Diabetes : पावसाळ्यात थोडासा निष्काळजीपणा मधुमेहींसाठी घातक, 'या' गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास समस्या आणखी वाढेल

Shreya Maskar

पावसाळा

पावसाळ्यात ओलावा, चिखल आणि दूषित पाणी यामुळे पायांना संसर्गाचा धोका निर्माण होतो. ओल्या वातावरणामुळे बुरशी आणि जिवाणू वेगाने वाढतात.

Monsoon | pinterest

मधुमेह

मधुमेहाची समस्या असलेल्या लोकांनी पावसाळ्यात आपल्या पायांची विशेष काळजी घ्यावी. जेव्हा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात नसते, तेव्हा नसांचे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे पाय सुन्न होतात. याला डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणतात, ज्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो.

Diabetes | pinterest

पायांचे नुकसान

मधुमेहामुळे पायांमधील रक्ताभिसरणात अडथळा येतो, ज्यामुळे शरीर संसर्गाशी प्रभावीपणे लढण्यास असमर्थ ठरते आणि गँगरीनचा धोका वाढतो. यामुळे पायांचे गंभीर नुकसान होते.

Foot Damage | pinterest

ओलाव्यापासून दूर रहा

पावसाळ्यात बाहेरून घरी आल्यावर आपले पाय कोमट पाण्याने स्वच्छ धुवा आणि त्वरित कोरडे करा. पाय ओले राहिल्याने संसर्ग होऊ शकतो.

Avoid Moisture | pinterest

जखमांकडे दुलर्क्ष करू नका

पावसाळ्यात मधुमेही रुग्णांच्या जखमा लवकर भरत नाही. त्यामुळे पायांवर कोणतीही जखम दिसली, तर ती स्वच्छ करून अँटीसेप्टिक क्रीम लावा. जर जखम वाढत असेल, तर डॉक्टरांकडे जा.

Do Not Ignore Wounds | pinterest

चप्पल घाला

पावसाळ्यात विशेषता अनवाणी चालू नका आणि नेहमी चप्पल घाला. कारण वातावरणात थंडावा असतो. तसेच पावसाळ्यात बूट घालू नका. कारण पावसाचे पाणी बुटाच्या आत शिरते.

Wear Footwear | pinterest

पायांच्या बोटांची काळजी

पायांच्या बोटांमधील जागा पूर्णपणे स्वच्छ करा. येथे जीवाणूंचा धोका जास्त असतो. हे टाळण्यासाठी बुरशीनाशक पावडर वापरा. तसेच नखं कापा.

Care for Toes | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : मधुमेह फक्त हृदयासाठीच नाही, तर मेंदूसाठीही धोकादायक, डोक्याच्या आरोग्यावर होतात 'हे' ५ गंभीर परिणाम

Diabetes | AI PHOTO
येथे क्लिक करा...