Indira Gandhi/Raosaheb Danave Saam TV
महाराष्ट्र

एक महिला 11 वर्ष पंतप्रधान होती, पण महिलांचे दुःख दूर केलं नाही - रावसाहेब दानवे

या देशातील एक महिला ११ वर्ष पंतप्रधान होती, पण महिलांचे दुःख दूर केले नाही, इंदिरा गांधीचं नाव न घेता रावसाहेब दानवेंची टीका

माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.

औरंगाबाद : आज औरंगाबाद शहरातील घरोघरी गॅस पुरवठा कामाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम होता या कार्यक्रमाला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) हे उपस्थित होते.

यावेळी भाषण करताना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Former Prime Minister Indira Gandhi) यांच्यावर टीका केली आहे. या देशातील एक महिला 11 वर्ष पंतप्रधान होती, पण महिलांचे दुःख दूर केलं नाही असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

ते भाषणात म्हणाले, 'आम्ही गॅस योजना आणली, पण औरंगाबादचे (Aurangabad) माजी खासदार म्हणतात, मी पत्र दिलं होतं ते काम म्हणून झाले, ते खासदार त्यावेळी कुठं होते, त्यांनाच माहीत, औरंगाबाद-पुणे रेल्वे (Aurangabad-Pune Railway) सुरू आम्ही केली, पुन्हा माजी खासदार म्हणाले मी पत्र दिले म्हणून झाले, असं म्हणत त्यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका केली.

दरम्यान, 'या देशातील एक महिला ११ वर्ष पंतप्रधान होती, पण महिलांचे दुःख दूर केले नाही, मात्र मोदी सरकारने मागेल त्याला घरपोच गॅस दिलं असं म्हणत त्यांनी नाव न घेता माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावरती टीका केली आहे. औरंगाबाद महापालिका (Aurangabad Municipal Corporation) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून अनेक कामाचा शुभारंभ होत असून केंद्र सरकारच्या कार्यक्रमात भाजपचा मेळावा? घेतला असल्याचं चित्र सध्या तिथे दिसत आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: लातूरच्या अहमदपूरमधून जाणाऱ्या मन्याड नदीला पूर

Pune Accident: गणपतीच्या बुकिंगसाठी गेले असता भयंकर घडलं, ट्रकने ११ वर्षांच्या मुलीला चिरडलं; अपघाताचा थरारक VIDEO

Pune : पुण्यातील शाळेत अश्लील डान्स, अंगविक्षेप करत तरुणीनं लगावले ठुमके, Video Viral

Election Commission : आयोगाला पत्रकार परिषद भोवणार? व्होट चोरीचा मुद्दा महाभियोगापर्यंत जाणार?

Maharashtra Government: शेतकऱ्यांना मिळणार गुड न्यूज: बळीराजासाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT