला

नांदेड जिल्ह्यात देखील इंधन टंचाईची झळ वाहनधारकांना सोसावी लागतीये.

नांदेडमध्ये अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलचा साठा संपला, त्यामुळे वाहनधारकांची मोठी परवड होत आहे.मात्र तरीही नांदेडमध्ये इंधन साठा समाधानकारक असल्याचा दावा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केला.

डिझेल , पेट्रोल घेण्यासाठी कॅन आणि भांडे घेऊन जाऊ नका असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.तसच प्रधानमंत्री यांनी जे आवाहन केले त्या नुसार ज्या ठिकाणी सायकलने जाऊ शकता , किंवा कमी अंतर असेल तर पायी जाऊ शकता तर या आवाहनाला प्रतिसाद द्या , इंधन जपून वापरा असा अजब सल्ला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिला.

Pune : विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर विद्यापीठातील अभियांत्रिकी परीक्षा पुढील महिन्यात होणार

विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर विद्यापीठातील अभियांत्रिकी परीक्षा पुढील महिन्यात होणार

काल अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे आठवड्यानंतर घ्यायला यासाठी आंदोलन केलं होतं

20 मे ला विद्यापीठाकडून परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं होतं आता या परीक्षा 20 जून नंतर होणार आहेत

सविस्तर वेळापत्रक विद्यापीठाकडून लवकरच जारी केले जाईल मात्र आता परीक्षा रद्द केल्याची विद्यापीठाने जाहीर केला आहे

Nagpur : ऑल इंडिया मेडिकल संघटनेच्या बंदचा नागपूर येथील रुग्णांवर परिणाम

- ऑल इंडिया मेडिकल संघटनेच्या बंदचा नागपूर येथील रुग्णांवर परिणाम.

- नागपूरच्या मेडिकल चौकातील २४ तास सुरू असणारी सर्व मेडिकल शॉप बंद..

- मेडप्लस ,अपोलो फार्मसी,वेलनेस फॉरेव्हर सारख्या फार्मसी सुरू..

- शहर आणि ग्रामीण मधील जवळपास सात हजार मेडिकल शॉप राहणार बंद..

- अति आवश्यक औषधी लागल्यास औषध निरीक्षकाची संपर्क साधावे अन्न औषध प्रशासना विभागाचे आवाहन.

नाशिक महानगरपालिकेची आज होणार ऑफलाईन महासभा

- नाशिक महानगरपालिकेची आज होणार ऑफलाईन महासभा

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहननंतर ऑनलाइन महासभा घेण्याचा झाला होता निर्णय

- मात्र नगरसेवकांचा विरोध झाल्यानं ऑफलाईन महासभा होणार

- शहरातील संथ गतीने सुरू असणारी विकास कामे , वाहतूक कोंडी, अनियमित पाणीपुरवठा, म्हाडा घोटाळ्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांविरोधात संशयाचे वातावरण

- अशा विविध कारणांमुळे आजची सभा वादळी ठरण्याची शक्यता

Washim : ऑनलाईन औषध विक्रीविरोधात आज एक दिवसीय देशव्यापी बंद

बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांकडून निर्माण होत असलेल्या अन्यायकारक स्पर्धेविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने (AIOCD) आज एक दिवसीय देशव्यापी बंदची हाक दिली असून,यात वाशिम जिल्ह्यातील केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन सर्व औषध विक्रेते सहभागी झाले झाले आहेत. यावेळी औषध विक्रेत्यांनी वाशिमच्या पाटणी चौकात घोषणाबाजी करत आंदोलन केलं

नाशिक जिल्ह्यातील ६५ हजार ७५६ शेतकऱ्यांना तब्बल ७३ कोटी ३४ लाख रुपयांची मदत जाहीर

* मार्चमधील अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून मोठा दिलासा

* नाशिक जिल्ह्यातील ६५ हजार ७५६ शेतकऱ्यांना तब्बल ७३ कोटी ३४ लाख रुपयांची मदत जाहीर

* डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत जमा होणार

* दिंडोरी, कळवण, नांदगाव, नाशिक, देवळा, मालेगाव, सटाणा, सिन्नर, चांदवड आणि निफाड तालुक्यांना बसला होता अवकाळीचा मोठा फटका

nashik-manmad-मनमाड मधील तरुणांच्या हत्ये प्रकरणी सहा जणांना अटक

नाशिकच्या मनमाड मध्ये रविवारी मध्ये रात्री सुदर्शन चव्हाण या तरुणांची हत्या झाली होती,या प्रकरणी मनमाड पोलिसांनी मुख्य आरोपीसह 6 जणांना अटक केली असून,यातील 2 आरोपी आद्यप फरार आहे,हत्या झालेला सुदर्शन चव्हाण हा कामाला मुंबई येथे असला तरी तो मूळचा मनमाड येथील असल्याने तो 15 तारखेला मनमाड येथे आला होता,आणि त्याचा साखरपुडा झाला होता,मात्र पूर्व वैमानस्यातून रात्री त्याच्यावर घाव घालण्यात येऊन त्याचा खून करण्यात आला,या प्रकरणी मनमाड पोलिसांनी अवघ्या काही तासात 6 आरोपींना जेर बंद केले असून, अन्य 2 आरोपी फरार असल्याने पोलीस त्यांचा शोध घेत आहे

Maharashtra News Live Update : जालना जिल्ह्यातील पेट्रोलपंपांवर नागरिकांची तुफान गर्दी

जालना जिल्ह्यातील पेट्रोलपंपांवर नागरिकांची तुफान गर्दी,

डिझेल खरेदीसाठी शेतकरी कॅन घेऊन रांगेत उभाच....

जालना मंठा रोडवरील सिंधी काळेगाव परिसरातील पेट्रोल पंपावर डिझेल खरेदीसाठी नागरिकांची गर्दी..

डिझेल भेटत नाही शेतीचे कामे पूर्ण होणार नाही शेतकऱ्यांनी कसं जगायचं सरकारला कंटाळून शेतकरी आत्महत्या करतो शेतकऱ्यांचा संताप..

जिल्ह्यात पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी टाळावी,इंधनाचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याच प्रशासनाचा आवाहन...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Price: मुंबईत पेट्रोल ५ रुपये स्वस्त दराने मिळणार; मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी

ST NCMC Card: एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक

अंबाबाईला अडीच कोटींचा सोन्याचा कळस, दीड किलो सोन्याचा कळस अंबाबाईच्या चरणी

Zp Scam: जिल्हा परिषदेत बोगस बिलांचा घोटाळा, CEOच्या बंगल्याला 25 लाखांची लाईटिंग

तुकाराम मुंढेंचा ऑपरेशन गुटखा’ यशस्वी! 350 जणांना अटक, 274 दुकाने सील, राज्यभर खळबळ

SCROLL FOR NEXT