Aadhar For Liquor Buy: google
महाराष्ट्र

Liquor: दारूसाठी लागणार आधारकार्ड, दारू खरेदीसाठी आता वयाची अट

Aadhar For Liquor Buy: तळीरामांसाठी आता महत्त्वाची बातमीये. तुम्ही दारु खरेदी करण्यासाठी जाणार असाल किंवा दारु पार्टीसाठी हॉटेल, क्लब आणि रेस्टोरंटमध्ये जात असाल तर आता तुमच्यासाठी प्रशासनानं करडे नियम तयार केलेत. नेमके काय नियम आहेत पाहुया या रिपोर्टमध्ये.

Snehil Shivaji

विकेंड किंवा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जर तुम्ही दारु पार्टी करण्याच्या विचारात असाल तर जरा थांबा. दारू खरेदीसाठी तुम्हाला आता वयाची अट पुर्ण करावी लागणार आहे. दारू खरेदीसाठी आधारकार्ड सक्तीचं करण्यात आलंय. त्यामुळे आता सहज बाजारात मिळाणाऱ्या मदिरेसाठी कागदपत्रांची पुर्तता करण्याची तयारी तुम्हाला करावी लागणारेय. दारूसाठी चक्क आधार कार्ड द्यावं लागेल तेही ओरिजिनल आणि इतकंच नव्हे तर तुम्ही तुमच्या वयाची २५ वर्ष पुर्ण केली असतील तरच तुम्हाला दारू खरेदी करता येणार आहे.

दारू विक्रीसाठी नेमक्या काय गाईडलाईन्स आहेत ते पाहूयात.

25 वर्षांखालील व्यक्तींना दारु विक्री बेकायदेशीर ठरणार

दारू विक्री करणाऱ्या हॉटेल्स, क्लब्स, रेस्टोरंट्सना नियम बंधनकारक

ग्राहकांच्या ओळखपत्राच्या हार्ड कॉपीच्या पडताळणीचे आदेश

अल्पवयीन तरुणांकडून मद्यपानाच्या तक्रारी वाढल्याने निर्णय

अल्पवयीन तरुणांना दारू विक्री केल्यास परवाना रद्द होणार

कायदेशीर मद्यपानाच्या वयाच्या नियमांचे पालन न केल्यास कारवाई होणार आहे.

अल्पवीयन तरुण तळीराम होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. हा निर्णय जरी चांगला असला तरी या हा निर्णय दिल्ली सरकारनं घेतलाय. त्यामुळे पुढच्या काळात महाराष्ट्रातही हा निर्णय़ लागू होण्याची शक्यता नाकारता येत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बल्लारपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेस उमेदवाराचे उमेदवारी अर्ज दाखल

Petrol Pump Fraud: सावधान! पेट्रोल भरताना 'Desnsity' द्वारे केली जाते फसवणूक; ग्राहकांनी अशी घ्या काळजी

धक्कादायक! नाशिकच्या भोसला मिलिटरी शाळेत बिबट्या शिरला; विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण, पाहा व्हिडिओ

Skin Care: चांगल्या आरोग्यासह चेहरा करी गोरा; तुमच्या रुपासमोर परीही ठरेल फेल

Sholay Re-Release: 'ये हाथ मुझे दे दे ठाकुर...'; ५० वर्षांनंतर 'जय-वीरू' पुन्हा गब्बरशी भिडणार

SCROLL FOR NEXT