Aaditya Thackeray - Devendra Fadnavis saam tv
महाराष्ट्र

Aaditya Thackeray On Devendra Fadnavis: कोकणी माणसाला देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न का करताय?; बारसूवरुन आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना खोचक सवाल

Ruchika Jadhav

Maharashtra Political News: काल विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बारसू आंदोलनाबाबतचं निवेदन सादर केलं. यावेळी फडणवीसांनी बारसू येथील आंदोलनासाठी बंगळुरूतून फंडिंग झालं आहे, असे गंभीर आरोप आंदोलकांवर केले आहेत. त्यावरुन कोकणावर आणि कोकणी माणसावर एवढा राग कशासाठी? असा प्रश्न विचारत आदित्य ठाकरेंनी फडणवीसावर टीकास्त्र सोडलं आहे. (Latest Marathi News)

आपल्या ट्वीटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत आदित्य ठाकरेंनी फडणवीसांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर देखील निशाणा साधला आहे. "नाणार असो की बारसू असो भाजपा महाराष्ट्रद्वेषी आहे हे वारंवार दिसतंच आणि त्याबरोबरच दिसतं ते शिंदेच्या सत्तेच्या लोभापायी कोकणी माणसाला दगा देणं, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी शिंदेंवर निशाणा साधलाय.

आपल्या ट्वीटमध्ये आदित्य ठाकरेंनी पुढे लिहिलं आहे की, "कोकणावर आणि कोकणी माणसावर या लोकांचा एवढा राग कशासाठी? पाकिस्तानशी संबंध, बंदिस्त संघटना, परदेशी फंडिंग” अशा गोष्टी कोकणाशी जोडून हे महाराष्ट्रद्वेष्टे कोकणी माणसाला देशद्रोही का ठरवू पाहताहेत?"

"उद्या हे कोकणी माणसाला नक्षलवादी म्हणतील, त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करतील. स्वतःचं खोटं रेटायला कोकणी माणसाचा बळी देतील. याचं कारण एकच- यांच्या महाराष्ट्र द्वेषा विरुद्ध उभ्या राहणाऱ्या कोकणी माणसावरचा राग, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs BAN: पहिल्याच डावात केलेल्या या 3 चुका टीम इंडियाला महागात पडू शकतात

IND vs BAN, 1st Test: टीम इंडियाचा डाव आटोपला! जडेजाचं शतक थोडक्यात हुकलं, बांगलादेशचा युवा गोलंदाज चमकला

Jalna Accident : जालन्यात एसटी बस आणि ट्रक अपघातात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारे PHOTO पाहा

Chandrakant Patil News : खडसेंमुळेच राजकारणाचा स्तर खाली घसरलाय; आमदार चंद्रकांत पाटील यांचा आरोप

Metro Ticket Booking: मेट्रोच्या तिकीटासाठी रांगेत उभं राहायची गरज नाही; काही मिनिटात ऑनलाइन तिकीट काढा

SCROLL FOR NEXT