नक्षलवादी Saam TV
महाराष्ट्र

...म्हणून 31 जवानांना मारलेल्या, 20 लाखांचं बक्षीस असलेल्या नक्षली जोडप्याने केलं आत्मसमर्मण

छत्तीसगडमध्ये त्याने विविध 6 मोठ्या नक्षल कारवायात 31 जवान मारले आहेत. छत्तीसगड राज्यातील नारायणपूर जिल्ह्यातील मूळची त्याची पत्नी श्यामबत्तीवर 2 गुन्हे दाखल आहेत.

संजय तुमराम

गडचिरोली : सध्या नक्षलवाद्यांचा (Naxalites) घातपात कालावधी सुरू आहे. मात्र या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. 20 लाख बक्षीस असलेल्या एका नक्षल जोडप्याने पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं आहे. यामध्ये दीपक इष्टाम (वय 34) नामक डिव्हिजनल कमांडरचा समावेश असून, त्याने पत्नी शामबत्ती अलाम (25) सह पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे.

मूळ एटापल्ली तालुक्यातील (Etapalli Taluka) गडेरी गावचा कमांडर दीपक 2001 मध्ये चळवळीत सहभागी झाला होता. त्याच्यावर 16 लाखांचे बक्षीस ठेवले गेले होते. विविध महत्वपूर्ण पदे सांभाळत तो प्लाटून 21 च्या DVC पदावर पोचला. छत्तीसगडमध्ये त्याने विविध 6 मोठ्या नक्षल कारवायात 31 जवान मारले आहेत. छत्तीसगड (Chhattisgarh) राज्यातील नारायणपूर जिल्ह्यातील मूळची त्याची पत्नी श्यामबत्तीवर 2 गुन्हे दाखल आहेत. प्लाटून 21 मधील या नक्षलीवर 4 लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. गडचिरोली (Gadchiroli Police) पोलिसांपुढे 2019 ते आजवर 45 नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

यामध्ये पाच डीव्हीसी, 2 दलम कमांडर, 3 कमांडर व 35 नक्षलवाद्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील आजवरची एकूण आत्मसमर्पित नक्षल संख्या 649 वर पोचली आहे. वीस वर्षे नक्षल चळवळीत काम करून देखील यातील फोलपणा लक्षात आल्याने आपण आत्मसमर्पण करत असल्याची भावनिक प्रतिक्रिया कमांडर दीपक याने याप्रसंगी व्यक्त केली. गेली वीस वर्षे तो स्वतःच्या कुटुंबालाही भेटू शकलेला नाही.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HPCL Recruitment: हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये नोकरीची संधी, पगार २.८ लाख रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Thackeray: काही तासांत ठाकरेंची तोफ धडाडणार; युतीची घोषणा होणार? आधी अन् शेवटी कोण भाषण करणार? A टू Z माहिती..

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Salman Khan : रक्तबंबाळ शरीर अन् डोळ्यात आग; सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान'चं पोस्टर रिलीज, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT