नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत घेणार बैठक
बैठकीला मंत्री उदय सामंत आणि दादा भुसे देखील राहणार उपस्थित
नाशिकनंतर श्रीकांत शिंदे उत्तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात देखील जाऊन घेणार आहेत आढावा
पक्ष संघटना मजबुत करण्यासह अन्य मुद्द्यांवर शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत श्रीकांत शिंदे करणार चर्चा
आगामी जिल्हा परिषद निवडणुका संदर्भात देखील श्रीकांत शिंदे घेणार आढावा
अशोक खरात याला आज सिन्नर न्यायालयात हजर करणार
लैंगिक शोषण आणि फसवणूक प्रकरणात अशोक खरात गेल्या 2 महिन्यापासून आहे कोठडीत
सिन्नर मधील आर्थिक फसवणूक प्रकरणात पोलिस कोठडीत असलेल्या अशोक खरातला आज न्यायालयीन कोठडी मिळाल्यास ED घेणार अशोक खरात याचा ताबा
ED कडून खरात प्रकरणात बेनामी संपत्ती आणि मनी लाँड्रिंग संशयावरून केला जातोय स्वतंत्र तपास
अशोक खरात याच्याशी संबंधित रूपाली चाकणकर यांच्यासह अनेकांची ED ने यापूर्वी केलीय चौकशी
काँग्रेस व त्यांच्या मित्र पक्ष म्हणजे घुबडाची औलादी आहेत,या घुबड्यांनी कधी गावगाड्यातल्या आणि शेतकरयांच्या प्रश्नावर आवाज उठवला नाही,अशी घणाघाती टीका आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंधन बचत आणि सोने खरेदी करू नका,असा सल्ला दिल्यानंतर आयत खाऊना चिंता लागली आहे,ज्यांना सत्ता मिळत नाही,सत्तेची डोहाळे ज्यांना लागलेत,त्यांना चिंता लागली आहे, अशी बोचारी टीका देखील आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे सांगली मध्ये पार पडलेल्या आत्मनिर्भर परिषदेमध्ये ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इंधन बचत व सोने खरेदी न करण्याच्या सल्ल्यावरून विरोधकांकडून होणारया टीकेला आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी जाहीर सभेतून जोरदार प्रत्युत्तर दिलाय.सांगलीमध्ये रयत क्रांती संघटनेच्यावतीने आयोजित आत्मनिर्भर नागरिक,कष्टकरी,शेतकरी परिषदेतून आमदार खोत आणि पडळकरांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय. आजचा इंधन संकट हे काँग्रेसचे पाप आहे, मात्र त्याची खापर नरेंद्र मोदींवर फोडली जाते,अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे,तर नरेंद्र मोदींच्यावर टीका करणाऱ्यांना अर्थमंत्री होऊन देखील ईश्वरपूर-सांगली रस्ता करता आला नाही,असा टोला आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंती पाटलांना लगावला आहे.
परभणी जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून आज तापमानाने तब्बल 45.2 अंश सेल्सिअसचा टप्पा पार केला आहे. यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत असून अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर पडणे नागरिक टाळत आहेत. वाढत्या उकाड्यामुळे बाजारपेठा, सार्वजनिक ठिकाणे आणि मुख्य रस्त्यांवरही गर्दी कमी झाल्याचे चित्र आहे. उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता आहे नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडताना काळजी घ्यावी, पाणी अधिक प्रमाणात प्यावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
नाशिकच्या कळवण तालुक्यातील चणकापूर धरण परिसरात कळवण येथील फिरायला गेलेल्या चौघे मित्रानं पैकी धनराज महाले हा धरणात पोहण्यासाठी गेला असता तो बराच वेळ पाण्यातून बाहेर न आल्याने सोबत असलेल्या मित्रांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला,मात्र त्याचा शोध लागू शकला नाही,अखेर स्थानिकांच्या मदतीने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला,या घटनेची माहिती आभोणा पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र संध्याकाळी उशिरा पर्यंत तरुणाचा शोध लागला नव्हता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.