Parbhani Crime News Saam TV
महाराष्ट्र

Parbhani Crime News: परभणीत किरकोळ भांडणाला हत्येचे वळण; चाकूने वार करत महिलेची हत्या

वादातून एका महिलेची तीक्ष्ण हत्याराने हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Parbhani Crime News: परभणी येथे एक खळबळजनक घटना घडली आहे. वादातून एका महिलेची तीक्ष्ण हत्याराने हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेत अन्य दोन व्यक्तीं देखील जखमी झाले आहेत. सदर घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, परभणीच्या (Parbhani) जिंतूर येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेत सत्यभामा नागोराव मुंडे यांची चाकूने वार करत हत्या झाली. तसेच अशामती फकीरराव बुधवंत आणि ऋषिकेश नाथराव सांगळे या दोघांवर देखील वार झाल्याने ते गंभीर जखमी आहेत. सध्या त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाद सुरू असताना राग अनावर झाल्याने सदर घटना घडल्याचे म्हटले जात आहे. तसेच जिंतूर पोलिस स्टेशनमध्ये या विषयी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दरोड्याच्या तयारीत असणारी टोळी जेरबंद

राहुरी तालुक्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. अशात यात दिलासादायक वृत्त समोर आलं आहे. राहुरी येथील सडे गावातील शिवरात पोलिसांनी छापा टाकला. काल रात्री या छाप्यात दोन दरोडेखोरांना (Robber) अटक करण्यात आली आहे. या दोघांकडून पोलिसांनी अनेक घातक वस्तू जप्त केल्या आहेत. यात एक चाकू, मिर्ची पूड, लोखंडी गज असे सामान आहे.

अटकेत असलेल्या दोघांची कसून चौकशी सुरू आहे. या दोघांबरोबर आणखीन तीघे जण मिळून दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. मात्र त्या आधीच पोलिसांची धाड पडली. यात इतर तीन जण अंधाराचा फायदा घेऊन फरार झालेत. राहुरी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Police : भिवंडीत गांजा विक्री करणारे तिघे ताब्यात; ३७ लाखाचा गांजा जप्त

Kalyan News: कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा! पलावा पुल आजपासून नागरिकांसाठी सुरू|VIDEO

Sanjay Raut : हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर संजय राऊतांची तिखट प्रतिकिया

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT