इचोरा येथे मानवीवस्तीत घुसला नर नीलगाय  Prasad Naygaonkar
महाराष्ट्र

इचोरा येथे मानवीवस्तीत घुसला नर नीलगाय

यवतमाळ जिल्ह्यातील इचोरा गावात भटकलेला एक नर नीलगाय मानवीवस्तीत घुसला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रसाद नायगावकर

यवतमाळ : पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर प्रत्येक जीवाचे संरक्षण करणे आत्यंतिक आवश्यक आहे. निसर्गात प्रत्येक जीवास अनन्यसाधारण महत्व आहे. यवतमाळ जिल्ह्यातील इचोरा गावात भटकलेला एक नर रोही अथवा नीलगाय ( ब्लू बुल ) घाबरलेल्या अवस्थेत रामभाऊ घोटकर यांच्या बैलाच्या गोठ्यात घुसला. A male Nilgai invades a human settlement In Ichora

त्याचे टोकदार शिंग पाहून कोणीही घाबरेल असा तो रोही होता. गावातील भटके श्वान पाठलाग करत असल्याने तो गावात सैर भैर पळत होता. अशातच गावामध्ये लयीत देखील नव्हती. त्यामुळे त्याला कुठे ठावठिकाणा सापडेनासा झालेला अश्यातच गावातील एका जागरूक नागरिकाला हा नर नीलगाय दिसला. त्याने वन्यजीव प्रेमींना या बाबतची माहिती दिली.

त्यानुसार लगेच लगेच स्थानिक कोब्रा ऍडव्हेंचरचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या मदतीने त्यांनी या नीलगायला पकडून त्याला सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

अलीकडच्या काळात होत असलेली जंगल तोड, मानवाकडून वन्य प्राण्यांच्या नैसर्गीक अधिवासात होत असलेला हस्तक्षेप या सर्व बाबींमुळे वन्यप्राण्यांचे मानवीवस्तीत येण्याचे प्रमाण वाढले आहे. नीलगायची सुटका केल्यानंतर वन्यप्राणी आणि मानव संघर्ष टाळण्यासाठी आपण काय केले पाहिजे या संबंधी चर्चा करण्यात आली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र लढण्याचा प्रस्ताव

Railway Fare Hike: मुंबई-पुणे प्रवास महागणार का? आजपासून रेल्वेचे नवीन तिकीट दर लागू, वाचा किती झाली वाढ

Heart Attack: झोपेतून उठताच थकवा जाणवतो? असू शकतं हार्ट अटॅकचं लक्षण, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Kalyan Dombivli : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर २७ गावांचा एल्गार; मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा

Kitchen Hacks : रोज १५ मिनिटांत या सोप्या टिप्सने घर झटपट आवरा, तासनतास वेळ लागणारच नाही

SCROLL FOR NEXT