रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात कोकण दर्शन करून मुंबईत परतणाऱ्या पर्यटकांच्या टेम्पो ट्रॅव्हलर बसचा रविवारी रात्री अपघात झाला.
मुंबईच्या दिशेने जाणारी ही टेम्पो ट्रॅव्हलर बस भोस्ते घाट उतरत असताना तिचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे बसने समोर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या हुंडाई एक्स्टर कारला पाठीमागून जोरदार धडक दिली.
या अपघातात कार महामार्गालगतच्या खड्ड्यात जाण्यापासून थोडक्यात बचावली. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस तसेच कशेडी महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कार्यवाही केली.
वर्धा जिल्ह्याच्या तापमानाचा पारा पुन्हा वाढलाय. तापमानाचा पारा हा 46.4 अंशावर पोहचला असून आज तापमान आणखी वाढणार असल्याची शक्यता आहे.
रविवारी जिल्ह्याचे तापमान 46.4 अंशावर होते हा तापमान तीस वर्षानंतर पुन्हा उच्चाक गाठलं आहे.
अमरावती जिल्ह्यामध्ये सूर्य अक्षरशः आग ओकताना दिसून येत आहे.एप्रिल महिन्यात तापमानांचे उच्चांक होत आहे काल अमरावतीचे तापमान 46.8 नोंदवण्यात आल्याने वर्षातला सर्वात हॉट दिवस ठरला आहे, तर राज्यात अकोला आणि अमरावती या दोन्ही जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद सुद्धा झाली आहे.तर हा उष्णतेचा पारा 47 अंश डिग्री सेल्सिअस वर जाईल असा अंदाज हवामान तज्ञांनी वर्तविला आहे.
महाराष्ट्र मध्ये आज पासून कृषी केंद्र चालकांनी सरकारच्या विरोधात आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून आजपासून बेमुदत संप पुकारला, त्यामुळे खरिपाच्या हंगामाची तयारी करणाऱ्या बळीराजासाठी हा संप मोठा अडचणीचा ठरला आहे, माफदा अर्थात महाराष्ट्र फर्टीलायझर सीड्स डीलर्स असोसिएशन या संघटनेने या बंदची हाक दिली आहे, या संघटनेच्या संपाला देशातील फर्टीलायझर असोसिएशनने देखील एक दिवसाचा पाठिंबा दिला आहे, दररोज सकाळी उघडणारी खताची औषधाची दुकाने बंद झाल्याने पहिल्याच दिवशी हिंगोली मध्ये मात्र शेतकऱ्यांना औषधे खरेदी न करताच रिकाम्या हाताने परत जावे लागले आहे.
संगमनेरचा भोंदू राजेंद्र गडगेला कोर्टात करणार हजर..
चार दिवसाची पोलीस कोठडी आज संपणार...
भोंदू गडगे 9 दिवसांपासून पोलिस कोठडीत...
मंत्र तत्राने कॅन्सर तसेच दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करणारा भोंदू गडगे झालाय गजाआड..
अंनिसच्या तक्रारीनंतर भोंदू गडगे गजाआड...
आज पुन्हा गडगेला न्यायालयात करणार हजर...
पोलीस आज आणखी वाढीव कोठडी मागणार...
संगमनेर जिल्हा सत्र न्यायालय पोलीस कोठडी देणार, की न्यायालयीन? याकडे लक्ष...
तर गडगेचा बॉस डॉ.मोहन पुरी, मुलगी ज्ञानेश्वरी गडगे आणि सुरज शिंदे हे तिघे आरोपी अद्यापही फरार..
मुंबईतील मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात
दोन दुचाकींचा अपघात
तिघांटा जागीच मृत्यू
नीटचा अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी
विद्यार्थ्यांना ऑनलाइन हॉल तिकीट मिळायल होणार सुरुवात
२७ तारखेपासून १० वाजल्या पासून ऑनलाइन मिळणार हॉल तिकीट
जवळपास २२ लाख विद्यार्थ्यांनी केली आहे परीक्षेसाठी नोंदणी
एनटीए ने दिली माहिती
जालन्यात दोन दुचाकींचा समोरासमोर भीषण अपघात झाला आहे.भोकरदन तालुक्यातील नळणी-राजूर मार्गावर हा काल रात्री भीषण अपघात झाला आहे. या अपघातात नळणी येथील सुभाष साठे, विकास साठे यांचा मृत्यू झाला आहे तर बरंजळा साबळे येथील अनिल बोराडे या तरुणाचा मृत्यू झाला असून समाधान कोरके हा तरुण गंभीर जखमी झाला आहे ..
वाशिममध्ये सध्या उन्हाचा तीव्र प्रकोप जाणवत असून वाशिम जिल्ह्यात आतापर्यंतची सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे,काल रविवारी तापमानाने विक्रमी 44.6 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असून दैनंदिन जीवनावर त्याचा मोठा परिणाम होत आहे. सकाळी ९ वाजतापासूनच उन्हाचे चटके बसायला सुरुवात होत असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण होत आहे. दुपारी १ वाजल्यानंतर तापमानात आणखी वाढ होत असून या काळात रस्त्यांवरील वर्दळ लक्षणीयरीत्या कमी होत आहे. अत्यावश्यक कामाशिवाय नागरिक घराबाहेर पडणे टाळत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
राज्यातील रुग्णालयात पुन्हा आरोग्य समित्या स्थापन करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे निर्देश
राज्यात रुग्ण कल्याण समिती जन आरोग्य समिती महिला आरोग्य समिती ग्राम आरोग्य पोषण या आरोग्य समिती असतात
या समितीमधील लोकप्रतिनिधीचा आणि एनजीओच्या सदस्याचा सहभाग असणार आहे
राज्यातील आरोग्य सेवा प्रभावीपणे दिल्या जातात का नाही यातील त्रुटी प्रशासनापर्यंत पोहोचण्याचा काम या समित्या करत असतात.
राज्यातील आरोग्य समित्या पुन्हा सक्रिय करण्याचे निर्देश आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांनी दिले आहेत
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुधारण्यासाठी महापालिकेच्या ७०० कोटींची केंद्राकडे मागणी
महापौरांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी भेट
रस्ते, उड्डाणपूल व महामार्ग रुंदीकरणासाठी निधीची गरज
गडकरींकडून सकारात्मक संकेत, प्राधान्य कामांची यादी घेऊन दिल्लीत येण्याचे निमंत्रण
द्वारका सर्कल ते दत्त मंदिर रस्ता रुंदीकरण प्रकल्प रखडला
कुंभमेळ्यापूर्वी पायाभूत सुविधा उभारणीसाठी महापालिकेची धडपड
रविवारी वर्षभरातील सर्वाधिक तापमानाची नोंद लोहगाव कोरेगाव पार्क तापमान 43 अंशावर
तापमान 43 अंशावर गेल्याने यावर्षीच्या सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे
या अगोदर चार वेळा तापमान 43 अंशावर गेल्याची नोंद हवामान विभागाकडे आहे
30 एप्रिल 1897 रोजी 44.4 अंशाचा सर्वाधिक तापमानाचाविक्रम मात्र आणखी कायम आहे
हवामान विभागाने शहराला उष्णेतेचा येल्लो अलर्ट दिला आहे तर पाऊस संपल्याने तापमान आणखी वाढण्याची शक्यता
बुलढाणा जिल्ह्यातील असलेल्या जिगाव प्रकल्पाच्या पीव्हीसी पाईप साठवणूक केंद्राला भीषण आग.
आगीत साठवून ठेवलेले कोट्यावधी रुपयाचे पीव्हीसी पाईप जळून खाक.
शेतकऱ्यांना सिंचनासाठी बंदिस्त पाईप लाईनद्वारे शेतीसाठी पाणी देण्यासाठी टाकण्यात येणार होती पाईपलाईन.
जलंब ते माटरगाव दरम्यान असलेल्या तात्पुरत्या साठवणूक केंद्रात पीव्हीसी पाईपांना ही आग लागली.
आगीच कारण अस्पष्ट. खामगाव आणि शेगाव अग्निशमन दलाकडून आदीवर नियंत्रण मिळवण्यात आलं.
