Happy Women's Day : पाळण्याची दोरी खेचणारीचे हात आता ट्रॅक्सीच्या गियरवरही... पुण्यातल्या महिलेची अनोखी कहाणी !

Women's Day Special : खरेतर आज 8 मार्च जागतिक महिला दिन या दिवशी अनेक महिलांचा सन्मान केला जातो.
Happy Women's Day
Happy Women's DaySaam Tv

Pune News : स्त्री म्हटलं की, चुल आणि मुल याशिवाय तिचा संसार नसायचा परंतु, काळानुरुप अनेक गोष्टी बदलत गेल्या. स्रियांना शिक्षणाची मूभा मिळाली आणि त्यांनी पाखरासारखी आभाळी झेप घेतली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

बदलेल्या काळानुसार महिलांनी पुरुषांदेखील मागे टाकले आहे. शिक्षणक्षेत्र (Education) असो किंवा कामाच ठिकाण... घरातलं आणि बाहेरचं काम करताना अक्षरश: तिची तारेवरची कसरत होत असली तरी देखील ती मनमोकळेपणाने हा स्त्री रुपाचा भाळ सांभाळत असते.

Happy Women's Day
Happy Women's Day : आदी तू... अंत तू... जागतिक महिला दिनानिमित्त तुमच्या 'तिला' पाठवा खास शुभेच्छा !

खरेतर आज 8 मार्च जागतिक महिला दिन (Women's Day) या दिवशी अनेक महिलांचा सन्मान केला जातो. यामध्ये जिजाऊ, सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, आनंदीबाई जोशी यांसारख्या स्त्रियांचा आपल्या जीवनात महत्त्वाचा वाटा आहे. अशीच एक महिला जिच्या कर्तृत्वाला व जिद्दीला पुरुषांनादेखील सलाम केला आहे. ही घटना आहे पुण्यातील...

पुणे तिथे काय उणे... हम भी किसेस कम नही... असं म्हणतं पुण्यातील महिला टॅक्सी ड्रायव्हरने चक्क पुरुषांनाही मागे सोडलं आहे. यापूर्वी पुण्यात ट्रॅक्सी थांबवली की, पुरुष सर्वत्र पाहायला मिळायचे. मात्र आता तुम्ही बुक केलेल्या टॅक्सीच्या ड्रायव्हर सिटवर महिला दिसली तर नवल वाटायला नको. पाहूया महिला दिनानिमीत्त पुण्यातील महिला टॅक्सी ड्रायव्हरची कहाणी...

Happy Women's Day
Happy Women's Day : जागतिक महिला दिनानिमित्त जाणून घ्या राशीनुसार महिलांचे गुण, 'या' राशींच्या महिला असतात अधिक प्रभावी !

ड्रायव्हर सिटवर बसलेली ही आहे श्रध्दा करंजे. श्रद्धा पुण्यातली पहिली महिला टॅक्सी ड्रायव्हर आहे. पुण्यात (Pune) टॅक्सी चालवणारे सुमारे १८ हजार ड्रायव्हर आहेत मात्र आतापर्यंत त्यात एकही महिला ड्रायव्हर नव्हती. श्रद्धाला ड्रायविंगची हौस तर कार चालवण्यात ती तरबेज तसेच तिला १० वर्षांचा अनुभव देखील आहे.

रोजगाराची नवी संधी म्हणून टॅक्सी ड्रायव्हिंग असा विचार करत तिने टॅक्सी चालवायला सुरुवात केली आणि पुण्यातील पहिली महिला टॅक्सी ड्रायव्हर अशी तिची ओळख बनली.

श्रद्धाचा आदर्श घेवून रोजगाराची गरज असलेल्या महिला जेव्हा सहजपणे टॅक्सीचं स्टेअरिंग हातात घेतील तेव्हा आणखी एक चक्र गतीमान होईल महिला दिनानिमीत्त महिला टॅक्सी ड्रायव्हर श्रद्धाच्या कहाणीतून काही महिला प्रेरणा घेतील अशी श्रद्धा आशा करतेय.

सध्या श्रद्धा एका टॅक्सी वाहतूक करणाऱ्या कंपनीमध्ये काही महिन्यांपूर्वी रूजू झालीए. दिवस रात्र कसलाच विचार न करता ती निडरपणे रोज काम करतेय. विविध क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याची जिद्द बाळगणाऱ्या महिलांनीही या रोजगाराचा विचारा करावा असं आवाहन श्रद्धाने केलंय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com