Aaditya Thackeray
Aaditya Thackeray  saam tv
महाराष्ट्र

'शिवसैनिक असता तर बाळासाहेबांचा मुलगा...'; आदित्य ठाकरेंचा बंडखोर आमदारांवर जोरदार हल्लाबोल

सूरज सावंत

Aaditya Thackeray News : शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा शिंदे गटावर हल्लाबोल सुरूच आहे. 'आज जे घसा फोडून सांगत आहेत की, बाळासाहेबांचे हिंदुत्व पुढे नेत आहोत'. पण शिवसैनिक असता तर बाळासाहेबांचा मुलगा राजीनामा देत असताना तुम्ही पेढे भरवत नसता, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

आदित्य ठाकरे सध्या अलिबागच्या दौऱ्यावर आहेत. अलिबागमध्ये शिवसैनिकांनी आदित्य ठाकरे यांचे जंगी स्वागत केले. या दौऱ्यावर असताना त्यांनी आयोजित कार्यक्रमात शिवसैनिकांना संबोधित केले. शिवसैनिकांशी संवाद साधत असताना त्यांनी शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडलं.

आदित्य ठाकरे म्हणाले, 'आपण याच मातीतील लोक आहोत. या गद्दारीत रायगडला काय मिळालं. मी पहिला आमदार आहे की राजकारणात तेवढं वर-खाली पाहायचं होतं, ते पाहिलं आहे. कोरोनाचा काळ पाहिला. मंत्रिमंडळाचा पहिला निर्णय घेतला, तेव्हा रायगडसाठी ६०० कोटी दिले. आम्ही गद्दारांचे विधानभवनात चेहरे बघत होतो. ते चेहरे लपवून चालत होते. त्यांचा गेम झाल्याचे चेहऱ्यावर दिसत होते'.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, 'या राज्यात गद्दारी झाली, आता जे व्हायचं होतं ते झालं. राज्यात उपमुख्यमंत्री हे खरे मुख्यमंत्री आहेत. मंत्रिमंडळ जाहीर व्हायला ४१ दिवस लागले. या मंत्रिमंडळात रायगडचं कोणीही नाही. मुंबईचंही कोणी नाही. तसेच मंत्रिमंडळात महिलांना स्थान नाही'.

'शिंदे गटाला आता दुय्यम खाती मिळाली आहेत, त्याचा पश्चाताप त्यांच्या तोंडावर दिसत आहे. यांना गरजेपेक्षा जास्त आणि पात्रतेपेक्षा अधिक दिलं. यांना डोळे बंद करून मिठी मारली. त्यांनी पाठीत खंजीर खुपसला. उठाव करायला ताकद लागते. त्यांनी तर पळून जाऊन गद्दारी केली. हे खरे शिवसैनिक असते तर डोंगर हॉटेल बघितले नसते तर त्याचवेळी आसामच्या पुरात मदतीला उतरले असते. खायला तिकडे अन्न नव्हते. मदत हवी होती, आवाहन करत होते. शिवसैनिक असते तर मदत करायला उतरले असते', असेही आदिच्य ठाकरे म्हणाले.

'सरकार पडत असताना हे टेबलावर नाचत होते , हे तुमचे आमदार होतील हे नेतृत्व तुम्हाला मान्य आहे का ? काय याची वृत्ती आहे हे ओळखा. आज जे घसा फोडून सांगत आहेत की, बाळासाहेबांचे हिंदुत्व पुढे नेत आहोत'. पण शिवसैनिक असता तर बाळासाहेबांचा मुलगा राजीनामा देत असताना तुम्ही पेढे भरवत नसता. आजही एकच म्हणणं आहे की, तुमच्यावर दडपण असेल तर कोणी काही बोलणार नाही. जर तुम्हाला तेथे आनंदात राहायाचं असेल, लाज उरली असेल तर राजीनामे द्या. निवडणुकीला सामोरे जा, होऊन जाऊन दे, जनता कौल देईल, तो मला मान्य आहे, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना केलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : पवारांनी गल्ली ते दिल्लीपर्यंत फोडला घाम; पश्चिम महाराष्ट्रात अस्तित्वासाठी संघर्ष

Baramati Politics: विधानसभेतही बारामतीत महाभारत, अजित पवार यांना पुतण्या युगेंद्र देणार आव्हान?

Hardik Pandya Troll: हार्दिकने रोहितलाच केलं प्लेइंग ११ मधून बाहेर! फॅन्सच्या संतप्त प्रतिक्रिया

Mega Block : रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक; कोणत्या मार्गावरील सेवा असणार बंद? कोणत्या मार्गावर विशेष सेवा?

Kolhapur News: 'साम टीव्ही'चा लोगो वापरून प्रेक्षकांची दिशाभूल करणारा व्हिडिओ केला व्हायरल, अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल

SCROLL FOR NEXT