नाशिक शहरात उष्णतेचा कहर, तापमान ४१.४ अंशांवर
यंदाच्या हंगामातील उच्चांक, उष्णतेची तीव्र लाट कायम
दुपारच्या वेळेत रस्ते ओस, गरज असेल तरच नागरिकांनी बाहेर पडण्याचं आवाहन
सलग १०-१२ दिवसांपासून तापमान ३९ अंशांच्या पुढे
किमान तापमानही वाढले, रात्रीही उकाडा कायम
पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज
भोंदू अशोक खरात सातव्या गुन्ह्यात अटकेत, ४० दिवसांपासून तुरुंगात
सहाव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी, लगेचच एसआयटीकडून नव्या गुन्ह्यात ताबा
खरात विरोधात आतापर्यंत नाशिकमध्ये १२ गुन्हे दाखल, १४ वेळा न्यायालयात हजेरी
पीडितांना गुंगीकारक पदार्थ दिल्याचा आरोप, खरात तपासात सहकार्य नाही
स्मृतिभ्रंशाचे नाटक करत असल्याचा सरकारी पक्षाचा दावा
आज पुन्हा न्यायालयात सुनावणी, खरातला व्हीसीद्वारे हजर करणार
TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी
नाशिकरोड न्यायालयात सुनावणी पार पडणार
गुन्हा दाखल झाल्यापासून निदा खान फरार, मुंब्र्यामध्ये एसआयटीच्या धाडीपूर्वीच निदा खान निसटली
गर्भवती असल्याचे कारण देत निदा खानचा अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज
पहिल्या सुनावणीत आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद, आज सरकारी पक्ष मांडणार बाजू
धार्मिक भावना दुखावणे आणि विशिष्ट धर्माचे ट्रेनिंग दिल्याचा निदा खानवर गंभीर आरोप
नाशिक विमानतळावरील प्रवासीसंख्येत २४ टक्क्यांची मोठी वाढ
२०२५-२६ मध्ये ४.२१ लाख प्रवाशांनी केला हवाई प्रवास
तर कार्गो निर्यातीत तिप्पट वाढ, ४७० टनांपर्यंत झेप
मार्च महिन्यातच ४० हजारांहून अधिक प्रवाशांची हवाई प्रवासाची नोंद
नाशिक विमानतळावरून दिल्ली, बेंगळुरू, अहमदाबाद, गोवा, हैदराबादसाठी सेवा उपलब्ध
आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याच्या मागणीला जोर
दुसऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र सेवा बजावणाऱ्या एका महिला पोलीस अंमलदारालाच सासरच्या जाचाला सामोरे जावे लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या महिला अंमलदार यांनी आपल्या सासू, पतीसह सासरच्या 6 जणांविरुद्ध छळ आणि मारहाणीची तक्रार उरुळी कांचन पोलीस ठाण्यात दिली आहे
शहरात सध्या पाणीटंचाई सहन करावी लागत असताना, बी. टी. कवडे रस्ता परिसरात मुख्य जलवाहिनी फुटून लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया गेल्याची घटना आज सकाळी घडली. या वाहिनीतून गळती होत असल्याची पाणीपुरवठा विभागाला माहिती देऊनही कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे दुर्घटना घडली आहे.
शिवसेनेचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या वतीने विवाह सोहळ्याच आयोजन. उद्योगमंत्री उदय सामंत यांची विवाह सोहळ्याला हजेरी.
सामूहिक विवाह सोहळ्यात गरीब कुटुंबातील 29 जोडप्यांचा विवाह. अँकर:-शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला.
नांदेडच्या हदगाव येथे शिवसेनेचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या वतीने या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं.
या विवाह सोहळ्याला राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी हजेरी लावली.या सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात गरीब कुटुंबातील 29 जोडपी विवाह बंधनात अडकली.
दरम्यान आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी वधू-वरांना संसार उपयोगी साहित्यासह विवाह सोहळ्याचा संपूर्ण खर्च करून या सामाजिक उपक्रमाला हातभार लावला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.