Women Day News
Women Day News  Saam tv
महाराष्ट्र

Women Day : राज्यात ६० टक्के मुलींना अनुभवावा लागतोय वाईट स्पर्श; धक्कादायक माहिती आली समोर

संजय डाफ

नागपूर : आज राज्यभरात सर्वत्र जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. राज्यभरात अनेक महिलांच्या संघर्षांचं कौतुक केलं जात आहे. अनेक ठिकाणी विविध क्षेत्रात नाव कमावणाऱ्या स्त्रियांचं सन्मान केला जात आहे. याचदरम्यान, राज्यभरात ६० टक्के मुलींना वाईट स्पर्श अनुभवावा लागत आहे, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

आज सर्वत्र जागतिक महिला दिन साजरा होत होत आहे. मात्र, आजही महिला (Women) खरंच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण, आज राज्यात 60 टक्के महिलांना नकोसा स्पर्श अनुभवा लागत आहे.

‘वूई फॉर चेंज’ या संस्थेच्या सर्वेक्षणात हे धक्कादायक वास्तव पुढं आलंय. मात्र, आजही महिलांची अन्यायाविरोधात तक्रार देताना घुसमट होते. त्यामुळं महिलांना दररोज अशा नकोशा स्पर्शाला सामोरं जावं लागत आहे.

महिलांविषयी काम करणाऱ्या नागपुरातील (Nagpur) ‘वूई फॉर चेंज’ या संस्थेने हा सर्व्ह केला आहे. यात १८ ते २५ आणि २५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील महिलांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात १८ वर्षे वयापासून तर ६० वर्षे वयोगटातील महिला सहभागी झाल्या.

राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यातील महिलांनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला. सार्वजनिक स्थळी मुली सर्वात जास्त असुरक्षित असल्याचं सर्वेक्षणातुन स्पष्ट झालंय. तसंच बलात्कारानंतर कोणत्या कलमांतर्गत गुन्हा नोंदवला जातो, याची माहिती नव्या पिढीत ५८.७ टक्के आणि जुन्या पिढीतील ५८.८ टक्के महिलांना नसल्याचंही वास्तव पुढं आलं.

कुटुंबातील, ओळखीच्या, शेजारी, मित्र, सार्वजनिक ठिकाणी अनोळखी व्यक्तींकडून नकोसा स्पर्श महिलांना सहन करावा लागतो, मात्र भीती पोटी म्हणा किंवा माहिती अभावी यासंदर्भात महिला तक्रार देत नाही. त्यामुळं आज जागतिक महिला दिन साजरा करत असताना महिला खरंच सुरक्षित आहे का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Madha Constituency: कार्यकर्त्यांवर दादागिरी कराल तर गाठ माझ्याशी आहे, धैर्यशिल माेहिते पाटलांचा विराेधकांना सज्जड दम

Sharad Pawar Speech: शशिकांत शिंदेंना अडवण्याचा प्रयत्न; अटक केल्यास महाराष्ट्रभर संघर्ष करु.. शरद पवारांचा इशारा!

Arya Ambekar: कितीदा नव्याने तुला पाहावे, मनात फक्त तुला जपावे

Today's Marathi News Live : पुण्यात शिवसंग्राम संघटनेची आज महत्वाची बैठक

Kitchen Hacks: लिंबू फ्रीजमध्ये ठेवल्यानंतरही सुकतात,तर ट्राय करा 'या' टीप्स

SCROLL FOR NEXT